भुवनेश्वर येथे दोन तीन दिवस रहायच्या सोयींबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by प्रज्ञा९ on 29 January, 2018 - 06:05

माझा नवरा आमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या कामासाठी एका मित्राबरोबर भुवनेश्वर ला जात आहे. १ फेब्रुवारीला पहाटे भुवनेश्वरला उतरणार आणि ४ फेब. ला निघणार. ३ दिवस पूर्ण वास्तव्य भुवनेश्वर शहरातच असेल. तिथे बोटॅनिकल गार्डन आणि नर्सरी-रोपांशी संबंधित लोकांना आणि ठिकाणांना भेटायचं आहे. तर तिथे रहाण्यासाठी आणि शाकाहारी जेवणासाठी चांगले पर्याय सुचवा प्लीज. जिथे कामासाठी जायचंय तिथली माहिती काढलेली आहे. साधारण लॉजिंगचं बघून ठेवलंय (बुकिंग नाही), पण काही चांगली माहिती असली हवी आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

TripAdvisor चे रेटिंग आणि reviews वाचून खूपदा अनोळखी शहरात हॉटेल booking करतो. आत्तापर्यंत तरी कधीच वाईट अनुभव आला नाही.
Eatout साठी google केलं तरी चांगले पर्याय मिळतात, परत थोडं रेटिंग, थोडे reviews! Hope it helps

धन्यवाद राजसी. तिथेही चेक करते. अजून एक म्हणजे येताना
रेल्वे बुकिंग आहे. पण रेल्वे मध्ये काही विकत घेऊन खायची वेळ कमी यावी म्हणून घरात काही करून द्यायचं तर टिकून राहतील असे पदार्थ काय करू ? काही दिवसांपूर्वी असा प्रश्न किंवा वेगळा धागा बघितला. आता मिळत नाही.

makemytrip किंवा goibiboवर उत्तम सवलती मिळतात. रिव्ह्यू वाचून ठरवता येतं.

बुकिन्ग .कॉम वर बघा.

भुवनेश्वर मध्ये ट्रा यडेंट मस्त आहे पण महाग आहे. चिक्कार हॉटे लं आहेत. मस्त जागा आहे. तिथून हॉटेल मधुन पार्सल घेता येइल. हैद्राबाद हाउस म्हणून बघायला सांगा तिथे व्हेजि रेसीपीज भात, पनीर मसाला रोटी सर्व मिळेल. ते पार्सल नेता येइल लोकल व्हेज फूड पण उपलब्ध आहे. दालमा, चावल, भोपळ्याची भाजी असे मिळेल. जरा भारत बघा की.

१) पूर्व भागात(प्लॅटफाम नं सहा म्हणतात) जुनी वस्ती,स्वस्त हॅाटेल्स आहेत. तिकडे ओटो स्टँडजवळच 'हरेकृष्णा भोजनालया' - कांदा लसुणशिवाय व्हेज सापडले. डिसेंबरातच गेलो होतो. पार्सलही आहे. फोन नं देऊ?
२) चांगली हॅाटेल्स(राहाण्याची) पश्चिम भागात आहेत.
३) रोसगुल्ले,छेनापोडा,रबडी बय्राच ठिकाणी मिळते.
४) कोकणचे लोक भाव खातात पण चांगली स्वस्त शहाळी (१०-१५-२०रु) इथेच मिळतात. मलईदार.
५)भुब० रेल्वे स्टेशनचे पदार्थ - समोसे, सॅन्डविज बेकार आहेत.
६) प्रवासासाठी रवा/ तांदुळपिठ लाडू, चिवडा , साठं उत्तम.

माझ्या कलीगला विचारून उद्या हॉटेले लिहीते. कटकला आमचा खूप छान डीलर आहे. मला भाबीच मानतो तो. त्याचा फोन नंबर देते. कॅबवाला हवा आहे का? काळजी करू नका.

आभार Happy

फोन नं देऊ?>>> चालेल. विपुत चिकटवला तरी चालेल.

माझ्या कलीगला विचारून उद्या हॉटेले लिहीते. कटकला आमचा खूप छान डीलर आहे. मला भाबीच मानतो तो. त्याचा फोन नंबर देते. कॅबवाला हवा आहे का? >>>>अमा चालेल मला ही सगळी माहिती.

गरम पाणी घालून करायचा उपमा, पोहे,नूडल्स चे container नेऊ शकता. ऑनलाइन इन्स्टंट mix घरच्या घरी बनवायची कृती पण आहे. Personal kettle नेली तर गरम पाणी टाकून पोहे, उपमा खाता येईल. भेळ मिक्स न्यायचं आणि हॉटेल मधून ग्रीन सलाड विकत घेऊन त्यात मिसळून भेळ. रेलवे च जेवण सहसा चांगलं असतं. गाडीला pantry car असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही.

९, सावली एकदा विचार...
त्याभागात, खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स बहुधा तरी नाही होणार. ४च दिवस आहेत आणि; बर्‍या ठिकाणचं खायला, नवीन काही ट्राय करयाला भरपूर चान्स आहे (अर्थात, तब्येतीची पथ्य फार काही नसतील तर)
नॉर्मली हॉटेल रूम वर गरम पाण्याची किटली, चहा/कॉफी चे पाऊचेस आणि क्रिमर असतं; सो चहा, कॉफी तर करता येईलच; सोबत बिस्किट्स, कुकीज वगैरे घेता येतील, वेळ पडलीच तर. आणि बहुतेक वेळेला, हॉटेल च्या टॅरिफ मध्ये ब्रेकफास्ट असतो, तिथेही बर्‍याच वेळेला मस्त स्प्रेड असतो.

खुद्द भुवनेश्वरमधे खायचा प्रॉब्लेमच नाही वाटत मलाही. येतानाच रेल्वे मधे २ वेळा तरी जेवण असेल. त्यात मला काहीतरी इथूनच द्यायचं आहे जे येतानाच्या प्रवासापर्यंत टिकेल. आणि हे अवघड असूच शकतं. तिकडूनच येताना काही चांगलं पार्सल हा पर्याय आहे. पथ्य नसली तरी बाहेरचं खाऊन पित्त आणि अपचनाचा त्रास लगेच होतो त्यामुळे, आधीच तिथे राहायच्या २-३ दिवसांत हॉटेलचं खायचं, रेल्वेमधेही खायचं म्हणून हाताशी थोडा फूड स्टॉक हवाय. रेल्वे मधल्या जेवणाचे फोटो, बातम्या आणि एकदा खुद्द आमच्या कोकण रेल्वेच्या एका गाडीत झालेला घोळ बघून धसका बसलाय.

भुवनेश्वर चे नाल्को हेड ओफीसा समोर जिंजर म्हणून आहे ताज गृपचे बजेट हॉटेल एकदम बेस्ट व सेफ आहे. मी तिथे राहिले आहे अनेकदा. तिथे व्हेज ऑप्शन अवेलेबल आहे तिनही मील्स साठी.

हॉटेल जिंजर नाल्को हेड क्वार्टर समोर जॉयदेव विहार नयपल्लि भुवनेश्वर. ओदिश ७५१०१३

हॉटे ल स्वोस्ती प्रिमियम जयदेव विहार पे व नंदन कानन रोड. भुवनेश्वर ०६७४ ३०१७००० हा फोन नंबर आहे
पिन कोड सेम अ‍ॅज जिंजर. हे मस्त हॉटेल आहे व जेवायची सोय पण जबरी.

कटक बेहराम पूर ला जाणार आहेत का?

लिंगराज टेंपल जरूर बघा. व भुवनेश्वर मध्ये एक अर्बन हाट आहे तिथे पिपली वरक साड्या कपडे दागिने आदिवासी लोकां नी बनवलेले दागिने इत्यादि मिळते. तिथे जरूर चक्कर टाकायला सांगा.

तब्येतीचे त्रास असतील तर साधा ब्रेड ( एम एन सी कंपनी ने बनवलेला व लोकली डिस्ट्रिब्युट केलेला) व अमुल बटर
चे बारके सॅशे न्यावे. चीज क्यूब, मारी ग्लुकोज बिस्किट. मिनरल वाटरच प्यावे किंवा घरून तो ट्रावलर चा मोठा
घडा येतो पूर्वी आपण ट्रेन प्रवासात न्यायचो तो फिल्टर्ड बॉइल्ड पाण्याचा न्यावा म्हणजे अन्न व पाण्यातून संसर्ग होणार नाही. लोकल ओदिशा फूड मध्ये मोहरीचा व मोहरीच्या तेलाचा वापर असतो. सोसत नसल्यास म्हणून सांगितले. बंगाली फूड सारखेच पण त्याहून साधे प्रकरण आहे.

ओदिशा मध्ये गरीबी आहे त्यामुळे आयफोन मॅकबुक असेल तर ते कव्हर करून न्या फार फ्लॉट करू नका.
कॅब ने जाता येता नंबर घरच्यांना मेसेज ़ करून ठेवा . हायवे आहेत तिथे ट्राफिक फार नसतो मुंबईपुण्यासारखा.

मंदिरांची नगरी आहे. जवळच कलिंगा लढाई झाली ती जागा व स्तूप आहे. साठ किमी वर पुरी जगन्ना थ आहे.

९, नवरा चौथ्या दिवशी रेल्वे प्रवासात असेल ना?
मग येताना खाण्यासाठी इथून काही बनवून देण्यापेक्षा रेल्वेत चढताना ब्रेड , अमुल बटर सोबत घेतलेले बरे. इथून दाण्याची- खोबऱ्याची कोरडी चटणी सोबत दे. काकडी,टॉमॅटो, फळे ब्रेडबरोबरच भुवनेश्वरला घेता येईल. ट्रेनमध्ये सॅंडवीच, फळे खाता येईल. झालंच तर सोबत लाडू- चिवडा किंवा फराळाचे दे.
दशम्या, पुपो, गुपो टिकतात पण तरी चौथ्या- पाचव्या दिवशी कितपत खाण्यायोग्य असतिल हे प्रवासातल्या वातावरणावर अवलंबून असेल. थंड / कोरडे वातावरण असेल टिकेल चांगले.

अजून एक म्हणजे ज्या कोणत्या हॉटेलात नवरा रहाणार असेल तिथून एकवेळचे जेवण पॅक करून घेता येईल ट्रेनसाठी. देतात असे.

मॅमी पोको पॅन्ट्स पण द्या सोबत. भुवनेश्वर मध्ये ४ दिवस म्हणजे किती हाल होतील काही कल्पना आहे का?

काय एक एक सल्ले देतायत महान लोक.

>> काकडी,टॉमॅटो, फळे ब्रेडबरोबरच भुवनेश्वरला घेता येईल. ट्रेनमध्ये सॅंडवीच, फळे खाता येईल.

कच्च्या भाज्या/फळे यामधुन बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. आणि फळे कापताना धारदार हत्यार हाताळावे लागणार ते वेगळेच. चालती गाडी हलत असल्याने हात कापण्याची शक्यता बळावते. उगाच कशाला

>> सोबत लाडू- चिवडा किंवा फराळाचे दे.
हा बेस्ट ऑप्शन आहे.

बरोबर जाणारा मित्र भरवशाचा आहे ना? नाहीतर मित्र नवर्‍याला फूस लावण्यात पटाईत असतात. तुम्ही इथे लाडू-चिवडा बांधुन द्याल आणि तिथे मित्राच्या नादाला लागुन भलतंच काही खाल्लं जाईल. प्रत्येक खाण्याचे व्हिडीओ मागवा व्हॉट्स अ‍ॅप वरुन.
रच्याकने व्हॉट्सअ‍ॅप वरुन आठवलं, लाईव्ह लोकेशन फिचर ने नवरा (निदान त्याचा मोबाईल) कुठल्या वेळी कुठल्या ठिकाणी आहे यावर नजर ठेवता येउ शकते.

या चार दिवसांसाठी तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना शुभेच्छा! जमल्यास दैनिक आढावा पाठवा.

ओडिशात काय/कुठे शाकाहारी मिळेल ते अपेक्षित आहे. साइटसिइंग नाही. तेवढेच दिलं.

तिथले लोक फार चांगले वाटले मला.