पिकनिकला जायचंय.....?? इथे माहिती मिळेल.

Submitted by निंबुडा on 4 June, 2010 - 03:39

पावसाळा आला, लोको.

आपल्यापैकी प्रत्येकच जण कुठे ना कुठे तरी पिकनिक/ट्रेक किंवा ववि ला जायचा प्लॅन आखत असणार - कदाचित माबो च्या टोळक्यासोबत किंवा स्वतंत्र ग्रुप सोबत किंवा मग घरच्यांसोबत.

बर्‍याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं पण नक्की कुठे जायचं हे शोधण्यापासून पूर्वतयारी सुरु होते. मग नेट वर शोधा, मित्रांना हाकाट्या द्या (फोन वरून Wink ), माहिती मिळवा, चौकश्या करा या चक्रातून जावे लागते. तर या त्रासापासून वाचण्यासाठी हा लेखनाचा धागा सुरु करत आहे.

तुम्हाला माहीत असलेली ठिकाणे (water parks, resorts, धबधबे, किल्ले, बीचेस्, प्रायव्हेट बंगले/फार्म हाऊसेस् इ.इ.) जी एक दिवसीय किंवा दोन दिवसीय (over night stay) सहली (पिकनिक/ट्रेक किंवा ववि) साठी साठी उपयुक्त असतील ती इथे सांगा. जर राहण्याची सोय असेल तर सोबत बुकिंग साठी आवश्यक तपशीलही द्या. जसे की:
contact numbers
email addresses
पत्ता
जाण्या-येण्याचा सोपा मार्ग
transport ची व्यवस्था
इ.इ.

(आपल्याला बर्‍याचदा विपत्रांमधून ही माहीती मिळत असते. ती इथे share करा. ही माहिती असलेली PDF किंवा word doc फाईल तुमच्याकडे असेल तर तसे लिहा. म्हणजे मग इच्छुक लोक तुम्हाला संपर्कातून लिहू शकतील.)

एकमेकां सहाय्य करू, अवघे जाऊ पिकनिकला!!!!!! Happy

[जवळच्या (चार तासांचे आत) व लांबच्या प्रवासाच्या वेळी काय काय खबरदारी घ्यावी, कोणती पूर्वतयारी करावी, कोणती माहिती आगाऊ मिळवावी, कोणते संपर्क क्रमांक जवळ असावेत, प्रवासाचा मार्ग कसा निश्चित करावा, सुरक्षेच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने काय काळजी घ्यावी, वाहनाच्या बाबतीत व ड्रायव्हरच्या बाबतीत काय पथ्ये पाळावीत इत्यादी माहितीचे एकत्रित संकलन खालील धाग्यावर पाहता येईलः
प्रवासी भाडोत्री गाडीने जवळच्या/ लांबच्या प्रवासासाठी टीपा
]

+++++++++++++++++++++++++++++
आत्ता पर्यंत या धाग्यावर पडलेल्या पोस्ट्स मधून पिकनिकसाठी जे ऑप्शन्स मिळाले आहेत ते एकत्र करून एरियावाइज इथे देत आहे:

मुंबईजवळः
१) शहापूरजवळ (जिल्हा. ठाणे) एक HARSHGIRI Lake Resort आहे.
खूप अगदी खास नाहिये. पण जेवण बरे होते इथले. आणि रेट्स ही फॅमिलीसाठी परवडेबल आहेत.
राहण्याची सोय आहे अथवा नाही मला idea नाही. नेट वर सर्च केल्यास या Resort ची लिंक आणि बुकिंग चे तपशील मिळू शकतील.

२)
कर्जत मधील काही रिसॉर्ट
रीव्हरटच ** http://www.rivertouchresort.com/index.html
मोदी रिसॉर्ट** https://www.drmodisresort.com/contactus/
सत्या *** http://www.satyaresort.com/
रीव्हरगेट **** www.rivergateresort.com

कर्जत फार्म हाऊसेसची माहिती ह्या साईटवर पण मिळेल :
http://way2nature.com/index.asp
http://mumbai.click.in/classified/travels/hotels-resorts/karjat-farmhous...

३)
कल्याण -
विश्वासराव फार्म हाउस** http://vishwasraofarmhouse.com/
विसावा रिसॉर्ट - www.visawaresort.com

४)
अंबरनाथ - शांती सागर**
At Vasat, Near M.I.D.C. Pump House, Ulhas River Bank, P.O. Jambhul,
Ambernath(W). Maharashtra, INDIA.
For General Enquiries and call on Telephone No : (0251) - 2681999 / 2683210 / 3200728
(0251) 2682792 / 2685631 / 3200727 Mobile: 93204 09818 ( call timings 8.a.m. to 8p.m.)

५)
बदलापूर - रेनी रिसॉर्ट**

६)
ठाणे - टिकूजी-नी-वाडी ** http://www.tikuji-ni-wadi.com/
टिकुजीनी गुज्जू लोकांच फेव्हरिट त्यामुळे जेवण अगदी गोड गोड असतं.

७)
वसई- पालघर - भाईंदर

८) रोशिनी कृषी पर्यटन केंद्र
Post Karanjon,
Shiravali-Vajreshwari Road,
Vasai(E)
6808406, 9890376323,

९) केशवसृष्टी
Keshav Srishti Office
Uttan village, (on way to Essel World by road),
Bhayander (West), Thane: 401 106
Tele: +91 22 28450247/2855
Email: jagdish_rp@rediffmail.com
http://www.keshavsrushti.com

१०)
नेरळचे सगूणा बाग फार्म हाऊस: - http://www.sagunabaug.com/
नेरळला भडसावळे यांचा हा फार्म आहे. जवळ नदी पण आहे. घरगुती स्वरूपाची व्यवस्था आहे. पिलांना न्यायला मस्त आहे. खूप मजा करतात बच्चे कंपनी तिथे. बफेलो राइड मूळे तर अजुनच मजा येते त्यांना.
पण मोठ्यासाठी एंजॉयेबल पिकनिकची गॅरंटी नाही. एका माबोकराच्या अनुभ्वाप्रमाणे व्यवस्था काही खास नव्हती. नदीत नुसता चिखलगाळ होता. जागेचा नीट न ठेवलेला मेंटेनन्स, जेवणाची नीट न झालेली सोय यामुळे खूप मजा नाही आली . शिवाय जेवणाची चवही इतकी खास नव्हती.

११) खोपोली -
uncle's kitchen resort
खोपोली पासून केवळ काही मिनिटांच्या अंतरवर हे ठिकाण आहे. 2010 चा माबो ववि इथे झाला होता. फॅमिली व ग्रूप पिकनिकसाठी छान जागा.

पेण-खोपोली रस्त्यावरील SP Farmhouse - http://spfarmhouse.com/

१२) माथेरान:
http://matheranhotels.com/index.html छान हॉटेल आहे हे. स्टेशन पासुन साधारण १ कि.मी. असेल.
टॉय ट्रेनने जाणार असाल तर त्याचे बुकिंग मात्र आधीच करा. तिथे भली मोठी लाईन असते.

१३) रोहा:
कोलाड - सुतारवाडी डॅम जवळील Hans Adventure Resort
http://hansadventure.com/index_sw.asp
Hans Adventure Resort धम्माल आहे
फक्त भरपूर पाऊस झाल्यानंतर जावे. कुंडलिका नदीत रिव्हर राफ्टिंग क्लास अनुभव आहे.

१४) नवी मुंबई जवळचे ठिकाणे... कल्याण वरून मलंगगड, पनवेल-पळस्पे फाट्यावरुन जवळ प्रबळगड, कलावंतीण दुर्ग, कर्नाळा, इर्शाळगड, चंदेरी... अलिबागला कुलाबा, थळला खांदेरी-उंदेरी आहेत.

पुणे:

Picnic Spots Near Pune:

१)
गिरिवन रिसॉर्ट:

२)
श्री क्षेत्र सत्यसाई पांडुरंग मंदिर , हाडशी (पौड पुणे )
(सुंदर अन शांत निसर्ग अध्यात्माच्या सानिध्यात पाहायचा असेल तर इथे जरूर भेट द्यावी.)
जाण्याचा मार्ग -:-
पुणे-नळस्टॉप-पौड रोड - चांदनी चौक - पिरंगूट - पौड - उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे- हाडशी. साधारण ६० किमी.

३)
मावळसृष्टी - http://www.mavalsrushti.com/
इथे २००९ चा ववि झाला होता. या स्पॉटविषयी माबोकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हे ठिकाण विशेष खास नाही असे kabhayk या माबोकराचे म्हणणे आहे.

४)
सूर्य शिबीर - पुण्यावरून ४५ किमी असेल.. तिथे जाण्यासाठी त्यांची बस आहे पुढे बोटीतून .पिकनिक साठी मस्त जागा.

५)
पुण्यापासून दोन तासांच्या अंतरावर जाधव गड आहे. आधी बुकींग केले तर बरे. जरा पीळ ड्राइव आहे पण मस्त जागा आहे. कॉफी शॉप मध्ये उत्तम बिर्यानी मिळाली. मुलांसाठी स्विमिन्ग पूल व तिथेच स्पा आहे आयांसाठी. एक रात्र तरी राहिले तर जास्त छान. बर्‍यापैकी महाग असेल बहुतेक.

६) अ‍ॅम्बीव्हॅली/ कोरिगड:
अ‍ॅम्बीव्हॅली देखिल आता सगळ्यांकरता खुलं झालं आहे. अँबी व्हॅलीलाच लागून कोरिगडाजवळ "क्लाऊड ९ आहे, ग्रूपनुसार बंगले मिळतात. अप्रतिम. स्विमिंग पूल पण आहे. फक्त व्हेज जेवण मिळते.

७) भोरजवळ भाटघर धरणचा लेक व्ह्यू असलेलं मंत्र ए ठिकाण पावसाळ्यात एकदम मस्त आहे. पुण्यातून तासाभरात पोहोचता येतं इथं सर्व माहीती आहे..

८) महाबळेश्वर
महाबळेश्वरमधे रहाण्या-जेवण्यासाठी उत्तम शाकाहरी हॉटेल - गिरीविहार. (http://www.hotelgirivihar.com/). स्थलदर्शनासाठी तुम्ही जिकडे रहाला तिथेच वाहनाची सोय करण्याची विनंती करता येईल. क्षेत्र महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, तापोळा, महाबळेश्वरातले पॉईंट्स इत्यादी गोष्टी बघता येईल. महाबळेश्वरला जाणार असाल तर वाई सुध्दा कराच.

महाबळेश्वरमधे रहाण्या-जेवण्यासाठी छान हॉटेल "andvanbhuva" - http://www.hotelanandvanbhuvan.co.in/
मिलिंद गुणाजीने पण या हॉटेल वर एका कर्यक्रमात सान्गितले होते. ईथले जेवण पण मस्त आहे.

खरेखुरे अ‍ॅनिव्हर्सरी स्पेशल हवे असेल तर इतर कुठला फार विचार न करता महाबळेश्वरला रामसुख रिसॉर्टला जा आणि earth star, blue heart किंवा florentine या तीनपैकीच एका कॉटेजमध्ये रहा. पावसाळ्यात गेलात तर Cullinan कॉटेज मध्ये. रेट्स थोडे जास्त वाटले(४२K /२ nights) तरी it's worth it. इथले जेवण उत्कृष्ट असले तरी 'फक्त व्हेज' मिळते हीच एक (माझ्या दृष्टीने) उणीव.

महाबळेश्वर जाणार असाल तर एक स्ट्रॉबेरी रिझॉर्ट पण छान आहे.

९) लवासा:

http://www.lavasa.com/
इथे तुम्हाला लवासाची माहिती मिळेल. हॉटेल्सचे फार ऑप्शन्स नाहीयेत. एकांत एका टेकडीवर आहे आणि इथून दिसणारा व्हू अत्यंत सुंदर आहे. इथून शेजारूनच एक छोटासा ट्रेल आहे.
फॉरच्युनमध्ये स्विमिंग पूलही मिळेल. इथून वॉटरस्पोर्टस जवळ आहेत. पण व्हू इतका चांगला नाही.
Ekaant – The Retreat: A scenic 20 room resort, which offers breathtaking views and a multi – cuisine restaurant, for reservation call 020 6675 7000.
Fortune select Dasve: An elegant 60 room, 4 star hotel on the warasgaon lake front, for reservation call: 020 30994444.
The Water Front Shaw serviced apartments: self-contained, fully equipped apartments that overlook the lake, above the promenade, for reservation call 020 66541414.
Mercure Lavasa: A 133 room hotel by the Accor Group, for reservation call 020 67929000
AC tents at X-thrill camp, for reservation call 020 20291310 / 9819443047

१०) खंडाळा:
ड्यूक्स रिट्रीट, खंडाळा. खूप कपल्स असतील तर कॉटेज घेता येइल नाहीतर रूम्स मस्त आहेत. स्पा आहे. स्पेशल डेट सारखे फॉरमल जेवणाची मस्त जागा आहे. पूल साइड आहे. सकाळी ट्रेल्स वगैरे आखतात ते लोक्स शिवाय ब्रेकफास्ट जेवण खाण मस्त आहे. पावसाळ्यात रॉक्स. वीकांताचे रेट्स जास्त आहेत. वीकडेला गेल्यास स्वस्त पड्ते. मुंबई/ पुण्यापासून दीड तासाची ड्राइव्ह.

११) लोणावळा:
लोणावळ्याचे लगूना सुरुवातीला चांगले होते. नंतर ते तसे राहिले नाही. लोणावळ्यालाच जायचे असेल तर फरियास चांगले आहे. पण शुक्रवार- शनिवार रात्री मुंबईकरांची गर्दी असते.
थोडेसे हटके पाहिजे असेल तर मचाण नावाचे आहे लोणावळ्यावरून अँबी व्हॅलीला जायच्या रस्त्यावर घुसळखांबकडे थोडी वाकडी वाट करून. तीन बेडरूमचे सुंदर घर आहे. एका जोडप्याला रहायलाही ते छान आहे. दरीच्या टोकाला बांधले आहे. आणि दरीकडे पूर्ण काचेच्या भिंती आहेत. त्यांचा स्वयंपाकी तुम्हाला जेंव्हा जे काही हवे ते बनवून देतो. फिरण्यासाठी पायवाटा आहेत. www.themachan.com
ड्यूक्स रिट्रीट पण फार छान आहे. तिथे तुम्हाला हवे तसे खास अ‍ॅनिवर्सरी डिनर प्लॅन करतात. विथ म्युझिक मला वाट्ते १० के आहे कि काय तरी. एक बोहले असल्यासारखे असते आणि डिनर, वाइन इत्यादी. मेन्यू आधी सांगता येतो. अगदी क्यूट ड्रीमी लोके शन आहे. हा अगदी नो कटकट आरामाचा रिसॉर्ट आहे. क्यूट से इन्डोअर रेस्ट. पण आहे. यम्मी ब्रेकफास्ट.

कोकणः
१) अलिबाग-नागाव:

वैद्य यांचे फार्म हाऊस
पत्ता: नागाव-हाटाळे बाजारा जवळ
पांढरा मारुती समोर
कवळे पाडा
फोनः ९५२१ ४९४५०१७ (आता change झाला असल्यास idea नाही )
बुकिंग साठी मुंबईचा पत्ता:
पोपटलाल बिल्डिंग, रानडे रोड, दादर (प.)
फोनः ४३०९३७१

फार्म हाऊस खूप स्वच्छ नाहिये. पण ठिक आहे. २ मजली आहे. खाली हॉल + किचन + एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम. वरती एक बेडरूम + टॉयलेट + बाथरूम + टेरेस
जानेवारी २००९ मध्ये २५० रु. per head charge होता. किचन मध्ये तुम्हाला स्वत: स्वयंपाक करायचा असल्यास allowed आहे. फार्म हाऊस वर एक नोकर असतो. बाहेरून जेवण वगैरे मागवायचे असल्यास तो मदत करू शकेल. अर्थात मुंबई चा फोन नं. दिला आहे. त्यावर चौकशी केल्यास पूर्ण माहिती मिळेलच. अलिबाग-नागाव ला जाण्यासाठी कल्याण/ठाणे येथून बसेस मिळतात. किंवा gate way of india वरून फेरी बोट/लाँच ही मिळू शकेल.

++++++++++
मामी | 22 November, 2012 - 22:29
२०, २१ नोव्हेंबरला नागावला गेलो होतो. आयत्यावेळी ठरल्याने, बरेच जण असल्याने एकदम ४-५ रूम्स हव्या असल्याने, समुद्रकिनार्‍याच्या जवळच हॉटेल हवं असल्याने आणि नेटवरचे रिव्हू वाचून या सगळ्या क्रायटेरियात बसणारं 'डॉलफिन हाऊस बीच रिसॉर्ट' नावाचं रिसॉर्ट बुक केलं होतं. पण ते फारच बोअरिंग निघालं. एकतर नागावमध्ये शिरल्यावर छान छान वाड्या दिसतात. तशी एखादी वाडी असेल घरामागे अशी अपेक्षा होती ती मोडीत निघाली. एक नुसतंच घर. त्यात आजूबाजूला अज्जिब्बात जागा नाही. पण खोल्या बर्‍या होत्या आणि खूप अपेक्षाही नव्हती म्हणून ठीकाय. रिसॉर्टच्या मालकाची वृत्तीही 'हे आहे हे असं आहे. यात आम्ही बदल करणार नाही. तुम्ही उगाच सल्ले देऊ नका आणि कमेंटसही करू नका.' अशी होती. असो.
गेल्यावर लंच रिसॉर्टमध्येच केल्यावर इथे काही खरं नाही हे लक्षात आलं. त्यामुळे जेवल्यावर फिरायला बाहेर पडलो तेव्हा 'डिनर कुठे?' या प्रश्नाचं उत्तरंही शोधत होतो. आणि आम्हाला एक अत्यंत अमुल्य खजिनाच सापडला - 'अन्नपुर्णा' नावाचा. श्री व सौ चिटणीस त्यांच्या घरातून हे घरगुती पध्दतीचं जेवण देणारं रेस्टॉरंट चालवतात. ऑर्डर आधी द्यावी लागते (तसंही नागावला कुठेही आधी ऑर्डर द्यावी लागते). व्हेज - नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं अप्रतिम चवीचं जेवण इथे मिळतं. व्हेज थाळी रु. १०० आणि नॉनव्हेज रु. २५०.
आम्ही रात्रीकरता बोंबलाचं कालवण, कोलंबीचं लिपतं आणि तळलेलं पापलेट असा नॉनव्हेज बेत सांगितला होता तर कोबीची भाजी, फ्लॉवर-मटारची भाजी, डाळ असा बेत सांगितला होता. कोलंबीचे पैसे वेगळे होते कारण थाळीत दोनच नॉनव्हेज आयटेम असतात. पण जेवण भरपूर असतं आणि अत्यंत प्रेमानं वाढतात. जेऊन तृप्त होणं म्हणजे काय हे अनुभवायचं असेल तर 'अन्नपुर्णा' ला पर्याय नाही.
दुसर्‍या दिवशी सकाळचा नाश्ताही अर्थात तिथेच. चविष्ट पोहे आणि ऑम्लेट-पाव.
अन्नपुर्णा : अलिबागहून नागावमध्ये शिरल्यावर मुख्य रस्त्यावरून शिवाजीचा पुतळा (उजवीकडे) आल्यावर तसंच पुढे गेलात की रस्ता डावीकडे वळतो. तिथे लगेच उजव्या हाताला तुम्हाला अन्नपुर्णाचा बोर्ड दिसेल. (अजून एक अन्नपुर्णा आमच्या सुप्रसिध्द रिसॉर्टजवळही होतं. त्यामुळे गोंधळ होऊ देऊ नका. ) फोन : ८००७४३९३७९, ९७६४५५७०७९, ७३५०५६७९८८, ०२१४१-२४५३२८. हे जवळपासच्या हॉटेलातून रहाण्याची सोयही करतात.

++++++++++++

अलिबागजवळ आवास म्हणुन एक बीच आहे. कुटुंबासाठी जायला छान जागा आहे...
तिथे जोगळेकर कोटेज मध्ये राहाण्याची चांगली सोय होते... मुलांसाठी खुप छान जागा आहे. शांत आणि निवांत...
जोगळेकर कोटेजची माहिति इथे मिळेलः
www.jogalekarcottage.com
अत्युत्तम जेवण. वेज नॉनवेज (अनलिमिटेड).

+++++++++++

दुर्वांकुर कॉटेज
नागाव वैद्य आळी.
कपिल वैद्य ९९२१९७४०५०
घरगुती जेवणाची सोय आहे, २ मजली आहे. + टॉयलेट + बाथरूम. + बेडरूम
मध्यवर्ती असल्याने काशीद बीच, नागव बीच, अक्षी बीच, जाता येते जवळच बिर्ला मंदीर सुद्धा आहे

२)
मुरुडला गोल्डन स्वान नावाचे बीच रिसॉर्ट आहे:
प्रत्येक कॉटेजच्या बाहेर मस्त व्हरांडा आहे... आणि तिथुन समुद्राचा व्ह्यु!
तिथला बीच प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे.. तरीही मुरुडच्या मेन बीचपासुन चालत जाण्याच्या अंतरावर... अगदी किनार्‍यावर मस्त झोपाळे आणि बीच चेअर्स आहेत! शिवाय गोल्डन स्वानने रेंट वर सायकल्सही ठेवल्या आहेत... आणि बीचवर घोडा आणि घोडागाडी राईड्सही आहेत. जेवण थोडे महाग पण क्वांटिटी चांगली! आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अतिशय नम्र आणि तत्पर स्टाफ. कॉटेजेस काही फार लॅव्हिश वगैरे नाहियेत आतुन पण फार वाईटही नाहीत! पुण्यापासुन ताम्हिणी घाटातुन १५६ किमीवर आहे. कपल्स साठी तर बेस्ट आहेच पण मुलांना खेळायला आणि फॅमिली गेट्-टुगेदर्सनाही चांगले आहे... अतिशय सुंदर लोकेशन - समुद्राच्या शेजारीच, स्वच्छ आणि पूर्णपणे सुरक्षित समुद्रकिनारा, टुमदार रिसॉर्ट, अतिशय आदबशीर आणि तत्पर स्टाफ, चविष्ट जेवण.
हे रिसॉर्ट पूर्वी एमटीडिसीचं होतं आणि आता गोल्डन क्लब लीजवर चालवत आहे. त्यामुळे खोल्या अगदी बेसिक आहेत. विशेषतः डि१, डि२ अतिशय छोट्या - केवळ दोन लोकांकरताच आहेत. तिसर्‍याला त्यात अगदीच वाव नाही (फारच लहान मूल असेल तर ठीक). डि१+डि२ आणि डि३+डि४ अशा एकत्र करू शकता कारण मध्ये कॉमन दार आहे.
डी३, डि४ या खोल्या १ आणि २ च्या शेजारीच असल्या तरी जरा मोठ्या आहेत. त्यामुळे रात्री अजूनएक बेड लावता येईल. पण त्यांच्याकडे फोल्डिंग बेड नाहीत त्यामुळे जमिनीवर गादी घालून झोपावं लागेल.
डि५,डि६ या खोल्यांमध्ये पोटमाळ्यावर बंकबेड बनवले आहेत. ते बरेच मोठे आहेत. तीनजण आरामात झोपू शकतात. बच्चेकंपनी या सोईवर अतोनात खुश होते.
याव्यतिरिक्त काही कॉटेजेस आहेत. पण त्यात ६ ते ८ माणसांकरता केवळ एकेकच बाथरूम आहे.
बाथरूम्सही छोट्या आणि 'सुधारणेला बराच वाव' टाईप्स वाटल्या.
तरीही, लोक्स, यातून आपल्याला त्यातल्यात्यात योग्य अशी रूम शोधा पण नक्की एकदा तरी जाच.

अधिक माहिती : http://www.goldenswan.com/beachresort/html/index.html

मुरुड्ला जाणार्‍या लोकांसाठी एक टीप - एकदा तरी पाटील खाणावळीत जेवा. veg अथवा non veg. खेकडा खा, मासे खा, prawns खा किंवा चिकन fry खा. या जन्मात विसरणार नाही. बिलपण फार नाही, कि जेवण्याची मजा अजुन वाढते. अप्रतिम जेवण मिळतं. आणि हे एका मस्तं नारळाच्या वाडीत बसुन हां ! छान जागा आहे एकदम.

३)
हरिहरेश्वरला रहायची सोय आहे बोड्सांच्या 'तपोवन' मधे. छान नविन स्वछ्छ आणि AC रुम्स आहेत. सावधान - ईथे खूप सारे बोडस आहेत. आपण योग्य ठिकाणी गेला आहेत ना चेक करा. दिलीप बोड्स यांचे तपोवन छान आहे. पण त्यांच्या घरी राहण्याचा एका माबोकराचा अनुभव फारसा चांगला नाही. service व Rooms खास नाही.
Dilip G. Bodas
9272943106

जर तंबुमधे रहायचं असेल तर सरळ MTDC गाठा. समुद्र पण जवळ आहे इथून. खाण्यापिण्याची पण सोय आहे.
घरगुती राहाण्याची सोय बर्‍याच ठिकाणी आहे, पण मग त्यात सुद्धा शेटे एकदम बेश्ट ! चांगला माणूस आहे. राहिलात कुठेही तरी शेटेंकडे एकदा जेवाच. अगत्याने चवदार जेवण मिळण्याची खत्रिशीर जागा आहे ही.
बोड्स आणि मोघे मंडळींचा सुळसुळाट आहे. त्यामुळे योग्य माणूस शोधा

हरिहरेश्वरला कुटुम्बे यान्च्याकडे ही मस्त व्यवस्था अस्ते. पण त्यांच्या कडे केवळ शाकाहारी जेवण असते.

हरिहरेश्वरचे दोन्ही किनारे स्वच्छ व सुंदर आहेत. हरीहरेश्वरचा समुद्र सुरक्षित नाही. समुद्रात पोहायला जाण्याचा विचार असेल तर तेथील रहिवाश्यांच्या सुचना दुर्लक्षित करु नका. येथले समुद्रकिनारे खडकाळ आहे. लाटा फार येतात.

हरिहरेश्वर समुद्र सुरक्षित नाहि हे सगळ्यानी लिहलेय पण तीथल्या खड्कांवरुन प्रदक्षिणा वर्थ आहे. तसेच MTDC चे लोकेशन मस्त आहे आणि त्या बाजुच्या किनार्‍यावर काही वॉटरस्पोर्ट्स चालतात.

४) दापोली:
http://mangalati.com
ज्याना कोणाला सी.ए. (Complete आराम) अथवा एम.बी.ए.(मस्त बसुन आराम) करायचाअ असेल तर हे ठिकाण फॅमिलीसाठी उत्तमच. पावसाळ्यात तर जाम धमाल असते... गेल्यावर्षी पावसाळ्यात गेलो होतो.. व्हेज आणि नॉनव्हेज ची उत्तम सोय असते..

५) सासवणे:
सासवण्याला रवि आपट्यांचं b&b आहे. उत्तम आहे. अक्षरशः अंगणात समुद्र आहे. एकदम सेफ. तो समुद्र किनारा फार खडकाळ आहे त्यामुळे पाण्यात जायची मजा येत नाही जास्त. MTDC चं रजि. आहे त्याला त्यामुळे इन्फो त्या साइटवर मिळेल. मुंबईहून लाँचने मांडवा जेट्टी आणि तिथून रिक्षा (२५-३० रूपये). रिक्षावाल्याला रवि आपटे, सासवणे सांगितलं की तो दारात नेऊन सोडतो. तसच उलट. रिक्षावाल्याचा नंबर घेऊन ठेवायचा म्हणजे परतीच्या लाँचला किती गर्दी काय ते तो सांगतो. या जेट्टीवाल्यांच्या बसेस सुद्धा आहेत. जोगळेकर कॉटेज अवास येथे आहे. मांडव्यापासून अर्धा तास. खरतर या दोन्ही ठीकाणी कार असलेली बरी जवळच्या समुद्रकिनार्यांवर जाता येते. रवी आपट्यांकडे शाकाहारी जेवणच मिळते .तुम्ही आधी सांगितलेलं असेल तर मांसाहारीही मिळते. रिसॉर्टमधे केवळ ब्रेफा व चहा बनतो. जेवण बाहेरून डब्यातून येते.

सासवणेला संसारे फार्महाउस ला गेलो. ति जागा पण MTDC अप्रुव्हड आहे. चांगली हिरवीगार जागा होती. दुपारच्यावेळी पण AC नसुन थंड होती. १ मोठ्ठी खोली होती. तिथेच आम्ही ८ जणी राहिलो. जेवण पण सगळ्यांना आवडल. सासवणे समुद्र किनारा अगदि २ मिनीटावर आहे. आणि मांडवि जेट्टी गाडीने १० मिनीटावर आहे.

कोकण नेचर ट्रेल्स
http://blog.krishivarada.in/nature-trails-of-the-season/

६) गुहागर
अश्विनी डोंगरे | 13 March, 2012 - 10:28
गुहागर मधे आम्ही एक पर्यटक निवास चालवत आहोत. हे एक पूर्ण घर आहे, जे आम्ही पर्यटकाना देतो.
घरात आधूनिक सोयी आहेत ( टी.व्ही. नाही- बरेच लोक त्यामुळे जास्त खूष होतात )
एक जोडपे देखभालीसाठी तिथे असते. १५-२० लोकांचा ग्रुप सहज राहु शकेल ( काही वेळा जास्ती लोकही तिथे राहिले आहेत).
घराच्या पुढे-मागे अंगण, मागे नारळी-पोफळीची बाग आणि बागेतुन पायवाटेने समुद्र किनारा अशी सुबक रचना आहे.
जेवणाची सोय घरात नाही, पण जवळपास भरपूर पर्याय आहेत.
अधिक माहितीसाठी मला विपू करा.

वेलावन बीच हाऊस- गुहागर
www.facebook.com/velavan.guhagar
कोकणवाडी गेस्ट हाऊस- कोतवडे, रत्नागिरी
www.facebook.com/kokanwadi

७) मालवणः
तारकर्ली बिच रिसॉर्ट.. MTDCच आहे. एका दिवसाला रु.२,०००/- फक्त. जर MTDC नको असेल तर बुकिंग न करता जा... खुप चांगली आणि स्वस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत.
तारकर्ली बीच जवळच 'गजानन'

seapearlresort.com
Sea Pearl Resort
Devbag ,Malvan, District Sindhudurg. Maharashtra, India.. Phone: +91 2365 248520. Sanika Wairkar: +91 9819447799. Shashank Wairkar: +91 9867755799 ...

सातारा:

१)
गुरसळे रिसोर्ट @ कोयना नगर. रहाण्याची उत्तम सोय (१२०० - १५०० रु. एका खोलीचे भाडे) .
२-३ दिवस निवांत राहुन आसपाचा रमणिय परिसर पहाण्यास खुप छान आहे. विकेंड ट्रिपसाठि चांगले ठिकाण. रिसोर्ट डोंगरावर आहे...... तिकडुन धरणाचा व्ह्यु दिसतो. धरणातले ताजे मासे..... अप्रतिम!!!! (सकाळीच मास्याची order दिली तर रिसोर्ट चा माणुस ताजे मासे घेउन येतो )
http://www.gursaleresort.com/

२)
सातार्‍यामधे महाराजा म्हणून एक हॉटेल पवई नाक्यावर आहे. त्या व्यतिरिक्त राजतारा आणि हॉटेल ग्रिन फिल्ड सांगु शकतो दोन्ही ठिकाणी जेवण आणि रहायची चांगली सोय आणि माफक दर आहे.

३)
ठोसेघर वेड जागा आहे.... अजुन थोडा पाउस झाल्यावर गेलात तर फुल्ल फ्लो असेल धबधब्याला.....
तरी आता जागोजागी रेलिंग घातली आहेत त्यामुळे धबधब्याखाली जाता येत नाही... पण तरीही बेस्ट जागा आहे! अजुन थोडे पुढे जाउन चाळकेवाडीच्या पवनचक्क्या पाहुन या!.... भन्नाट वारे असते तिकडे

औरंगाबाद:
औरंगाबाद च्या जवळ - खुलताबाद चा किल्ला, भद्रा मारुती आहे. तसेच वेरूळ, अजंठा लेणी आहेत. अगदी शहरात च - बिबिका मकबरा आणि पाणचक्की.. तसेच पितळखोरा लेणी, म्हैसमाळ हिलस्टेशन पण आहे. MTDC च्या वेबसाईटवर अजून माहिती मिळेल.

नाशिकः
भिमाशंकरच्या पायथ्याला जंगलात एक ब्लु मॉर्म्मोन नावाच रिसॉर्ट आहे.
तिथे जाउन आलेल्या लोकानी फार उत्तम आहे असा अभिप्राय दिलाय.

http://www.bhimashankarbluemormon.com/index.html
हे ही बघा

ट्रेकिंग ग्रूप्सः
१) Jungle Lore:
Trek Organizers
Mr.Kaustubh Upadhye. Mob – 9819756684
Mr.Tejas Abhyankar. Mob – 9821906046

उत्तम नियोजन, वेळेचे भान ठेवून ठरवलेला कार्यक्रम आणि निसर्ग आणि गडसंवर्धन याबद्दलची कळकळ व ती सर्वांपर्यंत पोचवण्याची धडपड हे या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घेतलेला मार्ग एक्सप्रेस वे - सातारा - कोल्हापूर - थावंदी फाटा - आजरा - अंबोली - विलवडे - बांदा - म्हापसा बाहेरून - अंजूना.
विलवडेमार्गे एकदम बांदा गाठता येते, सावंतवाडीला जावे लागत नाही. १० एक कि.मि. वाचतात. पण मधला रस्ता फारच खराब झाला आहे, मागच्या वेळी बरा होता.

संध्याकाळचे ५.००. मोर्चा सरळ वॅगॅतोरकडे वळवला. धारगळ ते वॅगॅतोर सुद्धा वेळ लागला. वाटेत पेट्रोल फूल केले. (आता येथील पेट्रोल फक्त ९.०० रू. स्वस्त आहे, मागच्या वेळेस हा फरक तब्बल २० रू. होता). हॉटेल शोधण्याच्या फंदात न पडता गाडी वॅगॅतोर फूट्बॉल ग्राऊंड्समोर उभी केली (थलासासमोरचा पार्किंग लॉट), पैसे,मोबाइल, कॅमेरा बरोबर घेतले, इतर सर्व सामान गाडीतच सोडून एक ५०-६० पायरी खाली उतरलो आणि उत्तर गोव्यातील आमच्या आवडत्या बीचवर पाऊल ठेवते झालो. लिटल वॅगॅतोर किंवा ओझरान बीच. मेन किंवा बिग वॅगॅतोर बीचच्या खूपसा डावीकडे असलेला हा बीच पटकन दिसत नाही. म्हणूनच अत्यंत कमी गर्दी असलेला, नावाप्रमाणेच छोटासा नितांत सुंदर बीच.
गोव्याची साद - भाग २
(या भागात या ट्रीपची तसेच मागील काही ट्रीप्समधे घेतलेली प्रकाशचित्रे टाकली आहेत)
तर सकाळी सकाळी अंजुनाहून पाळोळेकडे प्रयाण केले आणि साधारण ११.०० च्या सुमारास पाळोळे गावात प्रवेश केला. मार्ग - अंजुना - पणजी - मडगाव - नवेली - कुंकळ्ळी - करमळघाट – चाररस्ता (काणकोण) -पाळोळे .
पाळोळे गावातून डावी उजवीकडे पाहताना मागच्या सर्वच ट्रीप्स आठवत होत्या आणि बीच रोड्कडे डावीकडे वळल्यावर तर मन उल्हासित झाले / भरून आले (Excitement) .
आता पाळोळेविषयी थोडेसे - १० एक वर्षांपूर्वी एक सदग्रुहस्थ आम्हाला बागाला भेटले होते. तेंव्हा आमच्यासाठी गोवा म्हणजे कळंगुट, बागा, पणजी, मडगाव, फारफार तर कोलवा आणि बाणवली पलिकडे नव्हते. या महाभागाने थोडी अतिशयोक्ती करतच सांगितले की - पाळोळे समुद्रकिनारा हाच गोव्यातला सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे. अतिशय संथ, स्थिर पाणी आणि लाटा जवळ जवळ नाहितच. खूप आत जाईपर्यंत सपाट तळ आणि कुठेही खोली वाढत नसल्याने तुम्ही नाकाशी पाणी येईपर्यंत एखाद्या तलावात असल्याप्रमाणे आत चालत जाऊ शकता. अतिशयोक्ती तर होतीच पण वर्णन वेडावणारे होते. लगेचच्या आमच्या पुढच्या ट्रीपला आम्ही पाळोळे समुद्रकिनारा गाठला आणि याच्या प्रेमातच पडलो. असे म्हणतात की फेब्रुवारीनंतर समुद्र थोडा थोडा अशांत होऊ लागतो आणि पाउस संपेपर्यंत खवळलेलाच असतो. तरीही ह्या मार्च अखेरिस दोन मोठ्या लाटांच्यामधे मी मनात ३०-३२ आकडे मोजले. पाण्याचे फुगवटे, अतिशय अशक्त लाट जी किनार्यापर्यंत पोचू पण शकत नव्हती हे येत होते पण लाट नाही. विचार करा की ऑक्टोबर नोव्हें डिसेंबर मधे समुद्र काय रुपडे दाखवत असेल| समुद्राची गाझ ज्याला म्हणतात ती पण थांबली आहे का असा कधीकधी भास होतो.
तर तेव्हा आम्ही इथे असताना एखादे भारतीय कुटुंब दिसले की खूष व्हायचो. एक्मेकांना सांगायचो - ती बघ हिंदुस्थानी लोक्स . संपुर्ण बीचवर परदेशी मंडळी विखुरलेली असायची. समुद्रस्नान, बीच शॅक्सवर एखादा ज्यूस्/बियर/कॉकटेल घेऊन दिवसभर सूर्यस्नान्/पुस्तक वाचन करताना दिसायची. दक्षिणेकडून आपली हिंदुस्थानी मंडळी कर्नाटक, ता.ना., केरळाकडून कारवारमार्गे यायचे आणि एक चांगला बीच आहे अशा ऐकीव माहितीवर २ कि.मि. आत शिरून बीचला पाय लाऊन जायचे कारण बहुतेकांची बुकिंग्ज कळंगुट, बागा, कोलवा , बाणवली इकडेच असायची.
आता परिस्थिती बदलली आहे. अनेक हिंदुस्थानी मंडळी मुद्दाम येथेच येतात, राहतात, आनंद करून जातात. पुस्तके वाचणारी परदेशी टूरिस्ट मंडळी ह्या वेळी तर दिसलीच नाही. अर्थात या कंपनीचा गोवा सिझन म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी. तर असो
धारण ३-३.५ कि.मी. पसारा असलेला हा समुद्रकिनारा. याच्या खाली (दक्षिणेकडे) आणि वर (उत्तरेकडे) लागून लागून काही समुदकिनारे आहेत. पण किनारा ते किनारा असे जाता येत नाही. डोंगररांगा, सामुद्रीखडकरांगा यांमुळे संपर्क तुटतो. काही बहाद्दर असेही जायचा प्रयत्न करतात. तर पाळोळेच्या दक्षिणेकडे लागून आहे कोळंब किनारा (साधारण अर्धाच कि.मी.) त्यानंतर पाटणे किनारा (साधारण १.५ कि.मी.). मग राजबाग बीच (१.५ ते २.० कि.मी. चा पसारा) हा राजबाग बीच द ललीत - गोल्फ क्लब आणि रिसॉर्ट्सला लगत आहे. असा समज आहे की हा त्यांचा प्रायव्हेट बीच आहे. पण यावर कोणालाही जाता येते. माझ्या माहितीप्रमाणे गोव्यामधे प्रायव्हेट बीच नाहीत. हे रिसोर्टवालेच तसा समज करून देतात. उगाच सेक्युरीटी वगैरे ठेऊन तसा आभास निर्माण करतात. आम्हि राजबाग, माजोर्डा, सिंकेरी (ताज अग्वादचा) किनार्यांवर तेथे रहात नसताही गेलो आहोत.
तर राजबाग बीचच्या खाली (दक्षिणेकडे) ताल्पोना, गालजीबाग आणि शेवटचा पोळेम किनारा. हे सर्व छोटे छोटे, अत्यंत कमी गर्दी असलेले किनारे आहेत. एखाद दोनच बीच शॅक्स / रेस्टॉरंट्स असतील. यापै़की पाटणे किनार्याचे वर्णन मि.पा.च्या सोत्रि नी दोन एक वर्षांपूर्वी इथेच केले आहे. आणि सोत्रि, तुम्ही रेकमेंड केलेल्या "सी व्ह्यू रेसॉर्ट" मधे आम्ही २ दिवस राहीलो बरं का | चांगले हॉटेल आणि किनारा आहे. पण चिरंजीवांच्या मते पाळोळे पेक्क्षा कमी हॅपनिंग असल्याने तिसर्या दिवशी पाळोळेला "सी गल" मधे शिफ्ट झालो होतो. अगोंडा किनार्याबद्दलही चिरंजीवांचे हेच मत पडले होते. असो.
पोळेम किनारा नंतर बहुतेक गोवा हद्द संपते आणि कर्नाटकची हद्द चालू होते. लगेचच कारवार येते. आणि महाराजा काय ते द्रुष्य.... अपार स्रुष्टीसौदर्य..... दक्षिणेकडून येताना कारवारमधे शिरले की पब्लीक बीच, नेव्हल बीच, नंतर काली नदीवरील पूल, तो संपता संपता एक चढाव, त्यानंतर छोटीशी खिड, त्यानंतर सुरू होणार्या डोंगररांगा आणि हिरवाई; डावीकडे लपलेल्या तरी डोंगररांगातून डोकावणार्या एका रिसॉर्ट्च्या छोट्या इमारती (हे एकच रिसॉर्ट आहे), आणि पुढे वळणावळणांचा हिरवाईत हरवणारा काळा डांबरी रस्ता; तो ही गोव्यात शिरणारा... अहा हा | विहंगम महाराजा........१०-१५ मिनीटांच्या प्रवासात भान हरपतेच. एन. एच. १७ वर असे अनेक डोळ्यांना सुखावणारे तुकडे आहेत. थोडे अजून खाली एका बाजूला नदी आणि दुसर्या बाजूला समुद्र घेऊन जाणारा २-३ कि.मी. चा पल्ला तर स्वप्नातीत आहे. तर चला आपण परत पाळोळेला जाऊ..
किनार्याच्या वर (उत्तरेकडे) आहे एक लपलेला, हरपलेला किनारा - बटरफ्लाय बीच. ईथे जायचा रस्ता पण शोधायलाच लागतो. अगदी अर्ध्या कि.मी. पेक्षा लहान गोलाकार किनारा. त्यानंतर सुप्रसिद्ध अगोंडा बीच. हा २ एक कि.मी. किंवा जास्तच पसरला आहे आणि नव्यानेच पाळोळे इतकाच प्रसिद्ध होऊ लागला आहे. सध्या विदेशी पर्यटकांनी उचललेला आहे. ह्याच्या आजूबाजूला खाण्याची मात्र चंगळ आहे. गोवन स्पेशल आणि जगभरातील सर्व प्रकार. ("पिण्याची चंगळ" शब्द मुद्दामच वापरला नाही कारण ती पूर्ण गोव्यातच आहे). अगोंडाच्या उत्तरेला खोला (कोला) नावाचा छोटासा आणि परत एकदा जवळ जवळ निर्जन किनारा. ईथे जायचा रस्ता पण शोधायलाच लागतो. या वेळेस एक दोन पाट्या दिसल्या खोला बीच कडे म्हणून. चांगले आहे.
या किनार्यानंतर बरेच अंतर समुद्रकिनारे नाहीत. एकदम लागतो एक किल्ला. समुद्राला खेटून असलेला. काबो डी रामा किल्ला. त्याच्या पलिकडे काबो डी रामा नावाचा छोटासा किनारा. यानंतर मात्र काही अंतर अथांग सागर आहे. त्यच्या पलिकडचे जमिनीचे टोक म्हणजे मोबोर किनारा. ईथे येण्यासाठी मडगाववरून कोलवा - बाणवली - व्हार्का - केवलोसीम - मोबोर असा दूसरा रस्ता घ्यावा लागतो. (वास्को ते बोगमलो) - (मोबोर) - (आगोंडा.पाळोळे.पाटणे) ही दक्षिण गोव्याची तिरप्या त्रिशूळाची तीन टोकेच जणू. ह्याच मोबोर किनार्यानजिक आहेत द लीला पॅलेस, हॉलिडे ईन, हाथी महल सारखी नावाजलेली पंचतारांकित रेसॉर्ट्स. ईथेच आहे नामांकित "द फिशरमन्स व्हार्फ" साल नदी जिथे समुद्राला भेटते त्या ठिकाणी आहे हे व्हार्फ
पहिल्या ट्रीपपासून आम्ही राहतो ते सीगल गेस्ट हाऊस. अतिशय स्वच्छ, अॅटॅच्ड बाथ, ए सी.-नॉन ए.सी रूम्स, महाग नसलेले हॉटेल, खुल्या दिलाचा मालक, सहकार्यशील स्टाफ , किनार्याच्या मेन एंट्रि पासुन ५० मी. च्या आत, ३ कारसाठी पार्किंगची सोय , पहिल्या मजल्यावरच्या रूम्ससाठी एक सलग व्हरांडा . त्यात टाकलेल्या खुर्च्या, टि-पॉय, बाजूला रॅक्समधे असंख्य पुस्तके - अनेक प्रकार आणि वाचण्यासाठी सर्वांना खुली. और क्या चाहिये ?
दिवसा थोडे ड्राइव करायला हरकत नाही म्हणून परत चार रस्ता पर्यंत येऊन उलटे मडगावच्या दिशेने ३ एक कि.मी. गेलो आणि करमळघाट रेस्टॉरंटला विसावलो. ह्या रेस्टॉरंटचा शोध आम्ही सर्वात पहिल्यांदा कारने आलो होतो तेव्हा लावला होता. बीचवर पूर्ण जेवण, व्हेज-नॉनव्हेज-फिश थाळी बहुतेक ठिकाणी मिळत नाहित. त्यासाठी हा जवळचा पर्याय आहे. अजून एक मँगलोर रेस्टॉरंट म्हणून चार रस्त्यालाच आहे. (बीचपासून २.५ कि.मी.) ते पण चांगलेच आहे.

हिस्टोरिकल गोष्टी साठी कमी फेमस आहे, परंतु येथुन अरबी समुद्र, वॅगॅटॉर बीच खुप सुंदर दिसतो.. सनसेट पण खुप सुंदर दिसतो परंतु आम्ही भर उन्हात फोर्ट चढत होतो. सर्वजन चापोराला( दिल चाहता है चे काही शुटींग ह्या फोर्ट वरती झाले होते) निघाले होते, त्यामुळे मागोमाग मी निघालो आणि त्यांना जॉईन झालो.चापोरा फोर्ट तसा इतिहास नसला तरी
गोव्यातील हवा उष्ण अजिबात वाटली नाही, थंड झुळुक हलकीच स्पर्श करुन जायची. फोर्ट वरुन अरबी समुद्र, वॅगॅटॉर(vagator) बीच खुपच मोहक दिसत होता.
म्हापसा ओलांडल्यावरती रस्त्यावर गर्दी अजिबात नव्हतीच... गोव्याचे हे रुपडे वेगळेच भासत होते, गर्दी .. फॉरेनर्स फक्त बीच च्या बाजुला, इकडे सगळीकडे सामसुम. एक वेगळाच गोवा नजरेत येत होता.. आणि तितकाच आवडत होता. मी बर्याच ठिकानी छोटे छोटे थांबे घेतले.. कुठे मस्त चहा पी कुठे थोडासा नाष्टा.. प्रवासात भेटणार्या लोकांशी मस्त गप्पा मारत , परिस्थीतीचा हालहवा घेत मी पुढे चाललो होतो. विशेष सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे त्यांना मराठी कळत होते आणि त्यांची थोडीफार शब्दाची लकब मला जमली होती... त्यामुळे बोलण्यास छान वाटत होते. तितक्यात मयेम लेक आला, हॉटेल मध्ये जाऊन थोडा चहा घेतला, ८:३० वाजुन गेले होते. लेक मध्ये तिकट काढुन उगाच एक फेरफटका मारला , नंतर त्या शांतेत्त थोडा समरसुन गेलो.. पुन्हा पुढे निघालो. हॉटेल वाल्याने नार्वे चा रस्ता सांगितला होता . थोडे पुढे उलट्या दिशेने जावे लागत होते पण जवळच आहे असे सांगितले.
सप्तकोटीश्वर मंदिर
द्वीपपाड क्षेत्र महाथोर⃓ जेथे देव सप्तकोटेश्वर
वारवें राहिवास मंदिर⃓ स्थान सप्तऋषींचे ⃓
सप्तधातूंचे लिंग म्हणती⃓ नवरत्नांची ज्योती⃓
ऐसीनवल प्रभा स्थिती⃓ योजवेता भूषणाते⃓
सप्तकोटीश्वराचे लिंग पाषाणाचे नाही. ते सप्तधातूंचे आहे. सप्तधातूंचे शिवलिंग अन्य कोठेही नाही.
शककर्ते शिवराय १६६८ च्यादरम्यान डिचोली महाल काबीज करून डिचोलीला आले. त्यांनी तेथे सप्तकोटीश्वराविषयी ऐकले. लगेच ते डिचोलीहून निघून नार्व्याला येऊन पोचले. तिथे त्यांनी सप्तकोटीश्वराचे दर्शन घेतले. ते धांतूमय शिवलिंग पाहून राजास अतिशय संतोष झाला. आणि पोर्तुगिजांनी जे भ्रष्ट केले होते त्याचा जिर्नोधार राज्यांनी केला.
माडांच्या सावलीत विसावलेले हे मंदिर खरेच खुप सुंदर आहे, आत जाताना एक थरार वाटला, स्वता शिवाजी राजांनी बांधलेले हे मंदिर आणि सप्तधातुतील शिवलिंग. खुप प्रसन्न वाटले. एकमेव मंदिर जेथे शिवरायांनी आपले नाव कोरले जिर्नोधारानंतर.
सप्तकोटेश्वर मंदिर
तेथुन विचारत विचारत सुंदर रस्त्यांवरुन.. मी अरावलेम धबधब्यापाशी आलो, विशेष म्हणजे जवळ जवळ ५ किमी च्या परिघात याबद्दल विचारले तरी कोणी स्पष्ट याबद्दल निटसे सांगु शकले नाही. उन्हाळा असल्याने पाणी कमी होते तरी येथे ही २-३ रशियन दिसले, तेथुन मग नागनाथ मंदिरात जावुन नंतर गुफेकडे चाललो होतो, रशियन रस्ता चुकले होते, ते चुकुन वॉटर्फॉल जिकडुन होता त्याबाजुने गुफेकडे चालले होते. त्यांना रस्ता निटसा सांगितला आणि आम्ही नंतर एकत्रच गुफेकडे गेलो. साध्याश्याच गुफा होत्या.
आता वेध लागले होते तांबडी सुर्ला या प्रसिद्ध मंदिराचे , आण रस्त्यातच एक गोवन मुलगा भेटला (नेव्हील), थोडेशे बोलणॅ झाले, त्याच्या घराजवळ पाणे प्यालो, त्याला पण इच्छा झाली माझ्याबरोबर तांबडी सुर्ल्याला यायची त्यामुळे मी त्याला बरोबर घेतले, त्यामुळे जंगल, रस्ता,, वेगवेगळी वळणे यांचे मला काहीच वाटले नाही, आम्ही कमी वेळात जंगलात पोहचलो. हेमाडपंथीय शिल्पकलेच उत्तम उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. गोव्यातील हे बहुतेक एकमेव यादवकालीन मंदिर. तांबडी सुर्ला ला जाण्याचा मार्ग खुप जंजलातुन आहे , आणि अतिशय मस्त आहे, मंदिराच्या सुरवातीलाच सुंदर असा झरा ( नदि?) दिसतो, पावसाळ्यात त्या झर्याच्या उगमाला सुंदर धबधबा आहे असे ऐकले.
तांबडी सुर्ला कडे जाताना

त्यानंतर आम्ही बोंडला (Wildlife sanctuary) ला गेलो. वेगवेगळे प्राणी बघितले. आणि पुन्हा माघारी निघालो. त्याच्या घरी त्याला सोडुन मी पुन्हा आल्या त्या मार्गाने आरपोरा ला आलो.

हे वरचे कॉपी पेस्ट आहे. पण माहिती चांगली आहे. गोव्याच्या ट्रिपबद्दल आहे. ज्यांनी पाठवले त्यांनी हे मिसळपाव वरुन उचलले आहे. त्यामुळे त्या अननोन लेखकाचे आभार.

हे वरचे कॉपी पेस्ट आहे. पण माहिती चांगली आहे. गोव्याच्या ट्रिपबद्दल आहे. ज्यांनी पाठवले त्यांनी हे मिसळपाव वरुन उचलले आहे. त्यामुळे त्या अननोन लेखकाचे आभार.>>> खरंच खुप आभार.अतिशय उपयुक्त पोस्ट आहे.

The above post on goa is very good except Mayem lake. That lake is very boring. But the journey to the lake is amazing.

फक्त दोघीनीच जाण्याइतके गणपतीपुळे सेफ अाहे का? अाधी कधीच गेलेलो नाहीये, २-३ दिवस मुक्काम करायचा विचार अाहे.खूप काही पहाव असा प्लॅन नाही, फक्त निवांतपणा अपेक्षित अाहे, भक्तनिवास राहण्यासाठी योग्य अाहे काय?

गोव्याचा हिरवा खजिना
भौगोलिकदृष्टय़ा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये असलेलं गोवा
मकरंद जोशी | Updated: June 28, 2017 1:06 AM

या राज्याला वन्यजीवनाचा अप्रतिम वारसाही लाभलेला आहे.
आषाढाच्या धो धो सरी कोसळून गेल्यावर, हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या आणि धबधब्यांचा जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरीसुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरेल.
जेव्हा एखादी व्यक्ती बहुपलू असते तेव्हा काही वेळा तिच्यातील एखाद्याचं गुणवैशिष्टय़ाकडे लक्ष वेधलं जाऊन बाकीचे पलू दुर्लक्षित राहण्याचा धोका असतो. याची अनेक उदाहरणे चित्र-नाटय़सृष्टीत पाहायला मिळतात. पर्यटनातही अनेक ठिकाणे अशी आहेत की ज्यांचा एकच चेहरा कायम जगासमोर येतो आणि दुसरा अंधारातच राहातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राला खेटून असलेलं गोवा. गोवा म्हटल्यावर उसळत्या सागरलाटा आणि फेसाळते चषक हीच प्रतिमा सर्वसामान्य पर्यटकांच्या मनावर उमटलेली आहे. पण या राज्याला वन्यजीवनाचा अप्रतिम वारसाही लाभलेला आहे. गोव्याच्या या जंगलांना भेट द्यायला पावसाळ्यापेक्षा दुसरा उत्तम ऋतू नाही. आषाढाच्या धो धो सरी कोसळून गेल्यावर, हिरवाईच्या अनेक छटा मिरवणाऱ्या आणि धबधब्यांच्या जलजल्लोष साजरा करणाऱ्या गोव्याच्या जंगलात मारलेली एक फेरीसुद्धा तुम्हाला प्रसन्न करणारी ठरेल.
भौगोलिकदृष्टय़ा महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामध्ये असलेलं गोवा, महाराष्ट्राच्या सह्यद्रीतील जंगल आणि कर्नाटकातलं जंगल यांतील दुव्याचं महत्त्वपूर्ण काम बजावतं. गोव्यातला सुमारे ५९ टक्के भूभाग वनाच्छादित आहे. या भूभागावर खाडीकिनाऱ्यांच्या कांदळवनांपासून ते सदाहरित रानापर्यंत अरण्याचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळेच नेहमीचा गोवा म्हणजेच पुरातन मंदिरे, ऐतिहासिक चच्रेस आणि सागर किनारे बाजूला ठेवून जर गोव्याच्या हिरव्यागार जंगलाकडे मोर्चा वळवला तर गोव्याचा खराखुरा ‘वाइल्ड चेहरा’ बघायला मिळतो.
सर्वसाधारणपणे जंगलात जायचे, अभयारण्यात फिरायचे म्हटल्यावर अनेकांच्या डोळ्यासमोर हत्ती, वाघ, बिबटय़ा असे मोठे प्राणीच येतात. पण या नेहमीच नजरेत भरणाऱ्या प्राण्यांपलीकडे एक छोटय़ा जिवांची आणि उडणाऱ्या पाखरांची दुनियाही आहे आणि गोव्याची जंगले या बाबतीत अतिशय संपन्न आहेत. गोव्याची पूर्व हद्द जिथे कर्नाटकला भिडलेली आहे तिथे भगवान महावीर अभयारण्य हे गोव्यातले सर्वात मोठे अभयारण्य आहे. या हिरव्यागर्द जंगलात गौर(गवा), सांबर, चितळ, बिबटय़ा असे मोठे प्राणी तर आहेतच, पण स्लेंडर लोरिस आणि फ्लाइंग स्क्विरलसारखे स्पेशल अ‍ॅपिअरन्स देणारे प्राणीही आहेत. या अरण्यात जे दोनशे सव्वा दोनशे प्रकारचे पक्षी आहेत त्यामध्ये ट्री पाय, ओरिओल, ड्रोंगो, मुनिया, बॅबलर, बुलबुल, वुडपेकर असे नेहमीचे भिडू तर आहेतच, पण ग्रेट हॉर्नबिल, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, मलबार ट्रोगन, व्हर्नल हँिगग पॅरट, लिटल स्पायडर हंटरसारखे पक्षीप्रेमींना आकर्षति करणारे पक्षीही आहेत. महावीर अभयारण्यातील दाट जंगलात तुम्ही पायी चालत पक्षी निरीक्षणाचा आनंद घेताना जमिनीवरही बारकाइने बघायला विसरू नका. या अरण्यात धामण, मांजऱ्या साप, ब्रॉन्झबॅक ट्री स्नेक असे बिनविषारी साप जसे आहे तसेच रसेल्स व्हायपर (घोणस), मण्यार, नाग, मलबार पिट व्हायपर असे विषारी सापही आहेत. त्यातही बदामी, गुलाबी रंगाचा आणि नाकावरचा उंचवटा मिरवणारा ‘हम्प नोज्ड व्हायपर’ साप त्याच्या कॅमोफ्लेज रंगसंगतीमुळे आसपासच्या परिसरात असा मिसळून गेलेला असतो की विचारू नका. गोव्याच्या जंगलातला एकाच नजरेत प्रेमात पाडणारा साप म्हणजे ऑर्नेट फ्लाइंग स्नेक. इतर अनेक उडणाऱ्या प्राण्यांप्रमाणेच म्हणजेच फ्लाइंग फ्रॉग, फ्लाइंग स्क्विरल प्रमाणेच हा देखणा साप प्रत्यक्ष उडत नसला तरी ग्लाइड होत म्हणजे तरंगत तरंगत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो. दिवसा हालचाली करणाऱ्या या सापाच्या अंगावरील रंगांची नक्षी त्याचे ऑर्नेट विशेषण सार्थ करते. विशेषत: त्यामधील शेंदरी रंगाचे ठिपके पाहाताना पोवळी जडवलेल्या दागिन्याची आठवण होते.
याच अभयारण्यात तांबडी सुर्ला येथे गोव्यातील सर्वात प्राचीन, १२ व्या शतकातील शिवमंदिर आहे. तसेच गोव्याचे आकर्षण ठरलेला दूध सागर धबधबाही आहे. सुमारे हजार फुटांवरून तीनचार टप्प्यात कोसळणारा दूधसागर डोळ्यांचे पारणे फेडतो. ऐन पावसाळ्यात अतिउत्साही पर्यटकांना आवर घालण्यासाठी गेली दोन वष्रे या धबधब्याचा रस्ता बंद केला जातो, पण नंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्येही दूध सागराच्या पांढऱ्या शुभ्र धारा तितक्याच वेगाने ओसंडत असतात.
उडत्या (तरंगत्या) सापाप्रमाणेच गोव्याच्या जंगलात उडते सरडेही आहेत. त्यासाठी जायला हवं नॉर्थ गोव्यातील पोंडा तालुक्यातील बोंडला अभयारण्यात. गोव्यातील हे आकाराने सर्वात लहान अभयारण्य आहे. इथेच गोव्यातलं एकमेव प्राणी संग्रहालय असल्याने शनिवार-रविवारी कुटुंबासह पिकनिकला येणाऱ्यांची संख्या भरपूर असते. याच अभयारण्यात ड्रॅको अर्थात उडता सरडा अगदी सहज पाहायला मिळतो. या सरडय़ाच्या पायांना एक कातडी पडदा असतो, त्याच्या मदतीने हा सरडा आरामात उंच झाडावरून जमिनीकडे किंवा दुसऱ्या झाडाकडे तरंगत जातो. तसा आपल्या नेहमीच्या सरडय़ासारखाच हा दिसत असला तरी त्याच्या गळ्यावर एक छोटीशी, पिवळ्या रंगाची पताका असते, त्यामुळे तो ओळखता येतो. बोंडलाच्या अरण्यात तुम्हाला जायंट स्क्विरल्स अर्थात शेकरूही अगदी जवळून पाहायला मिळतात.
या दोन जंगलांशिवाय गोव्यातील नेत्रावळीचं जंगल आणि कोटिगाव अभयारण्य देखील आपल्या समृद्ध वन्यसंपदेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र कोणत्याही जंगलात स्थानिक वाटाडय़ाशिवाय जंगलात शिरायचे धाडस करू नका.पावसाळ्यात काही भागांमध्ये जळवांचे प्रमाण जास्त असते, त्यापासून काळजी घ्या. जंगलातील फुले, फळे, भूछत्र, अळंबी तोडू नका. वन्य प्राण्यांना (अगदी सरपटणाऱ्याही) डिवचू नका. वन भ्रमंती करायची तर ही खबरदारी घ्यायलाच हवी. मग पुढच्या गोवा भेटीमध्ये गोव्याचा हिरवा खजिना अवश्य बघा.

कसे जाल?
• गोव्यातील अभयारण्यांसाठी दाबोलिम हा सोईचा विमानतळ आहे. पणजीहून महावीर अभयारण्य ५७ किलोमीटर तर बोंडला ५० किलोमीटरवर आहे. रेल्वेने गेल्यास मडगाववरून जावे.
• कधी जाल ? पावसाळ्यातील वन्यजीवन अनुभवण्यासाठी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर.
• निवास – वनखात्याची निवास व्यवस्था महावीर आणि बोंडला दोन्हीकडे आहे.
मकरंद जोशी
makarandvj@gmail.com

थायलंड बॅन्काॅक ला काय बघण्यासारखे आहे.? 1 दिवस पटाया करायचा प्रयत्न आहे.>> बँकोक ला राजवाडा बुद्धीस्ट मंदिरे, एक भली उंच इमा रत आहे त्याच्या ८४थ फ्लोअर्ला जाआ येते व वर व्युइंग डेक आहे ते. असे सर्व टुरिस्टी प्रकरण करता येते. खूप धमाल जागा आहे शॉपिंग नक्की करा. पटायाला दोन दिवस तरी राहा. पटायाला जाताना मध्ये एक टायगर रिजर्व आहे पण ते बोगस आहे. तिथे वाघांना औ ष्ध दिले असावे असेच मला वाटले इतके ते मौ वागत होते व फोटो ऑप देत होते. दात पण काढलेले असावेत. टुरिस्ट ट्रॅप वाटले.

पटाया मध्ये रात्रीचा अल कझार शो नक्की बघा. व मग नाइट लाइफ जवळ जवळ रात्रभर चालू असते.
मग नेक्स्ट डे जवळ एक आयलॅन्ड आहे तिथे जा. स्पीड बोट ने जाता येते. बोटीवर जिथे ट्रान्स्फर करतात तिथे
पेरू, कैरी जरूर खा. मस्त लागते. अंडर वॉटर वॉक हा पण टुरीस्ट ट्रॅप आहे. ह्या आयलँड वर वॉटर स्पोर्ट पण आहेत.
सन स्क्रीन नक्की न्या. गर्दी फार असते. बी प्रीपेअर्ड.

प टाया मध्ये जेवण भयंकर छान मिळते. थाई फूड खा नक्की. व सॉस घेउन या विकत.

फक्त दोघीनीच जाण्याइतके गणपतीपुळे सेफ अाहे का? अाधी कधीच गेलेलो नाहीये, २-३ दिवस मुक्काम करायचा विचार अाहे.>>>> हे मलाही जाणून घ्यायचे आहे.
आम्ही ५-६ जणी जुलै च्या दुसऱ्या शनिवार-रविवारी तिकडे जायचा विचार करतोय. फक्त एक रात्र स्टे करायचा आहे.

पुढच्या महिन्यात 1 वर्ष वयाची 4 मुले आणि 8 मोठी माणसे हैद्राबाद ला जायचे ठरते आहे. तर कुठे राहावे, काय बघावे याबद्दल गाईड कराल का? राहण्या खाण्याच्या रिझनेबल पण चांगल्या सोयी सांगाल का?

पियु, ताजमहाल हॉटेल अबीडस मस्त आहे. आम्ही तिकडे राहिलो होतो..बर्यापैकी मध्यवर्ती आहे.बुकींग.कॉम वरुन आम्हाल चांगली डील मिळाली होती.रुम्स मस्त होत्या.सर्वीस पण छान.
तिथली थाळी अज्जीबात चुकवु नका..एकदम मस्त होती.त्यांच्या पॅकेज मद्धे कॉम्प्लीमेंटरी नाष्टा मिळाला होता...तो पण छान होता.
रामोजी, झु, सुधा कार म्युझियम नक्की जा..मुलांना आवडेल.
रामोजी ला बाहुबली पॅकेज वालं स्पेशल वालं टीकीट घ्या ज्यात जेवण वगैरे सगळं ईन्क्लुडेड आहे. ते छान आहे.एसी बस ने सगळी कडे फिरवतात. कमी चालावं लागतं.
बाकी हुसेन सागर ला आम्ही नाही जाउ शकलो...वेळ पण नव्हता आणी एकदा टॅक्सी ने कुठेतरी जाताना वाटेत हुसेन सागर लागले तेव्हा तिथे येणारा भयानक वास घेउन आवर्जुन जायची ईच्छा पण नाही झाली.
बिर्ला मंदीर पण छान आहे म्हणतात पण आम्हाला तिकडे जायला पण वेळ मिळाला नाही.

खाण्यासाठी - पॅराडाईज बिर्याणी ला नक्की जा..मस्त बिर्याणी होती.चटनीज मद्धे जाउन बबई ईडली आणि स्टीम डोसा नक्की खा.ताज महाल हॉटेल मधली थाळी बेस्ट होती.ती पण नकी ट्राय करा.कराची बिस्कीट आजकाल कुठेपण मिळतात तरीपण एकदा त्यांच्या दुकानात चक्कर मारु शकता.त्यात पण बरेच प्रकार आहेत.

खरेदी:चारमिनार भागात बरेच मोतीवाले आहेत. मी तिथल्या एका दुकानातुन मोत्यांच्या लडी आणल्या. बार्गेन करा भरपुर. ते देतात कमी करुन.

मायबोली सर्चवर हैद्राबाद असे सर्च करा. राजेंद्र या आयडीचा एक धागा आहे तो पाहा.
इथे अॅपवर धाग्याची लिंक देता येत नाहीय.

हैदराबाद हुसेनसागर क्रुज कोणी गळ्यात मारत असेल तर जाऊ नका.
मुलांसाठी नेहरू पार्क ( तिकडचा राणीचा बाग) उत्तम. खास वेळ काढून जा.
बाकी रामोजिचा व्हिडिओ युट्यबवरचा पाहून घेतल्यास बरीच कल्पना येईल ( तिकडे जायचे का नाही हे ठरवता येईल.
सर्वांनी एकत्रच जाण्यासाठी सिटिबस वापरता यईल. विशेषत: गोवळकोंडा. फार काही त्रास नसतो.

हैद्राबाद सिटी बस सर्व्हिस उत्तम आहे, तिचा वापर नक्कीच करू शकाल. हुसेन सागर तलावाला चक्कर नक्की मारा.. टॅन्क बंड रोड वरून, विशेषतः सूर्य मावळतीच्या वेळेस, मस्त दृष्य असते, एकदम हॅपनिंग भाग आहे तो. सलारजंग म्युझियम पण नक्की बघा.

हैदराबादला पुल्लारेड्डी असे फेमस मिठाई चे दुकान आहे. तिथुन पुट्टरेकलु या नावाची मिठाई घ्या. फार सुंदर मिळते.

दिवाळीच्या सुट्टीत एक दोन पिकनिकसाठी ठिकाण सुचवाल का मायबोलीकर ?
आम्हा मुलींचा ग्रुप असणारे . सेफ्टीला प्राधान्य . मुंबईजवळ असेल तर बरेच

Pages