आवळा सुपारी हवी आहे

Submitted by jui.k on 26 March, 2018 - 11:45

डोंबिवली मध्ये चांगली आवळा सुपारी कुठे मिळेल??
किंवा ऑनलाईन कुठे विकत मिळेल का??

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सध्या विकत वाल्या आवळा सुपार्‍यांत प्रचंड मीठ असते असं जाणवलंय.जास्तीत जास्त टिकावी म्हणून टाकत असतील.
घरी आवळा, सैन्धव, हिंग, आलं,काळंमीठ वापरुन मस्त बनते.खडखडीत वाळायला मात्र प्रॉब्लेम येतो कारण वाळायच्या आतच संपते. Happy

खडखडीत वाळायला मात्र प्रॉब्लेम येतो कारण वाळायच्या आतच संपते.>>>>> Proud बरोबर..
घरी वाळवायचा प्रश्न आहे कारण बाल्कनी मध्ये ऊन नाही येत फार आणि आवळ्याचा सिझन पण नाहीये आता..

हाच तर सिझन आहे, इथे मिळताहेत आवळे सध्या.

नवीन Submitted by साधना on 27 March, 2018 - 20:10>>>> ओह धन्यवाद बघते मला वाटलं dec मध्ये सिझन असतो आवळ्यांचा

डोंबिवलीत लहानपणी बऱ्याच दुकानात आवळासुपारीची छोटी छोटी पाकिटं मिळायची, शाळेत येता जाता खायचो. आताही मिळत असतील. आई पूर्वी सिझनला घरी करायची. मी इथे डोंबिवलीत नाही करत पण श्रीरामपुरला वर गच्ची होती तेव्हा करायचे. आवळा आलं सुपारी मिक्स मस्त लागते. बारीक तुकडे किंवा किस करून मीठ लावून वाळवायचं.

Submitted by अन्जू on 28 March, 2018 - 02:13>>>>>>>>
आता तशी छोटी पाकिटं फक्त st स्टँड वरच दिसतात...