बॉईज वील बी बॉईज

Submitted by यशू वर्तोस्की on 11 January, 2018 - 13:37

मला पुलं च्या वल्लीपैकी नाथा कामत खूप आवडतो . पुलंनीच वर्णन करून ठेवल्याप्रमाणे स्त्रियांकडे पाहण्याचा त्याचा नजरिया एकदम मस्त असतो . विधात्याने सुद्धा स्त्री पदार्थच असा बनवला आहे की अस्तित्वच आजूबाजूच्या पुरुष मंडळींच्या आयुष्यात एक हलचल , उत्तेजना आणते . बघा ना पुरुषाचे आयुष्य स्त्री या एका विषयाने ग्रासलेले असते . एकटा दुकटा असतानाच नव्हे तर ………. मित्रांबरोबर , समारंभात , पार्टीत जरा चार टाळकी एकत्र आली की सर्वात प्राइम विषय एकच . यात व्हल्गर काही असते किंवा फालतुगिरी असतेच असं नाही . बोलणं चागलं असो व वाईट विषय मात्र मुख्यतः स्त्रियांचेच .
अगदी खाशी सुंदर नसली तरी जरा एखादी सुबक ठेंगणी आजूबाजूला आली की पुरुष जणूकाही हरवून जातात . नंतर डायरेक्ट नसल्या तरी सर्व इन डायरेक्ट हालचाली तिच्या संदर्भात असतात . हे करत असताना आपण काय आहोत , आपलं वय काय आहे किंवा आपण कसे दिसतो . सर्व हालचाली तिला इंप्रेस करण्याच्या दृष्टीने असतात , यात अतिशयोक्तीचा भाग वाटला तरी जरा बारकाईने लक्ष दिले तर हे तुम्हाला जाणवेल .
पुरुषाने स्त्री कडे आकर्षित होणे याला वयाची अट नाही . मला शाळेतला एक प्रसंग आठवतो . दहावीच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा काळ होता . कार्यक्रम संपल्यावर सर्व जण मेन गेट बाहेर बाहेर आलो . आमच्या शाळेत गुप्ते नावाची बरी मुलगी होती. तिला पाहून शाळेच्या गेट बाहेर असलेल्या एका मुलाने काहीतरी कॉमेंट केली तिच्या कानावर काहीही पडलं नव्हतं योगायोगाने तिने त्याच्याकडे पहिले आणि साहजिकच तिच्या चेहेऱ्यावर कसलेच भाव नव्हते. ती रागावलेली नाही हे पाहून तो एकदम हवेत गेला. मी तिथेच थोडावेळ थबकलो आपल्या शाळेतील एक मुलगा त्याचा मित्र असावा दोघेही बोलत होते . ते पाहून मी त्यांच्या पाठीपाठी गेलो आणि पहातो तर तो मुलगा प्रत्यक्षात फुटपाथ वर जुनी रद्दी मासिके विकण्याचा धंदा करत होता . प्रेम कुणी करावे याला माझा आक्षेप नाही . त्यांच्या आजूबाजूला घोटाळून मी त्यांचे बोलणे ऐकले तर ते फक्त तिच्या विषयीच बोलत होते . मला मनोमन गम्मत वाटत होती . तो तिच्या खिजगणतीत नव्हता आणि तरीही स्वप्नं रंगवत होता . हा किस्सा जरी टिपिकल असला तरी पुरुष गुणविशेष विशद करणारा आहे.
माझ्या बऱ्याच मैत्रिणींचा असाच अनुभव आहे पुरुष पंचविशीत असो व पन्नाशीत सुंदर स्त्री समोर एक्साईट होवून बावळटपणे वागतात . साधारणतः दोन प्रकारचे PATTERN दिसून येतात . एक म्हणजे आपण तिला भावच देत नाही अस वरवर दाखवून चोरून बघतात किंवा तिच्या समोर जरा जास्तीच शो ऑफ करतात . आपण कसे एटीकेट्स पाळणारे आहोत , सुसंकृत आहोत , नॉलेजेबल आहोत असे दाखवतात किंवा आपण कसे एकलकोंडे आहोत , कमी बोलणारे आहोत , थोडेसे जगापेक्षा वेगळे आहोत असे दाखवतात . वेगळे बसतात . एकटेच मोबाइल किंवा LAPTOP वर काम करण्याचा किंवा बोलण्याचा आव आणतात . आणि एकदा वातावरण निवळले की मग पोपटासारखे बोलू लागतात .
बाकी साऱ्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करणारे पुरुष या बाबतीत मात्र एकमेकांशी एकदम कोऑपरेटिव्ह असतात . कोठल्याही प्रसंगी एखादी सुंदर स्त्री त्यांच्या आजूबाजूला आली कि सार्वजण मिळून मिसळून असतात . नेहेमीची Rat Race विसरून हिरीरीने या Cat Race मध्ये सामील होतात . आपापसात तिला ऐकू याव्यात म्हणून आणि अश्या गप्पा मारतात डिस्कशन करतात . अश्या वेळी मग कोल्हापूरला ही न जावू शकणारा एखादा पुढच्या आठवड्यात कॅलिफोर्नियाला जाणार असतो , नेहेमी स्कुटर वर हिंडणार्याने नवी पोर्श गाडी बुक केलेली असते . बी कॉम पास क्लास मध्ये पास झालेल्या कोणाचा प्रबंध लान्सेट किंवा टाईम मासिकात छापून येणार असतो . खिशात मेमो असणारा कोणी कंपनीच्या डायरेक्टर बोर्डात जात असतो . सर्व नाटक कसं एकदम मिळून मिसळून . पण बरेचदा सुंदरी एकदम चंट असते . अश्या खिलाडू चर्चा तिने बसच्या रांगेत , ट्रेन मध्ये , दूरच्या प्रवासात , लग्न समारंभात , गेट टुगेदर आपल्या आजूबाजूला ऐकलेल्या असतात . या गप्पांमधला खरा मतितार्थ तिला बरोबर माहित असतो . ती मनातल्या मनात हसत असते , कधी कधी तर करमणूक म्हणून ती असल्या गप्पा अगदी मन लावून ऐकत देखील असते . कधी कधी तर मोहक स्माइल देखील देते . बस मग काय सर्व जमिनीवर चालणारे आत्मे हवेत जातात . याच आनंदात कोठ्लातरी बार गाठून आनंद सेलिब्रेट केला जातो . परत ती जर भेटली तर आपण तिला कसं Approch होणार याची स्वप्न रंगवली जातात . याच धुंदीत एक दोन पेग जास्त होतात . घरी जायला उशीर होतो . आई किंवा बायको वाट पाहून कंटाळलेली असते . साळसूदपणे दोन घास चिवडून अंथरुणा वर अंग टाकायचं असतं . कारण आजच्या रात्रीच्या स्वप्नात तिचं Advance Booking असतं आणि म्हणून झोपायची घाई झालेली असते.

बिकॉज……… बॉईज वील बी बॉईज

Group content visibility: 
Use group defaults

आपण कसे एटीकेट्स पाळणारे आहोत , सुसंकृत आहोत , नॉलेजेबल आहोत असे दाखवतात किंवा आपण कसे एकलकोंडे आहोत , कमी बोलणारे आहोत , थोडेसे जगापेक्षा वेगळे आहोत असे दाखवतात . वेगळे बसतात .
>>>>>>>>

हल्ली बहुतांश मुलींना मॅनर्सलेस किंवा रुल्स ब्रेक करणारे बॉईज आवडतात असे एक बारीक निरीक्षण आहे Happy

सुंदर गर्ल्स ना बॅड बॉयस आवडतात!>>>> प्लीज!!!
असलं काही चेष्टेतही लिहू नका. सुरूवात अशीच होते छेड काढण्याला. "नो मिन्स नो" ही चळवळ माहित आहे ना तुम्हाला? कुठल्याही मुलीला छेड काढलेली, स्टॉकिंग वगैरे केलेलं, कसले रूल्स ब्रेक करून तिच्या पाठी वगैरे लागणं आवडत नाही. मॅनर्सलेस तर अजिबातच नाहीत. कुठली assumptions करू नका.

बॅड म्हणजे छेड काढणारे किंवा स्टाकिंग वाले नाही हो.
नो मिन्स नो चा के संबंध आहे इथे.. कुठली गोष्ट कुठे घेऊन जाता? __/\__

पुरुषप्रधान संस्कृतीने कात टाकली आहे.
एकेकाळी स्त्रियांची ईच्छा आणि त्यांना काय आवडते याचा जराही विचार केला जायचा नाही.
हल्ली स्त्रियांना काय हवेय आणि काय आवडते हे पुरुषांतर्फे स्वत:च ठरवले जाते.

च्रप्स हे तुमच्या पोस्टला वा लेखाला उद्देशून नाही.
सहज केलेले एक बारीक निरीक्षण आहे.

लेख आवडला.
पुरुषप्रधान संस्कृतीने कात टाकली आहे.
एकेकाळी स्त्रियांची ईच्छा आणि त्यांना काय आवडते याचा जराही विचार केला जायचा नाही.
हल्ली स्त्रियांना काय हवेय आणि काय आवडते हे पुरुषांतर्फे स्वत:च ठरवले जाते.>>>>> +१.

काहीही, मग इथे bad boys कॅटेगरीत नेमकी कुठली पोरं येतात ?
>>>>>

मी वर म्हटलं तसे असेल...
हल्ली बहुतांश मुलींना मॅनर्सलेस किंवा रुल्स ब्रेक करणारे बॉईज आवडतात असे एक बारीक निरीक्षण आहे ....

तसेच सिगारेट शौकिन व्यसनी.. वा मारामारया करणारी भाई टाईप्स...

साधे घरी लहान मुलांनी मस्ती केली तरी आपण त्यांना म्हणतोच ना.. बॅड गर्ल.. बॅड बॉय..

उगाच का त्यांच्या वाक्याचा आपणच अर्थ काढायचा?

बाकी त्या अर्थाच्या अनुषंगाने अंजली यांनी लिहिलेल्या पोस्टशी सहमत. च्रप्स सुद्धा असतील..

तसेच सिगारेट शौकिन व्यसनी.. वा मारामारया करणारी भाई टाईप्स...>>
अशा सिग्रेटी फुकणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या उरावर नाचणाऱ्या पोरांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या पोरींना माझा कोपरापासून नमस्कार ...असल्या खवट नारळात त्यांनी नेमकं काय पाहिलं, देवसुद्धा सांगू शकणार नाही.

ते एक व्यसन आहे हो विलभ. कुठल्याही नारळाला लागु शकते.>> असेलही.
पण आपणहून कसायाच्या हातात आपली मान कोणी कसं काय देऊ शकतं ? एरवी नको त्या बाबीत खुसपट काढणाऱ्या पोरींचे डोळे, नेमक्या याच वेळी कसे केळी खायला जातात ?

एक्साक्टली रूनमेश म्हणाला तोच टाईप.

आणि हे दोन्ही साईडने खरे आहे. एक संस्कारी बहेनजी टाईप बोरिंग मुलगी आहे आणि एक थोडीशी दुसऱ्या टाईप ची.. ओकेशनल ड्रिंक्स, पार्ट्या करणारी.. ट्रॅव्हल आवडणारी..
कॉन्फिडेंट.. लेक्चर्स बंक करून मस्ती करणारी.

कोणत्याही पुरुषाला दुसरा टाईप च आवडेल.
( लग्न हा विषय नाहीय.. त्यामुळे तिकडे वळवू नका... attraction हा विषय आहे)

आणि हे दोन्ही साईडने खरे आहे. एक संस्कारी बहेनजी टाईप बोरिंग मुलगी आहे आणि एक थोडीशी दुसऱ्या टाईप ची.. ओकेशनल ड्रिंक्स, पार्ट्या करणारी.. ट्रॅव्हल आवडणारी..
कॉन्फिडेंट.. लेक्चर्स बंक करून मस्ती करणारी.>>
सगळ्या मुलामुलींना एकाच चौकटीत बसवण्याचा अट्टाहास कशाला?
बोअरिंग/एक्सायटिंग, हा सगळा हायली सब्जेक्टिव्ह मामला... कुणाला स्वच्छंद परी आवडेल, कुणाला लाजाळूचं झाड ...

सगळ्या मुलींना एरिया चे भाई आवडतात, असं सरळसरळ कसं म्हणता येईल? तसं असतं तर एव्हाना प्रत्येक गल्लीत मुन्नाभाई आणि सर्किट दिसले असते.

लेख जमलाय यशुजी. पुरुषांचे ते वागण्याचे दोन पॅटर्न तर बरेचदा परफेक्ट. Happy

हे मधेच छेडछाडी, स्टाल्किंग कुठुन आलं?

पण आपणहून कसायाच्या हातात आपली मान कोणी कसं काय देऊ शकतं ? एरवी नको त्या बाबीत खुसपट काढणाऱ्या पोरींचे डोळे, नेमक्या याच वेळी कसे केळी खायला जातात ?>>>>>>>> सिगारेटी पिणारे कसाई??? बाब्बो!! Lol