तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

हे रोचक कॉकटेल आहे!
२ वर्षांपूर्वी पुण्यात, एका नेहमीच्या अड्ड्यावर निरनिराळ्या निमित्ताने घरात आलेल्या आणी तळाशी थोडी थोडी शिल्लक असलेल्या सगळ्या दारवा (वोडका, टकीला, white rum, व्हिस्की, आणि त्याच दिवशी आणलेली red wine आणि स्कॉच एकत्र करून प्यायली होती यजमान.. इच्छा असून मला try नाही करता आली.. बघू आता कधी पुन्हा अशी वेळ येतेय ते!

बिअर कशाबरोबर मिक्स करायचे आपल्याला सवयीचे नाहीये त्यामुळे जरा ऑड वाट्त असेल पण बिअर कॉकटेल्स असा सर्च केलात तर पोत्याने रेसिप्या मिळतील.

होय सगळ्यात डेडली तेच वाटत होते
टकीला आणि ऑरेंज किंवा पाईनपल अगदीच चालू शकते पण बिअर आणि ज्यूस एकत्र कधी इमाजिनल पण नव्हतं

करके देखो. आम्ही या कॉकटेलचं नामकरणही केलंय.
जामखुश.
जिच्या घरी केलं तिला आम्ही जामखुश म्हणतो हे एक कारण आणि मग हा जाम पिऊन खुश व्हायला होतं वगैरे व्युत्पत्तीही आहे.

आरारांच्या दारुवरच्या पोस्ट जबरदस्त! सेपरेट लेख झालाच पाहिजे.

काजूच्या फेणीचे दर्दी नाहीत का कोणी इथे? अर्थात फेणी ही ड्राय किंवा केवळ पाणी घालून प्यावी. सोडा किंवा कोणत्याही प्रकारच कोल्ड्रींक मिक्स करायला गेलात की गंडलीच म्हणून समजा. टकीलाच्या शॉट्ससारखे फेणीचे दोन-तीन शॉट्स लागोपाठ मारुन बघा, खतरा अनुभव देते.

फेणीविषयी भाऊंनी एक पोस्ट टाकली होती ना. ह्या मधल्या गदारोळात हरवल्यासारखी झाली असेल. पण आहे. मी स्वतः अनभिज्ञ आहे त्या बाबतीत.

मी सरळ आहे. ही असली माहिती ठेवून मला काय फायदा? होमो असण्याचा आणि जातीचा संबंध काय?>>>>>>

जोई आठवला Rofl

आता वाचते बाकिचे प्रतिसाद

आ.रा.रांच्या पोस्टी भारी आहेत.

दारूवर फार प्रेम नाही त्यामुळे माझ्याकडे लिहिण्यासारखं काही नाही... नी ने बनवलेले वोडका जेली शॉट्स आठवतात

हा धागा वाचुन बरीच करमणुक झाली

रॉयल स्टॅग ते बॅगपायपर कुठलीही आयेमेफेल (इंडियन मेड फॉरेन लिकर) ९० + मसाला छास १००-१२० मध्ये(नुसतं जिरंपूड काळंमीठ लावलेलं मसाला ताक, गुजरात -राजस्थान - हरयाणा फेमस)
(जास्त कडसर लागलं तर ताकाचं प्रमाण वाढवावं)

वाचायला/ऐकायला किळसवाणे वाटेल (मला वाटले होते) पण अफलातून चवीचे असते, ह्या उन्हाळ्यात पहिल्यांदा ट्राय केलं अन वेडाच झालो.

आरारा, मस्त पोस्ट्स. बघू कायकाय करता येतं ते!

मी नेहमी वोडका sprite पिते. गेल्यावेळी sprite संपले नी नुसती ब्रीझर होती घरात, cranberry. मस्त लागली वोडका बरोबर. मग हेच कॉम्बो सुरू.

काजूच्या फेणीचे दर्दी नाहीत का कोणी इथे?<< फेणी नाही पण मी हुर्राक प्रेमी आहे.
गोव्यात दोन ट्रिपा झाल्या त्यामुळे हा उन्हाळा हुर्राकविना गेला नाही.

हुर्राक लिम्क्यातूनच प्यावी म्हणतात. गोव्यातच एक तान नावाचे सॉफ्टड्रिंक मिळते. त्याचा लेमन फ्लेवर हा लिम्कापेक्षा मस्त आहे. (स्प्राइटला मी गिनत नाही. ते फार गोडुस असते.) तर या तानमधून हुर्राक घ्यावी.
किंवा मग साधं पाणी आणि लिंबू किंवा पाणी-लिंबू-सोडा

ही पण हळूहळू प्यायची गोष्ट आहे. ठेस व्हायला पिणे हा उद्देशच मूर्खपणाचा आहे.
हुर्राक लगेच लागत नाही. थोड्या वेळाने लागते. दर्दी लोकांना वाईन आणि इतर दारवांच्या तरलतेतला फरक कळत असेल. ही अजून तिसर्‍या प्रकारची तरलता आहे.

कोळपेवाडीचा कोणता ब्रँड? शुगर फॅक्ट्रीत युज्वली मद्यार्क उर्फ एथिल अल्कोहोल बनते. ते बहुतेकदा मळीपासून बनवतात.

हुर्राक सुद्धा काजुचीच असते ना?
माझे फेव्हरेट म्हणजे १ भाग व्होडका+२भाग नारळपाणी+रोस्ट केलेल्या नारळाच्या मलईचे बारीक तुकडे. एकदम भारी.

चिल्ड पाणी ( म्हणजे ग्लासच्या बाहेरून दव जमेल इतकं चिल्ड) + बकार्डी लिमोन (फ्रेश लाईम) त्यात बर्फ वगैरे काही नाही तर अतिशय पातळ (जवळपास पारदर्शक) अशी एक पिवळ्याधम्मक सणसणीत लिंबाची चकती.

हुर्राक >>> आमच्या मागील ट्रीप मध्ये एका सावंतवाडी कराने आण्लेली. ते लोक हुर्राक जिरा सोड्यात प्यायचे.

हुर्राक सुद्धा काजुचीच असते ना?.... हो.फेणीच्या आधीचा अवतार आहे म्हणे.दर्दी सांगतीलच.गोव्यात लहान मुलांना सर्दीतापावर द्यायचे.

सोनू - व्होडका आणि ब्रिझर अफलातून कोम्बो आहे, पण बेताने प्यालो नाही तर विमान उडत जोरात
माझे दोन्ही वेळला झालाय असं आणि दुसरे दिवशी जबरा हंगोव्हर

त्यापेक्षा मग व्हिस्की भरपूर बर्फात घालून प्यावी, जीवाला बरं वाटत आणि दुसरे दिवशी त्रास होत नाही

माझ्या गावठी कॉकटेल मधला फसलेला प्रयोग म्हणजे घरी कोकम सरबत केलेलं, त्यात व्होडका मिक्स करून प्यायलो. व्होडकाच्या उग्र चवीमुळे कोकमची टेस्ट झाकली गेली पण पुढच्या वेळी व्हिस्की मिसळून पहिली पण अजून भिकार लागली.

यात कुणाला काही भन्नाट उपाय सुचत असेल तर सांगा

यात कुणाला काही भन्नाट उपाय सुचत असेल तर सांगा

टकीला पिताना हाती लिंबाची फोड अन बेचक्यात मिठाऐवजी जर हाती शॉट, बेचक्यात मीठ अन नंतर खायला कोकम (आमसुले) ठेवली तर?

वांडा,
फ्रेंच तकीला शॉटची पद्धत ठाऊक आहे का? Wink

चँप, असाच माझा एक प्रयोग जाम भिकार झाला होता. कैरीचा रस काढून मार्गारिटा हिट्ट झाल्यावर (रिक्षा - माझ्या लेखनात रेस्पी मिळेल) पन्ह्याचे उद्योग करून बघायचा विचार आला (अवदसा सुचली वगैरे!). आयुष्यात पहिल्यांदा मी पन्ह्याचे कॉन्सन्ट्रेट घरी केले होते. त्यामुळे वेगळे पन्हे करायची गरज नव्हती.
तर कॉन्सन्ट्रेटात पाणी घालून पन्ह्याप्रमाणे पन्हे केले. मग खालील सर्व गोष्टीत ते घालून बघितले. सगळे इक्वली बकाल लागले.
१. व्होडका
२. व्होड्का + सोडा
३. व्होडका + मिरची
४. व्हाइट रम

तस्मात शिजवलेल्या फळाच्या चवीची आणि दारूची कुण्डली जमत नाही. हे मान्य केले.

कोकम सरबतात भयाणच लागणार.

Pages