किल्लीवाला आणि आमचे चिरंजीव...

Submitted by अतुल. on 23 January, 2018 - 01:25

मच्या शेजारचे काका. जास्तीकरून ते आपल्या गावीच असतात. क्वचित कधीतरी महिन्यातून एकदा वगैरे त्यांच्या कामानिमित्त पुण्याला येणे झाले कि इथे राहायला येतात. अन्यथा फ्लॅट बंदच असतो. काल रात्री असेच आले. रात्री यायला उशिर झाला. पाहतात तर त्यांच्याकडे किल्ली नव्हती. बहुधा विसरली असावी. किंवा गहाळ झाली असावी. मग धावाधाव. शेजारी इकडेतिकडे कुणाकडे पूर्वी कधी एखादी डुप्लिकेट वगैरे ठेवलीय का याची चौकशी केली. अर्थात आमच्याकडेही केली. पण डुप्लिकेट कुणाकडेच नव्हती. आमच्या चिरंजीवाना कळले कि शेजारचे काका किल्ली विसरून आलेत. झाले. आता रात्रीबेरात्री ते त्यांचा फ्लॅट कसा उघडणार याची उत्सुकता आणि टेन्शन त्यांच्या पेक्षा यालाच जास्त Proud कारण त्याच्या आयुष्यात अशी केस तो पहिल्यांदाच पाहत होता. म्हणून खिडकीशी उभे राहून 'आता ते काय करतात' हे पाहणे सुरु झाले.

मग त्या काकांनी किल्ली करून देणारा कोण भेटतो का ते पाहायला आपल्या नोकराला गाडी घेऊन शहरात धाडले. तो गेला. त्यानंतर बरीच फोनाफोनी सुरु होती. बहुधा कोण किल्लीवाला जवळपास लवकर भेटत नसावा. भेटण्याची शक्यता पण दिसत नसावी. तरीही ते काका शांतच होते. पण इकडे आमच्या चिरंजीवालाच जास्त टेन्शन Lol शेवटी बरीच वाट पाहिल्यानंतर तासा दीड तासाने त्यांचा तो नोकर धापा टाकत कुठूनतरी एका किल्ली बनवणाऱ्याला घेऊन आलाच एकदाचा. तो आल्यानंतर चिरंजीवाचा जीव भांड्यात पडला.

एव्हाना इकडे मी झोपेच्या अधीन होत होतो. तर बायकोला गाढ झोप लागली होती. पण चिरंजीव अगदी उत्साहात बेडरूम मध्ये आले. आईला उठवू लागले.

"मम्मा... मम्मा..."

हि गाढ झोपेत Wink

"अग आऽऽऽई", `मम्मा` ने काम झाले नाही कि `आई` चा प्रयोग हा नेहमीचाच Happy

शेवटी हिला जाग आलीच.

"काऽऽऽय?" त्रासून तिने विचारले Uhoh

"शेजारच्या काकांचा किल्लीवाला आला" चिरंजीव शांतपणे म्हणाले Biggrin Biggrin

"मग मी काय करु?" प्रचंड चिडचिड होऊन हिने विचारले, "हे सांगायला मला उठवलेस? उद्या शाळा आहे लवकर. गप्पपणे झोपतोस का नाही आता?" Angry Angry

आणि इकडे मी मात्र तोंडावर चादर ओढून मनमुराद हसून घेतले Lol Rofl

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बिचारं पोर! किती आनंदाने सांगायला आलं होतं Happy
तुम्हांला किनई शेजारधर्मच मुळी उरला नाही Happy

>> तुम्हांला किनई शेजारधर्मच मुळी उरला नाही
हो ना. "मग मी काय करु?" ऐकल्यावर एव्हढेसे तोंड केले बिचाऱ्याने Proud

>> तुम्हीच सांगितलं होतंत ना त्याला आईला हे सांग म्हणून
Biggrin नाही हो Wink

>> उद्या आपलीपण हरवली तर?? असे सांगायचे असावे त्याला
हा हा हा... कदाचित Happy

☺️