तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

मी भास्कर यांचा फेक आयडी नाही. तसेच त्या दोन स्त्रियांपैकी मी कुणीही नाही. माझे नाव मधु, मधुरा असे काही नाही. कृपया मला मधुर असेच म्हणावे. शेवटी आपल्या सर्वांची मर्जी. मी डॉक्टर नाही.

क्रॅप्स, अमितव,

जौद्य हो. हे/ह्या एंटायर पोलिटिकल सायन्स चे/च्या पदवीपूर्व विद्यार्थी आहेत. अजून डॉक्टरेट मिळायला वेळ आहे.

तसेच ते आपले दुसरे ते हे.
ते एकतर गटारीचे पाणी विथ लॉट्स ऑफ नॉनव्हेज, किंवा डायरेक्ट दिडकीची, असे आहेत. Lol

भभा म्हणजे रून्मेष आहे काय Wink
>>>

हो.
आणि हे मी वेगळा धागा काढून मनोगत लिहिलेय त्यात घोषित केले आहे.

अहो भास्कर आणि मधु, बलात्कार विसरलात की तुम्ही. ते दारू पिऊनच तर होतात ना!
>>>
अमितव
नक्की काय म्हणायचे आहे?
बलात्कार दारू न पिताही होतात म्हणून दारू वाईट नाही?
सिरीअसली... हा असा मुद्दा आहे?

'मी सरळ आहे'
'होमो सेपियन’
आणि
'नशीब मी होमो इरेक्ट्स बद्दल नाही विचारलं’

हसुन हसुन पुरेवाट!!!
क्षणभर धाग्याचा विषय काय तेच विसरलो. चालू द्या!

नाही नाही, दारू पिऊन बलात्कार होतात म्हणून ती वाईट आहे.
>>>

बलात्कारच कश्याला, मारामारी, शिवीगाळ, घरगुती हिंसाचार, लोकांना गाडीखाली चिरडणे, दारूच्या नशेत वा अमलाखाली माणूस काय काय करतो आणि कुठल्या पातळीला जाऊ शकतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कारण दारूने तुमच्या मेंदूचा ताबा घेतला असतो. तुमची अक्कल त्या तेवढ्या वेळेपुरता तुमची नसतेच. तुमच्या तोंडून दारू बोलत असते आणि तुम्हाला तीच आपल्या तालावर नाचवत असते. ज्याला किक लागणे असे बोलतात ती दारूची गुलामी असते.

धम्माल सुरुय Lol
धागा सहस्त्री खेळी करणार बहुतेक Wink
दारुविरोधी आहे मीसुद्धा त्यामुळे धाग्याच्या शीर्षका नुसार चर्चेत सहभाग नाही __/\__ पण अवांतर चर्चा फूल ऑन इंटरटेनिंग Lol
एकेक चौकार षटकार लगे रहो भाईलोग Wink

"बलात्कारच कश्याला, मारामारी, शिवीगाळ, घरगुती हिंसाचार, लोकांना गाडीखाली चिरडणे, दारूच्या नशेत वा अमलाखाली माणूस काय काय करतो आणि कुठल्या पातळीला जाऊ शकतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे."

==> या गोष्टी दारू पिणाऱ्या लोकांकडून जितक्या झाल्या असतील त्याच्या कैकपट अधिक न पिणाऱ्या लोकांकडून झाल्यात. देवदर्शनला जाणाऱ्या किंवा करून परतणाऱ्या भाविकांना अनेकदा अपघात झालेत ते नक्कीच दारू पिलेले नसतात, धार्मिक उन्माद असलेल्या दारूला स्पर्श न करणाऱ्या झुंडीनी कित्येकांची कत्तल केली आहे, हिटलर दारूला स्पर्श करत नव्हता त्याने लाखो ज्यूंना ठार केले आहे.

मसालेदार नॉनव्हेज खाल्लं की दारू प्यावी वाटते आणि दारू प्यायली की हे वरचे चाळे घडतात. नॉनव्हेजला बंदी घाला, मुळावर घाव घाला की सगळे सुधारतील. झोपेच्या गोळ्या घेतल्या की त्या नशेत रेशिअल स्लर तोंडातून निघतात ती त्या झोपेच्या गोळ्यांची चूक असते. हल्लीच्या पोरी रिव्हीलिंग कपडे घालतात मग बलात्कार घडतात ती त्या कपड्यांची आणि मुलींची चूक.
छान आहे. चालू द्या.

मी म्हणतो मदिरा प्यायला शिवाय ती वाईट का चांगली? किंवा सामिष खाल्याविना ते चांगले की वाईट हे कसे ठरवू शकतो आपण?

आत्मानुभुती घ्या आणि मग ठरवा!

मी आजवर सामिष खाल्ले नाही कधी त्यामुळे मी त्याला आजवर वाईट कधीच म्हणालो नाही माझा अधिकारच नाही त्यावर बोलण्याचा. मसालेदार जास्त तिखट खाल्ले की त्रास होता पचनसंस्थेला ती अनुभुती घेतली आहे त्यामुळे अश्या पदार्थांचा नियमित आहार घेत नाही!
रोज सकाळ संध्याकाळ कांदाभजी, बटाटेवडे तळलेल्या मिरच्यासोबत खा त्रास होणारच!

मी २० वर्षे तंबाखू खात होतो आता गेल्या १० वर्षांपासून पुर्ण बंद एक कण नाही खात. मला माहिती आहे तंबाखू चांगली नाही प्रकृतीला. मी खाण्यार्‍याला सांगू शकतो की तंबाखू सेवन वाईट!

"तुम्ही दारू कशी पिता?' - असा विषय आहे धाग्याचा. 'प्यावी की नाही', 'तुम्ही पिता की नाही', 'तुम्हाला पटतं की नाही' असा कुठलाच नाही. उगाच विषयाला फाटे फोडायची गरज नाही.

Irony म्हणजे, इथे विषयाला फाटे फोडणारे, इतर धाग्यांवर जाऊन 'विषयाला धरून बोलण्याचं' आवाहन करतात. Happy

मुळात दारु पिणे न पिणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पिणार्‍याला दारु वाईट आहे, दारुचा ग्लास करी संसाराचा नाश वगैरे उपदेश द्यायचा कुणालाही कसलाही हक्क नाही. तेंव्हा स्वत: गटारीचे पाणी मिक्स करुन दारु ढोसणार्‍यांनी इतरांना दारु पिऊ नका असे सांगणे हि शुद्ध नौटंकी आहे ह्या इतर सदस्यांच्या मताशी मी संपूर्ण सहमत आहे.
---
मला आठवते त्याप्रमाणे दारुबंदीवर चित्रपटातून प्रवचन द्यायची पहिली सुरुवात आचार्य अत्रे यांनी, त्यांच्या 'ब्रांडीची बाटली'(बहुतेक १९३८) या सिनेमातून केली होती. त्या सिनेमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल दारुबंदीवर भाषण देतायत असा एक प्रसंग त्या चित्रपटात होता. आता तो चित्रपट येऊन इतकी वर्षे लोटली तरी लोक दारु पितायतच, तर आता उपदेश, प्रवचन देऊन काय फरक पडणार आहे ? पिऊदे आणि मरुदे तिच्याआयला, नाहितरी भारताची लोकसंख्या खूपच वाढलेय !

स्वतः अत्रे बेवडा म्हणावे इतके अट्टल दारूबाज होते. स्वतः गडकरींनादेखिल दारूचे व्यसन होतेच. या न्यायाने इथले सन्माननिय ऋआयडी भभा टल्ली होऊनच दारूविरोधी पोस्टस लिहित नसतील कशावरून मंडळी??
भभा, कृहघ्या..

मी सरळ आहे'
'होमो सेपियन’ >>> बाबी /बार्बी झाले, विपर्यास / विर्यपास झाले, एकूणात मुद्दाम असे काहीतरी घोटाळे करून इनोद करण्याचा प्रयत्न दिसतोय.
चालू द्या! प्रत्येक मालाला गिर्हाइक असतेच.

दारू सोबत चखना हवाच.
तमाशात झिलतोडे, मावशीचे जोक्स हवेत.
तसे माबोवर हे ही हवेच.

***

तर,
होस्टेलची दारू.

३ इडियट्स नावाचा पिक्चर आवडण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यात दाखवलेली होस्टेलगिरी. मग ती रॅगिंग असो, की पाण्याच्या टाकीच्या पायर्‍यांवर प्रत्येकाचा वेगळा ग्लास घेऊन, आपापल्या खिशातला चखना खात प्यालेली ओल्ड मंक असो. अन सोबतच्या गप्पा!!

स्वस्तात मस्त दारू म्हणजे रम. अन होस्टेलला मेन प्रॉब्लेम असतो तो नानाजीचा. त्यामुळे रम सगळ्यांना परवडणारी दारू. तशी आमच्याकाळी ब्लूबर्ड नावाची जीन १८ रुपयांत हाफ मिळत असे. ४॥ रुपयांत विल्स लाईट्सचं पाकिट. पण पगारच ४८० असेल तर ही चैन परवडावी कशी? वरतून जिन प्यायची म्हणजे किमान लिम्का हवी सोबत. तेव्हा त्याहूनही स्वस्त म्हणजे रम. तशी देशी त्याकाळी २ रुपयांत क्वार्टरची बाटली भरून मिळे. बाटली स्वतःची नेली, तर १ रुपयात. (ही कधीच प्यालो नाही. फक्त थेरी पास विथ फर्स्ट क्लास बर्का.)

रम कशीही पिता येते.

पाण्यात. गरम पाण्यात, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरचं टॅप वॉटर रम प्यायला चालतं. बर्फ वगैरे नाटक नाही. असलाच तर बोचत नाही, पण नसण्याने काडीचा फरक पडत नाही. कोकाकोला, थम्बसप वगैरे कधीकाळी रईसी असली तर करायच्या गोष्टी. गेला बाजार सिप बाय सिप कोरडी प्याल्यानेही फरक पडत नाही.

एका कॉलेज इलेक्शनला आमचा जीएस निवडून आणल्यावरच्या मिरवणूकीत ढोलताशांच्या गजरात कुणीतरी ओल्डमंकची बाटली हातात दिली. मी काउंटींग ऑफिसर असल्याने कोरडाच होतो, लोक बाहेर आधीच चालू पडलेले. मग लेवल येण्यासाठी घाईत डायरेक्ट दोन चार घोट कोरडे हाणले, अन जी आग झाली, ती पळत जाऊन बाथरूमच्या बेसीनच्या नळाला तोंड लावून पाणी ढसाढसा प्याल्यावर कशीबशी थांबली.

मुद्दा काय, तर अशीही पिता येते Wink

बरं चव म्हणावं तर गोडसर असते. ओल्डमंक पेक्षा मॅकडॉवेलची चवीला माईल्ड. आजकालची बकार्डी ब्लॅक जास्तच चांगली. (पण तीही बहुतेकदा IMFL अर्थात इंड्या मेड फॉरेन लिकर निघते. याबद्दल नंतर) त्यामुळे उगाच चखन्याला फार काय आणावं लागत नाही. एकदा काळं पडलेलं केळ धकून गेलेलं चखना म्हणून. नाहीतर रूमवर घरून आलेला चिवडा/चकल्या/शंकरपाळी जो काय खाऊ ज्या कुणाच्या रूमवर सापडेल तो. अन नंतर जेवायला मेस किंवा लडकत मावशीचा डब्बा. खिसा गरम असेल तर स्टेशनवरून आणलेली अंडा भुर्जी किंवा खिमापाव.

ग्लास प्रत्येकाने आपापला आणायचा. 'एलिट्स' काचेचा आणत. पण जनरली. स्टीलचा भारी पडतो. म्हणजे मग नाटक करणारी काही मंडळी असते, त्यांनी लाथा मारल्या तरी फुटत नाही. हो. होस्टेलची दारू पिणं हा सामुहिक कार्यक्रम असतो. किमान ३-४ तरी हवेतच. त्यात एकाने नाटक केलं नाही तर दारू पिण्याची काय मजा नाही. फक्त दोन लोक पीत असले तर समजून घ्या की एकाचा प्रेमभंग झालाय अन दुसरा जिवलग त्याची समजूत काढतोय. तिथे डिस्टर्ब करायला जायचं नाही.

एकतर बहुतेक सगळेच नवखे दारू पिणारे असतात, ३०-६० मधेच विमानं उडायला लागतात. दोस्तीच्या आणाभाका, अन रात्ररात्र रंगणार्‍या गप्पा, हे खरे त्या रम पिण्याचे कारण. अन मुख्य म्हणजे, 'भावा, दारू प्यालोय, खोटं नाय बोलणार' ही कन्सेप्ट. त्यासाठी प्याली/पाजली जाते.

साडेचार वर्षांच्या यूजी होस्टेल लाईफमधे फारतर १०-१५ वेळा दारू प्यालो असेन. त्यातही बहुतेकदा बियर, किंवा जिमलेट, अन काहींदा रम. खूप बजेटरी प्लॅनिंग करून मग पिण्यात येई. थोडी जास्त पिणे, अन चवीने पिणे पगार सुरू झाल्या नंतरच्या काळातले.

उसाच्या रसापासून रम बनते. त्यामुळे उसाच्या रसात घालून रम पिणे हे काँबो म्हणजे लय भारी.

बीजेच्या लेडिजहोस्टेल कडून जीपीओ कडे जाणारा रस्ता पुढे कंटिन्यू केला की एक 'चौपाटी' नामक प्रकार होता. त्यामागे बैरामजींचा बंगला होता, तिथे आता बहुतेक मॉल किंवा तत्सम मोठी बिल्डिंग झालिये. पण त्या काळी चौपाटी होती, म्हणजे रस्त्याच्या कडेला छोटे छोटे ज्यूस, तंदूरी, चाट असले स्टॉल्स. त्यातल्या एका उसाच्या रसवाल्याकडे आमच्या काही शौकीन मित्रांनी रमचा खंबा देऊन ठेवलेला असे. स्पेशल ऑर्डर दिली की तिथेच स्मॉल पेग मिक्स करून रस मिळे. तो प्यायचा अन मग राईट टर्न मारून एम्पायरला सिनेमा.

एकंदर रम अन होस्टेलच्या आठवणी यांचं अतूट नातं आहे.

आजही कधी डार्क रम नॉर्मल पाण्यात घेऊन सोबत अमूलचं चीज चाखत गप्पा मारल्या तर नॉस्टाल्जिआ आटोपत नाही..

contd..

व्हाईट रम, पायनॅपल, नारळपाणी/नारळाचं दूध हे काँबो म्हणजे फेमस कॉकटेल पिना कोलाडा. मेमरीज ऑफ सनी बीचेस अँड लीजर. लॉट्स ऑफ सीफूड.

रम खरं तर समुद्राची दारु आहे. Pirates and rum..

दुसरं फेमस कॉकटेल म्हणजे डायक्री/डेक्री daiquiri. रममधे लिंबू किंवा तत्सम आम्बटपणा, अन काहीतरी गोड मिक्स केलं, की ही बनते. उसाचा लिंबू आले मिश्रीत रस थोडा जास्त आम्बट करून त्यात रम घातली की बनते, ते हेच दुसरे पॉप्युलर कॉकटेल.

तशी रम बेस्ड कॉकटेल्स अनेक आहेत. हॉट टॉडी सहसा व्हिस्कीने बनते, पण रम घालूनही मस्त लागते. थंडीत प्यायची अक्षरशः गरम दारू. ग्लासात मध घालावा, त्यात ४५ मिलि रम, एक दालचिनिची काडी, वरतून गरम वाफाळते पाणी. काही लोक कोरा चहा घालतात, नुसत्या पाण्याऐवजी. मस्स्त लागते. इथे डार्क रम वापरायची.

व्हाईट रम वालं अजून एक भारी कॉकटेल म्हणजे एलआयआयटी. लाँग आयलंड आईस्ड टी. ५ पांढर्‍या दारवा. अन एक गोडवा. व्हाईट रम, जिन, व्होडका, तकिला अन ट्रिपल सेक, ही शेवटची साधी अन दारूसकट दोन्ही मिळते, अन गोड असते. कॉइन्त्र्यु आणली तर संत्र्याची चव लागेल, पण सालासकट कडू. मी टाळतो.मग भर्पूर बर्फ अन कोला. ग्लास मात्र किमान ३०० मिलीचा हवा. भल्ला मोठ्ठा. हे कमालीचे सुंदर कॉकटेल आहे.

तशीच एक नारळाच्या चवीची मालिबू रम. रम कसली, लिक्युअर आहे ती. हिप फ्लास्कमधे निम्मी मालिबू अन निम्मी व्हाईट बकार्डी रम भरली, की लो डोस सस्टेन्ड रिलीज दारू पिण्याची मज्जा सहलींत अनुभवता येते.

रम पिण्याच्या या काही पद्धती.

दोस्त जमवावेत. खड्ड्यातल्या निखार्‍यात कोंबडी भाजत घालावी. सोबत रम असावी. गप्पाटप्पा चालू द्याव्या..

हो. रमसोबत फक्त गप्पा. बॅकग्राउंडला गझला वगैरे रमसोबत नाही. त्यासाठीची दारू वेगळी. कोणती, ते पाहू,

क्रमशः

झकास आ.रा.रा.

लाँग आयलंड आईस्ड टी प्रकाराला जवळची (मित्र) मंडळी असावीत असं माझं मत (अनुभवामुळे असेल कदाचित), कारण ती मस्त चढते. अशा वेळी उगाचच मोजून-मापून वागण्या-बोलण्याचे शिष्टाचार नको वाटतात. म्हणजे काही करायचं असतं असं नाही, पण काहीही न करता बसून रहायला सुद्धा अनौपचारिक कंपनी बरी पडते.

Daiquiri हा प्रकार क्वचित प्यायलोय. मला थोडासा आयरिश कॉफी सारखा वाटला. क्रिमी आणी गोडसर.

अरररा - जबराट लिहले आहे, सगळे चित्र आजी अनुभव डोळ्यासमोर आले.
भन्नाट
कॉलेजच्या गोष्टीवरून आठवले आमची सहल गेलेली सिमला कुलू मनाली ला ऐन थंडीत. तुफान वाट लागलेली आणि मग मित्रांनी पैसे गोळा करून आम्ही ओल्ड मंक चा खंबा आणला. आणि हे चुकून एका मैत्रिणीला सांगितले, झालं आधी शिव्या खाल्ल्या की काय हे असे करतात का, मी तर तुला सभ्य समजलेली वगैरे.
रात्री मग दरवाजा खटखटला, म्हणलं झालं हिने सरांना किंवा मॅडम ना चुगली केली दिसतेय. दार उघडले तर ही बया म्हणे अरे ती ही आहे ना तिला खूप थंडी भरून आलीये, तुम्ही आणलीय ना, तिला द्या थोडी चमचा भर.
झालं चमचा म्हणत म्हणत पावशेर नेली, आणि थोड्या वेळाने परत हजर, म्हणे सगळ्याच मुलींनी थोडी थोडी घेऊन संपवली आम्हाला उरलीच नाही.
आणि इथे मी इतक्या दुर्धर प्रसंगात सापडलो,
लेका पोरींच्या नादात दारू संपवली आणि आपल्याला कमी पडली तर बघ, हायेत तुला फटके
असे मित्रांच्या नजरा आग ओकत होत्या आणि मैत्रिणीला (शेवटपर्यंत मैत्रिणच राहिली ) नाही म्हणणे जीवावर आलेले. कसेतरी आता हे शेवटचे वगैरे म्हणत वाटप केलेलं.
गरम पाण्यात घेतलेल्या त्या रमची चव आणि ती आठवण अद्याप मनात घर करून आहे.

अ रा रा... बढिया पोस्ट्स. प्लीज या सगळ्यांचा एक वेगळा लेख/लेखमाला लिहाल का? आय क्नो जरा लेंग्दी आणि भरपूर टायपायला होईल पण जरा घ्या मनावर. खूप सुंदर डॉक्युमेंटेशन असेल हे, ते ही मराठीतून. विषय अगाध असला तरीही...

हिटलर दारूला स्पर्श करत नव्हता त्याने लाखो ज्यूंना ठार केले आहे.
>>>>>>>

मग दारू पवित्र कशी झाली?

Pages