तुझे नाव घेतो कधी

Submitted by माउ on 5 April, 2018 - 23:45

तुझे नाव घेतो कधी, मोहरते चांदणे..
तुझा भास होतो कधी, दरवळते चांदणे..

मी कशास पाठवू निरोप पत्र नि फुले?
माझेच ना तुझ्यावरी ओघळते चांदणे..

आठवून सांग ना.. स्पर्श भासतो तुला?
बघ तरी कसे मिठीत सळसळते चांदणे..!

चंद्र सांडतो जरा ..शुभ्र चांदणीचुरा..
ठेच लागते तुझी, अडखळते चांदणे..

मालवून काजवे.. हजार धुंदले दिवे..
उगाच रात्र जागते..हळहळते चांदणे..!

उजाडल्या धुक्यासवे..नवीन स्वप्न पालवे
क्षणात ऊन होउनी विरघळते चांदणे..

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर,मोहक खयाल!
लिहीत रहा,सरावाने ओळी इतक्या सहज याव्या की सुचताना वृत्तातच सुचाव्या!
शुभेच्छा!