बॉलीवूडला धक्का ! काळवीट प्रकरणात सलमानला पाच वर्षांची शिक्षा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 April, 2018 - 03:30

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची (सैफ अलीखान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सलमानला पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड शिक्षा झाली आहे..
सलमान खरेच गजाआड जाणार का? आणि किती काळासाठी?
सलमानचा वर्षाला एक चित्रपट यायचा जो ३०० ते ४०० करोड कमवायचा. एकूण उलाढाल यापेक्षा जास्तच..
त्याचे असे ऐन उमेदीच्या काळात जेलमध्ये जाणे बॉलीवूडला मोठा फटकाच आहे.
निकालही लागला आहे तो तब्बल वीस वर्षांनी !!
उशीरा का होईना या देशात न्याय मिळतो याचे कौतुक करावे कि न्याय मिळायला ईतका उशीर लागतो यावर टिका करावी?
खरे तर दोषी असो वा नसो, या वीस वर्षात सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला असेल.. हा तरी नक्कीच न्याय नाहीये..
न्यायावरून आठवले, माणसांना चिरडण्याची शिक्षा झाली नाही, पण जनावरांना मारून मात्र फसला. हे अजब आहे..
अर्थात माणसांना मारायचा गुन्हा सिद्ध झाला नाही, हा झाला. हा फरक आहेच ..
त्या गुन्ह्यात शिक्षा झाली असती तर त्याला कुठलीही सहानुभुती नव्हती, पण इथे मात्र त्याच्याबद्दल वाईट वाटतेय.
आजवर मी स्वत: किंवा आपण सर्वांनीच जिभेचे चोचले पुरवायला ईतकी जनावरे मारून खाल्ली असतील. याला मात्र एक बेकायदेशीर असलेले जनावर मारायची अवदसा सुचली आणि लटकला.
यात असेही वाटते की कदाचित सेलेब्रेटी नसता तर हे प्रकरण गाजावाजा न होता कुठेतरी दाबता आले असते, आणि संबंधितांचे खिसे गरम करून केव्हाचाच सुटला असता. कारण बेकाय्देशीर कृत्ये करून अश्या प्रकारे सुटणारे या देशात कैक असतील.
पण मग तो हिट अ‍ॅण्ड रन केसमधून कसा सुटला? कि तिथे खरेच निर्दोष होता?
काही का असेना, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान .. बॉलीवूडला या धक्यातून सावरायला बळ मिळावे ही एक चित्रपटप्रेमी म्हणून प्रार्थना !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्धी न्यूज आहे. सेम न्यायाधीश ने जामीन मंजूर केलाय.
87 न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. सलमान केस चा काही संबंध नाही.

ओके म्हणजे बदली झाली पण यात काही गौडबंगाल नाहीये.
हा निव्वळ योगायोग आहे.
बिचारा सलमान उगाच बदनाम होतोय..

@ ऋन्मेऽऽष - बघा मी आधीच सांगितले होते तो लगेच सुटेल म्हणून आणि तू उगीच शिळ्या काढिला उत आनतोय म्हणून ....

अहो जामीन मिळालाय ना फक्त.. निर्दोष मुक्तता नाही झालीय. जेव्हा तसे होईल तेव्हा मी स्वत: मायबोली सोडून निघून जाईल

@ऋन्मेऽऽष - फारच विनोदी स्वभाव तुमचा ... म्हणजे तुम्ही मायबोली कधीच सोडणार नाही तर ...

असो ... इंग्रजीत एक म्हण आहे "Justice delayed is justice denied" .. मला वाटतं तुमच्या सारख्या सुज्ञास अधिक बोलणे ना लगे

Justice delayed is justice denied" ..
>>>

दिरंगाई तर गेले 20 वर्षांची आहे. जर नियमाने जामीन द्यावा लागत असेल तर तो मिळणारच. उलट या दिरंगाईने सलमानचेच नुकसान झाले आहे. डोक्यावर जेलची टांगती तलवार असल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये.

निर्दोष मुक्तता नाही झालीय. जेव्हा तसे होईल तेव्हा मी स्वत: मायबोली सोडून निघून जाईल
>>> महाग पडेल.. उंच न्यायालयात सुटेल निर्दोष.

जर खरेच निर्दोष असेल तर सुटेलही निर्दोष, पण दोषी असेल तर शिक्षा होणारच!
सरकार आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा.. भुजबळांचे उदाहरण ताजे आहे. फक्त सलमानला मोदी वा मल्यासारखे फरार होऊ देऊ नका

{{{ या दिरंगाईने सलमानचेच नुकसान झाले आहे. डोक्यावर जेलची टांगती तलवार असल्याने त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. }}}

या तलवारीखाली संजय आणि राहूलची किती लग्नं झाली?

सलमान बाहेर आल्याने आता धाग्याचा उद्देश पुर्ण झालेला आहे आता निव्वळ फालतुगिरी सुरू आहे

अॅडमिन यांनी पुढील वाद-विवाद टाळून धागा बंद करावा

सलमान बाहेर आल्याने आता धाग्याचा उद्देश पुर्ण झालेला आहे
>>>>

सलमान बाहेर येणे हा धाग्याचा उद्देश होता??
सॉरी 2 से .. पण हा माझ्या चारीत्र्यावर आरोप आहे !

होय
आरोप आहे, मानहानीचा दावा ठोकू शकतोस

मला वाटतं त्यापेक्षाही हा सलमानच्या वकिलाच्या काबिलीयत (कौशल्य) वर केला गेलेला आरोप आहे. ऋन्मेषच्या धाग्याने सलमान दोन दिवसांत बाहेर? मग वकिलाने काय केलं?

"गंगाजल" सिनेमा आठवतोय?
विचारण्याचे कारण की, काल एका आमदाराला नगरच्या एसपींनी चौकशीसाठी बोलविले असता आमदाराच्या कार्यकर्त्यांनी एसपी साहेबांचे ऑफिसचं फोडले.
किती ही दहशद आणि किती प्रशासनाचे वाभाडे!!
प्रथमतः काल हत्या झालेल्या दोन सर्वसामान्य कार्यकर्त्यांना श्रद्धांजली.
मी नगर शहरात गेल्या ३० वर्षांपासून राहत आहे, परंतु नगरची गुंडागर्दी ही खूप जुनी आहे. अलीकडे नात्या-गोत्याची गुंडागर्दी राजकारण फारच वाढले आहे.
नगरचे कुप्रसिद्ध गुंड आ. कर्डीले, गुंड आ. जगताप पिता-पुत्र आणि जेलमध्ये असणारे कोतकर पिता-पुत्र हे सगळे एकमेकांचे व्याही.
गुंड कर्डीले याची एक मुलगी आ. जगतापला तर दुसरी तुरुंगात असलेल्या गुंड कोतकरला. या गोतावळ्याने आक्खे नगर आणि परिसर दहशदीमध्ये ठेवलेला आहे. कोणताही पत्रकार अथवा संपादक यांच्याविषयी जास्त लिहीत नाही कारण यांची असलेली नगरमधली दहशत, अपवाद फक्त संपादक श्री. शिवाजीराव शिर्के यांचा .
अलीकडेच लांडे खून प्रकरणात गुंड आमदार कर्डीले आणि त्याचा व्याही कोतकर यांना अटक झाली होती. परंतु कर्डीले राजकीय वजन वापरून सुटला आणि कोतकर आणि त्याची तीन मुले तुरुंगात आहेत. २५पेक्षा जास्त गुन्हे कोतकर परिवारावर दाखल आहेत. आता येऊया गुंड आ. कर्डिलेकडे, याच्यावर १४ गुन्हे दाखल असून हा कित्येक वेळा तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे. त्याच्या २५ वर्षाच्या मुलावर पण महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ तसेच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत . आता नगर शहर आणि परिसर ज्याच्या प्रचंड दहशतीखाली आहे असे गुंड आमदार अरुण जगताप आणि त्याचा पुत्र गुंड आमदार संग्राम जगताप. यांच्यावर अनेक वर्षांपासून अनेक गुन्हे दाखल आहेत. नगरमधील प्रत्येक सामान्य नागरिक असो अथवा व्यापारी , प्रत्येकावर यांची दहशद आहे. यांच्या घराबाहेर कधीही गेलात तर तुम्हाला १००-१५० तरुण पोरांचे आणि गुन्हेगारांचे टोळके दिसेल जे की नगर शहरात "किंग्स" या ग्रुप नावाने फिरत असते.
परिवारात काही नगरसेवक, झेडपी सदस्य आणि इतर राजकीय पदे, प्रत्येकावर दिगभर गुन्हे दाखल आहेत. कर्डीले-कोतकर-जगताप या तिन्ही गुंड परिवारांवर खून, धमकावणे, खंडणी, हाणामारी, विनयभंग, प्रतिस्पर्धी उमेदवारांवर हल्ले, पोलिसांना शिवीगाळ, अनेक अवैध धंदे असे कित्येक गुन्हे कित्येक वर्षांपासून दाखल झालेही आणि त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झालीही. नगरचे सिंघम एसपी श्री. कृष्ण प्रकाश यांनी काही काळ या गुंडाच्या मुसक्या आवळल्या होत्या परंतु त्यांच्या बदलीनंतर परत या गुंडानी वर तोंड काढले.
नगरमधून चहूबाजूला जाणाऱ्या महामार्गांवर या कर्डीले-कोतकर-जगताप या गुंडांची हॉटेल्स आणि इतर धंदे आहेत आणि येथूनच त्यांची सर्वत्र दहशत सुरू असते. सर्वसामान्य नागरिक त्यांचा विषय आला की शक्यतो न बोललेच बरं म्हणून सोडून देतो.
आ. अरुण जगताप, आ. शिवाजी कर्डीले आणि भानुदास कोतकर ही व्याही मंडळी गेले ३-४ दशकापासून नगरचे कुप्रसिद्ध गुंड आहेत, आधी एकमेकांविरोधात भांडायचे आता एकमेकांचे नातेवाईक झाल्यामुळे एकत्रित गुंडागर्दी चालवतात. प्रत्येकाचे पुत्र किमान डजनभर गुन्हे अंगावर घेऊन राजकारणात वावरत आहेत. कोतकर चे तर तिनही पुत्र खुनाच्या गुन्ह्याखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. जामिनावर ते कधीही बाहेर येतील. एकाच घरात असलेले तीन आमदार, महापौर, नगरसेवक, झेड पी सदस्य अशा अनेक पदांमुळे ते सत्तेचा वापर करून दबावतंत्र वापरून प्रत्येकवेळेस व्यवस्थित सुटतात.
काही जण भाजपमध्ये, काही काँग्रेसमध्ये, काहीजण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर काही इतर पक्षात मग यांच्याविरोधात बोलणार कोण?
परंतु आज बोलण्याची वेळ आली आहे, कारण काल माझ्या परिचयाच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील दोन कार्यकर्त्यांची हत्या या कर्डीले-कोतकर-जगताप यांच्या गुंडानी केली. उद्या हा प्रसंग आपल्या कोणाच्याही परिवारावर येऊ शकतो. मोघलाई माजलेली नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आणि डॉ. आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानात राहतो. बिहार आणि उत्तरप्रदेशला नावे ठेवणारे आपण आपल्या महाराष्ट्रातील "अहमदनगर" मात्र विसरतो. उद्या स्वतःच्या बहिणीची छेडछाड जरी या गुंडांच्या कार्यकर्त्यांनी केली तरी नगरमधला कोणताच व्यक्ती यांच्याविरोधात काहीही करू शकत नाही. लोक जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकासमोर त्यांच्याच कार्यालयाची तोडफोड करू शकतात, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्यायासाठी जायचे कोणाकडे ?
हा लेख लिहताना माझी बायको म्हणाली की तुमचे नाव कुठेही टाकू नका, नाहीतर हे तुम्हालाही मारायला पोरं पाठवतील.. तिला म्हटलं आता वयाशी पन्नाशी ओलांडली आहे, मधुमेहाने त्रस्त आहे. मधुमेहाने मरण्यापेक्षा न्यायासाठी संघर्ष करून मरेल.
चला, आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, हा मेसेज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याला आणि मुख्यमंत्रांपर्यंत पोहोचवूया.
आता आपली जबाबदारी आहे कि या लोकशाहीत अशा गुंडांना कडक शासन झाले पाहिजे . अशा गुंडाची पाळेमुळे नष्ट केले पाहिजेत.
जयहिंद !! जय महाराष्ट्र !!!

- पांडुरंग बोरुडे (अहमदनगर)

चर्चा ह्या प्रश्नांवर करा.... सलमानचा पीआर म्हणून हा धागा वापरला जात आहे. सलमान आहे म्हणून हा धागा काढला आहे. इथे भारतात तीन तीन बलात्कार प्रकरणे गाजत आहेत.

जेव्हा तसे होईल तेव्हा मी स्वत: मायबोली सोडून निघून जाईल
<<
हे या हीरोने आधीही लिहिले आहे.
अजूनही हे टळले नाहियेत माबोवरून.
असो.
**
तजो,
सहमत.

<<<भारतात तीन तीन बलात्कार प्रकरणे गाजत आहेत.>>>
ते ठीक आहे हो. त्यासाठी तीन नवीन धागे उघडा.
या मायबोलीवर सिनेमा, बलात्कार असल्या धाग्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतात. कारण इथे सगळे सुशिक्षित, उच्चभ्रू, प्रतिष्ठित घराण्यातील लोक येतात. त्यामुळे असल्या विषयांवर तावातावाने चर्चा करणे, एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे, इतरांची अक्कल काढणे असले करायला लोक इथे येतात. सिनेमा नटनट्या, क्रिकेट खेळाडू ही दैवते. त्यांच्या बद्दल खरे खोटे काहीहि लिहीले तरी लोक लगेच "चर्चा" करायला उभे.

त्यातून भारतीय लोक म्हणजे लै धम्माल, कायदा मोडणे हा मुख्य व्यवसाय. पैसे खाणे हा मुख्य मार्ग उपजीविकेचा. मग काय, भानगडीच भानगडीच. धाग्यामागून धागे!

ज्यांना समाजसेवा, लष्कर, विज्ञान अथवा अध्यात्म यावर गंभीरपणे चर्चा करायची आहे ते मायबोलीवर क्वचितच येतात. आले तरी एक दोन प्रतिसादानंतर पुनः एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढणे, इतरांची अक्कल काढणे असले प्रकार सुरू होऊन धागा नाहीसा होतो.

अशी ही मायबोली! इथे असेच चालायचे!

सिनेमा नटनट्या, क्रिकेट खेळाडू ही दैवते. त्यांच्या बद्दल खरे खोटे काहीहि लिहीले तरी लोक लगेच "चर्चा" करायला उभे.
>>>>

दगडाचा देव मानण्यापेक्षा माणसातला देव मानणे केव्हाही चांगले हे माझे वैयक्तिक मत.
बाकी मला नाही वाटत ज्याच्यावर चर्चा होते तो देव असतो. अश्याने शाहरूखला देवेंद्र किंवा महादेव बोलायला हवे.
माझ्यामते क्रिकेट आणि सिनेमा हे आम्हा भारतीयांचे दोन छंद आहेत. त्यानिमित्ताने त्या संबंधित क्षेत्रातील लोकांची चर्चा होते. तर या देशात मूळ क्रेझ व्यक्तीची नसून खरे तर क्रिकेट या खेळाची आणि चित्रपट या कलेची आहे Happy

आणि हो, छंद हे तुमच्या आयुष्याला अर्थ देतात, का जगायचे हे शिकवतात असे काहीसे पुलं म्हणून गेलेत. कोणीतरी कन्फर्म करा. व्हॉटसपवर वाचलेय.

Pages