AIPMT परिक्षा एक रम्य प्रवास (भाग-१)

Submitted by Siddharth Pradhan on 20 June, 2018 - 04:05

१२ वी च्या परिक्षा नुकतयाच संपल्या होत्या तरी पण अभ्यास मात्र चालूच होता करण .AIPMT (All india pre medical test)ची परिक्षा १ मे ला होणार होती. अजुनही वस्तीगृहात राहत होतो गावी घरी जाण्याच्या अाठवणी व्याकूळ झालो होतो. परिक्षा तोंडावर आल्यामुळे वाचनालयातच दिवस जात असे मित्रासोबत फिरणे,खळणे,गप्पा मारणे,हे तर संगळ विसरच पडला होता.वस्तीगृहातील सर्व मित्र गावी जात होते आणी मी ऐकटाच राहिलो होतो. साडेसाहची चर्च ची घंटी वाजली आणी मी जेवण करून रूम मध्ये आलो आणी अभ्यासात मग्न झालो.तेवढ्यात मोबाईलचा आवाज उठलोआणी पाहिले तर काय ?AIPMT परिक्ष्याचा परिक्षा पत्र आल होता व माझे परिक्षा केंद ठाणे लागले होते.
मी नेट कँफे धाव घेतली परिक्षा पत्र काढले आणी अभ्यास थोडा दुर सारला.ठाणे ला कधी जायंच याच मनात कुतूहल चालू लागल. मी या पूवी मुंबईकडे कधीच गेलो नव्हतो. घरची परिस्थीती बीकट असल्यामुळे ऐका रफ कोर्या कागदावर जाणे-येणे सर्व खर्च चा अंदाज आखला .परंतु ठाणे शहरामध्ये राहण्याची सोय मात्र कुणाकडे लागत नव्हते.अंदाजपञकाकडे पाहता पाहता रात्रीचे१२ वाजले रूमच्या बाहेर आलो आणी वस्तीगृहाच्या गेट वर गेलो पाहतो तर काय सुभेदार काका पण झोपले होते.पुन्हा रूम मध्ये आलो झोपी गेलो. परिक्षा सकाळी १० ला म्हणुन एक दिवस अगोदर जाणे गरजेचे होते.आणी एक रात्रभर ठाणेमध्ये कुठ राहायचं ही सर्वात मोठा प्रश्न माझ्या समोर होता.पुढच पुढे बघता येईल या विश्वासावर २९ एप्रिलला संध्याकाळी मी रेल्वे स्टेशनकडे निघालो नंदिग्राम एक्सप्रेसचा औंरगाबादचा वेळ १०:३० मिनिटे होता मी ९ वाजताच निघालो.अंदाजपत्र कानुसार रिक्शान न जाता पायी जात होतो
एक तास पायी चालल्या नंतर रेल्वे स्टेशनवर पोहचलो.तिकीट काढले आणी रेल्वे स्टेशनवर बसलो.अजूनही अर्धा तास बाकी होता नंदिग्राम एक्सप्रेस यायला.गाडीचा आवाज कानावर पडला आणी उढलो.गाडीला खुपच गर्दि होती कारण मी व्दितीय श्रणीच्या डब्यामध्ये कधीच बसायला जागा मिळत नसते हे मलाही माहित होते त्यामुळे दरवाज्यातच बसलो आणी नंदिग्राम एक्सप्रेस औंरगाबादहून-मुंबईकडे रवाना झाली.तब्बल सहा तासाच्या प्रवासानंतर मी ठाणे शहरात पोहचलो.सकाळचे ५ वाजले होते.रात्रभर प्रवास केल्यामुळे झोप डोळ्यात खुप साचली होती.स्टेशनवर उतरलो बाहेर अंधार असल्यामुळे एक तास.स्टेशनवरच झोपलो.डोळे उघडले तेव्हा खुप लोकाची कलकल चालू होती.सकाळचे सहा वाजले होते.मुंबईकडे सकाळी कामावर जाणार्या माणसाची सर्व गर्दि रेल्वे स्टेशनवरच असते.मी प्रत्येक प्रवासाचे हावभाव निरखून पाहत होतो.खंरच बाबा सांगायचे की मुंबई बे शहर गजबजल्याल आहे.प्रत्यकामागे घाई असते. हे मला आता समजले. बाहेर सुर्याचा प्रकाश पडला होता.मी जीन्यावर गेलो तेथून तिन मार्ग होते शहरात प्रवेश करायचे ते खुप लांबवर दिसत होते.काही माहीत म्हणून एका व्यकतीली विचारले बसस्थानक कुठ आहे? विचारले त्यानी सरळ जा आणी डावीकडे वळा थोड्याच वेळात मी शहर बसस्थानकावर पोहचलो.सावरकर नगरची गाडी पकडली आणी निघालो.ठाणेपासून १५ की.मी अंतरावर मी सावरकर नगरला आलो.बँगमधून परिक्षा पत्र काढले आणी ते परिक्षा केंद एका तलावाजवळ होते.मी त्या महाविद्यालयाची खात्री करून घेतल
ठाणे शहराच्या टोकाला परिक्षा केंद येईल कधी स्वप्नातही विचार केला नव्हता.जवळपास सर्व गल्या मी फिरुन पाहिल्या.तेथूनउंच डोंगर व डोंगरावरचे मंदीर दिसत होते.मी डोंगराकडे पाहिले आणी म्हटल की,आजचा दिवस इकडेच काढायचा.या विचाराने किरानादुकानावरून पाणयाची बॉटली खाण्यासाठी काही घेतले व निघालो.मला एकटे माळरानात फिरणे लहानपणापासून आवडायचे.डोंगराच्या पायथ्याशी लोक कचरा टाकत असल्यानी खुप दुर्गधी पसरली होती.आकाशात असंख्य कावळे करकस मारत फिरत होते.डोंगरावरून व्यायाम करून लोक घरी जात होते.आणी मी वरती जात होतो.थोडे वरती गेल्यानंतर एक हिरव्या रंगाची पाटी दिसली त्यावर लिहलेल होत की, "मामा-भान्जे अभयरण्य" व खाली लिहलं होत कि,संध्याकाळी सहाच्यानंतर डोंगरावर चढू नव्हे व वाघ ,चित्ता पासून सावधान....!
हे वाचून मी हादरलोच माझ्या मनात विचार बदलला आणी स्वत:ताला संध्याकाळी लॉज करून राहू या विचाराने डोंगरीवर चढू लागलो.डोंगराच्या तिसर्या टप्यात येऊन पोहचलो.मंदिर अजूनही वरती होते मात्र तीसर्या टप्यात एक दर्गा होता व तेथे पिण्याच्या पाण्याची सोय होती मी तिथली एक चटई उचलली आणी झाडाखाली जाऊन बसलो.बँगमधून सर्व पुस्तक काढली पुस्तकावरून शेवटची नजर फिरवून घेऊ या हेतूने अभ्यासाला लागलो. खरं तेव्हा वातावरण खुप रम्य होत कबुतराच्या पिल्याची किलबिल चालू होती.दाने टिपण्यासाठी पक्षाचा थवा बसला होता.झाडावर खेळणारे माकडाची लहान पिल्ली खेळत होते दुरवरून कानावर येणारा कोकीळ पक्षाचा आवाच ऐकून माझे मन प्रसन्न झाल.मी अभ्यासात मग्न झालो आणी सांयकाळचे ४ कधी वाजले कळालच नाही.मनात सहज विचार आला कि,आपण उद्या थोडेच आहोत म्हणुन माझी आठवण म्हणून काय करायचे ह्याचा विचार करू लागलो
तेवढ्यात मला एका झाडाचे खोड दिसले त्याला खुप मोठे छिंद्र होत त्यामध्ये झाडाची भरपूर वाळलेली पाने साचली होती ते पाने मी काढले.आणी पाहत तर काय तिथे पावसाचे पाणी सुध्दा जाऊ शकणार नाही अशी ती जागा होती.या खोडामध्ये आपली आठवण म्हणुन काहीतरी ठेवायचे मी जेव्हा मोठा होईल आणी कधीतरी भविष्यात बालपणची आठवण म्हणुन येईल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
तुम्ही त्र ऐवजी ञ लिहिलंय, ते बदलाल का?

छान अनुभव
जिद्द अन् कठोर परिश्रम करण्याची चिकाटी आवडली

सिद्धार्थ,
लेख वाचायला सुरुवात केली. तो त्र आधी नीट लिहा पाहू.
ञ हे वेगळे अक्षर आहे. हा स्वर आहे, त्र हे त व र हिब्दों अक्षरे मिळून बनलेले जोडाक्षर आहे.
किमान मायबोलीवर शुद्धलेखन नीट असावे, ही अपेक्षा.

@सिद्धार्थ
नवीन लेखनाबद्दल अभिनंदन.
त्र = t+r+a कॉपी-पेस्ट केले असेल सुधारू शकता.

@आ.रा.रा. साहेब,
नवीन आहे. घ्या जरा संभाळून. Light 1

छान लिहिलंय.. Happy
काही टायपोज आहेत ते सुधारता येतील. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

<<< Aipmt पास झाल्यावर जे काय बनतात तिथे चुका सांभाळून घेता येत नाहीत >>>
Doctors are humans, too. डॉ. अतुल गवांडे (की गवांदे?) यांचे "Complications: A Surgeon's Notes on an Imperfect Science" हे पुस्तक जरूर वाचावे, असे नम्रपणे सुचवतो.

पहिला प्रयत्न छान आहे.
वाचतोय.. लिहित रहा Happy

फारच अवांतर आहे पण, अतुल गवांदेंचा मी पण फॅन आहे. सगळीच पुस्तकं कॉम्प्लिकेशन आणि बिईंग मॉर्टन मुख्यत्वे सगळ्यात आवडली. आजच ते बेझोज, बर्कशायर आणि जे पी मॉर्गन च्या नव्या हेल्थ केअरचे सीईओ म्हणून निवडले गेलेत. दुसरीकडे बोलू अर्थात आता.