तुम्ही दारू कशी पिता?

Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53

उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.

प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.

प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.

प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.

चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !

Group content visibility: 
Use group defaults

माणूस शिकार केलेले कच्चे मांस आधी खात होता की कंदमुळे हे कसे काय खात्रीने सांगताय ? आधी कंदमुळे, शस्त्र बनवायचे शिक्षण मिळाल्यावर शिकार असं असेल का ? कि हाताने शिकार करत असेल तुमच्या मते ?
आधी वेद आले. मग मनुष्य आला. त्यात चार प्रकारचे लोक आले. ब्राह्मण आणि वैश्य शाकाहार करत. क्षत्रियांना बी १२ जीवनसत्वासाठी मांसाहार करावा लागे. ऋषी मुनींना कंदमुळातून सर्व प्रकारची जीवनसत्त्वे मिळत . ते दहा हजार वर्षे जगू शकत असत. विश्वामित्र आणि वाल्मिकी यांच्यात दहा हजार वर्षे वैर होते. विश्वामित्रांनी त्यासाठी मांसाहार सोडला आणि ते ब्राह्मण झाले.
तुम्ही विषय भरकटवल्यामुळे हा प्रतिसाद लांबला.

इथे सगळे विषय का भरकटवत आहेत हे कळत नाही.

आधी वेद आले. मग मनुष्य आला. त्यात चार प्रकारचे लोक आले. ब्राह्मण आणि वैश्य शाकाहार करत. क्षत्रियांना बी १२ जीवनसत्वासाठी मांसाहार करावा लागे. ऋषी मुनींना कंदमुळातून सर्व प्रकारची जीवनसत्त्वे मिळत . ते दहा हजार वर्षे जगू शकत असत. विश्वामित्र आणि वाल्मिकी यांच्यात दहा हजार वर्षे वैर होते. विश्वामित्रांनी त्यासाठी मांसाहार सोडला आणि ते ब्राह्मण झाले.
<<
लोकहो, जास्त पित जाऊ नका. नैतर असले लिखाण येते.

आधी वेद आले. मग मनुष्य आला. त्यात चार प्रकारचे लोक आले. ब्राह्मण आणि वैश्य शाकाहार करत. क्षत्रियांना बी १२ जीवनसत्वासाठी मांसाहार करावा लागे. ऋषी मुनींना कंदमुळातून सर्व प्रकारची जीवनसत्त्वे मिळत . ते दहा हजार वर्षे जगू शकत असत. विश्वामित्र आणि वाल्मिकी यांच्यात दहा हजार वर्षे वैर होते. विश्वामित्रांनी त्यासाठी मांसाहार सोडला आणि ते ब्राह्मण झाले.>>>>>>>>>>

Rofl Rofl Rofl Rofl

निरुत्तर झाल्यानंतर अपमानास्पद वैयक्तिक शेरेबाजी किंवा हास्यास्पद ठरवणे हे असंतुलितपणाचे लक्षण आहे. इग्नोर केले आहे.

Lol lihit raha Bhaskar n madhuraambe.
Initially you were irritating, now we are enjoying.

हे पहा मद्य हे मानसिक वय कमी असलेल्यांसाठी अथवा मानसिक दुबळेपणा असलेल्यांसाठी नाही. (याचा अर्थ मानसिक वय कमी असणे अथवा मानसिक दुबळेपणा असणे याला मी कमी वगैरे लेखत नाही हे सुद्धा लक्षात घ्या). तसेच मद्य कोणत्या क्वालिटीचे आहे आणि किती घेतले आहे यावर पण अवलंबून आहे. दारू पिल्यानंतर:

१. भेलकांडत तोल जात धडपडणे पडणे
२. हायपर होऊन बरळणे बडबडणे
३. मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊन इतरांना त्रास होईल अशी कृत्ये करणे

उच्च प्रतीचे आणि योग्य प्रमाणात घेऊनही या गोष्टी जर आपल्याकडून घडत असतील तर आपले मानसिक वय कमी आहे अथवा मानसिक दौर्बल्य आहे असे समजा. हे पेय आपणासाठी नाही. विषय संपला.

उच्च प्रतीचे मद्य योग्य प्रमाणात घेऊन किक बसल्यानंतर डोके थोडे हलके होते आणि तशा अवस्थेत धीरगंभीर होऊन गझल ऐकणे, आयुष्यावर विचार करणे, घुटके घेत एखाद्या गंभीर विषयावर आवाज न वाढवता शांतपणे चर्चा करणे इत्यादी ज्यांना कळते जमते आवडते, मद्य अशांनीच घ्यावे. दारू अशीच प्यावी.

नाक चिमटीत पकडून देशी चपटी घटाघटा घशात ओतायची आणि भेलकांडत शिवीगाळी करत गल्लीत राडा करायचा, घरी जाऊन बायकापोरांना मारहाण करायची किंवा घेतल्यानंतर मित्रांबरोबर आरडाओरडा करायचा, गैरकृत्ये करायची इत्यादी करणाऱ्या दुबळ्या मनाच्या सुमार वृत्तीच्या लोकांनी आपल्याकडे दारू बदनाम केली. दारू अशी पिऊ नये.

आयुर्वेदीक सुरा (मद्य) आणि दारू यातला फरकच कळत नसेल तर पुढे बोलण्यात आणि रक्त आटवण्यात अर्थ नाही. आपल्याला जे ठाऊक नाही ते सांगितल्यावर स्मायल्या टाकून हुर्यो उडवणा-यांना तर नाहीच नाही.

ज्यांनी कुणी प्राचीन काळाचे उल्लेख केलेले आहेत त्यांना प्राचीन काळचे हे वचन ठाऊक असावे

सुरा मेरय मज्ज पमा द ठाणा वेरमणि

अर्थात

मधुरंबे जिंकलेत, फार दिवसांनी इतके सुंदर विचार मिळाले वाचायला. अवडलाय तुम्ही, आपण बसू एकदा, फार म्हणजे फारच धमाल आहात, मैफिलीची शान असणार तुम्ही यात वाद नाहीच

एक भाबडा प्रश्न होमो सेपियन मधेही ब्राह्मण होते का?

एक भाबडा प्रश्न होमो सेपियन मधेही ब्राह्मण होते का?
>>>

लोकहो. दारू कशी प्यावी या धाग्यावर हा विषय चालतो पण दारूच्या विरोधात बोललेले दारूशी संबंधित असूनही चालत नाही. कारण ते दारूच्या विरोधात असते म्हणून धागा भरकटवणारे आणि अवांतर ठरते का?

आशूचॅम्प, माझा आपल्या अवांतर पोस्टींवर वैयक्तिक आक्षेप नाही. आपले चालू द्या. पण माझ्या दारूविरोधात एकत्र येणारया दारू समर्थकांना वरचा प्रश्न विचारला आहे.

जर समाधानकारक उत्तर नाही मिळाले तर मागच्या पोस्टमध्ये मागितलेली माफी परत घेतली जाईल.

इनामदार,
सलमान खानने जेव्हा लोकांना चिरडले तेव्हा तो कुठल्या देशी दारूच्या गुत्त्यावर देशी चपटी घटाघटा प्यायला गेला होता समजेल का?

दारू ही दारू असते हो. उगाच उंची मद्याची भलामण करू नका.
जर चढणारच नसेल, किकच लागणार नसेल, तर कोण दारूवर पैसे खर्च करेल. कोक नाहीतर पेप्सी नाही का पिणार...

एक भाबडा प्रश्न होमो सेपियन मधेही ब्राह्मण होते का? >>> मी सरळ आहे. ही असली माहिती ठेवून मला काय फायदा? होमो असण्याचा आणि जातीचा संबंध काय?

>> एक भाबडा प्रश्न होमो सेपियन मधेही ब्राह्मण होते का? >>> मी सरळ आहे. ही असली माहिती ठेवून मला काय फायदा? होमो असण्याचा आणि जातीचा संबंध काय?

प्रतिसाद of the day Lol

भास्कररावांच्याच वाडीतले वाटतात आंबे! अन वाडीच्या बाजूलाच बहुधा मालही पेरला असावा, कडक माल है एकदम

अशुचॅम्प, जबरदस्त रिप्लाय बरं का!

अरे भाभु हे दारुशी संबंधीतच आहे
>>>

चला मानलं एकवेळ की होमो सेपियन मध्ये ब्राह्मण येतात का हा प्रश्न दारूशी संबंधित आहे. पण दारू कशी प्यावी या विषयाशी नाही ना. जर दारूशीच संबंधित काहीही चालत असेल तर माझ्या पोस्टमध्ये कुठे शाहरूखच्या चित्रपटाची जाहीरात होती? अर्थात हा प्रश्न आपल्याला नसून ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना आहे. उत्तर येईल अशी अपेक्षा आहे.

मी सरळ आहे. ही असली माहिती ठेवून मला काय फायदा? होमो असण्याचा आणि जातीचा संबंध काय?>>>>>>>

खतरनाक, वाटल होत त्यापेक्षा यांची एंटरटेनमेंट व्हॅल्यू खूपच जास्त आहे
दिवस सत्कारणी लागला

नशीब मी होमो इरेक्ट्स बद्दल नाही विचारलं

आशुचँप, धन्य हो! Proud मधुरांबे, होमोचा अर्थ प्रत्येक वेळी "तोच" असतो असे नाहीये हो!

४- ५ वी ची ईंग्लिश मिडीयमची इव्हिस सायन्स वाचा हो, नाहीतर इतिहास पुन्हा तपासा.

तळटीपः- मी कुठल्याच फळांच्या साली सोलणार नाही. ज्यांना होमो या शब्दाबद्दल गोंधळ आहे त्याने इतिहास वाचा.

Homo sapiens, (Latin: “wise man”) the species to which all modern human beings belong. Homo sapiens is one of several species grouped into the genus Homo, but it is the only one that is not extinct. See also human evolution. Human being (Homo sapiens), male. ... H. sapiens is human by definition, whereas apes are not.

रश्मीजी
माझ्या म्हणण्याचा अर्थ तोच होता. तुमचा कही तरी गैरसमज झाला असावा.

Rofl
अहो भास्कर आणि मधु, बलात्कार विसरलात की तुम्ही. ते दारू पिऊनच तर होतात ना!

Pages