मायबोलीवर कोणते सल्ले मागावेत, कोणते मागू नयेत?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 April, 2018 - 17:00

मायबोलीवर "मदत हवी आहे", "माहिती हवी आहे", "कोणाशी तरी बोलायचे आहे" ईत्यादी विभागाअंतर्गत बरेच सल्ले मागितले जातात.
अगदी रुमाल कुठला घ्यायचा अश्या फुटकळ वस्तूपासून फ्रिज कसा घ्यावा यावर सल्ला मागितला जातो.
मोबाईल तर जणू सल्ल्याशिवाय घेताच येत नाही. लोकं गर्लफ्रेंड निवडताना ईतका विचार करत नसतील तितका मोबाईल घेताना चोखंदळपणा दाखवतात.
घरात ऊंदीर शिरला, हाकलू कसा? कारमध्ये डास घुसले, मारू कसे?
त्यात विवाहीत लोकं म्हटली की समस्यांचे भंडार असते.
बायकोशी पटत नाही, नवरयाचे बाहेर लफडे आहे, नणंद-सासू जोडगोळी त्रास देते अश्या वैवाहीक समस्या तर दर दुसरया घरात नांदत असतात.
लग्न करताना त्यावर खर्च किती करावा ते हनीमूनला कुठे जावे यासाठी ईथे सल्ला मागितला जातो.
मुले झाल्यावर तर धमालच धमाल. मुलाला नावे सुचवा पासून सुरुवात होते ते त्याची मुंज कधी करावी, शाळेत कुठल्या टाकावे, त्याला सुट्टीत चित्रपट कुठले दाखवावेत, त्याला डब्याला काय द्यावे, ते त्याला बारीक सारीक गोष्टीत शिस्त कशी लावावी याचे एकूण एक सल्ले ईथे मागितले जातात.
जे मुलांबाबत तेच पाळीव प्राण्यांबाबतही. मागे कुत्र्याला नाव सुचवा असाही एक शतकी धागा ईथे येऊन गेल्याचे आठवते.
बरं बॅचलर लोकंही आपले प्रेमप्रकरण ते व्यसनांबद्दल ईथे सल्ले मागतात.
येत्या विकेण्डला कुठल्या पिक्चरला जावे असा सहज सल्ला मागितल्यासारखे लोकं पैसे कुठे गुंतवावे याचा सल्ला मागतात, धंदा कोणता सुरू करावा याचा सल्ला मागतात, त्या धंद्याला नाव सुचवा याचाही सल्ला ईथेच मागतात.
एखादा माणूस सर्दी खोकला ताप जुलाब याने हैराण असतो. ईथे सल्ला मागतो काय करू? पहिलाच सल्ला मिळतो डॉक्टरकडे जा..
ते ऐकून तो जातोही. तरी याचा पत्त्याच नसलेले लोकं आपल्या आजीबाईंच्या बटव्यातील सल्ले देत धाग्याची शंभरी करतात.
तो मात्र रात्री डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर बेडवर पडल्यापडल्या सारे सल्ले वाचत आपले मनोरंजन करतो.

येनीवेज, जुन्या जाणत्या मायबोलीकरांना कश्याला हवीत ईतकी उदाहरणे ..

तर धाग्याचा विषय आहे,

1) मायबोलीवर (वा तत्सम सोशलसाईटवर) कोणत्या प्रकारचे सल्ले मागावेत? कोणत्या प्रकारचे मागू नयेत?

2) तुम्ही स्वत: मायबोलीवर आजवर कुठल्या प्रकारचे सल्ले मागितले आहेत, आणि ईथे मिळालेल्या सल्ल्यांचा आणि माहितीचा तुम्हाला प्रत्यक्षात कितपत फायदा झाला आहे?

3) ईथे एखाद्याला सल्ला देताना तुम्ही कितपत सिरीअस असता? काय विचार करून सल्ला देता?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे धागा Proud

काही लोक्स सल्ले मागत नाहीत फक्त खडा टाकून गम्मत बघतात. Happy

तो मात्र रात्री डॉक्टरांकडे जाऊन आल्यावर बेडवर पडल्यापडल्या सारे सल्ले वाचत आपले मनोरंजन करतो.>>>हेच्तेते

आणखी एक ओबसर्वशन -
स्वतःची स्टोरी मित्र/मैत्रीण च्या नावावर सांगून सल्ले मागणे.☺️
माझा एक मित्र आहे त्याचे असे असे आहे तसे तसे आहे.. अशी सुरुवात करतात.

1) मायबोलीवर (वा तत्सम सोशलसाईटवर) कोणत्या प्रकारचे सल्ले मागावेत? कोणत्या प्रकारचे मागू नयेत?

>>> कोणत्याही प्रकारचे सल्ले मागू नयेत.

2) तुम्ही स्वत: मायबोलीवर आजवर कुठल्या प्रकारचे सल्ले मागितले आहेत, आणि ईथे मिळालेल्या सल्ल्यांचा आणि माहितीचा तुम्हाला प्रत्यक्षात कितपत फायदा झाला आहे?>>>>

मी तरी आजवर कोणताही सल्ला मागितलेला नाही. सल्ला मागितलेला नसला तरी सल्ले मिळाले खूप आहेत. त्यांचा काही उपयोग मात्र झाला नाही कारण ते मागितलेलेही नव्हते व नकोही होते.

3) ईथे एखाद्याला सल्ला देताना तुम्ही कितपत सिरीअस असता? काय विचार करून सल्ला देता?

>>>>

इथे सल्ला मागणार्‍यांचेच मला नवल वाटते. तेही, खास धागा काढून वैद्यकीय, खरेदीविषयक वगैरे सल्ले काढणार्‍यांचे फारच नवल वाटते.

====

असे. आता फार पूर्वी सगळे ठीक असताना इथल्या एका डॉक्टरांनी एका वाहत्या पानावर अ‍ॅसिडिटीचा विषय काढल्यावर त्यांच्याशी चार दोन प्रतिसादांची देवाणघेवाण केली (बिल भरायचा प्रश्न नव्हताच) त्यावरून आता 'हल्लाबोल'व्हायची वाट पाहत आहे. त्यांच्या सोबत्यांच्या मते मी फार मोठे व गंभीर वैद्यकीय सल्ले त्यांच्याकडून घेऊन, ते आचरणात आणून स्वतःची अ‍ॅसिडिटी घालवली व नंतर स्वार्थीपणे ते उपकार झाल्याचे नाकारले आणि कृतघ्नपणाचे कायमस्वरुपी उदाहरण मायबोलीवर स्थापित केले.

मायबोलीवर कोणते सल्ले मागावेत, कोणते मागू नयेत?>>> ते तुमचे व मायबोलीचे नाते कसे आहे यावर अवलंबून आहे. तसेच तुमची त्यावेळची मनस्थिती. तुमचा पिंड,समस्येच तुमच्यासाठी असलेले गांभीर्य असे इतरही अनेक पैलू आहेत. सल्ला देणे न देणे हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे. तसेच तो अमलात आणणे न आणणे हे त्या व्यक्तिवर अवलंबून आहे. मायबोली संकेतस्थळाची हानी होणार नाही एवढे पहावे म्हणजे झाले.

जर सासरी विरोध होत असेल आणि 'आप' इतका लव्हेबल वाटत असेल की सतराशे साठ प्रतिसादांवर गेले कैक महिने प्रतिवाद करण्याची हिम्मत मनात आहे तर घटस्फोट घेऊन मोकळ्या व्हा की, असे म्हणण्याचे 'फक्त' मनात येते.

फक्त मनात आलेलं टाइप होऊन सेव्ह होण्याइतकं विकसित तंत्रज्ञान मायबोलीवर आलंय का माहीत नाही.
वर जे लिहिलंय त्याला सल्ला म्हणता येईल का हे ज्याचं त्याने ठरवावं.

मी एकदा असाच एक सल्ला माझ्या येथील मित्रांना मागितला होता, मैत्रिणीसाठी कानटोपी घेताना कलर कुठला निवडावा. Proud त्यावेळी ज्यांनी मदत केली होती त्या सगळ्यांचे ह्या धाग्यावर जाहीर आभार मानतो..

ऐकावे जणांचे करावे मनाचे

आपला वेळ, ईंटरनेट खर्ची करुन विचारायचाय एखाद्याला सला, किंवा तसेच द्यायचाय एखाद्याला सल्ला काय फरक पडतो.

तसेही बरेचदा ईकडे ज्या अश्या चर्चा होतात त्यातुन बरेचदा काही चांगल्या गोष्टी कळतात , तसेच मुद्दाम टर खेचायला सुद्धा लोक येतात ईकडे.

मस्त टाईमपास होतो.

बहुतांश भारतिय कुणा ना कुणाच्या सल्ल्यावरच विसंबुन असतात , ऊगाच नाही भोंदु बाबांचे दुकान ईतके चालतं.

माबो बद्दल बोलायचे तर, मला वाटते की काही लोक ऊगा टाईमपास करण्यासाठी , तर काही आपली होणारी घुसमट आपण ओळखीच्या लोकांत बोलु शकत नाही म्हणुन ईथे सल्ले विचारत असावेत असे मला वाटते.

पण मला व्यक्तीशः दक्षिणा, देवकीताई, साधना, मि अनु आणि अ‍ॅमी यांचे प्रतिसाद आवडतात.

यातल्या काही, समोरच्याने वेळ घालविण्यासाठी धागा काढला असण्याची शक्यता ९९% जरी असेल तरी ऊरलेल्या १% चे चान्सेस लक्षात घेवुन अगदी मनापासुन प्रतिसाद देतात असे वाटते तर अ‍ॅमी यांचे शब्द जरी थोडे तिखट वाटतील कानाला असे असले तरी प्रॅक्टीकल वाटतात

Uhoh
पाफा, क्या आपको लगता हैं, मैं बिना सोचे समझें लिखता हूँ ? Happy
काय भरवसा आणखी पाच दहा वर्षांनी एखादा जपून ठेवलेला स्क्रिनशॉट तुम्ही मंडळी येथे टाकायचात आणि म्हणायचात, "सल्ला दिलता पण आभार मानलंच नै.. कृतघ्न मेला, आनंद !" म्हणून आत्ताच आभार मानून घेतो... Proud

जोक्स अपार्ट,
येथील अनुभवी जेष्ठ मंडळींनी दिलेले काही सल्ले खुपच मोलाचे आणि उपयोगी ठरतात. मी कधी कशावर मागितला नाही पण इतरांचे बाफ वाचून बरंच काही चांगलं शिकायला मिळालं आहे.. Happy

वर VB यांनी म्हटल्याप्रमाणे दक्षिणाताई, साधनाताई, अनुजी तसेच कारवीताई आणि ऋन्मेषचे सुद्धा महत्वाच्या विषयांवर दिलेले मुद्देसूद सल्ले बहुमोल असतात. आणखीही बरेचजणांचे असतील पण माझ्या पाहण्यात तितकेसे नाहीत.

व्हीबी आणि आनंद, माझा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद!!

सर्वात मोठा डायलॉग हृतिक ने जिनामिदो मध्ये दिलेला आहे. "मतलब तुझे किसी और के मुंह से सुनना था की तुझे ये शादी नही करनी चाहीये" Happy
मागितलेले सल्ले हे बरेच वेळा कौल असतात. मनाचा निर्णय अलरेडी झालेला असतो.एका बाजूला टपकन फूल पडायचा अवकाश असतो.हे टपकन फूल वाला कौल एका अनोळखी मंचावर तटस्थ मंच समजून मागितला जातो.
खरं तर व्यक्त होणार्‍या कोणाबद्दलही 'परिस्थिती काय, इश्युचे गांभिर्य काय आणि हा शाणा इंटरनेट वर सल्ले काय मागतोय' असे कन्क्ल्युड करुन उपयोग नाही.कुठे कसे व्यक्त व्हावे हा त्याचा चॉइस आहे. व्हॉटेव्हर हेल्प्स.अगदी त्याने इंटरनेट वर "हार्ट अ‍ॅटॅक येतोय असं वाटतंय, डॉ खूप लांब आहे, विठ्ठल नाम जप करु का" असं विचारलं तरी Happy .त्याचा निर्णय ही त्याची जबाबदारी आहे.त्याने तो मागितलाय.तळ्यात की मळ्यात हे पाऊल त्याचे तो टाकणार आहे. आपण सपोर्ट करु शकतो.बाकी प्रत्येक जण आपापला क्रॉस वाहत आपली लढाई लढत असतोच.
(ऑ, इतना सन्नाटा क्यूं है भाई? कुठे गेले सगळे? घोरतायत का माझी वाक्यं टिपायला सोनेरी डायरी आणि हिरेजडीत पेन आणायला स्टेशनरीत गेलेत?)

विशिष्ट डॉक्टर कडे जाणारे लोक जेव्हा नेटवर इतरांकडून फुकटचा सल्ला मागतात तेव्हा त्या लोकांची भरपूर खिल्लीच उडवायची असते Wink

VB, उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद Happy

अॅमी यांचे शब्द जरी थोडे तिखट वाटतील कानाला असे असले तरी प्रॅक्टीकल वाटतात >> हा हा Lol हो शब्द तिखट असतात खरे माझे. राग आला कि बोलून टाकते. आणि बऱ्याचदा त्याबद्दल मला पश्चातापदेखील होत नाही कारण I really mean those words/ thoughts at that time. क्वचित कधीतरी वाटतं कि अरे आपण हेच थोड्या सौम्य शब्दात सांगू शकलो असतो (जसे परवा तुझ्या धाग्यावर झाले) Happy

बऱ्याचदा त्याबद्दल मला पश्चातापदेखील होत नाही कारण I really mean those words/ thoughts at that time. क्वचित कधीतरी वाटतं कि अरे आपण हेच थोड्या सौम्य शब्दात सांगू शकलो असतो (जसे परवा तुझ्या धाग्यावर झाले) >>> अन मला हेच आवडले, कारण मला त्यामुळे कळले की मी फक्त एकाच बाजुने विचार करतीये.

शेवटी ह्या आभासी जगात, एखाद्यावर किती विश्वास ठेवायचा , कुणाच्या बोलण्याला कितपत महत्त्व द्यायचे ते आपल्याच हातात आहे.

>> 1) मायबोलीवर (वा तत्सम सोशलसाईटवर) कोणत्या प्रकारचे सल्ले मागावेत? कोणत्या प्रकारचे मागू नयेत?

माझ्या मते मायबोलीच्या धोरणात बसतील असे कोणत्याही प्रकारचे सल्ले मागायला हरकत नाही. ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. अर्थात कोणत्याही सोशल साईटवर सल्ले मागताना जी काळजी घ्यायला हवी (आपली खाजगी माहिती, पत्ता, फोन, बँक डीटेल्स इत्यादी जाहीर न करणे) ती उघड होईल असे सल्ले मागू नयेत इतकेच.

>> 2) तुम्ही स्वत: मायबोलीवर आजवर कुठल्या प्रकारचे सल्ले मागितले आहेत, आणि ईथे मिळालेल्या सल्ल्यांचा आणि माहितीचा तुम्हाला प्रत्यक्षात कितपत फायदा झाला आहे?

इंटरनेट आणि कॉफी संबंधी माहिती मागितली होती त्याचा नक्कीच फायदा झाला.

>> 3) ईथे एखाद्याला सल्ला देताना तुम्ही कितपत सिरीअस असता? काय विचार करून सल्ला देता?

अर्थात मी सिरीयस असतो सल्ले देताना. स्वत: अनुभवले असेल किंवा अगदी खात्रीने माहिती असेल तरच सल्ला देतो. (नसल्यास तसा उल्लेख करतो)

एका सिनेमातला प्रसंग आठवला.

ती: क्या मै तुमसे एक सवाल पुछूं?

तो: तुम बंबईवाले सवाल पुछनेसे पहले भी सवाल पुछते हो?

====================================================================================================

बाकी, पहिल्याने मागितलेल्या धाग्यावर दुसर्‍याने दिलेला सल्ला (?) तिसराच इतका चांगला ध्यानात ठेवतो की, तीन वर्षांनीही धागा उचकटून सतराशे साठ प्रतिसादांतून नेमका प्रतिसाद लिंंकने दाखवतो हे पाहून टचकन डोळ्यात पाणी आले.

डोळ्यात आलेले पानी बादलीत भरून ठेवा पानीकपात आहे

तुमच्या डोळ्यात सतत पानी येऊन घरातली टाकी भरून रहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

{{{ करेक्शन - न मागता दिलेला सल्ला आहे तो.
Submitted by भरत. on 11 April, 2018 - 11:39 }}}

{{{ डोळ्यात आलेले पानी बादलीत भरून ठेवा पानीकपात आहे

तुमच्या डोळ्यात सतत पानी येऊन घरातली टाकी भरून रहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना

Submitted by दत्तू on 11 April, 2018 - 12:03 }}}

घ्या मलाही न मागता सल्ला मिळाला. बाय द वे माझ्या डोळ्यात आलेलं पाणी बाहेर सांडू देत नाही मी. आतल्या आत जिरवतो.

अरे काय रे ऋण्मेस....कोणते सल्ले मागावेत हा सुद्धा सल्ला इथेच मागितलास की राव.. Wink
माझ्या मते, कोणतेही सल्ले कोणीही मागावेत कोणीही द्यावेत, आवडले तर घ्यावेत नाहीतर सोडून द्यावे. हाकानाका.
लय विचारमंथनात्मक धागा काढल्याबद्द्ल धागाकर्त्याचे आभार.. लोकांच्या आठवणींना उजाळा मिळाला.. Wink

क्लिअरली दिसतेय ऍसिडिटी कमी करायच्या सल्ल्याचा उपयोग झाला नाहीये,
प्रतिसादातील आम्लता तशीच आहे Wink

पाहिल्याच्या धाग्यावरचा दुसऱ्याचा सल्ला तिसर्याने लक्षात ठेवल्याने चवथ्याला पोटदुखी का व्हावी?
असा स्त्री id ला घटस्फोटाचा सल्ला चवथ्याने द्यावा, 3 वर्षांनी तो ही रीकॉल करून देऊ , हाय काय अन नाय काय.

Pages