डरना जरूरी है .....

Submitted by यशू वर्तोस्की on 9 March, 2018 - 00:36

एकीकडे आपण प्रगती करतोय पुढारतोय पण दुसरीकडे माणसांमधे जनावरपण वाढतंय. हे असे विषय आहेत की यावर उघडपणे बोलायला माणसं कचरतात. वर्तमानपत्रात बातमी म्हणून मोजक्या शब्दात माहीती दिली की झालं . नंतर पेज ३ वर चर्चा करायला आपण मोकळे.
आपली मुलं आता वयात येत आहेत काही तारूण्यसुलभ भावना त्यांच्या मनात जागृत होत असतील. आपणही तरूण वयात सगळ्या गोष्टी केल्येत . याच अनैसर्गिक असं काही नाही . पण बदलली आहे ती सामाजिक परिस्थिती .

हल्ली सगळंच बदललंय . पुर्वी सगळ्या गोष्टींना एक निसर्गाने घातलेलं वयाचं बंधन होतं पण आपण प्रगती करून ते शिथील केलं . हल्ली वयात येण्याचं वय १५-१६ वरून १२-१३ वर आलंय आणि तरूण असण्याचं वय ६० पर्यंत पोहोचलय. नवनविन टेक्निक्स आणि ट्रिटमेंटस यामूळे माणसं ( विशेषत : बायका ) पन्नाशी उलटली तरीही खूपंच प्रेझेंटेबल असतात. तसंच पूर्वी आॅड कपल्स ही कल्पना फार नसायची पण हल्ली ही सहजसोपी कल्पना झाल्ये .

मूळ मुद्दा घाबरण्याचा ..... घाबरायला हवंय ..नुकतीच वयात आलेली मुलं आजुबाजुला वावरणार्या वयाने खूप मोठ्या बायकांकडे ज्या नजरेने पहातात ते पाहून मनात थरकायला होतं . बसमधे , ट्रेनमधे किंवा सार्वजनिक जागी मुलांना घाणेरडे काॅमेंटस मारताना पाहीलं की खूप काळजी वाटते. संसारी स्त्रियांना हे अनुभव येतात तर विधवा , परित्यक्ता , घटस्फोटीत किंवा चाॅईस म्हणून एकट्या रहाणार्यां बायकांना काय काय अनुभव येत असतील.
पेपरात दर दिवशी बातम्या असतात निर्जन जागी प्रेमीयुगुलांवर बेतलेल्या प्रसंगांवर. ही वृत्ती आदिम काळापासून चालत आलेली आहे पण मधल्या काळातल्या बंदिस्त समाजात हे कमी होतं किंवा छुपं होतं पण आजकाल इंटरनेटचा वापर इतका वाढलाय की बर्याच चांगल्या वाईट गोष्टी तुमच्यावर लादल्या जायला लागल्येत. आणि पोर्न साईटसनी तर स्त्री पुरुष नात्यातलं सौदर्य घालवून त्यात एकप्रकारचा बुभुक्षित ओरबाडून काढणारा विखार आणलाय. स्त्री कडे फक्त ओरबाडायची भोगवस्तू म्हणून बघण्याचा बाळकडू फारच लहान वयात मुलांच्या मनावर बिंबवलं जातंय. आता वयाच्या , नात्याच्या सगळ्या भिंती पार उध्वस्त झाल्येत. नातं असो की मैत्री स्त्रीकडे , मग ती कोणत्याही वयाची असो बघण्याची नजर एकंच. पुर्वी एका ठराविक वयाचा टप्पा ओलांडला की सार्वजनिक आयुष्यात स्त्री पुरुष थोडे विरक्त होत किंवा स्त्री करता थोडं सुरक्षित वातावरण असे ( ही मानसिकता होती) पण हल्ली वय वर्षे १ ते ६० असो कुठलीही स्त्री , वर्ष १२-७० कुठल्याच वयोगटातल्या पुरुषापासून सुरक्षित नाही.

कदाचित आपण ठरवून याबद्दल बोलत नाही. विचार करतो पण नको बाबा हा विषय हा जनरल अप्रोच असतो. ज्यांना पौगंडावस्थेत किंवा वयात आलेली मुलं आहेत त्यांनी हा विचार करायलाच हवा. हल्ली तर मुली आणि मुलं दोघेही सेफ नाहीत. सतत काहीतरी वेगळं, थ्रिलिंग करण्याच्या नादात आपण असे असुरक्षित तर होत नाही ना हा विचार हवाच. मुलांसोबत आपण बोललं पाहीजे आणि वागण्यातून आपला आदर्श ठेवला पाहिजे.

खरंच डरना जरूरी है...

उशीरा एकटीने किंवा कपल्स प्रवास करताना.... अनोळखी निर्जन जागी, जाताना.. ... घरात एकटी असताना.... पोस्टमन, प्लंबर, सुतार, कुरियर वाला , दुधवाला, भाजीवाला अशी अनेक अनोळखी माणसं...... किंवा शेजारी, नातेवाईक किंवा अगदी एका छताखाली रहाणारी माणसं .... मुळात यातली बहूतेक माणसं नार्मल असतात. पण तो एक मोहाचा वासनेचा क्षण सांगून येत नाही. माणसामधलं जनावर जागं होतं. नंतर आयुष्यभर पस्तावा होतो पण, त्या एका क्षणावर कोणाचाच कंट्रोल नसतो कदाचित. काळजी घेणं कधीही चांगलं.

देव आणि सैतानही... कुठल्या रूपात येईल ते सांगता येत नाही..... डरना जरूरी है.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप चांगलं लिहीलंय.
बातमी अस्वस्थ करुन गेली होती. तरुण कपल ने निवांत जागी फिरायला जाऊन अशी घटना अनेक वर्षापूर्वी युनिव्हर्सिटित घडली होती.त्यावर सातच्या आत घरात सिनेमा बनमा होता(तो जरा अतिरेकी वेगळ्या टोकाचा होता हा मुद्दा वेगळा.) पण अजूनही अश्या घटना घडतात.कमी झालेल्या नाहीत Sad
सुरक्षितता आणि सुधारणांच्या बाबतीत गेली अनेक वर्षे (कृपया अमुक सरकार वाले वाद वेगळ्या धाग्यावर घालावेत) काळ थांबलाय किंवा किंचीत मागेच गेलाय असं काहीतरी वाटत राहतं.

खरंय अनु. तळजाई टेकडीवर पण असे अनेक प्रकार घडले आहेत. सरळ जीव घेण्याची धमकी देतात हे लोक.
निव्वळ विकृती फैलावतेय.
मुंबईत त्या बंद मिल मध्ये जे घडलं ते तत्सम च होतं. Sad सून्न व्हायला होतं असं काही ऐकलं/वाचलं की.

सुरेख लेख.. अगदी पटला. आजवर कधी वाटलं नव्हतं पण आता एका आईच्या द्रुष्टीकोनातुन मी बघते आणि माझ्या एक वर्षाच्या मुलीसाठी खरच वाटत की डरना जरूरी है!
**बाय द वे, खूप दिवसांनी तुमचा लेख आलेला पाहून छान वाटलं!

आवडलं.
मुद्दा पटला.
खरंच डरना जरुरी है!