माझी सैन्यगाथा (भाग ११)

Submitted by nimita on 29 April, 2018 - 01:51

सगळ्यात आधी ‘working kitchen’ ची बॉक्स उघडली. आम्ही त्या बॉक्स मधे स्वैपाकघरात लागणाऱ्या बेसिक वस्तू पॅक केल्या होत्या. म्हणजे स्टोव्ह, matchboxes ,प्रेशर पॅन, एक कढई, दूध चहा वगैरे साठी २-३ पातेली, गाळणी, चमचे, चार ताटं, वाट्या ग्लास इत्यादी आणि या सगळ्या बरोबरच २-३ दिवसांची सोय होईल इतकी groceries.. चहा, साखर, डाळ, तांदूळ, मसाले वगैरे. या मागचा हेतू एकच - नवीन घरात गेल्यावर लगेच स्वैपाकघर functional करता यावं.
त्याप्रमाणे मी किचनमधे सगळं सामान लावायला सुरुवात केली.
ते घर खरं म्हणजे दोन बेडरूम्स असलेलं एक गेस्ट हाऊस होतं. त्यामुळे त्यामधे किचन च्या ऐवजी एक छोटीशी pantry होती. साहजिकच तिथे ओटा, kitchen sink या आणि अश्या सोयी नव्हत्या. पण ओट्याच्या ऐवजी एक पत्र्याचं टेबल मात्र होतं. पण वाहत्या पाण्याचा नळ नसल्यामुळे पाणी साठवून ठेवायची सोय करावी लागणार होती.
ही थोडीशी गैरसोय सोडता घर एकदम मस्त होतं .
अगदी एखाद्या स्वतंत्र बंगल्यासारखं! पुढे मागे खूप मोकळी जागा… आणि सगळ्यात interesting गोष्ट म्हणजे - घराच्या बरोब्बर समोर एक छानसं तळं आणि तळ्याच्या पल्याड ऑफिसर्स मेस ची इमारत… हा असा इतका सुंदर नजारा मला रोज अगदी घरबसल्या बघायला मिळणार होता… आणि त्या तळ्यात चक्क पेडल बोटिंग ची सोय होती. .. हे म्हणजे ‘आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन’ असंच काहीसं होतं.
मी किचन सेट करायला सुरुवात केली आणि नितीन नी गेस्ट रूम …. कारण इतक्या लांबच्या प्रवासामुळे बाबा थकले होते , म्हणून त्यांची खोली लवकरात लवकर सेट करणं आवश्यक होतं.
पण नितीन नी जेव्हा कपडे ठेवण्यासाठी कपाट उघडलं तेव्हा तो एकदम म्हणाला, “ इथे कपाटात वाळवी लागली आहे हं! सध्या तरी कपडे किंवा कुठलेही कागद नका ठेवू कुठल्याही कपाटात.”
ते ऐकल्यावर मनात पहिला विचार आला, ‘ चला, नव्या घरात नवे मित्र ! आता वाळवीशी ओळख करून घ्या.’ कारण विंचवा प्रमाणेच ‘वाळवी’ या जीवाबद्दल सुद्धा मी लग्नाआधी फक्त पुस्तकांत वाचलं होतं . आज प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. मी माझ्या नव्या सवंगड्यांना hi, hello करायला गेले. पहाते तर काय… कपाटाच्या आत खालपासून वरपर्यंत वाळवींनी आपलं घर बनवलं होतं…खरं तर त्या उभ्या आडव्या पसरलेल्या बांधकामाला वसाहत म्हणणं जास्त योग्य आहे.
“आता ह्यांचा नायनाट कसा करायचा ?” मी स्वतःच्या बुद्धीवर जास्त ताण न देता सरळ नितीनला च विचारलं.
तो शांतपणे म्हणाला,“औषध स्प्रे करायला लागेल. उद्या सकाळी बघतो काय ते. पण काही दिवस तरी कपाटांमधे काही नको ठेवू.”
‘Your wish is my command “ अश्या अर्थानी मान डोलावत मी आपली पुन्हा किचन मधे घुसले.
थोड्या वेळानी ऑफिसर्स मेस मधून एक जण विचारायला आले की ‘रात्रीच्या जेवणात काय बनवायचं?’ त्यांना जेव्हा कळलं की आम्ही रात्री घरीच जेवणार आहोत तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावर आश्चर्य दिसलं.
पण आमच्या ‘working kitchen’ च्या जोरावर थोड्याच वेळात खिचडी, पापड, तूप, लोणचं असा साग्रसंगीत स्वैपाक तयार होता.(In the given situation, तो साधा बेतही अगदी राजेशाही च होता.)
नवीन घरात आल्यानंतर काही तासांतच मी घरी स्वैपाक केला या गोष्टीचं बाबांना खूप कौतुक वाटलं. त्यांच्या दुसऱ्या दिवसाच्या पत्रलेखना साठी त्यांना एक विषय मिळाला होता.
प्रवासाच्या दगदगीमुळे आम्हाला’ कधी जेवतो आणि कधी झोपतो ‘असं झालं होतं.
पण कपाटामधल्या वाळवीची मात्र night shift सुरू झाली असावी. रात्रीच्या त्या शांततेत लाकूड पोखरताना होणारा तो ‘कटर्, कटर्’ असा आवाज खूप disturbing होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जाण्याआधी नितीननी दोन्ही बेडरूम्स मधल्या कपाटांमधे औषध स्प्रे केलं. त्यानंतर दुपारी मी ती वाळवीची वसाहत demolish करायला सुरुवात केली. पण हे काम वाटलं तेवढं सोपं नव्हतं… प्रथमदर्शनी मातीची वाटणारी ती घरं सहजासहजी तुटत नव्हती. खूप hard होती ती!
शेवटी मी चक्क किचन मधून butter knife आणली आणि एका बाजूनी ते बांधकाम खरवडून काढायला लागले. दोन्ही कपाटं वाळवीमुक्त करेपर्यंत संध्याकाळ होऊन गेली.
आता दोन्ही कपाटं स्वच्छ झाली होती. पण अचानक मनात एक विचार आला….
माझं घर सुरक्षित ठेवण्यासाठी मी दुसऱ्या कोणाचं तरी घर मोडून टाकलंय.. मी जे काही केलं ते बरोबर आहे का चूक ? पण मग लगेच डार्विन ची theory आठवली…’survival of the fittest’...म्हणजे माझं वागणं निसर्गनियमाना धरूनच होतं.
आम्हांला नवीन घरात settle होऊन एक दोन आठवडे झाले होते. एकदा ऑफिस मधून घरी आल्यावर नितीन म्हणाला,” माझं एका कोर्स साठी सिलेक्शन झालं आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षी म्हणजे डिसेंबर १९९३ मधे देवळाली ला जायचं आहे. कोर्स एक वर्षाचा आहे.”
वाह, अजून या जागी येऊन एक महिना ही नव्हता झाला आणि इथून जायचा countdown सुरु देखील झाला! म्हणजे आगरतला मधे जेमतेम एक वर्ष मुक्काम होता आमचा..
पण तो कोर्स नितीनच्या career च्या दृष्टींनी खूप महत्त्वाचा होता आणि त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या entrance exam मधून निवड होणं हे खूपच creditable\n होतं. त्यामुळे आम्ही दोघंही खूप खुश होतो.
पण आमच्यापेक्षा जास्त खुशी माझ्या बाबांना झाली असावी. कारण देवळाली म्हणजे पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर ! त्यामुळे पुण्याला परत जाताना ‘आता लवकरच भेटू देवळाली मधे ‘ असं म्हणत त्यांनी आमचा निरोप घेतला.
एका संध्याकाळी मी family welfare meeting हुन घरी आले तेव्हा घरात नितीन चे batman भैय्या dining room मधे उभे होते आणि भिंतीवर काठी आपटत होते… मी त्यांना विचारलं, “क्या हुआ भैय्या? कौन है वहाँ ?” त्यावर ते म्हणाले,” मेमसाब, घर में टिक्कु घुसा है। मैं कबसे कोशिश कर रहा हूँ, लेकिन वो हिल ही नहीं रहा।”
मी या टिक्कु नावाच्या प्राण्याबद्दल इतर ladies कडून खूप काही ऐकून होते.. टिक्कु हा एक प्रकारचा सरडा होता. दिसायला बऱ्यापैकी किळसवाणा….पण खूप धीट! जर का घरात घुसला तर तुम्ही त्याच्या पुढे मागे काठ्या आपटून त्याला पळवून लावण्याचा कितीही प्रयत्न करा, पण तो तसूभरही नाही हलायचा..जणू काही आपल्या मर्जीचा मालक…जसा आपणहून यायचा तसाच आपणहून निघून जायचा. तसं पाहिलं तर निरुपद्रवी जीव पण जर त्याला जास्त छेडलं तर मात्र चावायला तयार… आणि त्याचा चावा जरी विषारी नसला तरी खूप painful असतो, असंही ऐकलं होतं मी.
मी बऱ्याच वेळा मॉर्निंग वॉक ला जाताना आजूबाजूच्या झाडांमधून या टिक्कु चं ओरडणं ऐकलं होतं.. ‘आं उं…..आं उं’ अस काहीसं विचित्र आवाजात ओरडायचा तो..
इतके दिवस त्याच्या आवाजावरून मी त्याची जी image तयार केली होती ती काही फारशी आल्हाददायक नव्हती.
आज त्याला प्रत्यक्ष बघायचा योग आला होता. मी dining room मधे जाऊन पाहिलं तर dining table च्या जवळच्या भिंतीवर हे महाशय ठाण मांडून बसले होते. आणि आमचे भैय्या त्याच्या पुढे मागे काठी नाचवत त्याला हाकलायचा प्रयत्न करत होते. मला तर वाटलं की आता हे टिककुजी भिंतीवरून सरळ खाली टेबल वरच पडतील की काय ? “Eeww…” त्या नुसत्या कल्पनेनीच अंगावर काटा आला.
आमचं हे एकतर्फी युद्ध चालू असताना नितीन ऑफिस मधून आला.आमचं गाऱ्हाणं ऐकून तो म्हणाला,” सोडा त्याचा नाद. जसा आला तसा जाईल बाहेर!”
Actually आमच्याकडे पण दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हीही आपापल्या कामाला लागलो.
आणि थोड्या वेळानी पाहिलं तर खरंच टिककुजी भिंतीवर नव्हते. पण माझ्या डोक्यात आता वेगळीच काळजी … इथे नाही तर मग गेला कुठे ? आधी बेडरूम मधे जाऊन सगळीकडे नीट शोधलं.. Thankfully तिथे कुठेच नव्हता. मी पटकन बाहेर येऊन खोलीचं दार बंद करून टाकलं. हो ना… नाहीतर लोहितपुर च्या उंदरांसारखा इथे हा टिक्कु यायचा कंपनी द्यायला !
बेडरूम सीलबंद केल्यावर मी किचन मधे जाऊन पाहिलं, तर हे महाशय तिथल्या भिंतीवर विराजमान होते. त्या रात्री मी स्वैपाक कसा केला ते माझं मलाच माहित!
रात्री झोपताना किचन ची खिडकी थोडीशी उघडी ठेवली आणि दार बंद करून ठेवलं.. रात्री कदाचित त्या खिडकीच्या गॅप मधून तो बाहेर जाईल अशी आशा होती. सकाळी जेव्हा दार उघडून पाहिलं तर खरंच माझी strategy यशस्वी झाली होती. सगळं किचन उलटं पालटं करून चेक केलं… हुश्श !!! टिक्कु स्वामी अंतर्धान पावले होते.
येणाऱ्या वर्षं भरात मी जवळजवळ सगळं त्रिपुरा पालथं घातलं.. नितीनला त्याच्या कमांडर बरोबर official visits/inspections करता बाहेरगावी जावं लागायचं. बऱ्याच ठिकाणी ‘Family Welfare Center’ च्या inspection साठी कमांडर च्या बायकोला पण जावं लागायचं. त्या एकदा मला म्हणाल्या,” तू पण चल आमच्याबरोबर. घरी एकटी बसून काय करशील? सध्या मुलं बाळं नाहीयेत तोपर्यंत जेवढं शक्य होईल तेवढं एकत्र राहा दोघं. पुढे मुलांच्या शाळा, परीक्षा वगैरे च्या चक्रव्यूहात अडकलात की नाही जमणार असं कायम एकत्र राहाणं.”
अशा प्रकारे माझी ‘गाड्या बरोबर नळ्या ची यात्रा’ सुरू झाली.
या माझ्या सगळ्या भटकंतीमुळे मला बरंच काही बघायला मिळालं आणि पर्यायानी शिकायलाही !
मुख्य म्हणजे मी वेगवेगळ्या जागा बघितल्या. तिथल्या लोकांची जीवनशैली, त्यांची घरं सगळं जवळून बघायची संधी मिळाली. छोट्या छोट्या गावांमधली ती बांबूच्या लाकडापासून बनलेली घरं पाहून मला आमचं लोहितपुर चं घर डोळ्यासमोर यायचं. कारण इथली घरं पण तशीच जमिनीपासून उंचावर - बांबूच्या stilts वर बांधलेली होती. प्रत्येक घरासमोर एक छोटंसं तळं हमखास असायचं.. kitchen garden असल्यासारखं… तसं पाहता एका अर्थी ते तळं म्हणजे त्यांची kitchen garden च होती.. कारण त्यात तिथले लोक मासे पाळायचे- रोजच्या जेवणात लागणाऱ्या कालवणासाठी!
कालवणावरून आठवलं- तिथे आपली नेहेमीची नाजूकशी कोथिंबीर मला कुठेच नाही दिसली. पण तिकडचे लोक जी कोथिंबीर वापरायचे तिला ‘बर्मा धनिया ‘ किंवा’ विलाती(विलायती) धनिया’ म्हणायचे. ती पण कोथिंबिरीचीच एक variety होती. पण तिची पानं खूप लांब आणि मोठी असायची…. थोडीफार पालक च्या पानांसारखी. एकाच भाजीची इतकी वेगळी दोन रूपं… निसर्गाची किमया !!
मी राजस्थान मधल्या उदयपूर बद्दल आणि तिथल्या lake palace बद्दल खूप काही ऐकून होते. पण त्रिपुरा मधे पण उदयपूर आहे आणि एक lake palace सुद्धा...ही माहिती माझ्यासाठी नवीन च होती.
फरक एकच होता … इथला lake palace उदयपूर मधे नव्हता. आगरतला जवळ एक छोटंसं गाव आहे मेलाघर नावाचं. तिथे आहे हा ‘नीर महल’. As the name suggests हा महाल एका तळ्याच्या मध्यभागी आहे, त्या तळ्याचं नाव आहे ‘ रुद्रप्रयाग’.. त्रिपुरा चा राजा बीर बिक्रम किशोर माणिक्य बहादूर यानी त्याच्या कारकिर्दीत हा महाल बांधून घेतला. त्याकाळी त्रिपुरा ची उन्हाळी राजधानी होता हा नीर महल…
नंतर काही वर्षांनी मी जेव्हा राजस्थान मधलं उदयपूर आणि तिथला lake palace पाहिला ना तेव्हा मला मेलाघर चा हा नीर महल आठवला. खूप साम्य जाणवलं दोन्ही मधे!
अजून एक खूपच interesting गोष्ट पहायला मिळाली… भारत आणि बांग्लादेश यांची सीमा ! बऱ्याच ठिकाणी अगदी proper fencing, guards वगैरे होते पण काही ठिकाणी मात्र फक्त दोन्ही देशांच्या सीमा दर्शवणारे पांढऱ्या रंगाचे दगड (boundary pillars)....... या बाजूला भारत आणि त्या बाजूला बांग्लादेश ! एक दोन ठिकाणी तर लोकांच्या शेतांत असे सीमा-दर्शक दगड बघितले मी…. म्हणजे या बाजूचं शेत भारतात आणि त्या बाजूचं बांग्लादेश मधे!!!
हे सगळं बघून माझ्या मनात एक मजेशीर विचार आला… आम्ही लहानपणी ‘तळ्यात.. मळ्यात’ हा खेळ खेळायचो. तसं इथली मुलं ‘ भारतात...बांग्लादेशात’ असा खेळ खेळत असतील का?
मी जेव्हा आमच्या कमांडर च्या बायको बरोबर वेगवेगळ्या युनिट्स मधे welfare centers च्या inspection करता जायचे तेव्हा सुद्धा मी बरंच काही शिकले…. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं, त्यामुळे मी सगळं अगदी नीट बारकाईनी बघत होते. आणि त्या (the Commander’s wife) पण मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होत्या. मी civil background ची असल्यामुळे माझ्यासाठी आर्मी मधले बरेचसे प्रोटोकॉल्स, etiquettes समजून घेणं आवश्यक होतं.. ..त्यांनी पदोपदी मला मार्गदर्शन केलं. मी जर कुठे चुकते आहे असं वाटलं तर लगेच त्या मला तसं सांगायच्या. त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे माझा आणखी एक फायदा झाला..By virtue of interacting with such senior level officers and ladies, i was able to understand their way of thinking , their expectations from their juniors. I learnt how to plan big events with minimum resources.मला नाण्याच्या दोन्ही बाजू बघता आल्या. आणि या सगळ्याचा मला नंतर खूप फायदा झाला.
एके दिवशी नितीन मला म्हणाला ,” आज संध्याकाळी माझा एक कोर्समेट आणि त्याची बायको येणार आहेत आपल्याकडे. आम्ही NDA मधे एकत्र होतो. आणि पुढच्या वर्षी देवळालीच्या कोर्स करता त्याचंही selection झालंय. आणि हो... ते दोघं मराठी आहेत.”
हे सगळं ऐकल्यावर मला तर खूपच उत्सुकता होती आमच्या पाहुण्यांना भेटायची.. आमचं लग्न झाल्यापासून मी नितीनच्या तोंडून बऱ्याच वेळा त्याच्या course mates बद्दल ऐकलं होतं. आणि प्रत्येक वेळी तो त्यांच्या बद्दल अगदी भरभरून बोलायचा. त्यांचे एकेक किस्से सांगताना त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक यायची.
आज finally मी त्याच्या एका कोर्समेट ला भेटणार होते आणि तोही ‘मराठी’.... हे म्हणजे अगदी ‘सोने पे सुहागा’ च झालं.
लोहितपुर ला जायला निघाल्यापासून आज पर्यंत मी फक्त दोनच व्यक्तींशी मराठी बोलत होते..नितीनशी आणि माझे बाबा होते तेव्हा त्यांच्याशी! आणि तेही फक्त घरातच. कारण आर्मी मधे एक अलिखित नियम आहे… जेव्हा तुम्ही इतर लोकांबरोबर असाल तेव्हा सगळ्यांना कळेल, समजेल अश्याच भाषेत बोलायचं. त्यामुळे सगळेजण एकमेकांशी हिंदी किंवा इंग्लिश मधेच बोलतात. आणि माझ्या मते हे योग्यच आहे ..When everybody understands the conversation then nobody feels left out.
तर सांगायचा मुद्दा हा की आज कितीतरी दिवसांनंतर मी कोणाशी तरी मराठी मधून बोलणार होते.
संध्याकाळी बरोब्बर दिलेल्या वेळेला आमचे पाहुणे आले. सुरुवातीचं hi, hello झालं. आणि बघता बघता दोघंही course mates त्यांच्या गप्पांमधे रंगून गेले. पण एका अर्थी बरंच झालं म्हणा, कारण त्यामुळे मला आणि माझ्या नव्या मैत्रिणीला एकमेकींबरोबर खूप गप्पा मारता आल्या.
माझी ही नवी मैत्रीण मला बघताक्षणीच आवडली होती. खूप शांत स्वभावाची, काहीशी अबोल पण हसतमुख ! आर्मी मधली माझी पहिली मराठी मैत्रीण!

त्या दिवशी आम्हां दोघीत जुळलेलं ते मैत्रीचं नातं आज २६ वर्षांनंतर ही टिकून आहे.. आणि इतक्या वर्षांत अधिकाधिक दृढ होत चाललंय !!!

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणे च सुंदर लेख,
वेगवेगळ्या किटक-वधाचे(हे कमी च आहेत) / त्यांना हैंडल करायचे (हे जास्त) किस्से किती छान लिहिले आहेत, मारुती चितमपल्लीं नी लिहिलेले एक पुस्तक आठवले, त्यात त्यांचा दृष्टिकोन फार छान मांडला होता, उत्सुकता दिसून येते पदोपदी ‌‌‌‌‌‌‌‌‌‌नवीन काही दिसलं की....

माझ्या ब्लॉग मधे मी बरेच photos ही share केले आहेत. पण इथे अपलोड होत नाहीयेत. माझ्या ब्लॉगची लिंक देते आहे. Please visit my blog and leave your comments there also. https://priyadivekarjoshi.wordpress.com

हा भाग पण आवडला!
तुमचा ब्लॉग बघितला. सुंदर आहेत फोटो! (ब्लॉगवर मला मोबाईल वरून प्रतिक्रिया देता येत नाहीये म्हणून इथे लिहिले आहे)

कुठून आणता इतकी सकारात्मकता? वाळवी पाहून लगेच चिंतेने माझे डोके पोखरायला सुरुवात केली असती! तेच त्या सरड्याचे. फोटो असतील तर नक्की टाका भागासोबत.
पुभाप्र!

जिज्ञासा, इथे एकावेळी कास्ट फोटो post करता येत नाहीयेत. वर comments मधे माझ्या ब्लॉग ची लिंक दिली आहे. त्यात बतेच photos टाकले आहेत. त्या सरड्याचा आवाज ऐकवणारी लिंक पण दिली आहे. Please visit my blog and leave your comments. Happy

हा भाग पण आवडला!
तुमचा ब्लॉग बघितला. सुंदर आहेत फोटो! >>> +999

सकारात्मकता हा तुमचा स्वभावविशेष आहे. Happy

आज सगळे भाग संपले वाचून. खूप छान लिहिता. तुमच्या लिखाणात तुमची सकारात्मकता जाणवते आहे.
तुमच्या अनुभवांचे पुस्तक लिहाच तुम्ही.

आज सगळे भाग संपले वाचून. खूप छान लिहिता. तुमच्या लिखाणात तुमची सकारात्मकता जाणवते आहे.
तुमच्या अनुभवांचे पुस्तक लिहाच तुम्ही.>>>+१