मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - काव्यालंकार - ३ मार्च २०१८ - अनुप्रास अलंकार

Submitted by मभा दिन संयोजक on 2 March, 2018 - 21:42

काव्यालंकार
खरंतर एखादी कविता म्हणजे शब्दाची रचना नव्हे. यमक जुळवले की कविता होत नाही तर ती कविता वाचल्यानंतर जे भाव मनात उरतात ती कविता. कवितेला वय नसतं ,आयुष्य नसतं. विषयाचं ,वेळेचं, बंधन नसतं. शब्द भाव अमर असतात. तर अश्याच आपल्या सुंदर भावनांना कवितेत गुंफून सुंदर भाव भरूया.
संकल्पना अतिशय सोपी आहे. हा खेळ आहे, स्पर्धा नाही. बंधने काहीच नाहीत नि वाचकही आपल्यातलेच आहेत. आम्ही आपल्याला कवितांसाठी काही अलंकार देत आहोत. तुम्ही त्यावर आधारित कविता करायच्या आहेत. कवितेला फॉर्मचे बंधन नाही - मुक्त छंदापासून गझलेपर्यंत काहीही चालेल. एका आयडीने एका किंवा अनेक कविता करायच्या ह्याला कसलेही बंधन नाही.
अलंकार -
अनुप्रास अलंकार
कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. १. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले.
२. गाडी गडी गुडगुडी हातात सत्तेची छडी त्यात ते रमले होते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनुप्रास : एका ओळीत त्या त्या वर्णांची अनेक वेळा पुनरुक्ती

उदाहरण - गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले

रजतनील, ताम्रनील
स्थिर पल जल, पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्णमेघ खेळे

बा.भ. बोरकर