सोनी कॅमकॉर्डर चे पुण्यात दुरुस्ती केन्द्र?

Submitted by यक्ष on 30 March, 2018 - 06:51

ह्यापुर्वीही माझा सोनी DCR-SR82 Handycam झोपला होता. नित्याचाच स्क्रिन फ्लिकरिंग चा त्रास. मागे (६-७ वर्षापूर्वी) सुमारे २०००/- रु. लावून दुरुस्तकरून घेतला होता.

तोच त्रास पुन्हा सुरू झालाय. मध्ये सुमारे १ ते २ वर्षे अडगळीत पडला होता. मोबाइलच्या HD recording च्या उपलब्धतेने कॅमकॉर्डर तसा विस्मरणात चाललाय!

सोनी केअर सेंटरला फोन करण्याचे अवलक्षण केले. त्या ललनेने माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली तर नाहीच पण एक व्यावसयिक कोरड्या आवाजात माझी पूर्ण माहिती काढून घेतली व मला सुनावले की ती आता मला कुठल्याशा सिस्टीम वर ट्रान्स्फर करतेय. तिकडे (IVR) गेल्यावर मी नेटाने सर्व (माझ्या दॄष्टीकोणातून योग्य) असे पर्याय दाबल्यावर एका अनंत शांततेत अवतरल्यासारखे वाटले....पूर्ण शांतता....संपूर्ण शांतता......फक्त माझ्या श्वसोछ्वासाचा अवज ऐकु येत होता....मग हतबलतेने प्रयत्न सोडून दिले.

समोर मी मोठ्या हौसेने अमेरिकेतून घेतलेल्या कॅमकॉर्डर चे अर्धचेतन शरीर पडले आहे...

कुणी सर्विस सेंटरचा नंबर देता का सर्विस सेंटरचा नंबर?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी राहुलनगर कर्वे पुतळा कोथरुड जवळ सोनी सर्विस सेंटर आहे तिथे टाकला होता. सोनीची दुरुस्ती महाग असते.

टाकून द्या ते अर्धचेतन शरीर आणि फोन वरून व्हीडीओ शूट करत जा. इ वेस्ट नियमांनुसार डिस्पोझ ऑफ करा मात्र.

अगं आई गं! Rofl
@ टाकून द्या ते अर्धचेतन शरीर...
देवा!

अन भारतात ई वेस्ट नियम??

अहो, मी बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलसाठी अव्वाच्या सव्वा पैसे भरतो, बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल योग्य प्रकारे व्हावी म्हणून तळमळतो, अन माझ्या मुन्शीपाल्टीचा ऑथराईज्ड डिस्पोजल कंत्राटदार माझ्याकडून कचरा नेऊन जनरल खड्ड्यात पुरतो हो.. Angry जौद्या.

हे जरा सेंट्रल बोर्डाचे पेपर फुटल्यावरच्या पत्रकार परिषदेत जा वडे कर (केंद्रिय "शिक्शा मंत्री") बंगालातल्या दंग्यांबद्दल बरळत होते, तसं असंबद्ध झालं; पण असो.

इ वेस्ट नियमांनुसार डिस्पोझ ऑफ करा मात्र.>>
अन भारतात ई वेस्ट नियम??>>
काय आरारा, तुम्हाला कसे माहिती नाही ईवेस्ट, ईईईईईईई करुन डस्ट्बिनच झाकण उघडा त्यात टाका, आणि दुसर्‍यादिवशी पुन्हा ईईईईईई करत ते डस्ट्बिन घंटा गाडीत ओतुन टाका.. हाकानाका. Wink

काही वस्तू या म्युझियम मध्ये ठेवण्यासाठी असतात.
आम्ही हौशेने जर्मनीतून फिल्म एस एल आर घेतला होता अनेक वर्षापूर्वी.त्यानंतर १ वर्षाने मोबाईल कॅमेरा आणि डिजीटल कॅमेरा चे पीक फुटले.
याची लेन्स पण घेतली होती.
फिल्म जवळ मिळेना झाल्या.शिवाय त्याचा क्लिक चा इश्यु यायला लागला.विकायला प्रसिद्ध प्रसिद्ध फोटोग्राफर पोर्टल वर अनेक जाहीराती देऊनही त्या सुग्रीवाच्या बायकोला कोणी वाली मिळाला नाही.फायनली कँपात नवा डिजीटल कॅमेरा घेताना २००० की काहीतरी मध्ये बायबॅक झाला.आता आमच्याकडे कधीकाळी सुबत्तेचं लक्षण असलेला मोठ्या स्क्रिन चा सी आर टी आहे. तो कोणी घेतला की मग आम्ही एल ए डी टिव्ही घेऊ.आमच्या एकंदर वसूलीभाई वृत्तीमुळे तो आम्ही ८-९ वर्षं टिकवायचा आग्रह धरु.तोवर हवेत बोटं फिरवून हवेतच होलोग्राम म्हणून बघायचे अदृष्य टिव्ही ट्रेंड मध्ये असतील आणि कोणीतरी ५०० रु बाय बॅक मध्ये आमचा एल इ डी टिव्ही विकत घेईल.

मी राहुलनगर कर्वे पुतळा कोथरुड जवळ सोनी सर्विस सेंटर आहे तिथे टाकला होता. > आता तिथे नाहीये ते बहुतेक.

एक सोनी सेंटर तांदळे हाईट्स नावाच्या बिल्डिंगमध्ये आहे. लॉ कॉलेज रोडवरून सेनापती बापट रोडला वळतो त्या कॉर्नर वर. जर्मन बेकरी आहे तीच बिल्डिंग.

आमच्याकडे कधीकाळी सुबत्तेचं लक्षण असलेला मोठ्या स्क्रिन चा सी आर टी आहे. तो कोणी घेतला की मग आम्ही एल ए डी टिव्ही घेऊ.आमच्या एकंदर वसूलीभाई वृत्तीमुळे तो आम्ही ८-९ वर्षं टिकवायचा आग्रह धरु.तोवर हवेत बोटं फिरवून हवेतच होलोग्राम म्हणून बघायचे अदृष्य टिव्ही ट्रेंड मध्ये असतील आणि कोणीतरी ५०० रु बाय बॅक मध्ये आमचा एल इ डी टिव्ही विकत घेईल.
<<

यक्झाक्टली याच कारणासाठी मी सोनीबिनी क्किंवा i-डब्बा किंवा तत्सम प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक "ब्रँडेड" बाबींपासून दूर राहतो.

वर्ष दोन वर्षांत टेक्नॉलॉजी उड्या मारत पुढे जाते, अन घेतलेले डबडे पडून राहते.

उदा. आमच्या मित्राने ३२ इन्ची सोनी एलसीडी टीव्ही दीड लाखात घेतला, तेव्हा मी बेनक्यूचा ४२ इंची एलईडी ४० हजारात घेतला होता. आज त्या सोनीपेक्षा छान दिसणारा (म्हणजे पिक्चर क्वालिटी. कोणताही एलईडी इज बेटर दॅन एलसीडी) फडतूस स्पीडकॉन कंपनीचा ३२" एलईडी ११ हजारात मिळतो. अन त्यावर १२ प्रकारच्या अ‍ॅटॅचमेंट्स चालतात, सोनीवर पेन ड्राईव्ह/फोन लावला, तर अनेकदा रेकग्नाईजही होत नाही. मिराकास्ट दूरच.

तात्पर्य काय?

तर मोबाईल, टीव्ही असल्या वस्तू घेताना ब्रँडच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे फेकायला मला आ(पर)वडत नाही.

आरारा, टीसीएल या चायनीज (वावडं नसेल तर) कंपनीचे टीव्ही भारतात मिळतात का माहित नाही. असतील तर ४० ह्जार रुपयात ४के UHD ५५ इंची+ ब्राईट आणि डार्क एरिया कॉन्ट्रास्ट विथ स्मार्ट टीव्ही इनबिल्ट ज्यावर यच्चयावत स्ट्रीमिंग अ‍ॅप्स चालतील असा टीव्ही मिळतो. पेनड्राईव्हही चालतो. मिराकास्ट हा प्रकार मला अजिबात आवडत नाही पण तो ही चालतो.
टीव्ही/ फोन ही कमोडीटी आहे, कुठल्याही फीचरला अजिबात कॉम्प्रोमाईज न करता स्वस्त पर्याय निवडावा. 2-4 वर्षे चालला की बदलावासा वाटतोच.

तर मोबाईल, टीव्ही असल्या वस्तू घेताना ब्रँडच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा पैसे फेकायला मला आ(पर)वडत नाही.>> +१
पण घेतानाच थोडा अ‍ॅडवान्स फिचर वाला घेतो, जेणे करुन लगेच आउट्डेट होनार नाही

प्रतिसादाबद्दल सगळ्यांन्ना मनःपूर्वक धन्यवाद!

त्याचे काय आहे की ह्या वस्तू उमेदीच्या काळात हौसेने घेतल्या होत्या. त्यामुळे 'भावनिक व्हॅल्यु' ज्यास्त!आपण सर्व समजू शकाल..

सर्वसमान्य चालिरितीप्रमाणे - माझी पहिली सायकल, पहिली लुना, पहिली 'प्रिया (हमारा बजाज!), पहिली हिरो होंडा, पहिल्या पगारात घेतेलेली आईची साडी व केनचा सोफा, व ह्या कॅमेर्‍याची पहिली (भारताबहेरची) जंगी खरेदी ह्याबद्दल जरा ज्यास्त ममत्व.

पुढे-पुढे खरेदी ही यांत्रिक झाली. बिग बझार मध्ये सुरुवातीच्या काळात 'हावरटा' सारखी अगदी अनावश्यक खरेदिही झाली. नंतर नंतर हळु-हळु ती झिंग ओसरली. त्यातला फोलपणा प्रखरपणे जाणवायला लागला. आताशा खरेदीविषयी प्रचंड विरक्ती आलीय. पण ह्या जुन्या आठवणींशी नाळ तोडतांन्ना कुठेतरी आंत तुटल्यासारखं वाटतं. वस्तु नुसती ठेवताही येत नाही आणी वापरताही येत नाही असे त्रांगडं होउन बसतं. मेन्टेन करणंही त्रासदायक.

नवीन वस्तू घेतांन्ना आता मात्र किती गरजेच्या आहेत ह्या निकषावर घासून घासून पार गुग्गूळ करून टाकतो!.आवश्यक तेवढ्याच आवश्यक आयुष्मानाच्या घेतो. (हो ई-वेस्ट च्या डिस्पोजलची योग्य काळजी घेतो. पुण्यात इले़क्ट्रोनिक वस्तूंच्या प्रदर्शनात बर्‍याच वेळा ई-वेस्ट च्या डिस्पोजल ची खास व्यवस्था असते, त्याचा फायदा घेतो!)

तर..सेनापती बापट रोडवरती स्थित सोनी सेंटर ला आज जातोय....पाहुया काय होते ते....आपल्या शुभेच्छांची आवश्यकता....!धन्यवाद!!

TCL चा tv भारतात मिळतो. माझ्याकडे आहे. एकदम मस्त अनुभव. फर्स्ट क्लास streaming होतं. हा tv आल्यापासून आम्ही cable काढून टाकलं आहे. Internet tv जिंदाबाद!