आधार कार्ड आणि एन आर आय

Submitted by sneha1 on 6 June, 2018 - 10:45

नमस्कार,
मला आधार कार्ड बद्दल माहिती हवी आहे. एन आर आय लोकांना हे कार्ड काढणे मस्ट आहे का? असल्यास कसे काढावे? भारतात जाऊनच काढावे लागते का?
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणूनच लोकांनाच डिक्लेअर करायला सांगणे आणि जबाबदारी अ‍ॅप्लाय करणार्‍यावरही टाकणे हेच बरोबर वाटते. "under the penalty of perjury...." ई.ई.

penalty of perjury ठीक आहे एक लीगल सेकंडरी डिटरंट म्हणून पण प्रायमरी व्हेरिफायेबल डेटा नको का?
आधार निवासी लोकांना देणार मग कोणी निवासी व्यक्ती अनिवासी झाली की आधार रद्द करायचा का? तो केला का नाही हे कोण बघणार? निवासाचं प्रुफ म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स असणे ठीक आहे. पॅन कार्ड कोणीही काढू शकतो तर आधार का नाही > हे मला टिपिकल भारतीय गोंधळी धोरण वाटतं.
एस एस एन देताना penalty of perjury वर सही करायला लागते, पण आधी हजार क्रॉस रेफरंस असलेली प्रुफ पण जोडलेली असतात तसं काही हवं असं वाटलं. अर्थात एस एस एन रेसिडंसचं प्रुफ नाहीच.

अरे पण एन आर आय ची व्याख्या काय आहे नक्की ? मला वाटत होतं की ही फक्त इन्कम टॅक्स करता असलेली संज्ञा आहे. म्हणजे तुम्ही भारताचे नागरीक आहात पण भारतात राहत नाहीत सध्या असे.

अमित - हो. ते मान्य.

ध - हो सुरूवातीला टॅक्स करता होती. अमिताभ ने टॅक्स बेनिफिट घेतला होता एन आर आय डिक्लेअर करून स्वतःला तेव्हा पेपर्स नी त्याने नागरिकत्व सोडले अशी आवई उठवून दिली होती ते आठवते Happy

माझ्या माहितीप्रमाणे एन आर आय = सहा महिन्यांपेक्षा भारताबाहेर राहणारी पण भारतीय नागरिक व्यक्ती

मग परदेशी नागरिकांना आधार कार्ड मिळतं का? >>>> परदेशी नागरिक कामाधंद्यासाठी भारतात राहत असेल, तर त्याला आधारकार्ड जरूरी आहे.

>>आधार निवासी लोकांना देणार मग कोणी निवासी व्यक्ती अनिवासी झाली की आधार रद्द करायचा का?<<
नाहि बहुतेक. आधार कार्ड हे निव्वळ ग्लोरिफाय्ड (आणि बायोमेट्रिक्सने मढवलेलं) रेशन कार्ड आहे, जे पुर्वि आय्डेंटिफिकेशन करता लागायचं.

माझ्या मते (आणि माहिती वरुन) भारतात न रहाणार्‍या लोकांना आधार कार्डची अजिबात गरज नाहि. उगाच, विनासायास मिळतंय म्हणुन घेउन ठेवा आणि अजुन एका आय्डेंटिटि थेफ्ट करता सामोरे जा - या सल्ल्याला काहि अर्थ नाहि...

भारतात न रहाणार्‍या लोकांनी ते का घेतलंय, याची कारणं वाचायला आवडतील... Happy

आम्ही आधार कार्ड घेतल कारण बॅंकेत १० + वर्ष एन् आर आय अकाऊॅंट असुनही के वाय सी साठी मागीतल. एस बी आय Sad पण मग घर खरेदीविक्री मघ्ये अजिबात प्राॅब्लेम आला नाही.

कोणालाही आधार मिळू शकते.
अड्रेस प्रूफ नाही ? नो प्रॉब्लेम
आयडी प्रूफ नाही ? नो प्रॉब्लेम.
तालाठ्याकडून लेटर घेऊन या तो ओळखतो तुम्हाला... using that letter u can apply to adhaar.

आणि तालाठ्याकडून लेटर मिळवणे इतके अवघड काम नाही !

NRI are not eligible for adhaar card. Nor it is required for transactions when one party is NRI.

Adhaar card च्या वेब्साइट वर adhaar myth busters नावाचि link आहे.
त्या फाईल मधे मुद्दा ७ बघा.
https://www.uidai.gov.in/images/recently_asked_ques_13012018.pdf

तसेच
https://www.quora.com/How-can-an-NRI-sell-his-property-in-India-if-Aadha...

अधिक महिती: खालिल लिंक वर jerry pattali याम्चे उत्तर बघा.

https://www.quora.com/Are-OCI-card-holders-eligible-to-obtain-a-Aadhar-c...

My conclusion:

If you are living in India more than 182 days - even of you are not indian citizen, or if you are OCI card holder, green card holder etc , you can apply for aadhar card. Being resident of India for more than 182 days is the key.

कुणी हुषार भारतीय खोटी आधार कार्डे करायचा धंदा अमेरिकेत नि इंग्लंडमधे काढेल का? थोडे डोके लढवले नि योग्य लोकांशी ओळख काढल्यास तर भारताच्या मास्टर डेटा बेसमधे ते रजिस्टर करण्याचे पण जमेल.
जोरात चालेल धंदा. भारतात काढला तर कदाचित पकडला जाईल. इथे सेफ आहे.

NRI मंडळींना "आधार" नाही. They don't qualify and don't need as far as I know.

आ‌य-सी-आय-सी-आय आणि एचडीएफसी बँका US च्या नंबर वर text पाठवतात. बाकीच्यांचे माहीत नाही.

हल्लीच आयसीआयसीआयचा भयानक चांगला अनुभव आला मला.
भारताच्या बाहेर राहून एकही कागद कुठेही न पाठवता २-३ दिवसांत एनआरओ अकाउंट उघडता आला. आधी एनआरई होता, सो त्यांच्याकडे सगळी माहिती होतीच, पण तरीही असं काही होउ शकेल यावर माझा जरा ही विश्वास न्हवता.
ऑनलाईन पासवर्ड रिकव्हरीही झाली. अमेरिकेच्या नंबर एका फटक्यात अपडेट झाला, त्यावर वन टाईम पिन येतात. सगळ अशक्य स्मूथ झालं. Happy टडोपा झालं मला.

*** ICICI exceeding customer expectations *** nice!

"भयानक-चांगला" हा तर oxymoron झालाय.

Oxymoron-ला मराठी शब्द काय आहे? कोणाला माहित आहे का?

एचडीफसी का नाही करत अमेरिकेचा मोबाईल नंबर अपडेट? मेला दर वेळी ते ओटीपी भारतातल्या मोबाईलवर जातो. मग आईला फोन करा तिच्याकडून तो नं घ्या. कसरतच सगळी.

>> कसरतच सगळी.<<

आय फिल योर पेन. पण यावर बँक बदलण्या व्यतिरिक्त दुसरा उपाय/पर्याय नाहि. आत्ताचं माहित नाहि, पण काहि वर्षांपर्यंत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेतहि अशीच परिस्थिती होती. ऑन्लाइन अ‍ॅक्सेस अप्रुव/ऑथेंटिकेट करायला ते दोन महिन्यांनंतर कार्बन पेपरवरचा पिन मेलने पाठ्वायचे आणि तो इथे मिळेस्तोवर ओरिजिनल रिक्वेस्ट एक्स्पायर झालेली असायची... Happy

अंजली.. प्री-पेड वोडाफोन कार्ड घेऊन मी अमेरिकेत डुएल सिम मोबाईल मधे वापरतो. सगळे ओ टी पी येतात.
आणि प्री-पेड चा महिन्याच्या महिन्याला खर्च नाही..

एचडीफसी का नाही करत अमेरिकेचा मोबाईल नंबर अपडेट? >> मला ओ-टी-पी अमेरीकेच्या नंबरवर येतोय गेली बरीच वर्षं. त्याच्या ग्राहकसेवेला फोन करून बघा.

परदेसाई, मस्त कल्पना आहे प्रीपेड कार्ड वापरायची. पण टेक्स्ट मेसेज साठी इंटरनॅशनल रोमिंग लागत असेल ना?

>>> Oxymoron-ला मराठी शब्द काय आहे? कोणाला माहित आहे का?
वदतोव्याघ्यात

मला ओ-टी-पी अमेरीकेच्या नंबरवर येतोय गेली बरीच वर्षं. त्याच्या ग्राहकसेवेला फोन करून बघा.>>>> हो का? मस्त आहे की. करते ट्राय आज.
मी गेल्या भारतवारीत पर्सनली रिक्वेस्ट करून आले होते बँकेत. काही फायदा झाला नाही.

प्री-पेड वोडाफोन कार्ड घेऊन मी अमेरिकेत डुएल सिम मोबाईल मधे वापरतो. सगळे ओ टी पी येतात.
आणि प्री-पेड चा महिन्याच्या महिन्याला खर्च नाही..>>>>>>>>> माझा नाहीये डुएल सिमवाला फोन.

Pages