प्रेमपरीक्षा- ई-बुक

Submitted by विद्या भुतकर on 3 April, 2018 - 09:38

'हजारो ख्वाहिशें ऐसी......'. माणसाच्या आयुष्यात अनेक अधुरी स्वप्नं, आकांक्षा असतात, काही पूर्ण होतात तर काही अस्तित्वात आहेत हेही आपल्याला माहित नसतं. मागच्या वर्षी मी 'प्रेमपरीक्षा' ही पत्रमालिका लिहायला सुरुवात केली होती, 'न लिहिलेली पत्रे' या फेसबुक पेजवर. तेव्हा फक्त एकच इच्छा होती, कुणाला तरी पत्रं लिहायची. पण ती इच्छा हळूहळू एक कुतूहल आणि मग एक आव्हान बनली. कारण पत्रातून एक आयुष्य उभं करायचं. त्या पात्राच्या अवतीभवती होणाऱ्या सर्व गोष्टी पत्रातूनच व्यक्त करायच्या आणि तरीही कथानक कुठेही थांबू द्यायचं नाही, हे आव्हान. जेव्हा पत्रमालिका संपली तेव्हा एक सुंदर गोष्ट बनली होती.

तरीही हे कुणाला पुस्तक म्हणून वाचायची इच्छा असेल असं कधी वाटलं नव्हतं. जेव्हा मला विचारलं पुस्तकाबद्दल मी अजूनही साशंक होते, 'हो' म्हणाले तरीही. पण ज्या दिवशी या पुस्तकाचं कव्हर मला दिसलं, त्यावर कथेचं नाव आणि खाली माझं, माझ्या लक्षात आलं की मनात कुठेतरी ही इच्छाही होतीच. आपलं एखादं पुस्तक प्रकाशित करण्याची. आणि ती किती तीव्र इच्छा होती हे ते कव्हर पाहिल्यावर जाणवलं. आज हे पुस्तक सादर करताना खूप आनंद होत आहे.
"प्रेमपरीक्षा" !!

मायबोलीच्या सर्व वाचकांचे खूप खूप आभार, मला आजवर इतकं प्रेम दिल्याबद्दल. तुम्हांला आवडेल अशी अपेक्षा.

ebook page.jpg

धन्यवाद,
विद्या भुतकर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@विद्या भुतकर,
मायबोलीच्या धोरणानुसार मायबोलीबाहेरच्या वेबसाईटवरची जाहिरात वजा लिंक इथे देता येणार नाही. त्यामुळे ती काढून टाकली आहे. तुम्ही हवे तर मायबोलीच्या जाहिरात विभागात ही जाहिरात म्हणून देऊ शकतात. मायबोलीकरांना तिथे विनामूल्य जाहिरात करता येते. https://jahirati.maayboli.com/

सर्वांचे आभार.

वेमा,
मला माहित नव्हते, क्शमस्व.
जाहिरात करण्यापेक्षा आनन्द जास्त होता. तो राहिला आहे इथे इत्के पुरेसे आहे. Happy धन्यवाद.

अभिनंदन.
कव्हर डिझाईन पण क्युट आहे.

Pages