बटरफ्लाय इफेक्ट

Submitted by कटप्पा on 13 May, 2018 - 22:08

काल ट्राफिक मध्ये अडकलो आणि गाडी चुकली आता हा जॉब गेला.. साला या ट्रेन ला पण आजच टाईम वर यायचा होता जेंव्हा फायनल इंटरव्ह्यू होता.. नरेश स्वतःवरच चिडत होता. काय करावे बर.. राहुल ला कॉल करावा का?

नरेश - हॅलो राहुल.. आहेस का?
राहुल - हा नरेश बोल, ऐकतोय.
नरेश -तुला तुझ्या एक्सपरिमेन्ट साठी टेस्ट सब्जेक्ट हवा होता ना...
राहुल - ये लॅब वर.. बोलू निवांत.

नरेश लॅब वर पोचला.
राहुल गेली बरीच महिने लॅबोरेटरी मध्ये रिसर्च च्या शेवटच्या एक्सपरिमेन्ट वर काम करत होता. नरेश म्हणाला मित्रा मला तुझा एक्सपरिमेन्ट माहीत आहे आणि तुला टेस्ट करायला मदत करायला मी तयार आहे.
राहुल ने एक स्माईल दिली आणि बोलला मी प्रचंड कॉन्फिडनट आहे. तू चहा बनव मस्त पैकी.
हे एक व्हेरियेबल सेट केले की तू बरोब्बर 24 तास मागे जाशील कालचक्रात.
पण कसे आहे ना, आपल्याला फक्त 24 तास मागे जाता येणार आहे, ही लिमिट आपल्याला वाढवणे शक्य नाही.
पण नरेश, 24 तास मागे जाऊन तू काहीही न करता फक्त नोंदी घेऊन येशील. तू केवळ 15 मिनिटे त्या भूतकाळात असशील.काहीही छेडछाड करू नकोस, paradox होऊ शकतो.
ओके राहुल, मी काहीही करणार नाही.

त्या टाईम मशीन मधून नरेश बरोबर 24 तास अलीकडे आला.
अरे मोबाईल कालची तारीख दाखवत आहे आणि मी लॅब मधून घरी कसा आलो. राहुल चा प्रयोग सक्सेस आहे तर.

फक्त 15 मिनिटे आहेत, सर्वात आधी ती वेळेवर आलेली गाडी 10 मिनिटे लेट करूया. स्टेशन वर जाण्याआधी ट्रॅकवरच थांबवू. लाल कापड आणि काठी हवी फक्त. लाल टॉवेल कामी येईल. पटापट केले पाहिजे.
ट्रॅक वर पोचलो, 10 मिनिटे झालीपन. आपल्याला काय आपण लाल झेंडा दाखवून गाडी थांबवू .. थांबली एकदाची..अरे झाली पाच मिनिटे.. अरे मी गायब होतोय.

Present Day :
राहुल - घेतल्यास का नोंदी…. कसं वाटतंय परत आल्यावर.
नरेश - अरे मी इथंच.. ट्रेन लेट झालीच नाही का?
राहुल - कोणती ट्रेन? काय बोलतोयस?
नरेश - मुंबई - दिल्ली मेल एक्सप्रेस.
राहुल - काय बोलतोयस .. शुद्धीवर आहेस का.. हे वाच .. आणि आजचा पेपर त्याने नरेश ला दिला.

हेडलाईन होती - अचानक थांबलेल्या दिल्ली मेल ला मागून यमुना एक्सप्रेस ची धडक - 110 ठार आणि 70 जखमी।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझाही गोंधळ झाला. Happy

काल गाडी चुकली म्हणून इंटरव्ह्यूला जायला उशिर झाला. म्हणून २४ तास मागे जाऊन गाडी लेट करण्यासाठी मधेच थांबविली आणि अपघात झाला. पण मग त्यामुळेच गाडी चुकली का?
काल ट्राफिक मध्ये अडकलो आणि गाडी चुकली आता हा जॉब गेला.. साला या ट्रेन ला पण आजच टाईम वर यायचा होता जेंव्हा फायनल इंटरव्ह्यू होता.. >>>>काल चुकली तरी आज गाडी वेळेवर आहे ना? कि आजपण गाडी वेळेवर यायला नकोय?

दक्षिणा आणि सोनाली - हा बटरफ्लाय इफेक्ट आहे.
काल गाडी चुकली कारण वेळेवर आलेली.
टाईम ट्रॅव्हल केला, तिथे छेडखाणी केली, परिणाम गाडीचा accident झाला.
त्यामुळे या नवीन काळात जेंव्हा तो परत आला, काल accident झालेला होता. पेपर मध्ये आज सकाळी बातमी आली होती.

सस्मित -पिच्चर नाही पहिला का. लेखकाने त्या पिच्चर वरूमच प्रेरणा घेऊन लिहिलेली वाटत आहे.>>ओके.
नाही पाहिलाय पिच्चर.

नरेश ने गाडी थांबवली म्हणजे तो त्या अ‍ॅक्सिडेन्ट मधे असेल ना?
आणि १५ मिनीटच भुतकाळात जाता येत असेल तर तो ईन्टर्व्ह्यु कसा देणार होता?