त्रास होईल एवढं कुणाच्या जवळ जाऊ नये

Submitted by द्वैत on 28 May, 2018 - 06:25

त्रास होईल एवढं कुणाच्या जवळ जाऊ नये
कधीही पूर्ण न होणारी स्वप्नेच पाहू नये

ह्या दुनियेत प्रत्येकाला स्वार्थ प्यारा आहे
अश्या दुनियेत कोणावर विसंबून राहू नये

सख्खी नाती देखील माणूस हातचे राखून जपतो
कोणासाठीच इथे कधी सर्वस्व वाहू नये

सुख दुःखाचे येणे जाणे नेहमी चालूच असते
क्षणभर मिळणाऱ्या सुखाने अखंड न्हाहू नये

- dwait

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !!