या पृथ्वीवर माणसांची एवढी गर्दी का आहे ?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 26 May, 2018 - 23:49

नमस्कार मंडळी

आज बऱ्याच दिवसांनी माबो वर व्यक्त होत आहे . मधला काही काल आध्यात्मिक चिंतन - मननात गेला .
माझे एक पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे . प्रकाशित झाल्यावर आपल्याला कळवेनच ! सर्वानी जरूर लाभ घ्यावा !

अव्हेन्जर्स इन्फिनिटी सिनेमाच्या शेवटी ठानोस कडून पृथ्वीवरील बहुतांश मानवजातीचा अंत होतो असे दाखवले आहे ... त्यावरून विचारचक्रे फिरू लागली व जे विचारमंथन झाले त्याचा हा परिपाक ;

चौदाव्या शतकात spanish आणि portugese लोकांनी नवे आणि त्यांच्या दृष्टीने अज्ञात प्रदेश धुंडाळायाला सुरुवात केली . सोळाव्या शतकात वाफेच्या इंजिनाच्या शोधानंतर औद्योगिक क्रांती झाली . आणि एकोणीसाव्या -विसाव्या शतकातील वैद्यकीय शोधांमुळे आरोग्य उंचावून आयुर्मर्यादा वाढली . या व अशा अनेक घटकांमुळे गेल्या ३/४ शतकात विश्वाची लोकसंख्या बेसुमार वाढली .

Table 1. World population milestones. Source: United Nations Secretariat, Department of Economic and Social Affairs, The World At Six Billion (1999), p. 8. World population reached: Year Time to add 1 billion
1 billion 1804
2 billion 1927 123 years
3 billion 1960 33 years
4 billion 1974 14 years
5 billion 1987 13 years
6 billion 1999 12 years
7.2 billion 2018 19 years

तर मुद्दा असा की सतराव्या शतकापर्यंत अतिशय मर्यादित लोकसंख्या असूनही जगाचे व्यवहार व्यवस्थित सुरु होते . आज फक्त दोनशे वर्षात लोकसंख्या सातपट वाढल्याने नैसर्गिक साधानसामुग्री वर अतोनात ताण येत आहे . एका अर्थाने मनुष्य अक्षरश: पृथ्वी ओरबाडून खातो आहे . अशा परिस्थितीत लोकसंख्या अशीच वाढत राहिल्यास भविष्य अंधारमय आहे . आपल्या क्षुद्र स्वार्थ अन हव्यासापोटी मनुष्यप्राणी आपल्या भावी पिढ्यांसाठी आणि मानवेतर प्राण्यांसाठी भविष्यात पृथ्वीवर जगणे मुश्कील करत आहे .

मॅट्रिक्स सिनेमातील एजन्ट स्मिथ च्या तोण्डी असलेले वाक्य खरे अहे की काय असा भास होतो ,
I'd like to share a revelation I've had during my time here. It came to me when I tried to classify your species. I realized that you're not actually mammals. Every mammal on this planet instinctively develops a natural equilibrium with their surrounding environment, but you humans do not. You move to another area, and you multiply, and you multiply, until every natural resource is consumed. The only way you can survive is to spread to another area. There is another organism on this planet that follows the same pattern. Do you know what it is? A virus. Human beings are a disease, a cancer of this planet. You are a plague, and we are the cure.

खरोखरच मंड्ळी , विचार करा ... आपण नक्की कुठे जात आहोत ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<< मनुष्यप्राणी आपल्या भावी पिढ्यांसाठी आणि मानवेतर प्राण्यांसाठी भविष्यात पृथ्वीवर जगणे मुश्कील करत आहे . >>>
बरं मग? नक्की मुद्दा काय आहे? तुम्हाला मनुष्यजातीची काळजी आहे की पृथ्वीची?

म्हणुनच स्वेच्छामरणाची चळवळ ही मजबूत झाली पाहिजे असे मला राहून राहून वाटत. विवेक बेळेंच जरा समजून घ्या हे डॉक्टर पेशंट च्या नात्यावर असलेले नाटक असेच या विषयावर भाष्य करते. जरुर पहा.

क्षमा असावी, पण अध्यात्मिक असाल तर कशाला काळजी करता कारण प्रत्येक जीव ईश्वरी ईच्छ ने आपले कर्म भोगण्याकर्ता जन्म घेतो असे सर्व साधू संत सांगतात, जो चोच देतो तो दाणापाणी देतो, असे आपले अध्यात्म सांगते, अर्थात रामदास स्वामींनी दगड फोडून आत बेडकी दाखवली आणि याची व्यवस्था कोण करतो ते सांग असे शिवाजी महाराजांना सांगितले होते अशी गोष्ट आहे, आणि त्याचबरोबर हे पण खरे आहे की सर्व धर्मातील तथाकथित अध्यात्मिक लोकांना पैसा संपत्ती, मठ, जागा , स्त्री, यांचा शिसारी येईल इतका हव्यास असतो उदा. बाबा राम रहीम, त्याची माफी, आसाराम वगैरे, यांना कायद्याने खून, आणि इतर गंभीर गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा झाल्या निदान सामान्य लोक हे मान्य तरी करतात की जगण्याकर्ता धन संपत्ती परिवार, लग्न, सेक्स आवश्यक आहे, पण तथाकथित अध्यात्मिक सर्व गोष्टींचा त्याग करा असे सांगतात पण प्रत्यक्षात सर्व ऐहिक उपभोग चोरून घेतात अनैतिक संबंध ठेवतात, वर प्रवचने देतात, हे गेल्या काही महिन्यांत पेपर मधील वरील लोकांच्याबद्दल आलेल्या बातम्या वाचल्यास तुम्हाला कळेल, या दुटप्पी वागण्याबद्दल तुमचे मत काय, आणि अध्यात्मिक ओळखण्याची पक्की कसोटी काय हे तरी आधी सांगा, आणि अनेक ढोंगी अध्यात्मिक म्हणून समाजात आहेत की नाहीत तुम्हाला काय वाटते ते पण लिहा, कोणाला दुखावण्याचा हेतू नाही, आणि आजही अनेक अध्यात्मिक जगात आहेत माझा पूर्ण विश्वास आहे,

जगाचे सगळे व्यवस्थित सुरु होते है भ्रम आहे , फक्त राजे महाराजे ज्यांचे व्यवस्थित सुरु होते , उर्वरित भिकार्डे होते.
आता लोकशाहीने चांगले दिवस आणले आहेत

जगाचे सगळे व्यवस्थित सुरु होते है भ्रम आहे , फक्त राजे महाराजे ज्यांचे व्यवस्थित सुरु होते , उर्वरित भिकार्डे होते.
आता लोकशाहीने चांगले दिवस आणले आहेत

माणूस तर एक छोटा भाग आहे निसर्गाचा.
ते निसर्गाचे आरोग्य मस्त होते असे सांगत आहेत.

खरी लोकसंख्या वाढ ही ह्या शतकातच झालेली आहे.
त्याला फक्त आधुनिक उपचार हे कारणीभूत नाहीत
तर योग्य आहार,विहार असलेली लोक छान निसर्ग आणि जोडीला आधुनिक उपचार ह्या मुळे लोकांचे वय पण वाढले आणि लहान मुलांचे मृत्यू प्रमाण सुद्धा कमी झाले म्हणून लोकसंख्या वाढली
पण येथून पुढे ती वाढणार नाही कमी होत जाईल.
१) नको ते शोक लहान वयात करणे
२) अजिबात पोष्टिक पना नसलेले हायब्रीड अन्न.
३)शारीरिक हालचाल व्यायाम ह्यांचा अभाव
४) दूषित हवा आणि पाणी
ह्या मुळे कमी वयातच दुर्धर आजाराने नवीन पिढी ग्रसली जाईल (आत्ताच हे चित्र दिसत आहे बापाच्या खांध्या वर मुलाचे शव वाहून न्यावे लागत आहे)
आधुनिक उपचार हे थांबवू शकणार नाही.