तिला दरवेळी त्याचं आगमन नको वाटायचं. खरंतर तो बापासारखाच तिच्या जगण्याच्या गरजा पुरवायचा. पण पितृमन वरवर कठोरच असतं ना! जगाला सुखवायचा तो येण्याने. जगाला वाटत असेल तो कंटाळ्यावर फुंकर मारून चैतन्य वाढवणारा! तसा वागायचाच तो! तो नसल्यावर लोक कासावीस व्हायचे. कृष्णाच्या बासरीसारखा होता तो लोकांसाठी. पण तिच्यासाठी? तिला धाकात ठेवायचा लबाड प्रयत्न करायचा तो. त्याला वाटत असेल, तो खेळकरपणे मुलीसारख्या असलेल्या तिला रमवतोय; पण तिला कठोरतेचं पाणी चढलेलं बापाचं प्रेम समजायचं नाही. तो न येण्याची ती मनोमन प्रार्थना करायची. पण आजही आला तो नेहमीप्रमाणे.
"च्चच्च! काय हा वारा!" असं उद्गारत त्या छोट्याशा देवळातील पुजार्यांनी देवापुढील दिव्याच्या थरथरणार्या ज्योतीभोवती हात धरले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माझा शतशब्दकथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न! कशी वाटली ते नक्की सांगा!
- द्वादशांगुला
जुई नाईक.
छान जमलीय
छान जमलीय
धन्यवाद अंबज्ञजी!
धन्यवाद अंबज्ञजी!
जमलीये!!
जमलीये!!
धन्यवाद संशोधक दादा !
धन्यवाद संशोधक दादा !
आवडली।
आवडली।
आवडली।
आवडली।
धन्यवाद वेडोबा जी!
धन्यवाद वेडोबा जी!
खूप छान जमली आहे.
खूप छान जमली आहे.
धन्यवाद मेघना जी!
धन्यवाद मेघना जी!
लय भारी
लय भारी
छान जमलिये .
छान जमलिये .
लय भारी द्वाबो.
लय भारी द्वाबो.
उत्सुकता छान ताणलीस.
छान
छान
सुरेखच! जमलीए मस्त! लिहा अजुन
सुरेखच! जमलीए मस्त! लिहा अजुन!
मस्तच जमली आहे
मस्तच जमली आहे
छान आहे !
छान आहे !
पण जुईले १०२ शब्द आहेत !
छान ग जुई.. पु.ले.शु.
छान ग जुई..
पु.ले.शु.
छान आहे. प्रत्येक शतशब्दकथेत
छान आहे. प्रत्येक शतशब्दकथेत ट्विस्ट असावाच लागतो का? (एक शंका)
मस्तच..
मस्तच..
मस्त लिहीलयस जुई... आनंददादा
मस्त लिहीलयस जुई...
आनंददादा
मस्तच !
मस्तच !
धन्यवाद अक्षयदादा, अधांतरीजी
धन्यवाद अक्षयदादा, अधांतरीजी,पाफाजी, कोमलजी, शालीजी, प्रणिताजी, आनंददादा , मेघाताई, पद्मसर, सायुरीताई, आदिसिद्धी, आसाजी!
आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद!
पण जुईले १०२ शब्द आहेत ! >>>> परफेक्ट 100 लागतात का? कच्च्या आराखड्यात तर 120 झालेले. इथवर कमी केले. बरं बघते काहीतरी!
पण आजही आला तो नेहमीप्रमाणे
पण आजही आला तो नेहमीप्रमाणे
>>
पण तो नेहमीप्रमाणे परतला.
देवळाआधीचा छोट्याशा शब्द काढ.
झाले १००
हाकानाका
पाफाजी, आपण सुचवल्याबद्दल खूप
पाफाजी, आपण सुचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! पण मी आधीच हे बदल केले. -
1) दुसर्या ओळीतल्या 'पित्याचं मन' ऐवजी 'पितृमन' केलंय.
2)सहाव्या ओळीतल्या 'कृष्णाच्या बासरीसारखा' च्या आधीचा 'अगदी' काढलाय.
धन्यवाद!
परफेक्ट 100 लागतात का?>>>
परफेक्ट 100 लागतात का?>>>
हो मग ! १०० च हवेत.
हो मग ! १०० च हवेत.>>>>> ओह्
हो मग ! १०० च हवेत.>>>>> ओह् धन्स हां! मला माहीत नव्हतं. मघाशी बदल केलाय.
छान जमलेय कथा
छान जमलेय कथा
जमलेय कथा.
जमलेय कथा.
जुई तुझं आडनाव नाईक आहे?
धन्यवाद उमानु जी, सस्मित जी!
धन्यवाद उमानु जी, सस्मित जी!
जुई तुझं आडनाव नाईक आहे? >>> हो!
छान कथा
छान कथा
Pages