...एक व्यथा !

Submitted by सेन्साय on 3 February, 2018 - 21:00

.

.

मी ईथे कोण आहे ?
कुठे आलोय मी ...
ह्या अनोळखी जगात !
अज्ञात मी अजुन स्वत:लाच
.... का आलो तरीही !

प्रश्न ..
निव्वळ प्रश्न ..
निरुत्तरित प्रश्न !
ह्या प्रश्नांना उत्तर मिळणे
खरंच गरजेचे आहे का ? ...

माझ्या विशिष्ट शरीराची
मलाच भीती वाटू लागली आहे;
इतक्या वर्षानंतर प्रथमच जाणीव होतेय
माझ्या अस्तित्वाची अन्
काहीच नसल्याचीही !

शरिर स्वतंत्र अस्तित्व राखून तरीही
मन मात्र कायम गुलामित जखडलंय
मालकी कोणाची ...
वाहत्या करुणाप्रद नजरांची की
झेपावणाऱ्या तिरस्कारकृत हेटाळणीची !

मी निरपराधी आहे ..
माझी काहीही चुकी नाही तरी..
परिस्थितिला आता तोंड दिलंच पाहिजे
अबनॉर्मल जिंदगीला माझ्या
नियतीच्या कोर्टात उभं राहिलंच पाहिजे

मला सजा मिळण्याची शक्यता नाही
तरी सजा मिळालीच तरी
मी काही करु शकत नाही !
कारण अपराधी, निरपराधी ह्याला
तुमच्या ह्या नॉर्मल जगात
फारसा अर्थ उरलेला नाही ...

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय.
काही प्रश्णांची उत्तरं कधीच मिळत नाहीत.

छान लिहीलय
पण आता पुर्वीसारखी परिस्थिती राहीली नाही.
सगळ्यांच्या बरोबरीने जीवन जगायचा प्रयत्न् करतायत. आपली नजर नॊर्मल ठेवली पाहीजे बस्
पुलेशु छान लिहीताय लिहित रहा. Happy