चूक ... A Tragic Loss Of Innocence !

Submitted by सेन्साय on 24 January, 2018 - 06:42

.

.

मम्मी ...
माझी काय गं चूक झाली
सांग ना गं...
असं का सगळी वाताहत झाली

त्या काकाने तर छान चॉकलेट दाखवली
म्हणून मीसुद्धा त्याच्या मागून गेली
पप्पासारखा तो मलापण बोलला गं
किती छान गोड दिसते माझी शोनुलि
मीही मग त्याच्या कडेवर बसली
चॉकलेटच्या चवीने स्पर्श विसरली

बोलताना त्याने केसांतून हात फिरवला
मला तर तोहि कौतुकाचा भाग वाटला
पण जेव्हा माझा गालगुच्चा घेतला
तेव्हा मीही त्याला छान पापी दिली
वाटलं की त्याचीही मुलगी असावी
माझ्याच वयाची छानसी एक बाहुली

मी लाडाने अजुन एक चॉकलेट मागितली
पण त्यानंतर माझी शुद्ध का गं हरपली
सांग ना गं...मम्मी ...
माझी काय मोठी चूक झाली
अवघ्या क्षणात अशी फरफट झाली

तो काका आता माणूस नाही गं राहिला
अर्धनग्न जणु राक्षस त्याच्यात उरला
जमिनीवर पालथी पाडून मला
कुत्र्यासारखं अंगभर हुंगत राहिला
मांजरीसारखा मला चाटुही लागला

एक चॉकलेट खायची शिक्षा बघ गं किती
जीव घुसमटला माझा श्वासही अड़कला
जेव्हा माझी ओरड थांबवायला
त्या काकानी माझा गळा पकडला

तुझी शप्पथ गं मम्मी ...
नाही खाणार अशी चॉकलेट पुन्हा कधी
माझी खरंच गं मोठी चूक झाली
माझ्या जाण्याने तुमच्या जीवनातली
अवघि माणुसकीच गं हरवली...!

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताचं हे कठोर वास्तव.. खरच कळत नाहि .. का अशी माणुसकी संपत चालली आहे दिवसेंदिवस माणसातली..

आताचं हे कठोर वास्तव.. खरच कळत नाहि .. का अशी माणुसकी संपत चालली आहे दिवसेंदिवस माणसातली.. >> +१ छान जमलीय कविता!

आताचं हे कठोर वास्तव.. खरच कळत नाहि .. का अशी माणुसकी संपत चालली आहे दिवसेंदिवस माणसातली.. >> +१ छान जमलीय कविता! Happy

आताचं हे कठोर वास्तव.. खरच कळत नाहि .. का अशी माणुसकी संपत चालली आहे दिवसेंदिवस माणसातली.. >> +१ छान जमलीय कविता!>> +१११