विजेचा मनमानी वापर

Submitted by साद on 8 May, 2018 - 02:59

एखादा सुटीचा दिवस असतो. योगायोगाने त्या दिवशी आपली आवडती क्रिकेट म्याच टीव्हीवर चालू असते. ती अगदी रंगात आलेली असते आणि आपण ती एन्जॉय करत असतो आणि अचानक ते प्रक्षेपण बंद पडते. कारण? अर्थातच विजेचे भारनियमन. मग आपली प्रचण्ड चिडचिड होते आणि नकळत आपल्या तोंडून “आय* त्या वीज ***च्या”, असे उद्गार बाहेर पडतात.

अशा प्रकारे रंगाचा बेरंग करणारे आणि आपल्या कामाचे वेळापत्रकही बिघडवून टाकणारे भारनियमन आपल्याला उन्हाळ्यात छळते. मेट्रो आणि मोठ्या शहरांत याची झळ फार नाही बसत. पण बाकी गावांत विजेच्या नावाने शंख होत असतो. विजेच्या अपुर्या उत्पादनाबाबत आपण सरकारच्या नावाने बोंब मारून मोकळे होतो. पण उपलब्ध विजेचा वापर आपण काळजीपूर्वक व काटकसरीने करतो का?

अंघोळीसाठी (अगदी उन्हाळ्यात पण) बरेच गरम पाणी तापवण्याच्या नादात आपण बाथरूममधील गिझर हे घरातील सर्वाधिक वीज वापरणारे उपकरण आहे हे विसरून जातो. काही घरांत तसेच कार्यालयांत विजेचा मनमानी वापर चालू असतो. दिवसा सर्व पडदे लावून घ्यायचे, अंधार करायचा आणि मग ट्यूबलाईटी जळत ठेवायच्या. हा सगळा उफराटा प्रकार आहे. आपल्या खोलीतून बाहेर पडताना दिवे व पंखे खुशाल चालू ठेवणे, फरश्या पाण्याने धुतल्यावर त्या वाळण्यासाठी फुलस्पीडमध्ये पंखे लावणे, ४० C तापमान असताना ड्रायरने कपडे वाळवणे.... ही सर्व विजेच्या उधळपट्टीची लक्षणे आहेत.

आता रात्री बाहेर पडून बघा काय दिसते ते. कितीतरी ऑफिसेसच्या पाट्या रात्रभर neon signs मध्ये झळकत असतात. हॉस्पिटल व अत्यावश्यक सेवांच्या बाबतीत हे योग्य आहे. पण, जे उद्योग रात्री कायम बंद असत्तात त्यांनी अशी वीज जाळावी काय?
‘एसी’ चा वापर पण खूप काळजीपूर्वक व्हायला पाहिजे. काही घरांत तो २४ तास चालू असतो. अहो निदान पहाटे तरी बंद करा ना राव. अजून ती उत्सवांची डोळे दिपवणारी रोषनाई तर काय वर्णावी? अन ते रस्त्यावरचे सार्वजनिक दिवे सकाळी ८ पर्यंत चालू दिसले की पण फार राग येतो.

वीज उत्पादन ही खर्चिक बाब आहे. वाढती लोकसंख्या आणि औद्योगिकरण यामुळे विजेची मागणी कायम वाढतीच राहते. सोलरचा वापर आपल्याकडे तसा कमीच आहे. वीजनिर्मितीचे नियोजन हा तज्ञांचा विषय आहे. पण नागरिक म्हणून विजेचा काळजीपूर्वक वापर ही तर आपलीच जबाबदारी आहे. आधीच उन्हाळ्याने लाही लाही होत असते आणि त्यात कुठे विजेची नासाडी होताना दिसली की मग डोके अगदी सटकते बघा.

बस्स, सर्वांना वीज जपून वापरायचे आवाहन करतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यत्यय Uhoh
सचिन काळे, तुमची ट्रिक जाणून घ्यायला आवडेल.

वीज वाचवणे / कमितकमी वापरणे हे नक्कीच आवश्यक आहे . पण त्याच बरोबर इतर मार्गांनी स्वस्त आणि मुबलक वीज बनवता येण्यासाठी भर देणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे असे वाटते. आजमितिला अनेक ठिकाणी पवनचक्की पाहायला मिळते आणि त्या त्या भागात ह्याचा बऱ्यापैकी फायदाही होत असतो मात्र निसर्गात अनेक असे स्त्रोत आहेत जसे की समुद्राच्या लाटांची ऊर्जा वगैरे अश्या गोष्टिपासून जे जे जेथे उपलब्ध आहे त्या अनुषंगाने संसाधने वापरली जाणे गरजेचे आहे. बायो कचऱ्यापासून इंधन निर्मिती, वीज निर्मिती असे काहीतरी बातमी सारखे वाचायला मिळण्याऐवजी अश्या प्रक्रिया आपली रूटीन प्रोसेस व्हावी असे वाटते.

आजमितिला गिझर, मिक्सर ग्राइंडर आणि इस्त्री हां जास्त वीज खाणारा प्रकार काही नवीन तंत्रज्ञान वापरून कमी विजेवर सुद्धा आता इतकेच कार्यक्षम आउटपुट देऊ शकेल अश्या प्रकारच्या संशोधनाची गरज आहेच आणि अश्या संशोधनातून उचित रिझल्ट्स देणाऱ्या प्रोडक्ट्सची बाजारात उपलब्धी होणे गरजेचे आहे.

__________________________

कोमट/ सिझननुसार गरम शॉवरसाठी गॅस गिझर हां पर्याय तुलनेत स्वस्त वाटतो. असे काही इतर उपकरणासाठी सुद्धा जर पर्यायी मार्ग असतील तर माहिती करून घ्यायला आवडेल.

धागाकर्ते @ साद, यांची मी अतिअवांतराबद्दल क्षमा मागून पुढील लेखन करतो.

@ पियू, सचिन काळे, तुमची ट्रिक जाणून घ्यायला आवडेल. >>> बादलीत थंड पाणी घेऊन मी अंघोळीला बसतो. मगमध्ये पाणी घेऊन डाव्या पायाच्या पावलावर पाणी हळूहळू सोडत पोटरी, गुढघा मग पूर्ण मांडीवर पाण्याची धार सोडतो. हीच क्रिया मग उजव्या पायावर त्याच क्रमाने करतो. पुन्हा मग पाण्याने भरून डाव्या हाताच्या पंज्यावर पाण्याची धार सोडत सोडत दंड आणि खांदा भिजवतो. हीच क्रिया त्याच क्रमाने उजव्या हातावरही करतो. पुन्हा मग पाण्याने भरून डोकं खाली करून केसांवर आणि मानेवर पाण्याची धार सोडतो. आता राहिला छातीचा सर्वात सेन्सिटिव्ह भाग ज्याला आपल्याला जास्तं गार वाटतं. इथे पुन्हा मग पाण्याने भरून त्यात हात बुचकळुन पाणी हातात घेतो आणि सर्व छाती आणि पोटावर चोळतो. पाठीला काही करायची आवश्यकता नाही. कारण आपली पाठ आपल्या शरीराचा सर्वात दणकट भाग आहे. आतापर्यंत आपले शरीर थंड पाण्याला बऱ्यापैकी सरावलेले असते. मग काय? पुन्हा मग पाण्याने भरायचा आणि पट्कन छातीवर रिता करायचा. झाला तुमचा थंड पाण्याने अंघोळीचा श्रीगणेशा! आता अंगावर कितीही थंड पाण्याचे मग ओता, बिलकुल गार वाटणार नाही. हीच क्रिया जेव्हा जेव्हा तुम्ही थंड पाण्याने अंघोळ कराल तेव्हा तेव्हा करा. बिलकुल त्रास होणार नाही.

ताजा कलम : ह्याला अवांतरही नाही म्हणता येणार कारण माझ्या ट्रिकमधून कोणीतरी स्फूर्ती घेऊन थंड पाण्याने अंघोळ करायला सुरुवात केली तर आपल्या कितीतरी इंधनाची बचत होईल.

© ह्या ट्रिकचे कॉपीराईट माझ्याकडे सुरक्षित आहेत. Lol

आधी उद्योगधंद्यांना हॉस्पिटलांना वीज द्यावी नि उरलीसुरली तर घरांमधे गरम पाणी, एसी, टीव्ही असल्या थेरांना द्यावी. हे बहुतेक विद्युत मंडळाला माहित असेलच, पण आपल्याकडे काय आहे,लाच दिली की काय वाट्टेल ते करून घेता येते. त्यामुळे उगीचच कायदे, सरकार, नियम असल्या थापा जगाला सांगायला. भारतात लाच!

पाणी तापवण्यासाठी सौरऊर्जा वापरणे सगळ्यात उत्तम.
टेरेस, मोकळ्या जागी सौर पॅनल बसवून तयार झालेली वीज महावितरणला पुरवता येईल. आता नेट मिटरींग उपलब्ध आहे. आपण तयार केलेली वीज आणि आपला वापर ह्यातल्या फरकाइतकच बील भराव लागतं.
अपारंपारिक ऊर्जा तंत्रज्ञान वापरणे, ही काळाची गरज आहे.

१. ताटात टाकून देऊ नकोस, तिकडे लहान मुले उपाशी मरतात.
२. वीज वापरू नकोस. "इतरांना" वापरता येईल.

या अन अशा वाक्यांची मला नेहेमीच गम्मत वाटत आली आहे.

आपलं सगळं आयुष्य "एनर्जी" कन्झ्यूम करण्यावर चालत असतं. तुम्ही किती एनर्जी अ‍ॅफोर्ड करता, ती तुमची श्रीमंती. अमेरिका सगळ्यात श्रीमंत देश का आहे? (अमेरिके*वर* असलेल्या कर्जाची माहिती घेतली, तर डोळे फिरतात) तर पर कॅपिटा एनर्जी कन्झम्प्शन सगळ्यात जास्त आहे.

एनर्जी तुम्ही वीज वापरून मिळवता, सूर्याकडून डायरेक्ट उन्हात पाणी गरम करून मिळवता, की सूर्यप्रकाश वापरून वनस्पतींने केलेले प्रकाशसंश्लेशण मार्गे निर्मित धान्य खाऊन तयार झालेली उर्जा पायापासून डोक्यापर्यंत गार पाणी ओतून मग हुडहुडी भरून गर्मी तयार करण्यासाठी वापरता या हिशोबाच्या गोष्टी आहेत.

मागे एका चर्चेत वापरायचे अन प्यायचे पाणी अशी एक चर्चा झाली होती. इथेच का ते आठवत नाही. पण, आपण ९९.९९% वेळा (काही 'रिसाय्कलिंग' हॉटेल इ. सोडल्यास,) संडास फ्लश करायला चक्क निर्जंतुक केलेले पोटेबल वॉटर वापरत असतो, यावरून घरोघरी दोन प्रकारचे पाणी पोहोचवले तर कसे होईल? असा हिशोब मांडलेला आठवतो. तात्पर्य असे होते की, म्युन्सिपाल्टीचे नळाचे पिण्यायोग्य पाणी संडासात वापरणे लॉजिस्टिकली कमी खर्चिक पडते.

एसीचे बोलू जावे, तर एका लिमिटपलिकडची गर्मी अन थंडी आपण गरम रक्ताचे प्राणी सहन करूच शकत नाही. एसी लावून थंड करणे अन हीटर लावून गरम करणे हे जीवनावश्यकही असतेच. घाम पुसत मी खड्डे खणू शकतो. मायक्रोसर्जरी करताना मधे मधे घाम पुसण्यापेक्षा एसी असलेला बरा असतो.

फ्रीज वापरून अठवडाभर टिकलेले अन्न, अन रोज फेकून द्याव्या लागणार्‍या भाज्या दूध, (२ वेळा दूध तापवऊन साठवायची उस्तवार अन इंधनखर्च) इ. चा जमाखर्च मांडून पाहिला तर त्या विजेवर केलेला खर्च परवडतो. पण फ्रीज म्हटलं की फक्त गार पाणी अन आइसक्रीम आठवतं..

हिशोब मांडायचाच, तर तुमच्या देशाची उर्जा "निर्माण" करण्याची ताकत वि. खर्च करण्याची "ऐपत" असा मांडावा.

या जमाखर्चात "बचत" ही बाब महत्वाची असली, तरी वीज "साठवून" ठेवताच येत नाही, ठेवायची, तर भ यं क र महाग पडते. (कपॅसिटर्स अन बॅटरीज) अन एकंदर हिशोब चुकतो, हे लक्षात घेतलेले बरे होईल.

तर,

वीज "वाचवा Lol

ऊर्जा वाचवण्याचे सह्ज उपाय,
१. आपले फ्रिज नेहमी चालू असते, ते आपल्या सर्वात महाग उपकरणांपैकी एक बनविते. दाराचे रबर सीलिंग चांगले असल्याची व त्यामुळे थंड हवा लीक होत नाही, खात्री करुन घ्या.. एक आदर्श फ्रिज तापमान 4 किंवा 5 डिग्री आहे आणि एक आदर्श फ्रीजर तापमान उणे 15 ते कमी 18 डिग्री सेल्सियस आहे.
२. स्वयंपाक वेळ कमी करण्यासाठी, अन्न शिजवताना भांड्यावर झाकण ठेवा.
३. ऊर्जा-कार्यक्षम एलईडी बल्ब वापरा ते ऊर्जा वाचवतात व जास्त काळ टिकतात.
४. एसीचे दर तीन महिन्यांनी फिल्टर स्वछ्य करा. एक गलिच्छ फिल्टर हवा प्रवाह कमी करतो आणि एसीवरील भार वाढवतो.
५. स्क्रीन सेव्हर वापरण्याऐवजी आपला संगणक स्लीप किंवा हायबरनेट मोडमध्ये सेट करा जेणेकरून ते निष्क्रियतेच्या काळात कमी वीज वापरेल.
६.स्वयंपाक करताना ओव्हनचे दार बंद ठेवा प्रत्येक वेळेला ओव्हन दरवाजा उघडताना तापमान 25 अंशांनी कमी होऊ शकते.
७. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या बॅटरीज पूर्ण चार्ज झाल्यास किंवा चार्जर वापरात नसताना बॅटरी चार्जर अनप्लग करा. अनेक चार्जर सलगपणे वीज खातात, अगदी हे उपकरण चार्जरमध्ये जोडले न सेल तरीही.
८. इस्त्री करतांना शक्यतो सर्व कपडे एकदाच घ्या व कपडे धुतांना वाशींग मशीनची पुर्ण क्षमता वापरा

आधी उद्योगधंद्यांना हॉस्पिटलांना वीज द्यावी नि उरलीसुरली तर घरांमधे गरम पाणी, एसी, टीव्ही असल्या थेरांना द्यावी. हे >>>>> +10000

ऊर्जासाधनांच्या मर्यादित असण्याचा मुद्दा जागतिक आहे. त्यामुळे ज्या देशांनी आतापर्यंत अधिक ऊर्जा उत्पादने वापरली आहेत आणि ज्यांचा दरडोई ऊर्जा वापर सरासरीपेक्षा अधिक आहे, अशा देशांच्या (म्हणजेच तेथील नागरिकांच्या)( ऊर्जा वापरावर बंधने यायला हवीत. ग्रीनहाउस गॅसेस निर्माण करून तपमानवाढ आणि हवाबदलाला हातभार लावण्यातही यांचाच मोठा वाटा आहे.
किमान या देशांतील सुजाण नागरिकांनी तरी ऊर्जेचा वापर कमीतकमी करण्याची स्वेच्छेने सुरुवात करावी. थंडीत हीटर, उन्हाळ्यात एसी ही थेरं बंद करावीत.
या धाग्याचा टीआरपी वाढवतानाही अनावश्यक ऊर्जा खर्च होते, त्यामुळे नुसते बोलण्यापेक्षा कृती करणे महत्त्वाचे.

इतके बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

आ.रा.रा. यांच्याशी सहमत.
वीज वापरू नकोस. "इतरांना" वापरता येईल हे अगदी विनोदी आहे. मुळात विजेचे बिल हे Tiered असते, त्यामुळे मिनिमम युसेजपेक्षा जास्त वीज वापरली, तर चढ्त्या दराने पैसे भरावे लागतात. उद्योगधंद्यांना तर कमर्शिअल दराने पैसे द्यावे लागतात (जो दर रेसिडेन्शियल दरापेक्षा जास्त असतो). त्यांनी रात्रभर पाट्या चालू ठेऊन बिल भरले तर हरकत का असावी?
मुळात विजेची खूप चोरी होते, ज्यांनी वीजबिल भरले नाही त्यांच्यावर त्वरित कारवाई होत नाही, ही खरी समस्या आहे.

विजेच्या वापराची गणितं हळूहळू बदलत आहेत. शाश्वत स्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त वीज निर्मिती कडे जग वळत आहे. तेव्हा आपण लवकरच विजेच्या बाबतीत प्रदुषणमुक्त आणि शाश्वत विजेचा वापर करायला लागू असं वाटतं.
मात्र पाण्याची समस्या अधिक गंभीर आहे आणि तिचे स्वरूप उग्र होत जाणार आहे. बहुतेक गोड्या पाण्याचे स्रोत आपण प्रदुषित केले आहेत. या शिवाय हवामान बदलामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी तीव्र दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते आहे. पाणी वाया न घालवणे किंवा प्रदुषित न करणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

हे राम!
आरारा आणि उपाशी बोका - पैसा आणि नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय ह्यातला फरक लक्षात घेता येईल का?

पाण्यातून निर्मिती होताना अनेक प्रोब्लेम्स असतातः
१. धरण बांधणे - धरणे बांधताना ( किंवा अगदी न्युक्लिअर पॉवर प्लँट उभारताना देखील) - जी जमिन वापरात आणतात ती खूप जैववैविध्य असलेली (उदा धरणांकरता डोंगरातील, न्युक्लिअर करता - कोकणासारख्या प्रदेशातली) असते.
अ. हे सगळे जैववैविध्य अक्षरशः पाण्यात जाते. पूर्ण निसर्गसाखळी बिघडते. तिथले प्राणी विस्थापित होतात. त्यांचा अन्नाचा सोर्स गेला की ते मानवी वस्त्यात दिसतात. मॅन अ‍ॅनिमल कॉन्फ्लिक्ट मधे झुकत माप माणसाला म्हणजे मग त्यांना क्रूर पद्धतीने मा रून टाकलं जातं, त्यांची संख्या घटत जाते. ह्याचा सगळ्याच साखळीवर फार वाईट परिणाम होत जातो.
म्हणजे आधी त्यांच्या जागेवर आपण घरं बांधतो. आणि मग त्यातल्या वाढीव गरजा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांची इतर स्थानेही हिसकावून घेतो.

ब. तिथली लोकं विस्थापित होतात. एक आख्खे समाज जीवन, संस्कृती मरते. ह्यातून त्यांचे शहरात स्थलांतर , इथे गरीबी असली तरी सोशियल कॉन्टेक्स्ट आणि त्यातून येणारे सॅटिसफॅक्शन, परत बेसिक गरजा निसर्गातून भागणे असते. शहरात गेल्यावर हा कॉन्टेक्स्ट तुटतो. परत मजुरी, पोल्युशन, गुन्हेगारी - हे त्या माणसांच्या वाटेला तर येतेच, परत शहरावरचा ताण वाढतो. भारता सारख्या शहरात विस्थापितांचे पुनर्वसन फार भयानक, असंवेदनाशील पद्धतीने होते ( गावाला वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड करून जागा देणे, वेगळ्या प्रकारची जमीन देणे, ज्याची त्यांना सवय नाही, निकृश्ट दर्जाची घरे असणे वगैरे) .

आपण अशा सिस्टिम चा भाग आहोत ज्यात आपण अ‍ॅडवांटेजियस जागी आहोत. That doesn't make them less of a human & us someone special.
आपण directly or indirectly त्यांची घरे , जगणे जाण्याचे कारण असू तर तो सरकारचा प्रश्न आहे म्हणून हात झटकू शकत नाही. आपण आपला पार्ट निभावला पाहिजे, संवेदनाशीलता दाखवली पाहिजे.

क. ह्याचा आपल्यावर होणारा परिणाम म्हणजे पाणी. पुन्हा तुम्ही मुंबईत असाल तर तुम्ही म्हणाल मला काय फरक पडणार.
आपली पॉवर स्टेशन्स कशी स्टेज्ड आहेत ह्याचा अ भ्यास केलात तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपण लो वॉटर बेसिन मधे धरणे बांधून ते पाणी उपसून हाय वॉटर बेसिन मधे ते पाणी डायरेक्टली/ इन्डिरेक्टली (उर्जेच्या रुपात) ओततोय.
पाणी प्रश्न दिसणार्‍या रिजन्स मधे दिसणारा पाण्याचा प्रश्न हा अनेक ठिकाणी ह्या प्रकारामुळे अ‍ॅग्रिगेट झाला आहे. ह्याचे डायरेक्ट रुपांतर त्यांचे स्थलांतर, सुजणारी शहरे/ शहरांवर वाढणारे ताण ह्यात होतो. जेव्हा एखादा माणूस विस्थापित होतो, तेव्हा त्या माणसावर तर परिणाम होतोच, पण तो समाजावरही होतो (गुन्हेगारी वाढ, बकाली वगैरे स्वरुपात).
ड. ह्याचा आपल्यावर होणारा दुसरा परिणाम म्हणजे - झाडे जाण्याने होणारा इम्पॅक्ट. उदा ठाणे जि ल्ह्यातील जंगले मुंबई चे lungs असताना, तिथे धरणे बांधणे म्हणजे मुंबईकरांच्या पा याव र (का फुफुसांवर) कुर्‍हाड हे अनेकदा मुंबईकरांनाही माहित नसते
.
इ. सामाजिक परिणाम आपण काही प्रमाणात पाहिलाच

ई. भरत ह्यांनीही महत्त्वाचे मुद्दे लिहिलेत. (ग्रीन हाऊस गॅ सेस. वगैरे)

फ. जर कन्झप्शन वाढले - तर सरकारवर ताण येतो. मग जास्त वीज निर्मिती करता जास्त नासधूस.
हा ताण गरज म्हणून आहे का चैन म्हणून आहे का worse yet वाया घालवण्यामुळे आहे, हे देखील बघितले पाहिजे.

ग. साधनाचा फेअर डिस्ट्रिब्युशन चा मुद्दा ही महत्त्वाचा. आपण अ‍ॅडवांटेजियस पोझिशन मधे आहोत वाला मुद्दा.

हे सगळे असताना ही माझी जबाबदारी नाही म्हणता येईल का?

शाश्वत स्रोतांचा वापर करून जास्तीत जास्त वीज निर्मिती कडे जग वळत आहे. तेव्हा आपण लवकरच विजेच्या बाबतीत प्रदुषणमुक्त आणि शाश्वत विजेचा वापर करायला लागू असं वाटतं. >> जिज्ञासा, ह्याबद्दल आणखीन लिहू शकशील का?

नानबा,
प्रतीसाद प्रचंड आवडला आणी पटला.

हे सगळे असताना ही माझी जबाबदारी नाही म्हणताना - सदसदविवेकबुद्धी वापरावी - अशी विनंती>>>> + 111

तसेच वीजनिर्मिती करतानाचे प्रदूषण हाही मुद्दा महत्वाचा वाटतो

नानबा,
भारतात जलविद्युत हा ऊर्जेचा मुख्य स्रोत नाही.
ऊर्जानिर्मिती क्षमतेचा विचार केला तर औष्णिक (थर्मल) ६४.८%, जल १३.२% आण्विक २% नूतनीकरणक्षम (रिन्युएबल) २०.१% असं प्रमाण आहे.
यात औष्णिक ऊर्जेला लागणारी नैसर्गिक साधने मर्यादित आहेत, त्यांची आपल्याला आयातही करावी लागते.
त्यामुळे हा प्रश्न आणखीनच गंभीर आहे.

तुम्ही मांडलेले मुद्दे सरकारच्या आणि देशाच्या नियोजनाच्या पातळीवरचे आहेत. जेव्हा एखादं सरकार विकास विकास विकास असा जप करत अधिकाधिक प्रकल्पांच्या मागे लागतं तेव्हा पर्यावरणाचा र्‍हास होणारच . पण त्याच वेळी देशात अनेक लोकांना अजूनही वीज मिळालेली नाही किंवा त्यांचा वीजवापर नगण्य आहे, उद्योगांसाठी आणि विकासाचा लाभ उपेक्षितांपर्यंत पोचण्यासाठीही अधिक विजेची गरज आहे, हेही दुर्लक्षिता येणार नाही. त्यामुळे यातून सुवर्णमध्य साधणे गरजेचे आहे.

इथे मांडले गेलेले उन्हाळ्यात किंवा ऐन थंडीत ऋतूत गार पाण्याने अंघोळ करणे हे लुटुपुटीचे उपाय झाले. असले उपाय करून आम्ही वीज वाचवतो आणि उपेक्षित लोकांबद्दल आम्हांला सहानुभूती दाखवतो, असं कोणाला वाटत असेल, तर तो टोकाचा भाबडेपणा झाला. त्या लोकांना मी नुसत्या ओल्या फडक्याने अंग पुसून घ्यायचा सल्ला देईन.

तसंच मी मुंबईत राहून वीज वाचवली, म्हणजे ती लोड शेडिंग असलेल्या भागात पोचेल हे होणे नाही. का तो तांत्रिक भाग वर लिहिला गेलाय.

याचा अर्थ आ.रा.रा., उपाशी बोका किंवा मी विजेच्या व्यर्थ वापराच्या बाजूने आहोत, असा होत नाही, हे तुम्हाला समजू शकावे.

इथे सध्याचे जगातले सर्वाधिक शक्तिशाली पुरुषोत्तम डोनाल्ड ट्रंप यांची आठवण काढणे भाग आहे. त्यांना हवामानबदल होतोय, हेच मुळात मान्य नाही. (त्यांच्यासारखे आणखीही असतीलच.) ग्रीनहाउस गॅसेस ट्रॅक करायच्या नासाच्या प्रोग्रामचा वित्तपुरवठा त्यांनी कमी केला. पॅरिस करारातून अंग काढून घेतले.

थँक्यू भरत, बदल केला आहे.
कोळसा वगैरेतून तर अधिकच प्रदु ष ण होते.

रिन्यु एबल एनर्जी बद्दल लिहिन वेळ मि ळाला की.

तुमचा प्रतिसाद आणि या धाग्याचा उद्देश निव्वळ भावनिक आहेत. त्यातून प्रत्यक्षात काही निष्पन्न होणे नाही.

बाकी, तुम्ही धरणांचा आणि विस्थापनाचा मुद्दा मांडलात ते छान केलेत. नर्मदा प्रकल्प, त्याची वाढवलेली उंची, विस्थापितांसाठी आंदोलने करणार्‍या मेधा पाटकर यांच्याबद्दलची आपापली मते यानिमित्ताने लोकांनी आठवून आणि तपासून [पाहिली तरी पुरे होईल. मुळात तिथे, "मला काय पडलंय" असा विचार आपण केला होता की नाही, हेसुद्धा.

हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही पण शाश्वत उर्जा निर्माण करण्यातला मोठा अडथळा म्हणजे त्या वीज निर्मितीची किंमत. ही किंमत सौर ऊर्जेच्या बाबतीत झपाट्याने कमी होत आहे. याला या क्षेत्रात घडलेले संशोधन आणि देशांची बदलती धोरणे या दोन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. जरी ट्रंप यांनी पॅरीस करारातून माघार घेतली असली तरी अमेरिकेतली बरीच राज्यं त्यांच्या पातळीवर सकारात्मक धोरणे लागू करत आहेत. या शिवाय चीननेही या क्षेत्रात बरीच मोठी कामगिरी केली आहे. मला गुगल करुन हा एक लेख सापडला जो वाचून आपल्याला या क्षेत्राच्या वाढत्या वेगाची कल्पना येईल. भारताची धोरणं देखिल शाश्वत वीज निर्मितीसाठी पुरकच आहेत.
https://www.carbonbrief.org/iea-renewable-electricity-set-to-grow-40-glo...

तुम्ही तुमच्या घरावर सौर उर्जा पॅनल लावून दिवसाला ६ युनिट वीज निर्माण करत आहात आणि ही वीज तुम्ही ग्रिडला पुरवत आहात. परंतू तुमचा रोजचा वीजवापर ५ युनिट आहे, एक जादा युनिट ग्रिडला पुरवल्याचा तुम्हाला वीज वितरण कंपनी कुठल्याही स्वरुपात मोबदला देत नाही. अशा वेळी वीजबचतीच्या बाजुने असलेल्यांची वीज वापराबाबत भुमिका काय राहील?

मला वाटते तसा मोबदला मिळतो.
पुढच्या महिन्यात विज बिल मधून वजा होतात युनिट.
या अश्या सोलर पॅनेल ला १ लाख खर्च आहे. धनकवडीत एक जण हे काम करतात.

तर तो टोकाचा भाबडेपणा झाला. >> भरत - अगदी तसे नसावे. अनेक शहरांत ठराविक वेळांमधे तेथील ग्रिड वर प्रचंड लोड असते. अशा वेळेस लोकांना त्या त्या वेळेत वीज कमी वापरा अशी आवाहने अगदी इथेही केली जातात. किमान तितक्या हेतूंकरता तरी असे स्वतःहून केलेले उपाय बरोबरच आहेत. मुंबईत वाचवलेली वीज गावात वापरता येणार नाही वगैरे मान्यच आहे.

पण त्याच वेळी देशात अनेक लोकांना अजूनही वीज मिळालेली नाही किंवा त्यांचा वीजवापर नगण्य आहे, उद्योगांसाठी आणि विकासाचा लाभ उपेक्षितांपर्यंत पोचण्यासाठीही अधिक विजेची गरज आहे, हेही दुर्लक्षिता येणार नाही. >>> बरोबर. एकूण शहरांची अमर्याद वाढ व त्यामुळे तेथील सुविधांवर येणारा ताण हेच मूळ कारण दिसते. एखाद्या शहरांत घरांचे किंवा उद्योगधंद्यांचे किती प्रकल्प होउ द्यावेत याचा कंट्रोल विकसित देशांत बर्‍यापैकी चांगला असतो. ते कंट्रोल झाले की पाणी, वीज वगैरे गोष्टींचे नियोजनही बरोबर होते.

फारएन्ड, सहमत.
चर्चा चांगली होत आहे. या विषयाचे अनेक पैलू समजत आहेत

नाही फक्त इथे कॉपी करताना गाळला. तो वाचूनच म्हंटले तसे - जरी लुटूपुटीचे असले तरी जर ते अशा कारणांकरता असतील तर उपयोगी आहेत म्हणून.

आताच भारतातली सगळ्या गावांत वीज पोचली, असं जाहीर झालंय.
एका गावात वीज पोचली म्हणजे गावातल्या किमान दहा टक्के घरांत वीज पोचली.

मी काही वर्षं इंदूरला होतो. तिथे नागरी भागात सकाळी साडेसहा ते साडेआठ शेड्यूल्ड लोड शेडिंग असे. त्या वेळी शेतीसाठी वीज दिली जाई.
तिथल्या संथ संस्थानी जगण्यात त्याने फार फरक पडत नसे. मुंबैपुण्यात असं केलेलं किती जणांना चालेल?

Pages