चिरुमाला (भाग ३)

Submitted by मिरिंडा on 14 May, 2018 - 08:48

बस वेगात जात होती . माझे विचार मात्र मागे मागे जात होते. पाटलांचा विचित्र वाडा. त्यातलं ते चित्र. त्या चित्रातली ती स्त्री , मला आता तर पाटलीणबाईंसारखी वाटू लागली. हे चित्र नक्की कोणाचं आहे ? ते तिथे का होतं. आणी त्याचा आकार बदलणं, दुसऱ्या भिंतीवरतीही तेच चित्र उमटणं. या सगळ्याच गोष्टींचा मला तरी संदर्भ लागत नव्हता. नाही म्हणायला. पूर्वी एक पुस्तक असंच वाचनात आलं होतं , की पृथ्वीवरील कोणत्याही जागेचं चित्र तिथे न जाता काढता येण्याची कला अगदी प्राचीन होती म्हणे आणि मुख्य म्हणजे असे चित्रकार पाचेक हजार वर्षांपूर्वी होते असेही त्यात लिहिले होते. तसेच इतरही गोष्टींचा उलगडा त्या पुस्तकात होता. पण ते मला तरी काल्पनिक वाटले होते. आणि मला तसं चित्र पाहिल्याचा अनुभव नव्हता. पण हे मात्र काहीतरीच होते. माझ्या बुद्धिच्या बाहेरचे . माझ्या मेंदूला त्याची मर्यादा दाखवणारे होते. कितीही झटकायचे म्हंटले तरी विचार जाईनात. पण मला अजून एकदाही बदली रद्द करावी असे वाटले नव्हते. आपण शशिकांतन नक्की कुठे राहत होता , ते पाहायला हवं होतं. म्हणजे गावात राहण्याची काही सोय होऊ शकेल का याची कल्पना आली असती. असो. हळूहळू बसच्या खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे म्हणा , किंवा माझा मेंदू विचित्र गोष्टींचा विचार करून दमला होता म्हणा, मला झोप लागू लागली. नशीब मला पाटलांच्या वाड्यावर रात्री राहण्याची वेळ आली नाही, हा त्यातल्या त्यात सुरक्षित विचार मी केला. डोंगराळ भागातला , जंगली दुर्गम रस्ता , तसं पाहीलं तर पाहण्यासारखा होता. पण मला चांगलीच झोप लागली. रात्री साधारण अकरा साडे अकराच्या सुमारास मी मुंबईला उतरलो. आता लवकर झोप येण्याचा प्रश्नच नव्हता. जेमतेम जेवण करून मी खिडकीजवळच्या आरामखुर्चित रेळू लागलो. लीना मात्र लवकरच झोपेच्या आधीन झाली. ............ मला आता जागेच्या एखाद्या एजंटला भेटावे लागणार होते.मुंबईतली गोष्ट वेगळी होती.कुठेही राहून कामावर जाता येतं. पण गावातच बँक असल्याने मला तिथेच जागा पाहाणं भाग होतं. अजूनही माझ्या डोळ्यासमोरून पाटलीण बाईंची छबी हालेना. ..................... मलाही मग सारखी चाळवणारी झोप लागली. मध्येच स्वप्न पडलं. पाटलीण बाई दिसल्या आणि मला एका मोठ्य बंगल्याकडे त्या बोट दाखवीत आहेत असे दिसले. पाटलीण बाई मग फिकट होत होत उडू लागल्या. आणि मला जाग आली. पहाटेचे चार वाजले होते. मी पाणी प्यायलो. आणि आराम खुर्चित बसून राहिलो. आता मात्र माझी झोप उडाली होती.
माझा स्वतःचा विश्वार अदभुत गोष्टींवर मुळीच नव्हता. पण कालचा आलेला अनुभव मी पुन्हा पुन्हा मेंदूने निर्माण केलेल्या तार्किक पट्टीवर घासून पाहत होतो. सकाळ झाली. मी बँकेत गेलो. मला काही काम नव्हतं. माझी ऑर्डर व इतर औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या. मग माझा खास मित्र जयंत वाडकर याला एजंट बद्दल विचारले. त्याने मला हरीदास नावाच्या त्याच्या ओळखीच्या एजंटचे
नाव आणि नंबर दिला. मी त्याला फोन कारण्यापेक्षा त्याच्याकडे व्यक्तिशः जाण्याचे ठरवले. माझ्याजवळ पाच दिवसांचा टाइम होता. तेवढ्या अवधीत जागा मिळवणं मला भाग होतं. बायको मुलांना नंतर आणतआलं असतं. हरिदासचं ऑफिस वडाळ्याला होतं. एका जुनाट तीन मजली चाळवजा बिल्डिंगमध्ये तो राहत असावा. मी अस्वच्छ जिन्यावरून चालत तिसऱ्या माळयावरच्या हरिदासच्या ऑफिसबाहेर चालत गेलो. तीन माळे पायी चढणं सोपं नव्हतं. तिथे लिफ्ट नव्हती. जुन्या बिल्डिंगना लिफ्ट नसे. दम लागल्याने मी जरा थांबलो. मग बेल वाजवली. एका काळ्या कभिन्न माणसाने दार उघडलं. गंमत म्ह्णजे त्याचे डोळे मात्र हिरवे होते. मी असा माणूस कधीही न पाहिल्याने त्याच्याकडे बघत बसलो. त्यावर तो त्रासिक मुद्रेने तो म्हणाला, " कोण पाहिजे ? " मी त्याचेच नाव सांगितल्यावर तो थोडा बाजूला झाला. मी आत शिरलो. आणि त्याच्यामगे एका खोलित प्रवेश केला. खोली कसली , ती तर अडगळीची खोली असावी काही तुटक्या फळ्या पडल्या होत्या. एक दोन रंगाची वापरलेली पिंपं पडली होती. भिंतींचा गिलावा उडाला होता. असो. त्याच्या समोरच्या खुर्चीत बसलो. मी माझी ओळख करून दिली. मग त्यावर तो म्हणाला. " असं पाहा , मी स्वतः रामनूरला कधीही गेलो नाही. सध्या माझ्याकडे एक जागा आहे. तो म्हणजे वाडावजा बंगला. फार जुना आहे. मी स्वतः पाहिलेला नाही. मात्र त्याचे मालक यूएस ला असतात. त्यांनी मला ही वाड्याची चित्रे पाठवलेली आहेत. म्हणून त्याने माझ्याकडे लॉपटॉप सरकवला. अतिशय अंधुक अशी खोल्यांही चित्रे पाहून मला काहीच अर्थ बोध होत नव्हता. ते पाहून तो म्हणाला, बंगल्यातल्या फक्त सहा खोल्या भाड्याने द्यायच्या आहेत. तीन खाली तीन वर. बाकी खोल्यांना कुलुपं आहेत. भाडं अर्थात्च पाच हजार रुपये आहे. आणि पन्नास हजार डिपॉझिट द्यावे लागेल. माझ्या नावाने पॉवर ऑफ ऍटर्नी आहे. पण मी स्वतः मात्र जागा पाहिलेली नाही. " मी थोडा विचारा पडलेला पाहून तो म्हणाला, " तुम्ही असं का करीत नाही त्याच गावाच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जागा का पाहत नाही. तिथल्या जागा मात्र मी पाहिलेल्या आहेत. वीस एक किलोमिटर वर जिल्हा आहे. " मला त्याचं त्याने स्वतः जागा न पाहिल्याचे सांगणं आवडत नव्हतं. मला दुसरा पर्याय नसल्याचे सांगून मी त्याला त्या वाड्याचे नक्की करायला सांगितले. दुसऱ्याच दिवशी मी त्याला तीन महिन्याचे आगाऊ भाडे आणि डिपॉझिटचा चेक देण्याचे आश्वासन देऊन तेथून निघालो. मी घरी आलो आणि लीनाला सागितल्यावर तिने एवढा मोठा वाडा काय करायचाय म्ह्णून थोडावेळ माझ्याशी वाद घातला. तिचँ म्हणणँ बरोबर होतँ. एवढ्या मोठ्या जागेची साफ सफाई करणँ कठीण होत. तरीही बाई मिळेल या आश्वासनावर तिच म्हणण झुगारून दिलँ. तिने ते ऐकलँ कारण की तिला या वेळेला माझ्याबरोबर यायला मिळणार होतँ. जेवणानँतर मी झोपायला जाणार तेवढ्यात लीनाने मला एक बँद पाकीट आणून दिलँ. ते उद्या पाहू म्हणून मी गादीखाली ठेवून दिले. अर्थातच ते मी पाहण्याचे विसरलो. दिवसभरात मी दोन चेक तयार करून एक आगाऊ भाड्याचा आणि दुसरा डिपॉझिटच्या रकमेचा, असे तयार करून हरिदासला नेऊन दिले. दिल्यावर तो परत एकदा मला म्हणाला,” सर, तुम्ही जिल्ह्याच्या गावाला जागा घ्या. यायला जायला तुम्हाला गाडी असेलच. तुम्ही ऑफिसला येऊ शकता. “ ...............त्यावर मी म्हँटले ,” अहो , बँकेने मला गाडी नाही दिली तर माझी पँचाइत होऊ शकेल. “ मग त्याने मला एकूण सात चाव्या सुपूर्त केल्या. आणि म्हणाला,” पुढल्या महिन्यात याल तेव्हा इतर रजिस्ट्रेशनचे सगळे उपचार करून घेऊ. मी चाव्या खिशात टाकल्या आणि खुशी खुशी घरी आलो. अजूनही मी ते पाकीत फोडून पाहिलँ नव्हत. मोठा वाडा म्हणजे मोठी जागा , आणि शाखेतलँ मोठँ पद, या उतावीळ पणामधे मी पुन्हा रात्र तशीच घालवली. रात्री परत एकदा मला पाटलीण बाईँचँ स्वप्न पडल. मधेच जागा झालेला पाहून लीनाही उठली. तिने पाणि वगैरे दिले, तेव्हा मी तिला जवळ ओढून झोपलो. सकाळची वेळ अशीच गेली. बँकेत आज मला सेँड ऑफ पार्टी होती. लीनालाही घेऊन जायचँ होत. सँध्याकाळी पार्टी सँपल्यावर , साहेबाँनी परत एकदा मला बोलावलँ. मला म्हणाले,” मि.सांगलीकर , थोडं सावध राहून काम करा. खेडेगाव आहे. तसे लोक डाँबरट असतात, उद्योजकही तसेच, कर्जाची मँजुरी हेडॉफिसला पाठवताना काळजी घ्या. कोणत्याही द्बावाखाली काम करू नका. एखाद दुसरी चौकशी तुमच्या विरुद्ध झाली तरी हरकत नाही. ती कशीतरी मँनेज करता येईल .” लीना आणि मुलँ मिळालेल्या गिफ्टमुळे खूश होती. मी घरी आलो. उद्या सकाळी मला रामनूर करता निघायचे होते. लीना आणि मुलाना मी नँतर नेणार होतो. मी मात्र तिला आत्ताच न्यावँ अस वाटत होतँ. तिला समजावून साँगितल्यावर ती थोडी रागावूनच झोपली. अजूनही मी ते पाकीट उघडून पाहिले नव्हते.
झोप चाळवाचाळवीचीच लागली. लीना मात्र छान झोपली होती. सकाळ नवीन वातावरण घेऊन उगवली. मी एकच बॅग सध्या पॅक केली होती. अचानक मला पाकिटाची आठवण झाली . मी गादी वर करून पाहिली. पाकीट तसच पडून होतं. मी ते उघडणार एवढ्यात लीनाने आत बोलावले. पाकीट तसेच टाकून मी आत गेलो. लीना म्हणाली,' हे पाहा, जरा लक्ष द्या, हे तीन ड बे मुद्दाम बनवल्येत हा बस मधे बसल्याबरोबर खाण्याचा, हा दुपारचा आणि हा रात्री साठी. ......." माझं फारसं लक्ष नाही असं पाहून ती म्हणाली, " जरा लक्ष द्या हो, सारखा नुसता धांदरटपणा, तुम्हाला कामावर घेणार आहेत. जरा उशिरा गेलात तरी चालणार आहे. आणखीन हे पाहा ही केळी , संत्री
हे आंबे. ". माझ्या डोक्यात पाकीट असल्याने मी होकार भरत तिथून पळ काढला. बेडवरचं पाकीट नाहीसं झालेलं होतं. मी सगळीकडे पाहिलं पण
सापड्लं नाही. मग मात्र मी नाद सोडला. बरोबर साडेसातला निघालो, लीनाला जवळ घेऊन तिचा आणि मुलांचा निरोप घेतला. तेवढ्यात लीनाने एका कोपर्‍यात पडलेलं पाकीट माझया हातात दिलं. " हे ठेवा , कालपासून विसरताय. " मी ते हातात घेऊन पँटच्या खिशात कोंबलं. मी घाईघाईने मुंबई सेंट्रल साठी बस पकड्ली. लवकरच रामनूरला जाणार्‍या बसमधे बसलो. बस हालली. मुंबईचा निरोप घेऊन , मी पुन्हा केव्हा मुंबईला येणार याचा विचार करीत हातातला पेपर वाचीत बसलो. मला वाड्याबद्दल कुतुहल होतं. प्रथम बँकेत जाऊन हजर व्हायचं आणि दुपारी वाड्यावर जाण्याचे ठरवले. गंमत म्हणून पाट्लांचा विचार केला. पुन्हा ते मुंडासंवाले पाटील भेटणार का ? भेटल्यावर त्यांचे आभार मानायचे ठरवले होते. थंडगार वार्‍यावर मला डुलकी येऊ लागली. सुमारे अडीच तीनच्या दरम्यान रामनूर आलं. बाहेर पाय ठेवला आणि पावसाचे बारीक तुषार अंगावर आले. फार छान वाटत होतं. माझं स्वागत जणू पावसाने होत होतं. मातीचा छान खरपूस वास सुटला होता. पाटील मात्र कोठेही दिसले नाहीत. पावसाच्या हलक्या धारा अंगावर घेत मी ऑफिस गाठले. ............ सगळिकडे निसर्ग नुसता बहरून आल्यागत वाटत होता. एक प्रकारचा मादक वास नाकात घुसत होता. दुसर्‍या कोणत्याही पर्फ्युमला तोंडात मारील असा वास होता . मी शशिकांतनच्या केबिन मधे शिरलो. .......................

शशिकांतन , साधारण माझ्याच वयाचा काळा रोम , चौकोनी चेहर्‍याचा, गुबगुबित गालांचा , आणि सारखे डोळे हलवण्याची लकब असलेला बर्‍यापैकी माणूस होता. तो पुष्कळच साधा असावा. स्वतःचं घर आणि बँक या पलिकडे तो विचार करीत नसावा. त्याला मी असं म्हणतोय, पण मी तरी कुठे घर आणी बँक याच्या व्यतिरिक्त विचार करीत होतो. पण माणूस नेहमी स्वतःला स्पेशल समजतो हेच खरं. सुरुवातीचे हस्तांदोलन झाल्यावर त्याने माझ्यासाठी चहा आणि त्याच्यासाठी कॉफी मागवली. नंतर त्याने तिथल्या स्टाफशी ओळख व्हावी म्हणून पत्येकाला केबिन मधे वोलावून त्याची ओळख आणि त्याचा बँकेतल्या कामातला रोल मला समजावून सांगितला. माझ्या हाताखाली एकूण बारा लोक होते. सर्वात शेवटी त्याने जुडेकर आणि गोळे यांची ओ ळख करून दि ली. त्यापैकी जुडेकर ख्रिश्चन होता आणि त्याचा इथल्या लोकांचा अभ्यास होता. इथली बरीच माहिती त्याला होती. आणि गोळे मात्र बँकेच्या नोकरी व्यतिरिक्त मांत्रिकाचं काम करी हेही त्याने मला सांगितलं. एवढ्या ओळखीवर मी जुडेकरला विचारले," इथे एक पाटील आहेत आणि बस स्टँडच्या पुढेच त्यांचा वाडा आहे. मी त्यांच्याकडे जेऊनही आलोय. " पुढे मी असेही म्हंटले की " पाटील एक प्रतिष्ठित आणि चांगले गृह स्थ आहेत ..........." त्यावर तो म्हणाला
"म्हणजे तुमी बी फसलात की आमच्या सासरेबुवांसारखे. " मी अचंबित झाल्याचे पाहून तो म्हणाला, " अवो पाटील वाडा हाय , पण तो ओसाड हाय तितं काय बी नाय. या गावालाच पाटील नाय न काय नाय. नंतर सांगतो सविस्तर " असं सांगून ते दोघे गेले.

(क्र म शः )

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users