दरवळ (शतशब्दकथा)

Submitted by किल्ली on 15 June, 2018 - 03:33

“तुझा आवडता perfume कुठला?”
“मी नाही सांगणार, secret आहे.”
“दूरदेशी जातोय, तिथून तुझ्यासाठी सुगंधी भेट आणीन म्हणतो. कधी कधी वाटतं, जाई, जुई, मोगरा, चाफा ही मंडळी नशिबवान आहेत. त्यांना तुझा सहवास कायमच मिळतो. माझ्यामुळे तुझी संध्याकाळ सुगंधी, भारावलेली झाली तर मी कृतार्थ होईन गं!”
तिचे मौन बघून काहीश्या निराशेनेच तो तिथून निघाला.
ठरल्याप्रमाणे त्याने आकाशात उंच भरारी घेतली. पण दुर्दैव! तो अगम्य उंचीवरून कोसळला! त्या परिस्थितीही, आपण तिच्यासाठी काही आणू शकलो नाही ह्या भावनेने आणि अतीव वेदनेने तो जणू अश्रू बनून कोसळू लागला. त्याच्या अंगप्रत्यंगांचा प्रत्येक कण जमिनीशी एकरूप होऊ पाहत होता आणि
वातावरणात मृदगंध पसरत चालला होता!!
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
१०० शब्दांत कथा लिहिण्याचा पहिला प्रयत्न करत आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. Happy
-----------------------------------------------------------------------------------------------------
तळटीप :
ह्या कथेतून बरेच अर्थ निघू शकतात. नायक आणि नायिकेकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता ह्यावर ते अवलंबून आहे. म्हणून 'अर्थकारण' वाचकांवर सोडलंय.
माझा दृष्टिकोन : नायक ढग/ वारा/बाष्प , नायिका : धरित्री

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह

किल्लीतै भारी जमलीय कथा. अवघ्या शंभर शब्दांत बरोबर आशय पोहोचवणारी कथा लिहिणं, हे एक आव्हान असतं; आणि तुला ते छान जमलंय ! Happy आवडली कथा! Happy

माझं नाव टाकल्याबद्दल धन्स हां! Wink

Wah...

छान..
तळटीप प्रमाणेच अर्थ काढला होता..

छान लिहिलंय
तळटीप टाकायची गरज नव्हती. तो अर्थ लागतोय सहज.

धन्यवाद मंडळी @स्वप्ना_राज,सायुरी ,भन्नाट भास्कर,अदिति, वेडोबा Happy Happy
माबोवर शशक लाट आलीये सध्या ! मी पण हात धुवून घेतलाय Lol

छान लिहिलंय
तळटीप टाकायची गरज नव्हती. तो अर्थ लागतोय सहज. >>>> +१११११

Pages