'कविता'

Submitted by सत्यजित... on 21 May, 2018 - 19:46

दुःखाच्या डोहामधुनी
करुणेची येते गाज
कुठलेसे पान तरंगत
लहरींना देते व्याज

कलतात उन्हे सोनेरी
रंगांची उधळत माया
डोहावर पसरत जाती
वृक्षांच्या काजळ छाया

ती काठावरती बसते
बुडवून स्वतःचे पाय
अन् हा हा म्हणता येते
पाण्यावर मोहक साय

मी 'कविता' वाचत असता
ती शांतच असते बहुधा
जणु चंद्रसरींनी भिजते
नित-निळी सावळी वसुधा!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users