हाडांची अधिक झीज

Submitted by arjun1988 on 15 June, 2018 - 04:29

माझे वय ४९ वर्ष आहे. साधारण दोन महिन्यापुर्वी माझा उजवा गुढगा दुखु लागला. लचकला असेल, होईल बरा असे समजुन मी दुर्लक्ष केले. पंधरा दिवसांनंतर ही बरे न वाटल्यामुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार एक्स रे व एम आर आय केले. डॉक्टरांनी निदान केले कि, माझे हाडे अपेक्षेपेक्षा जास्त अधिक झीजत आहे. जी झीज ६०, ७० वयात अपेक्षीत आहे, ती माझी आताच झाली आहे. त्यानुसार त्यांनी वेदनाशामक व्यायाम व उपचार सांगितले आहेत.
मला आताच चालतांना त्रास होत आहे. मला कमीत कमी अजुन पांच ते दहा वर्ष तरी काम करणे आवश्यक आहे. तरी हाडांची रीकव्हरी शक्य असते का? मला पुन्हा पहिल्यासारखे चालणे जमेल का? म ला कामानिमित्त भरपुर चालावे लागते. मला परत माझे काम करणे शक्य होईल का? माझे वय नवीन व्यक्तीला कमीत कमी ५५ असावे असे वाटते.माझे एकुणच एजींग वेगाने होत आहे तरी ह्यासाठी का उपचार शक्य आहेत का?
मला कृपया कोणी योग्य मार्गदर्शन करेल का?

Group content visibility: 
Use group defaults

हाडांच्या डॉक्टरांना दाखवा किंवा क्रिडावैद्यक प्रकारातल्या पुनर्भरण (मराठी शब्द चुकीचा असेल तर भावार्थ समजून घ्यावा) तज्ञाकडून सल्ला व उपचार घ्यावेत. हा आजार ओपन फोरम मधे सल्ले मागण्यासारखा नाही.
मला पण इतक्यातच बी १२ कमतरता आहे असे निदान झाले. त्यामुळे उजवा हात वर होत नव्हता. मी पुण्याला डॉक्टर आशीष बाभूळकरांकडे उपचार घेत आहे. फरक पडतोय. त्यांनाही दाखवू शकता.

ऑर्थोकडे जा.त्यांचा सल्ला घ्या.
डॉक्टरांच्या सल्याने कॅलशियम,व्हिटॅमिन डी च्या गोळ्या घ्या.आहारात दूध,दही घ्या विड्याच्या पानाला कणभर चुना लावून रोज खात चला(कॅलशियमचा स्रोत आहे.).बाकी ऑर्थो सांगतीलच.
मुख्य म्हणजे अजिबात धीर सोडू नका.सकारात्मकरित्या सामोरे जा.

डॉ. च्या सल्ल्याशिवाय आणी उपचाराशिवाय सर्व व्यर्थ. कारण ते शेवटी यातले तज्ञ आहेत. पण घरगुती उपाय म्हणून ज्यात कॅल्शियम जास्त असे केळी, अंडी, दूध, डिकांचे लाडु, नाचणीचे पदार्थ ( नाचणीचा लाडु/ भाकरी / उकड वगैरे ) राजगीरा, शिंगाड्याचे लाडु, खीर वगैरे आहारात ठेवा. याने निदान अपाय तरी होणार नाहीत. दुसरे म्हणजे जवसाची चटणी किंवा भाजलेले जवस रोज छोटा चमचा खात जावे . ( ओमेगा ३ फॅट्स मुळे जवस आज जास्त प्रसिद्ध आणी गुणकारी आहेत)

अदिवासी / कातकरी लोकांच्या जेवणात नाचणी व राजगीरा असल्याने ते डोंगर, रानोमाळ कितीही भटकु शकतात, चढु शकतात. पण आपण सो कॉल्ड शहरी सुशिक्षीत लोक या धान्यांना हलके लेखुन ते आहारात ठेवत नाही. असो,

मुंबईत असे चांगले ऑर्थो किंवा क्रिडावैद्यक कोणी आहे का?
माझा देखील उजवा गुडघा दुखण्यास सुरुवात झाली आहे आणि लक्षणे पण जवळपास सारखीच आहेत.

सस्मित,
आपण सांगत असलेले डॉ म्हणजे Dr. r.c.s. Khandelwal का?

r.c.s. लक्षात नाही. म्हणजे लक्ष नाही दिलं कधी. घरी फाईलवर बघुन लिहिते उद्या.
खंडेलवाल क्लिनिक असं नाव आहे.

अदिवासी / कातकरी लोकांच्या जेवणात नाचणी व राजगीरा असल्याने ते डोंगर, रानोमाळ कितीही भटकु शकतात, चढु शकतात. पण आपण सो कॉल्ड शहरी सुशिक्षीत लोक या धान्यांना हलके लेखुन ते आहारात ठेवत नाही. असो,
<<
हाफ ट्रुथ. किंवा रादर कन्व्हिनियंट ट्रुथ.

१. त्या खर्‍या आदिवास्याच्या जेवणात जे काय आहे, ते नित्कृष्ट तृणधान्य आहे. जरी त्यात व्हिटॅमिन्स्/मिनरल्स बर्‍यापैकी असलेत, तरी त्याची खाण्याची टोटल क्वांटिटी देखिल कमी आहे. सोबतचे बाकी अन्नघटकही आहेत-नाहीत वगैरे माळशेज इ. च्या कुपोषण स्टडीजमधे सापडेल.

२. आदिवासींना आजार होत नाहीत ही गैरसमजूत आहे.

३. शरीराचे वजन हा गुडघ्यांची झीज होण्यापाठचा मोठा भाग आहे. बारीक लोक जास्त मजेत चालतात. ओव्हरलोड ट्रक चे टायर लवकर झिजणारच. एकादा जाडजूड आदिवासी पाहिला आहे काय तुम्ही? त्याला विचारा सांधे काय म्हणतात?

***

तर मुद्द्याचे उत्तर @ धागाकर्ते.

तुमचे शरीर लवकर म्हातारे होते आहे, अर्थात प्रोजेरिया नावाच्या आजाराचे अधिकृत निदान झालेले आहे काय? तुम्ही ४९व्या वर्षी मस्तपैकी जिवंत आहात याचा अर्थ हा आजार तुम्हास नसावा. (त्या आजाराचे साधारण जीवनमान १३ वर्षे आहे)

तर,

सांधे झिजलेत हे अ‍ॅक्सेप्ट करा. पहिले काम म्हणजे वजन कमी करा. दुसरे म्हणजे तुमच्या अस्थिरोग तज्ज्ञांनी सांगितलेले व्यायाम नीट सुरू करा. गुडघ्याच्या आजूबाजूचे सर्व स्नायू मजबूत झाले तर तुमचा त्रास कमी होईल.

आजकाल टीकेआर अर्थात टोटल नी रिप्लेसमेंट उर्फ सांधे बदलायची शस्त्रक्रिया बर्‍यापैकी परवडण्यासारखी झालेली आहे, व करून घ्यायला हरकत नाही. किमान १० वर्षे तरी आनंदात राहता येईल. पण त्यासोबतच ही शस्त्रक्रिया गळ्यात मारण्याचे प्रमाणही वाढले आहे. आधी व्यायाम करा, अन सहन नच झाले तरच ऑपरेशनचा पर्याय घ्या. वेदना सहन करायची गरज नाही, शास्त्रातले नवे शोध आपल्या सोयीसाठी असतात. फक्त ४ ठिकाणी सेकंड ओपिनियन घ्या, त्यात वैदू उर्फ आयुर्वेद/होमिओपदी/युनानी/सिद्ध असले भोंदू टाळा.

अन हो. वजन कमी करण्यासोबत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन = सांध्याची अधिक झीज टाळण्यासाठी, जमीनीवर बसणे, भारतीय प्रकारचे शौचालय, इ प्रकार टाळा. उक्कड्/मांडी वाळून बसल्यानंतर उठताना गुडघ्यावर प्र च ण्ड ताण येतो.

ता.क. अ‍ॅक्टिव दुखत असताना व्यायाम करायचा नाही. विश्रांती व वेदनाशामक यांच्या वापराने वेदना बंद झाल्या नंतरच व्यायाम सुरू करावा. विश्रांती ही घेतलीच पाहिजे. काम तुमच्यासाठी थांबू शकते. आजार थांबत नाही, वाढत राहतो. बिनपगारी रजा, ट्रीटमेंट खर्चापेक्षा स्वस्त पडते, हे प्लीज लक्षात घ्या.

(सांध्यात लूज फॉरेन बॉडी उर्फ कूर्चेचे तुकडे इ. असलेत तर त्याला सर्जिकल इंटरवेन्शन लागतेच. तुम्ही लिहिलेले वाचून असले काहीच नसावे, व सेकंड ओपिनियन घ्यावे असे सुचवितो. )

काळजी करू नका. काळजी घ्या.

"सेकंड ओपिनियन" याबद्दल.

सेकंड ओपिनियन घेणे म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ४ डॉक्टरांना दाखवून त्यापैकी "मी ठरवलेल्या आजाराची" किंवा "मला छान वाटेल अशी" ट्रीटमेंट सांगणार्‍या डॉक्टरचे ऐका असे नाही.

आपल्याकडे रुग्ण बहुतेकदा घरून येतानाच मला होणार्‍या त्रासाचे कारण म्हणजे "माझ्या मावशीच्या म्हशीला झालेला टोणगा" असे काहितरी ठरवून येतात. किंवा उदा. डॉक्टर मला मायग्रेन आहे, त्याची ट्रीटमेंट सांगा, असे म्हणतात. असे करू नये. तुम्हाला होणारा त्रास डॉक्टरला सांगा. तो का होतोय ते शोधण्याचे काम त्याचे आहे.

काही आजार/लक्षणे मिसलिडींग असतात. आम्हीदेखिल एका ट्रॅकवर अडकून विचार करत राहतो. अशावेळी सेकंड ओपिनियन मी तरी स्वतः सुचवतो. तुम्हीही सेकंड ओपिनियन घेणे यात चुकीचे काही नाही. फक्त, सेकंड ओपिनियन = स्वस्त पर्यायासाठी शॉपिंग असे करू नये.

१. त्याने सुचविलेला उपचार करूनही गुण येत नाही म्हटल्यावर, त्या डॉक्टरांनाच विचारून पहावे, की आम्ही सेकंड ओपिनियन घेऊ इच्छितो. तुम्ही कुणाचे नांव सुचवाल? युज्वली चांगला डॉक्टर आपल्या गुरूचे किंवा सुपरस्पेशालिस्टचे नांव सुचवेल.

२. आपल्या डॉक्टरने सांगितलेला उपचार नीट व किमान योग्य काळासाठी करणे गरजेचे आहे. उगंच १ - २ दिवस गोळ्या खाऊन इन्स्टन्ट बरं वाटत नाही असे म्हणण्यात अर्थ नाही.

३. आपल्या मनाने सेकंड ओपिनियन घेतोय त्या डॉक्टरची क्वालिफिकेशन्स किमान आपल्या सध्याच्या डॉक्टर इतकी आहेत, हे पहावे. एमएस ऑर्थो नंतर हातोडीने मणके ठोकून नीट करणार्या हाडवैद्याचे ओपिनियन घेऊन उपयोगी नाही.

80

आंबाभौ,
क्रिकेट म्याचमधे कधी ८० रन झाले म्हणून कुण्या ब्याट्समनने आपली वर करून दाखवल्याचं पाहिलंय का?

८० ऐवजी ५६ प्रतिसादांवर किंवा आपल्या जुन्या सवयीनुसार ६१-६२ ला वर केली असती तर समजू शकलो असतो. माबोवर सध्या 'नवीण' आहात. इथे १०० च्या पुढे गेलं, तर आकडे टाकायची पद्धत आहे.

बघा समजतंय का.

अर्थात वर करायची तुमची मजबूरी समजू शकतोच.

झीज म्हणजे हाडांची घनता या अर्थी आहे का? ते विचारा. तुमची उंची कमी झाली आहे का?
बी१२, डी, कॅल्शिअम च्या टेस्ट केलेल्या का? तसं डॉ.ना वाटत असेक तर घनता बघायला स्पाईन, हिप आणि मनगटाचा डेकसा स्कॅन करतील.
काळजी घ्या.

K

Lol
KT

सर्वांचे खुप खुप आ भार,

आ.रा. रा. ,
माझी ऊंची ५' ७'' आहे. वजन ७४ किलो आहे. म्हणजे खुप जास्त नाही आहे. दोन तज्ञ डोक्टरांचा सल्ला घेतला आहे. दोघांचेही तेच मत आहे. वेदना सध्या तरी सहन करता येत आहे. पण जास्त चालले की खुप त्रास होतो. त्यामूळे पुढील काळजी वाटते.
अमित व,
बी१२, डी, कॅल्शिअम च्या टेस्ट सांगितल्या नाहित.

<<< माझी ऊंची ५' ७'' आहे. वजन ७४ किलो आहे. म्हणजे खुप जास्त नाही आहे. >>> BMI 26 आहे, म्हणजे जास्तच आहे, नॉर्मल नाही. भले obese नसाल, पण overweight नक्कीच आहे.

@आ.रा.रा.
छान प्रतिसाद. माहितीबद्दल धन्यवाद.

<<< कमाल आहे. ८०% लिहाय़चे होते. पण म्हणतात ना चोमचां >>>
80% म्हणायचे होते? कशाच्या संदर्भात? मग 80 च्या पुढे काहीच का लिहिले नाही? याला म्हणतात, गिऱ्या तो भी तंगडी उप्पर.

सध्या मलाहि हाच त्रास होतोय.... जीने चढताना गुढघ्याच्या बरोबर मधे कळ येते आणि पाय बेंड होतो. आज एक्सरे काढायचा आहे.