व्हॉट्सॲपवरील खोट्या संदेशांवर तोडगा काय?

Submitted by पीटर on 17 June, 2018 - 12:31

व्हॉट्सॲपवरील संदेश हे नेहमीच चर्चेचा विषय असतात, पण आता चर्चा करण्याची गोष्ट म्हणजे हेच संदेश आजकाल लोकांच्या बळी पडण्यास कारणीभूत ठरत आहेत!
मागे जवळपास, महिन्याआधी आसाममध्ये दोन भटकंती करण्यास आलेल्या तरुणांवर जमावाने हल्ला केला आणि त्यांना ठार केले, कारण काय तर व्हॉट्सॲपवरील संदेश..
त्यामुळे अशा घटना थांबवण्यासाठी काय करावे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे मूर्ख लोकं WA वर विश्वास ठेवतात ते डिलीट करणार नाहीत आणि जे करतील त्यांच्या मानेच्या वरचा भाग शाबूत होताच.
WA वर आहे म्हणजे खोटं आहे हे शिकवावे. तसही डोक्यात प्रकाश पडत नाही तोपर्यंत #डिलीट करून दुसरं काही येईल. आणि अक्कल येणे महा कठीण काम आहे.

अशा घटना थांबवण्यासाठी जास्तीत जास्त, शक्यतो भारतातील एकूण एक व्हॉट्स अ‍ॅपचा मेंबर होणे आणि सर्व मेसेजेस काळजीपूर्वक वाचून खरी माहीती ताबडतोब देणे हा रामबाण उपाय आहे.