कोल्हापूरचा तांबडा रस्सा....तिखटाचा जाळ

Submitted by राजेश्री on 5 May, 2018 - 05:42

चवींच्या गावात...(१)

कोल्हापूरच्या तांबडा पांढऱ्या तिखटाचा जाळ..
कोल्हापूर हे जाळ आणि धूर संगठच अस म्हणायला लावणार शहर.तांबडा आणि पांढरा रस्सा ही या शहराच्या खाद्यसंस्कृतीच्या अनुषंगाने येणारी ओळख.कोल्हापूरची माणसं देखील अशीच तिखट आणि उग्र आणि संतापीही .त्यांच तिखाटजाळ खाण पिणं हे स्वभावातून अस डोकावतच असत.मग लवंगी मिरची कोल्हापूरचीच का असते हे ध्यानात येत.तिखट खाऊन बुद्धी मांद चढत असत अस म्हणतात मग कोल्हापूरचे लोकांच्या तोंडात जवा बगल तवा कशाला डोकं चालवायचं भावडया हे शब्द येत असतील का?बहुदा असेल असही.कट,भुरका हे शब्द सहसा इथंच वापरले जातात.मग कट मारून निघणे यात या कटाचा कितपत सहभाग सांगता येत नाही.पण कट शिजायला ठेवलेला वेगळा आणि शिजणारा वेगळाच.जेवणात कट आपसूक येतो तो झणझणीत चटणीने कालवण फोडणीला टाकताना पहिल्या वेळी कांद्याच्याही अगोदर तेलात चटणी परतली की मग पहिला लागतो तो ठसका मग धूर उठतो. मग डोळे चुरचुरतात. तिखाट जाळ खाणारी माणसं अस स्वतःच्याच शरीराचं हाल हाल करीत आनंद घेतात .पुन्हा आणि तिखाट खायची इतकी हौस की तिखाट जाळ आमटीचा भुरका मारताना सोबत नाकातील पाणी निपटायला मोठा टॉवेलच घेऊन सोबत बसणार.घाम येतोय,नाकातून पाणी वाहताय, तोंडातून सु सु आवाज येतोय आणि हे असे तिखाटजाळ खाणारे लोक आमटीचा भुरक्यावर भुरका मारत राहतात.मग तिखट ही चव राहतच नाही ती एक अनुभूती होते. एक तर त्यांची जीभ भुरका घ्यायच्या नादात पोळलेली असते.चवीचा आणि आमचा काय संबंध नाही बाई म्हणत ती मग तोंडात जाऊन कुठेतरी कोपऱ्यात बसते.कानातून धूर येतो,अंगातून घाम येतो.तिखट खाणारी व्यक्ती लोहाराच्या भात्यात भाजलेल्या लालभडक कांबीसारखी दिसायला लागती. जेऊन ताटावरून उठायचं आणि काय न बोलता गप्प गुमान बसायचं ही ताटावरून तिखाट खाऊन उठलेल्या व्यक्तिची पहिली गरज असते.अश्यावेळी विचार करायला लावणारे प्रश्न तिला विचारू नयेच.विचारले तर स्वतःच्या जबाबदारीवर विचारावेत. नायतर एक कानफाड खायची तयारीही असू द्यावी.कधी कधी मला वाटत तिखट खाणाऱ्या व्यक्तींना एक वेगळंच सुख मिळत असत.तोंडाने सु सु करीत सुस्कारे सोडण्यातही त्यांचा आनंद सामावलेला असतो.तिखट खाल्ले आणि धन्य जाहलो असे अतीव समाधान तिखट खाऊन त्यांच्या तोंडावर झळकत असते.मग ते पुढील ओळी मनात नक्कीच आळवत असणार...
आम्हा घरी
तिखटाची आमटी
तिखटाचेच कोरड्यास
तिखटचं आम्ही
तिखट आमच्या
जीवास सुखावती
तिखट आवडती
तिन्ही त्रिकाळ
अहंकार आमचा
असे तिखटजाळ
गळ्या आमुच्या
लवंगी मिरचीची माळ
तिखट आम्ही
मिरवू तिखट
खाऊ तिखट
...दुसरी चवची नाही

आता तिखट मिसळीच पुढच्या भागात....

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०२/०५/२०१८

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलाय..

मी एकदाच खाल्ला होता.. दुसऱ्या दिवशी हालत टाइट.
दोन विटा घेऊनच फिरावे लागेल बरोबर असे वाटत होते.