मैत्री भाग - 14

Submitted by ..सिद्धी.. on 23 April, 2018 - 13:19

 आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा......

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825

भाग - 7
https://www.maayboli.com/node/65829

भाग - 8
https://www.maayboli.com/node/65844

भाग - 9
https://www.maayboli.com/node/65853

भाग - 10
https://www.maayboli.com/node/65859

भाग -11
https://www.maayboli.com/node/65867

भाग -12
https://www.maayboli.com/node/65871

भाग - 13
https://www.maayboli.com/node/65878
●●●●●●●●●●●●●●●●
मागील भागात:-
 दारात पाऊल ठेवताच महंतांना कसलीतरी विचीत्र जाणीव झाली..कालच्या सारखीच. ते लगेच काही म्हणाले नाहीत. पण जेवताना त्यांनी उद्या सकाळी एक पूजा करणार असल्याचं सांगितलं.इथे येण्याचं सगळं कारण कळल्यावर घरचे सगळे अवाक् झाले. समिधाच्या वडीलानी त्यांना परवानगी दिली.

रात्री महंतानी सर्व घरच्यांना काहीवेळ देवघरात बसवलं. एक मंत्र म्हणून घेतला. बाबांना बरोबर घेऊन त्यांनी संपूर्ण घराभोवती अभिमंत्रीत जल शिपडलं.
आता इथून पुढे:-
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
दुसर्या दिवशी सगळे जण सकाळी लवकर उठले.  महंतांनी पूजेची सगळी तयारी केली. त्यानी अनेक गोष्टींचा वापर करून मनातल्या मनात काही विशिष्ट मंत्रोच्चार करत एक गंध तयार केला. नंतर त्यांनी घरातल्या प्रत्येकाला जवळ बोलावून एक श्लोक म्हणायला लावत त्या त्या व्यक्तीच्या भृकुटीमध्यात त्या गंधाचा टिळा लावला. तो गंध लावणार्या प्रत्येकाला एकप्रकारची मनःशांती मिळाली. असं करत त्यांनी प्रत्येकाला देवघरात पाठवलं आणि दरवाजा बाहेरून लावून घेतला.

     महंतांनी बरोब्बर सहा वाजता पूजेला सुरूवात केली. अर्ध्या तासाच्या आवाहनानंतर कुंकवाच्या रिंगण एकदा चमकलं. एका मंत्रानंतर ती शक्ती त्या रिंगणात अवतरली. महंतांनी तिला या घरात येण्यामागचं प्रयोजन विचारलं . कारण समिधाच्या घरी येण्यामागे खरं तर तसं काहीच कारण नव्हतं आणि तीच्या येण्याने घरात कोणालाही अपाय झाला नव्हता. त्यामुळे संभ्रमात असलेल्या महंतांनी नक्की तिला अघोरीने पाठवलय का? याची शहानिशा करायला तीला ते विचारलं. पण त्यांना मिळालेलं उत्तर हे अनपेक्षित होतं.

ती म्हणाली; " मी मीरा. माझा चार वर्षापूर्वी रस्त्यावरच्या एका अपघातात मृत्यू झाला होता. त्या दिवशी अघोरीने रोहनच्या आत्म्याला आवाहन करताना त्याच्याकडून नकळत झालेल्या एका चुकीमुळे मला या जगात प्रवेश मिळाला. त्या रात्री राजेशबरोबरच मी इथे आले. पण दृश्य स्वरूपात मी कोणसमोरच अजून प्रकट होऊ शकले नाही. त्या दिवशी अघोरीने रोहनच्या आत्म्याला गवतांच्या काड्यांच्या जुडीत कैद केलेल हे मला कळलं. पण हे मी सांगू शकत नव्हते. काल तुम्ही आलात आणि गेटपाशी थांबून अंदाज घेतलात तेव्हाच मला कळलं की ती योग्य व्यक्ती तुम्हीच आहात. म्हणून आज तुम्ही केलेल्या आवाहनात मी प्रकट झाले. मला स्वतः दृश्य स्वरूपात प्रकट व्हायची विशिष्ट सिद्धी तुम्ही प्रदान केलीत तर मी अवश्य तुमची मदत करेन. फक्त नंतर मला मुक्ती मिळावी हीच इच्छा आहे."

महंतांनी काहीवेळ विचार केला. तिच्या बोलण्यात एक सत्यता दिसून येत होती. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवून काही मंत्रोच्चार करून त्यांनी विधी पार पाडले आणि तिला दृश्य स्वरूपात अवतरण्यासाठी एक छोटा मंत्र सांगितला. ही गोष्ट त्यांनी फक्त समिधा आणि संजनाला सांगितली. बाकी सर्वजण यापासून अनभिज्ञ होते.

त्या रात्री जेवण झाल्यावर महंत;समिधा आणि संजना गच्चीवर जमले. समिधाने आतून दार लावून घेतलं. महंतांनी मीराला बोलावून घेतलं आणि त्यादिवशी काय झालं ते विचारलं. तीने जे सगळं सांगितलं त्यावरून महंतांना कळलं की ही नुकतीच सुरूवात आहे. लवकर कळल्यामुळे उपाय करायला वाव आहे. आता लगेच कामाचा श्रीगणेशा करायला हवा. शेवटी बराच वेळ तिघांनी विचार केला आणि एक योजना तयार केली.

दुसर्या दिशवी सकाळी राजेशच्या केबिनचा दरवाजा वाजला. एका महत्वाच्या कामात तो मग्न होता. वर न बघताच तो "कम इन" म्हणाला. आत कोण आलय हे बघायला त्याने मान वर केली तेव्हा तो आ वासून बघतच राहीला. समीधा त्याला भेटायला आलेली.  पण तिच्यासोबत जी तरूणी आलेली तीला बघून तर राजेशचं हृदय दुप्पट वेगाने धडकायला लागलं. तीने हाय म्हणत त्याच्याशी हस्तांदोलन केलं तेव्हा त्याला जरा झटका बसला आणि तो भानावर आला. तीने आपली ओळख करून दिली. समिधा राजेशशी गप्पा मारत होती. पण सगळा वेळ त्याचं लक्ष त्या तरूणीचं सौंदर्य मनात उतरवून घेण्यात होतं. बाण अचूक निशाण्यावर बसलाय हे समिधाच्या लक्षात आलं होतं. तिच्या त्या निळ्या डोळ्यांच्या मायाजालात आता राजेश अडकला होता. अचानक क्षणभर त्याला परवा रात्रीच्या त्या सौंदर्यवतीची आठवण झाली. पण तिच्यात आणि हीच्यात जमीन अस्मानाचा फरक होता. समिधाने त्याला तिला नोकरी देण्याविषयी विचारलं. त्याने तिचा इंटरव्यू घेतला. तिची बुद्धीमत्ता बघून ती 'सौंदर्य आणि बुद्धीमत्तेचा अनोखा संगम' असल्याची त्याची खात्री पटली आणि तीची नोकरी पक्की केली. ती सतत आपल्या डोळ्यापुढे रहावी आणि असंच तिचं रूप न्याहाळता यावं म्हणून आपल्या केबिनसमोरच तिची कामाची जागा ठेवली...
ती तरूणी दुसरी तिसरी कोणी नसून महंतांनी पाठवलेली मीरा होती.....

क्रमशः

-----आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा. भारीच जमलाय हा भागही. मीराच्या येण्यामुळे अनोखा ट्विस्ट आलाय. आता पुढे काय होईल याचीच उत्सुकता लागलीय.

आनंददादा मागच्या भागात तुला ती सौंदर्यवती आवडलेली म्हणून खास तुझ्यासाठी हा पार्ट स्टोरीत अॅड केलाय....तीला परत आणणं शक्य नव्हतं...म्हणून तिच्याच तोडीची नवीन मुलगी आणलीये....आवडली तर सांग.....

@ अधरा ही काल्पनीक कथा आहे...त्यामुळे आमची मीरा काहीही करू शकते....त्यात परत ती सुंदर+हुशार+भूत याचा त्रिवेणी संगम आहे....

@ सस्मित आपल्या मताचा आदर आहे....

धन्यवाद...

आदी-सिद्धी, सगळ्यात आधी तुझं खूप कौतुक... माझ्या मते भय-कथा व विनोद-कथा लिहिणे अतिशय अवघड असते... तुझ्या प्रयत्नाबद्दल तुझं खूप अभिनंदन!
फक्त एकच सुचवावस वाटलं, शक्यतो हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्ड्स मध्ये ऍडमिट होताना मनगटावरचे धागे/दोरे, गळ्यातले लॉकेट्स आणि ताईत सगळं काढायला सांगतात...
आमच्या corporate language मध्ये "FYI & NA" Wink Wink Wink

अजून एक, हा feedback खरतर तुझ्यासाठी आणि द्वादशांगुला, दोघींसाठी
... you girls are simply be amazing ghost busters!!! cheers to your friendship & keep writing!!! Happy

अपूर्वदादा मला माहितीये ते....म्हणून मी आधीच लिहीलय की डाॅक्टरांची परमीशन घेऊन हे सगळं केलय.....आणि हो धन्यवाद संपूर्ण प्रतिक्रीयेबद्दल....

you girls are simply be amazing ghost busters!!! cheers to your friendship & keep writing!!! Happy>>>>>माझ्या आणि जुईच्या वतीने धन्यवाद हं.....

अधरा ही काल्पनीक कथा आहे...त्यामुळे आमची मीरा काहीही करू शकते....त्यात परत ती सुंदर+हुशार+भूत याचा त्रिवेणी संगम आहे....>>>>>>भुतकथा काल्पनिकच असावी :)खरी झाली तर सुंदर भुतासमोर आपण मदत करणारे असले तरी आपण उभे देखील राहणार नाही... Happy कथा मस्त चालुये उलट वेगळा ट्विस्ट आहे भूत वाईट माणसाला धडा शिकवायला मदत करतंय...म्हणून मजा येतीये वाचायला...

आनंददादा मागच्या भागात तुला ती सौंदर्यवती आवडलेली म्हणून खास तुझ्यासाठी हा पार्ट स्टोरीत अॅड केलाय....तीला परत आणणं शक्य नव्हतं...म्हणून तिच्याच तोडीची नवीन मुलगी आणलीये....आवडली तर सांग..... >>>
हे भारीय ! Lol