घराचे रजिस्ट्रेशन

Submitted by कटप्पा on 5 June, 2018 - 11:00

हॅलो मायबोली,
सर्वप्रथम धन्यवाद तुम्ही माझ्या कथांना इतका तुफान प्रतिसाद दिलात, मी त्यामुळे आणखी कथा लिहायला घेतल्या आहेत.
मी कामानिमित्त आफ्रिकेत आहे, मला भारतात एक फ्लॅट पसंत पडला आहे पण मला सुट्टी नसल्यामुळे मी स्वतः जाऊन बुक करू शकत नाही आहे.
माझा प्रश्न - मी पैसे पाठवून घर बाबांच्या नावाने घेऊ शकतो आणि पुढच्या वर्षी जेंव्हा भारतात जाईन माझ्या नावावर ट्रान्सफर करणे किती सोपे असेल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परत स्टॅंप ड्युटी भरावी लागेल. वडील-मुलगा ब्लड रिलेशन मध्ये काही कमी रेट आहे का ते चेक करा.
वडील तुमच्या नावे गिफ़्ट डिड करू शकतात. त्यावर सुदधा टॅक्स/ ड्युटी आहे.
हे सर्व तुम्ही लोन न घेता व्यवहार करणार आहात असे धरून लिहिले आहे.

मला वाटले "मला कथा लिहायच्या आहेत त्यामुळे घर घ्यायला वेळ नाही" असे लिहीले आहे Wink

पण तुम्ही वडिलांना पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देउन तुमच्या नावानेच थेट का घेउ शकत नाही. पूर्वी तरी हे करता येत असे.

असं कसं?
१) वडलांना पैसे दिलेत - त्यांना एवढा इन्कम झाला. टॅक्स लागेल. त्यातून घर होईल. आता एवढेच. तुम्ही तुमच्या इन्कमवर त्या देशात टॅक्स देणारच.

Srd - Nri ने पाठवलेल्या पैशांवर इन्कम टॅक्स लागत नाही, त्याच्या इंटरेस्ट वर लागतो.

कटप्पा - इंडियन आंबसि मध्ये जाऊन पोवर ऑफ अटरणी करून घ्या farend म्हणतात तसे. ते बेस्ट असेल.

पॉवर ऑफ attorny घेऊन सही करताना वेगळी ड्युटी भरावी लागते का हे सुद्धा तपासा.

बहुतेक इंडिव्हिज्युअल्ननआ लागत नाही, कंपनीला लागते असा नियम आहे, नीट तपासून पहा. नियम बदलायला वेळ लागत नाही. रक्ताच्या नात्यात निवासी अथवा कृषी मालमत्ता ट्रान्सफर करताना फक्त 200 रुपये स्टॅम्प ड्युटी भरावी लागते असा नियम 2015 मध्ये केला होता, तो 2017 मध्ये बदलून त्यावर 3 टक्के ड्युटी लावली असे लेटेस्ट वाचले.

माझ्या बिल्डरकडे त्याच्या यु एस मध्ये गेलेल्या पार्टनरची पॉवर ऑफ अत्तोर्णी होती पण ती वापरून सेल डिड सही करायचे तर त्याला 2 टक्के ड्युटी भरावी लागणार होती. या मुद्द्यावर अडून त्याने माझे सेल डिड केले नाही. त्याची कंपनी होती म्हणून हा प्रॉब्लेम झाला असे त्याने सांगितले.

च्रप्स, धन्यवाद.
बाकी हे नियम वाचण्यासाठी ट्याक्स साइटवरचे ओनलाईन पेज पूर्ण माहिती देते का? वाचण्याची इच्छा आहे. पिडीएफ चालेल.

वडिलांना पॉवर ऑफ ऍटर्नी तिकडे देऊन रेजिस्ट्रेशन करू शकता ,जर काहीकारणाने वडिलांच्या नावावर घर घेतले तरी ते गिफ्ट करता येते सध्या रक्ताच्या नात्यात वडीलांकडून मुलाला असेल तर ५०० रुपये स्टॅम्पड्युटी आणि ३०००० पर्यंत रेजिस्ट्रेशन फी आहे .फक्त वडिलांचे वय आणि प्रकृती पुढच्या वर्षापर्यंत कशी असेल याचा हि विचार व्हावा कारण त्यानंतर लीगल कॉम्प्लिकेशन खूप असतात .