आळव तू गीत माझे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 April, 2018 - 03:12

आळव तू गीत माझे

आळव तू गीत माझे
मी जवळ नसताना
तान माझीच येइल
तू रागदारी गाताना

हा कसा सुगंध खासा
मातीचा दरवळला
कालचा पाऊस माझा
दारी तुझ्या घुटमळला

चिंब चिंब तू झालीस
अंगोअंगी मज नशा
डोळे तुझेही शराबी
बोलतात माझी भाषा

कालचे ते स्पर्श सारे
आज कसे जागले
अन मनाने आजही
मागू नये ते मागले

नित्य नवी हुरहूर
खेळ कधी सरु नये
पाऊस आठवांचा हा
कधीच ओसरु नये
कधीच ओसरु नये

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults