मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 05:06

सवाल जवाब

मनामनातील खेळ असती निराळे
हर एक खेळाचे नवे रंग नवे तराणे
खेळाचा सामना असतो मोठा चुरशीचा
खेळ रंगता सवाल नसतो मर्जीचा.

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांची कोडी सोडवत असतो. कधी वर्तमानपत्रातले, मासिकातले तर हल्ली मोबाईलमध्ये आणि रोज आयुष्यात. या खेळात आपण खेळणार आहोत सवाल-जवाब.

नियम -
१. संयोजक रोज एक विषय देतील.
२. विषयाला अनुसरून एक कोडे देतील.
३. जो सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील तो पुढचे कोडे देणार.
४. एखादे कोडे अडल्यास जमेल तसा क्लू द्यावा.

पहिला विषय : मराठी चित्रपट

सवाल -
तर ऐका सवाल फेकतो पहिला, चित्रपट कोणता ओळखा ओ
सुरांचा तो खेळ जुना
वाटतो आज का पुन्हा नवा
मनी सजले गाणे धुंद संगीत तराणे
जणू मनात जागले स्वप्न रेखीव देखणे

_ _ _ _ _ _ _ _ _ _ (१० अक्षरी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेच ना मला कधी
चाहूल तुझी नुसती पुरे
भिरभिर उडे मन हे तुझ्याच भोवती

_ _ _ _ _ _ _ _ (८ अक्षरी)

भरत, अहो ते दिवस गेले जेव्हा कॉलेजात पहिल्या दिवशी भेटणारी मुलगीच पहिले व शेवटचे फुल असे. आता आज ब्रेकअप की उद्या नवे फुल.... तेच गाण्यात दिसतेय... Happy Happy

हलवीची पावले कळली नाहीय, हळदीची असावीत.

चांदण रात्री झगमगता - तारा तुटताना दिसता अंबरात
मन म्हणते काही, चुकले तर नाही
आन् काहूर उठते अंतरात कधी
तू हलवी हलवीच्या पावलात

अशा ओळी आहेत का? हलवीचं हळवी केलं तरी हळवीच्या पावलांत म्हणजे काय?

हळवी चा मला माहित असलेला अर्थ मनाला लावून घेणारा/री असा आहे.
माझ्यात मी जपले तुला
सांगायचे जमलेच ना मला कधी
चाहूल तुझी नुसती पुरे
भिरभिर उडे मन हे तुझ्याच भोवती
_ _ _ _ _ _ _ _ (८ अक्षरी) >>> ती सध्या काय करते.

श्वास हे गहाण, बदलले किती जन्म मी!
पायाची वहाण, होऊ दे रे एकदा तरी!
डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो!
डोळे मिटून घेतो, मी तुझ्यापाशी येतो!
मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला रं…

साधना, हे बघा.
सुलोचना, आशा काळे, अलका कुबल गेल्या. नवी फुलं आली पण तीही पायाची वहाण होण्यातच धन्यता मानताहेत.

Pages