स्नूपीने दिलेली मला शेवटची भेट...

Submitted by Vaibhav Gilankar on 10 February, 2018 - 00:50

नमस्कार मायबोलीकर,
मागच्या दिवाळीत दै. दिव्य मराठीच्या मधुरिमा दिवाळी अंकात माझी 'शापित जग' हि लघुकथा प्रकाशित झाली होती. नंतर मग मी ती admins ची परवानगी घेऊन मायबोलीवरही सादर केली.
त्याची लिंक हि आहे: https://www.maayboli.com/node/64611

त्या कथेबद्दल मला मासिकाकडून ₹750 चा चेक 8 फेब्रुवारी 2018 ला दुपारी मिळाला. पण दुःखद गोष्ट अशी की आमचा स्नूपी, ज्याच्या खऱ्या आयुष्यावरूनच मी ती कथा लिहिली होती, त्याच दिवशी सकाळी हे जग सोडून गेला... माझ्या कथेतील टॉमी नावाचे पात्र मी स्नूपीवरूनच बनवले.

मला माहित आहे की हे बक्षीस म्हणजे माझी पहिली कमाई आहे पण शोकांतिका अशी की ज्याच्यामुळे ती मिळाली तोच आता या जगात नाहीये... स्नूपी काही महिन्यांपासून खूप आजारी होता, त्याचे वय 12 होते, त्याच्यावर आम्ही उपचारही करण्याचे प्रयत्न केले पण काही फरक पडला नाही. त्याच्या जाण्याने आमच्या घरात खूप मोठा बदल झाला, एक वेगळीच पोकळी निर्माण झाली. माझी तुम्हा सर्वांशी एकच विनंती आहे की, तुमच्या घरी जे मुके प्राणी असतील, कुत्रा, मांजर, पक्षी, इ. त्या सर्वांची योग्य काळजी घ्या आणि त्यांना आपलंसं करा. त्यांना कधीही पाळीव प्राणी म्हणून नाही तर आपला कुटुंब सदस्य म्हणूनच वागवा. तुम्हाला त्यांचे आणि त्यांना तुमचे प्रेम कायम मिळत राहो हीच माझी प्रार्थना आहे.
धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो सॉरी फॉर युअर लॉस. सध्या तुम्ही दु:खात असाल. पण जसेच हळू हळू सावराल तसे त्याच्या बरोबरचे सुखी क्षण
तुम्हाला परत आनंद देतील. फेसबुक वर नॉट जस्ट अ डॉग व असे काही ग्रूप्स आहेत पेट डेथ च्या दु:खातून सावरायला तुम्हाला मदत करतील. तुम्ही तिथे स्नूपीचे फोटो व आठव्णी शेअर करू शकाल. कथा वाचून काढेन.
मी कालच रात्रीतून एक लेख वाचला. फार पूर्वीचे एका सात महिन्याच्या कुत्र्याचे व त्याच्या ह्युमनचे फॉसिल एकत्र
दफन केलेले सापडले. त्या कुत्र्याला कॅनाइन डिस्टेंपर झाला होता. ह्या रोगाला अजून ही औषध नाही.
तर तो कुत्रा आजारी असणार व शिकारीत त्याची काहीही मदत नस णार तरीही त्याच्या ह्युमनाने त्याची प्रेमाने देखभाल केलेली. आहे. कुत्रे व ह्युमन ह्यांच्यातील इमोशनल बॉड इ स. पूर्व १४००० वर्शे ते इ स पूर्व ३२००० वर्शे ह्या कालखंडात निर्माण होउन घट्ट होत गेला आहे. पूर्ण लेख खूप छान आहे.

काय ब्रीड होते स्नूपीचे? मी टाइम्स ऑफ इंडियात जे रोज चार्ली ब्राउन कार्टून येते त्यातील स्नूपीचे असले तर पट्टी कापून एका वहीत चिकटवून माझे प्रायवेट बुक तयार केले आहे. अशी काहीतरी अ‍ॅक्टिवीटी केलीत तर तुम्हाला थोडा मानसिक आराम मिळेल.

गिव युअरसेल्फ टाइम टु रिकव्हर.

अमा, स्नूपी लोकल मिक्स ब्रीडचाच असावा, आमच्या नवीन घराचे 2005 मध्ये काम सुरु असताना तेथे एक भटकी कुत्री होती, तिने काही पिलांना जन्म दिला होता. बाकीच्या पिलांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने मारलं पण हा फक्त वाचला. आम्ही जेव्हा नवीन घरी राहायला गेलो तेव्हा त्यालाही घरात घेतलं आणि तो मोठा झाला तेव्हा एक लक्षात आलं की स्नूपीचं फर भटक्या कुत्र्यांपेक्षा खूपच वेगळं होतं त्यामुळे वाटलं की तो maybe स्पेशल आणि लोकल ब्रीड चा मिक्स असावा.
अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे, आम्ही जेव्हा त्याचे नाव स्नूपी ठववले तेव्हा आम्हाला माहिती नव्हते की स्नूपी नावाचे असे कुठले कॉमिक पात्र आहे. ते नाव असेच माझ्या दादाच्या मनात आले आणि आम्ही ठेवले.