नेमस्त लाट येते आणिक फुटून ज़ाते (तस्वीर तरही)

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 March, 2018 - 14:15

तस्वीर तरहीसाठी बेफिजींचे आभार मानून...

डोक्यावरील छाया अलगद विरून जाते
हे झाड वाढलेले जेव्हा पड़ून ज़ाते

विस्तिर्ण पात्र आहे, ना सोबती कुणीही
मनसोक्त डुंबण्याची इच्छा म़रून ज़ाते

आसक्त षडरिपुंना येते अशी विरक्ती
होळीमधे जशी की पोळी ज़ळून ज़ाते

ध्यानस्थ कातळाला कळवा कुणीतरी हे
नेमस्त लाट येते आणिक फुटून ज़ाते

हरवेल बघ पुन्हा ती गर्दीत माणसांच्या
हातात हात घे ना, संधी निघून ज़ाते

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users