सलमान आणि काळवीट!

Submitted by मी_किशोरी on 5 April, 2018 - 05:41

खरंतर, चॅनेल्सवरचा या बातमीवरचा भडीमार ऐकून मी आपले मायबोलीकर आतापर्यंत मैदानात उतरले असतील, या अपेक्षेने वाचायला आले होते. पण मायबोलीकरांचा शाहरुख जास्त आवडता असल्यामुळे सलमानसाठी वेळ मिळाला नसावा बहुतेक. मग आपणच काढावा म्हंटल धागा.

येऊद्या तुमची मते इथे..... सलमान, काळवीट आणि इतर.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आलाय कि धागा, 'चालू घडामोडी ' या ग्रुपमध्ये...

बाकी,5 वर्षे शिक्षा Sad
म्हणजे आता बिग बॉस च सूत्रसंचालन सलमान नाही का करू शकणार?? Sad

पण मायबोलीकरांचा शाहरुख जास्त आवडता असल्यामुळे सलमानसाठी वेळ मिळाला नसावा बहुतेक. मग आपणच काढावा म्हंटल धागा.
>>>>>
बस्स काय, काढलाय ना धागा.. चालू घडामोडी ग्रूप जॉईन करा.
https://www.maayboli.com/node/65736

आणि हो, हा धागाही राहू द्या. शाहरूखचे नाव घेतले आहे आपण यात Happy

चालू घडामोडी तर दिसतंय मला, पण त्यामध्ये हा धागा दिसत नाहीय. बहुतेक मी त्या ग्रुपची सदस्य नसल्यामुळे.
शोधायला लागेल आता तिकडे सदस्य कसे व्हायचे.

ऋन्मेऽऽष, तुम्ही दिलेल्या लिंकवरून मला तुमचा धागा बघता येतो, पण नवीन लेखन मध्ये दिसत नाही.

मी मागेच ही शंका व्यक्त केलेली, असे डबल धागे निघायची. त्यात काही जणांना आयडी ब्लॉक करायची सोयही हवी होती, त्यात तर असे डबल धाग्यांचे प्रमाण वाढले असते.
येनीवेज, काही चर्चा होत असेल तर उत्तम, मग ती कुठेही होऊ द्या ..