Submitted by अनन्त्_यात्री on 24 April, 2018 - 12:41
दिवसातून छप्पन वेळा
माझा चेहेरा बदलत असतो
आरश्या पाठचा अचपळ पारा
माझ्या नसात दौडत असतो
दोन देतो दोन घेतो
चेहेरा तेव्हा निब्बर होतो
टेक्नोमंद जेव्हा ठरतो
मीच मला डफ्फर वाटतो
कोsहं प्रश्न पडतो तेव्हा
मुमुक्षू मी दिसतो खास
टपरीवरचा चहा पिताना
मीच टपोरी टाईमपास
अचाट काही जेव्हा बघतो
अफाट काही जेव्हा ऐकतो
अद्भुताची चाहूल लागून
अवघा चेहेरा कुतूहल बनतो
जुनी गाणी, जुने छंद,
वार्यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा
लोलक तोच, तिरीप नवी
जुनीच कविता, नवा कवी
अनंतरंगी अनवट खेळ
आकळण्याची आली वेळ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भारीय कविता
भारीय कविता
नवीन कविता नवा कवि
नवीन कविता नवा कवि
अशाच नवनवीन, सुंदर, विविध विषयांवरील कवितांच्या प्रतिक्षेत.....
द्वादशांगुला, शशाककजी :
द्वादशांगुला, शशाककजी : धन्यवाद!
सुंदर लोलक आहे . अनंतरंगी
सुंदर लोलक आहे . अनंतरंगी अनवट खेळ मांडतो .
आभार, दत्तात्रयजी!
आभार, दत्तात्रयजी!
जुनी गाणी, जुने छंद,
जुनी गाणी, जुने छंद,
वार्यासंगे विस्मृत गंध,
दर्वळतात भोवती जेव्हा
चेहेरा कवळा होतो तेव्हा...कसली जिवंत हालचाल आहे शब्दांत !
खुप सुंदर
खुप सुंदर
भुईकमळ, प्रतिसादाबद्दल मन
भुईकमळ, प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार!
mr. pandit, धन्यवाद!
mr. pandit, धन्यवाद!