Submitted by सेन्साय on 23 May, 2018 - 01:14
मद कस्तूरी गंधाचा
सपशेल आज हरला
घर्मबिंदु जोतावरुन जेव्हा
काळ्या मातीत मिसळला
चंदनभारित आसमंतही
अवचितपणे ओशाळला
नव शिशुच्या उटण्याला
जेव्हा धुप प्रसन्न दरवळला
वाऱ्याच्या झोतावर चौखुरलेला
केवड़ाही अलगद थांबला
तुझ्या आगंतुक चाहूलीने जेव्हा
स्वर्गीय दरवळ मोहक पसरला
― अंबज्ञ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
,मस्तच
,मस्तच
छान लिहिलंय. अगदी जगातल्या
छान लिहिलंय. अगदी जगातल्या सर्व प्रसन्न गोष्टी शब्दांत एकवटलेल्या वाटतात.
धन्यवाद Swapnilkulkarni
धन्यवाद Swapnilkulkarni
धन्यवाद द्वादशांगुला
धन्यवाद द्वादशांगुला
थोडासा प्रयास केलाय सगळं एकत्र गुंफण्याचा !