साहसी प्रवास - भाग १

Submitted by रानजाई on 17 April, 2018 - 00:50

मला वाचायला खूप आवडते, मायबोली वरील सगळ्या कथा वाचून मलाही लिहावेसे वाटले...हि माझी पहिलीच कथा मालिका... आणि पहिलेच लिखाण काही चुका असतील तर प्लीज माफी आणि दुरुस्ती सुचवा.
------------------------------------------------------------------------------

राणी साहेब उठा, राणीला उठवायला आलेली दासी राणीसाहेबाना आधीच तयार झालेले पाहून अचंबित झाली. रोज उठवल्या शिवाय न उठणारी राणी आज कोणाच्या हि मदती शिवाय उठून तयार झाली होती. राणी तशी लहानच पण कुणीही वारीस नसल्याने हि 18 वर्षाची राणी गादीवर बसलेली. १8 वर्षाची असून हि ती खूप कर्तबगार आणि चांगली, प्रजेची खूप लाडकी.

आज राणी लवकर उठून स्वतः तयार झाली याला कारण हि तसेच होते. आज तिचा खास दिवस होता. आज ती पुन्हा लहान होणार होती. आज ती जवळच्या राज्यात असलेल्या आपल्या मैत्रीणीस भेटायला जाणार होती. जाणे जरुरी होते कारण आज मनूचा वाढदिवस आणि दोघीनीं ठरवल्या प्रमाणे हा दिवस काहीतरी निराळे करण्याचा. राणी आणि जवळच्या राज्याची राजकुमारी मनू , तिचे नाव मानसी पण राणीची ती मनू, ह्या दोघी जिवलग मैत्रिणी, एकाच शाळेत शिकलेल्या. शाळेत खूप दंगा मस्ती करणाऱ्या मैत्रिणी. पण राणीवर जबादारी आली आणि दोघींना भेटणे हि मुश्किल झाले. मग या दोघीनीं ठरवले काहीहि झाले तरी एकमेकिंच्या वाढदिवशी भेटायचे आणि सगळे पाश झुगारून खूप मस्ती करायची, मनासारखे वागायचे, ह्या दिवसाची आठवण म्हणून काहीतरी साहसी करायचे. दोघी मैत्रिणी वर्षातील हे दोन दिवस भरभरून जागायच्या आणि ह्या दिवसाची वाट बघायच्या.

दासी, प्रधानमंत्री आणि सगळ्यांनी खूप विनवून हि राणी एकटी निघाली आपल्या मैत्रिणी ला भेटायला. दोघी खूप आतुर होत्या भेटायला. राणी त्यांच्या भेटण्याच्या ठिकाणी पोहचली तर मनू तिची वाटच पाहत होती. मागील भेटीत ठरल्या प्रमाणे आज त्या जवळच असलेला डोंगर सर करणार होत्या आणि वरती असलेल्या शंकराच्या मंदिरात जाऊन आपली आजची भेट सार्थ करणार होत्या डोंगर तसा छोटाच पण घनदाट जंगलाने वेढलेला. वरती शन्कराच्या मंदिरात जाण्याची एकट्या दुकट्याची हिंमत हि होत नसायची, आणि म्हणूनच आजच्या दिवसासाठी त्या दोघीनीं मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला.

दोघीनीं गळाभेट घेतली, वरती पाहून ॐ नमः शिवाय म्हणून शिवाला वंदन केले आणि डोंगर चढायला सुरुवात केली. डोंगर दिसायला खूप छोटा म्हणून त्यांना वाटले आपण संध्याकाळी पूर्वी दर्शन घेऊन खाली येऊ आणि घरी रात्री पूर्वी सुखरूप पोहचू. राणी आज रात्री मनू चा वाढदिवस असल्याने तिच्याच घरी जाणार होती आणि दुसऱ्या दिवशी आपल्या राज्यात पोहोचणार होती.

मनू हि राणीला भेटायला आणि सोबत घेऊन यायला म्हणून आपल्या घरातून निघाली होती. दोघींच्या घरी त्या एकमेकींच्या घरी सुखरूप आहेत असेच वाटत होते. दोघीनीं डोंगर चढायला सुरवात केली, सोबत जास्त सामान नव्हते फक्त मनू नि घरून राणी ला देण्यासाठी घेतलेली मिठाई होती. डोंगरावर चढायला पायवाट हि नव्हती अंदाजाने दोघी जंगलातून जात होत्या, खूप दिवसांनी भेटल्यामुळे दोघी अविरत बडबड करत जात होत्या. दोघींनाही वर्ष भरातील घडामोडी एकमेकींना सांगायची घाई झाली होती. त्या नादातच दोघी समोर दिसेल त्या वाटेने चालत जात होत्या.

चालतां चालतां दोघीना खूप भूक लागली म्हणून त्यांनी जवळ असलेली मिठाई खाल्ली आणि परत चालायला सुरवात केली, पण गोड खाल्यामुळे आता त्यांना पाणी प्यावेसे वाटू लागले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक छोटा झरा दिसला. तहान लागलेली असल्या मूळे त्या झऱ्या काठी जाऊन थोडे पाणी प्याल्या आणि तिथेच थोडावेळ एका झाडाखाली असलेल्या हिरवळीवर बसल्या. तो झरा आणि भोवतालचा भाग खूप नयनरम्य होता, संथ वाहणारे झऱ्यातील शीतल पाणी, चोहोबाजूनी असलेली हिरवीगार घनदाट झाडी, मंद वाहणारा वारा, पक्ष्यांची मधुर किलबिल यामुळे तो परिसर अगदी मंत्रमुग्ध करणारा होता कि तो परिसर तसा बनवला गेला होता?? पोटभर खाल्यामुळे आणि मनोहर वातावरणामुळे दोघीना लगेचच शांत, गाढ झोप लागली. पण दोघी हि पुढे काय होणार या पासून अनभिज्ञ होत्या. . .

क्रमशः. . .

-----------------------------------------------------------------------------------------------------
वरील कथा हि पूर्णतः काल्पनिक असून माझी रचना आहे. कोणाचा हि यावर कुठल्या हि प्रकारचा हक्क नाही. विना परवानगी कुठेही कथा वापरु किंवा पोस्ट करू नये.

©रानजाई https://myonlinemarathi.blogspot.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की कुणाचा वाढदिवस आहे? राणीचा की मनुचा?
राणी मनु राणी मनु कंफ्युज होतंय.

<<<<आज राणी लवकर उठून स्वतः तयार झाली याला कारण हि तसेच होते. आज तिचा खास दिवस होता.
आणि
राणी आज रात्री मनू चा वाढदिवस असल्याने तिच्याच घरी जाणार होती>>>>
इथे काही तरी घोळ झालाय.

दोघींनाही वर्ष भारतातल्या घडामोडी एकमेकींना सांगायची घाई झाली होती. >>पाहे वाक्य असे पाहिजे ना "दोघींनाही वर्ष भरातील घडामोडी एकमेकींना सांगायची घाई झाली होती."

थँक्स सस्मित , नरेन लक्षात आणून दिल्या बद्दल, माझे पहिलेच लिखाण आहे म्हणून प्लीज चुका सांगत जा. चूक दुरुस्त केली.