कुरियर

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 30 March, 2018 - 03:21

स्थळ-इस्लामपूर
दिनांक-१२-०२-२०१७

"हा मी इस्लामपूर कुरियर डेपो मधून बोलतोय,तुम्ही मिस.साठे ना ? हा तुमचं कुरियर आलंय तेवढं घेऊन जा....
हो स्टॅन्डजवळ आहे ऑफिस,हो आहे मी, या दिवसभरात"

"हो निघतीये मी,येता येता कुरियरपण घेऊन येईन,
हो मगाशी आलेला फोन मला कुरियरवल्याचा आणि तू जेवून घे हा,एकदा काम सुरु झालं कि भान राहत नाही तुला.
असूदेत,काळजी आहे म्हणून सांगतीये दहा वेळा.
हो मोपेड घेऊन जातीये..
आता मला कसं कळणार काय आहे कुरियर ते ? बघितल्यावर करते कि फोन.
बरं ठेवतीये मी आता आवरायचंय मलापण ....तू जेवून...ठेवलापण यान फोन"

"इथं सही करा,हो मुंबईचा पत्ता दिसतोय"
"मी तर नव्हतं मागवलं काही"
"काल दुपारी आलंय खरंतरं पण व्यापच इतका आहे कि तुम्हाला contact करायला उशीर झाला"
"ठीके"
"मॅडम मी ऑटो ची सोय करू का ?"
"हो प्लिज,हेवी दिसतंय हे खूपच"

"हां,तिथे त्या कपाटाशेजारी ठेवलं तरी चालेल ,एक मिनिट हा मी पाणी घेऊन येते"

"अरे ओव्हन आलंय !"
"माहितीये मला"
" म्हणजे ?"
"मीच बुक केलेलं...हवं होतं ना तुला ?"
"सांगायचं नाही होय मग ?”
"अगं आई सर्प्राईस सांगतात का ?"
"अरे पण मी घरात असतेच असं नाही,बाहेर गेले असले..."
"बरं आलंय ना आता घरी...आता कर तुझे सगळे पदार्थ.मी येतोच पुढच्या आठवड्यात खायला"

"हॅलो,आई काय ग..अडीच वाजलेत..आत्ता का फोन केलायस ? बरी आहेस ना ?"
"मी बरी आहे पण ते केक करायला temperature किती ठेवावं लागतं रे ?"
"अगं ए...ऑफिस आहे मला उद्या...आणि आत्ता काय केक करतीयेस तू उजाडल्यासारखं ?"
"अरे घरात सामान होतं सगळं आणि झोपपण नाही येते मग म्हणलं करून बघू...सांग ना तेवढंच राहिलंय बाकी सगळं तयार करून ठेवलंय मी"

"काय ग आई,झोपूदे ना मला...सकाळी उठायचंय लवकर.."
"ऐक जरा.."
"काय ऐकू आता,अशी दहा दहा मिनिटांनी फोन केल्यावर कसा झोपू मी..हॅलो...हॅलो आई...चिडली वाटत..हि आई पण ना"

"सुबोध घरात आहे कुणीतरी..."
"काय ? दारं बंद केलेलीस ना सगळी ? कितीवेळा सांगितलंय कि.."
"आज राहतिये का मी एकटी ? सगळं व्यवस्थित बंद केलेलं..तू म्हणालास म्ह्णून ओव्हन ठेवून झोपायला आले.कसलातरी आवाज येतोय "
"कसला आवाज ? शेजारी काकूंना फोन लाव,बोलवून घे कुणालातरी,नाहीतर मीच सोन्याला सांगतो तिथं यायला"
"नको कुणाला उठवत बसू...मला कळूदे नक्की काय होतंय ते..."
"काय होतंय ? कसला आवाज येतोय ? लाईट लावून बघ ना सगळीकडं"
"श्वास घेतंय कुणीतरी..खूप जोरात..मला काहीच कळत नाहीये...स्वयंपाकघरातून येतोय आवाज बहुतेक..."
"काय ?? काहीतरी confusion होतंय तुझं...तू जाऊन बघ आत...काही काय सांगतीयेस ?"
"वेड लागलंय का मला काहीही सांगायला ? आलीये स्वयंपाकघरात इथंच येतोय आवाज..."
"लाईट लावून बघ..'
"लाईट सुरुये,कुणी नाहीये इथं.."
"हा मग,काय कारण आहे घाबरायचं ?"
"अरे मूर्खां इथं कुणी नाहीये म्हणूनच भीती वाटतीये...आवाज येतोय कुठून ?"
"सुबोध..."
"हा बोल...हॅलो...आई...आई बोल ना...आई...हॅलो..."
"अरे भीती वाटतीये मला खूप...तो आवाज ओव्हन मधून येतोय... "
"ओव्हन...ओव्हन मधून ? अरे काय करतीयेस तू ? सोन्याचापण फोन नाही लागते..तू एक काम कर बाहेर जा घरातून...शेजारी काकूंना उठाव...तिथं..."
"हॅलो...हॅलो...आई...आई...ओरडू नको..काय झालं सांग मला...हॅलो आई..अगं रडतीयेस कशाला...काय झालंय ...हॅलो आई बोल कि...तू बाहेर आलीयेस का..."
"सुबो...त्या..त्या...ओव्हन मध्ये मुंडक आहे माणसाचं...सुबो....चक्क..चक्कर येतीये...हाल..हॅलो..सुबो..सुबोध..."
"आई तू बाहेर जा तिथून..मी सोन्याला उठवलंय तो येतोय तिकडं...तू तिथं नको थांबू...हॅलो..हॅलो आई ऐकतियेस का ? हॅलो...सोन्या येतोय...बेल वाजतीये बघ..सोन्या असेल दारं उघड...आई ऐकतियेस का ?"

"हॅलो सुभ्या..."
"हॅलो सोन्या...आईकडं दे.... बरी आहे ना ती ? काय म्हणतीये बघ ती.."
"हॅलो सुभ्या....अरे काकू...काकू गेल्यात..."
"निघतोय ..निघतोय मी"
------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ-सातारा
दिनांक-१६-०२-२०१७

"हॅलो अगं बाळा,तू काही मागवलेलंस का ?"
"हो, का ग ? आलं पण इतक्यात घरी ?"
"आत्ता तो कुरियरवाला घेऊन आलाय..तुमच्या नावे आहे म्हणतोय कुरियर"
"हो ठेवून घे,मीच मागवलंय"
"शहाणीचेस...काय आहे ?"
"मी का सांगू ?..Its Surprise...!!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच्यावर एक मिनी फिल्म बनेल :((घाबरलेला स्मायली)
एनीवन इंटरेस्टेड?
सध्याच्या नगर च्या कुरियर च्या घटनेच्या प्रकाशात शेवटी एक मोठं वाक्य पण पडद्यावर तरंगेल.
"प्रत्येक फ्री कुरियर प्लेझंट सरप्राइझ नसतं..जे तुम्ही मागवलं तेच पार्सल घ्या"

धन्यवाद प्रियाजी...
दार उघडा.....
ओव्हन असेल तर फक्त नीट तपासुन घ्या..!!

धन्यवाद सस्मित
बाब्बो! डेंजर आहे.>>>>>तेवढं मात्र खरंय...!

कथेतली नाही.पण नगर ला घडलेली ही घटना ताजी आहे.
आपण न मागवलेले, आपल्याला अपेक्षित नसलेले पार्सल स्विकारणे किंवा उघडणे कधीकधी दु:स्वप्न ठरु शकते.
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/ahma...

कथेचं नाव वाचून मला सर्वात आधी हीच कालपरवाची घटना आठवली. कथा वाचतानाही वाटत होतं, आता धडाssम आवाज करत बॉंब फुटेल ! Lol
छान लिहीलंय ! पुलेशु !!

हॅलो सुभ्या....अरे काकू...काकू गेल्यात..."
"निघतोय ..निघतोय मी">>>>>>>आँ! आई गेल्याचे या महाभागांना कळवले, तर शॉकिंग वगैरे असे काही न समजता इतका नॉर्मल प्रतीसाद? ( अर्थात लेखकाची कल्पना )

मस्त कथा, आवडली Happy

श्वास घेणारे मुंडके सत्यघटना असू शकते का? Happy

आई अशी शॉकिंग पद्धतीने गेल्यावर "निघतोय".. हे मलाही खटकले.. क्काय .. ?? करून मुलगाही जागेवर किंचाळून पडला पाहिजे. फोन हातातून गळून पडला पाहिजे..
शक्य असल्यास बदल करा. कारण तो क्लायमॅक्स आहे. घटनेचा ईम्पॅक्ट तुमच्या लिखाणातच नसेल तर वाचकांपर्यंत कसा पोहोचेल..

क्काय .. ?? करून मुलगाही जागेवर किंचाळून पडला पाहिजे. फोन हातातून गळून पडला पाहिजे.. >>> अव्हन मुलानेच पाठवलाय हे विसरू नका Happy

रियल लाइफ मध्ये दुःखी घटना ना ड्रामेटिक प्रतिसाद नसतात बरेचदा.पहिली रिएक्शन प्रचंड प्रैक्टीकल असते.अगदी 'किती वेळ ठेवणार आहेत' किंवा 'डेथ सर्टिफिकेट चं करायला घेतलंय का मी येताना डॉ आणू' असे अती कोरडे वाटतील ऐसे प्रश्नही.
प्रत्यक्ष त्या जागी जाताना किंवा पोहचल्यावर दुःख, शॉक आत भिनायला चालू होतो.
बरेचदा हा ग्रिफ अनेक वर्ष मनात असतो.अचानक अत्यंत साध्या प्रसंगाना हास्यास्पद पणे बाहेर येतो.
टीव्ही वर चमेली की शादी लागला की आधी 'अरे बाबाना फोन करून सांगावं' आणि ५ सेकंदानी 'पण बाबा जाऊन ४ वर्ष झाली ' म्हणून दुःख सिंक इन व्हायला चालू होतं.

(तात्पर्य: ग्रिफ व्यक्त किंवा प्रोसेस करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी)

Mi_anu, बरोबर आहे. प्रथम ऐकल्यावर एक बधिरपणा येतो. त्या प्रभावाखाली असताना बाहेरून पाहता आपण नॉर्मल वागतो. जवळचे गेल्याची जाणीव आत खोल जायला व त्यामुळे होणारे दुःख बाहेर यायला थोडा वेळ लागतो.

बाकी गोष्ट कळली नाही. दोन्ही घटनात कुरियर घरच्यांनीच घरच्यांनीच अरेंज केलेय व त्यांनी पाठवलेली वस्तूच त्यातून मिळालीय.

अव्हन मुलानेच पाठवलाय हे विसरू नका Happy
>>>

ओह आय सी.. ग्रेट एंगल...
मुलाने ओवनमध्ये मुंडके पाठवले. सोबत श्वासाचे आवाजाचे रेकॉर्डेड आवाज.. आईचा मर्डर !!

पण यातून सुटणार कसा??

मी अनू आपण म्हणता ते या केसमध्ये लागू होत नाही. घटनाक्रम बघा. आईशी काहीतरी अनुचित घडतेय हे मुलाला कळलेय, तो एकाला फोन करून बोलावतोय, हा सारा घटनाक्रम वेगाने आहे, त्यात आईची चौकशी करताच थेट गेलीय हे कानावर पडणे... व्यक्त्ती सुन्न होऊ शकते. प्रॅक्टीकल विचार करून आता आपल्याला निघावे लागेल आणि निघतोय बोलणे अवघड..

मुळात कसा वागेल यापेक्षा जास्त महत्वाचे कथेसाठी गरजेचा ईम्पॅक्ट !

प्रत्यक्षात मुलगा अचानक असा थंडपणे निघतोय बोल्ला तर त्याच्या मित्राला वाटेल की हा मुलगा नाही त्याचा ड्यु आय आहे Happy

जोक्स द अपार्ट
वरचा एंगल, आईचा मर्डर.. मित्रही सामील असेलच.. काम झाले आता मी निघतोय..
पुराव्यांची विल्हेवाट लावायचे काम मित्राचे??

मस्त कथा आहे.खूप शक्यता निघतात.
1. मुलाने आईचा खून करायला रचलेला बनाव
2. अमानवी कुरियर कंपनी ज्यात प्रेमाने कुटुंबियांना पाठवलेल्या पार्सल वर जादू होते.
3. आई पाणी घ्यायला गेलीय, मदत करायला आलेल्या रिक्षा वाल्याने झोल केलेला असू शकतो.
4. अनेक वर्षापूर्वी कुरियर ऑफिसात अशी घटना घडली होती.यात त्यावेळी धक्क्याने गेलेली माणसं दुसर्याना पण आपल्या जगात आणतात.ही साखळी वाढत पसरत जाते.
5. मुलगा आईला मित्रासाठी दार उघड सांगतोय पण ती त्यापूर्वीच बेशुद्ध आहे.ईथे 'फोनवरून नंतर बोलणारा मित्र' म्हणजे ते भूत/मुंडके असू शकते.मुलगा गेला की तोपण मरेल.

Pages