अंतर्मुख!

Submitted by झुलेलाल on 3 May, 2018 - 22:54

अंतर्मुख!
अंधेरी स्टेशनच्या तीन नंबर फलाटावर तीस सेकंद थांबून गाडी पुढे सरकली, आणि दरवाजाशी उभ्या असलेल्या त्या दोघांच्या नजरा सरसावल्या. पलीकडच्या, चार नंबर फलाटावरचं काहीतरी शोधू लागल्या.
गाडी जोगेश्वरीच्या दिशेने निघाली. समोरचा फलाट संपला आणि दोघांचे डोळे चमकले. त्यांनी एकमेकांकडे पाहून खुशी व्यक्त केली.
म्हणून माझेही लक्ष त्या फलाटाकडे, त्या जागेवर खिळले.
फलाटावर टोकाला असलेल्या एका बांधकामाच्या भिंतीवर एक चित्र होते...
अगदी साधे.
बंदूक हातात धरलेल्या युद्धसज्ज जवानाचे!
त्यावर एक वाक्य होते-
‘एक जिम्मेवार नागरिक बनो ताकि हम आपके लिये गर्वसे लड सकें!’
... मी त्या दोघांकडे पाहिलं.
त्यांची दाद त्या चित्राला नव्हे, त्या वाक्याला होती हे लगेच लक्षात आलं!
थोडंसं आश्वस्तही वाटलं!!

Group content visibility: 
Use group defaults