पेपर क्विलिंग-1 (basic tools)

Submitted by jui.k on 27 December, 2017 - 06:05

पेपर क्विलिंग म्हणजे कागदी पट्ट्यांचा रोल करून त्यापासून विविध आकार आणि designs बनवणे. हे सुरुवातीला कठिण वाटत असले तरी एकदा जम बसल्यावर खूपच सोपे आहे... पेपर क्विलिंग पासून आपण अगदी ज्वेलरी पासून शोभेच्या वस्तूंपर्यंत सर्व काही बनवू शकतो.
पेपर क्विलिंग चा प्रयत्न करू इच्छीणार्याना आणि नवशीक्यांना ही लेखमालिका उपयोगी पडेल अशी आशा आहे... Happy
बेसिक पेपर क्विलिंग साठी लागणारे टूल्स-
हे टूल्स कोणत्याही क्राफ्ट स्टोर मध्ये मिळतात.
1.slotted needle-
1-1-2.jpg
2.paper strips- हे पेपर स्ट्रिपस रेडीमेड मिळतात अथवा आपल्याला हवे त्या आकाराचे घरी कापू शकतो पण हे काम खूप किचकट असते
Craftsy-1-3.jpg
3. Glue- शक्यतो घट्ट ग्लू वापरावा. Fevicol असेल तर उत्तम
fabric-glue-250x250.jpg
ही झाली बेसिक quilling टूल्स.
विविध designs आणि अधिक advanced वस्तू बनवायला खालील टूल्स उपयोगी पडतात.
Quilling mould- पेपर coil चा घुमट (dome) बनवण्यासाठी याचा वापर होतो
Craftsy-22.jpg
Scissors- fringes बनवण्यासाठी हीचा उपयोग होतो.
Craftsy-17.jpgCraftsy-18.jpgFringed-Quilled-Card.jpg
Quilling comb- comb वापरून विविध फुले आणि patterns बनवता येतात.
Craftsy-1-19.jpg7cdd244574d41510a6749ac9d32ab9c8.jpg
क्रिम्पिंग टूल-
10781800924_ce0ee5f992_b.jpg10781800954_242be26d1d_o.jpg
बॉर्डर टूल्स- याच्या साहाय्याने आपण गोल चौकोनी बॉर्डर्स बनवू शकतो
0000175_border-buddy_415.jpegmaxresdefault.jpg
(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड सुंदर माहिती!! यातले फक्त पहिली क्वील किट बरोबर येते ती निडल आणि कोम्ब टूल वापराबद्दलच माहिती होते.
हे डोम आणि बाकी चौकोन करणारे टूल ही पूर्ण नवी माहिती.

सुंदरच Happy
बिगीनर्स साठी फारच छान..

मस्त लेख पुढील भागाच्या प्रतीक्षेत

Submitted by अमीदीप on 27 December, 2017 - 22:46
मनापासुन आभार आणी नमस्कार!

Submitted by रश्मी.. on 28 December, 2017 - 07:15>>>>>>>> Happy

मी बॉर्डर टुल्सला अजुनतरी हात लावलेला नैय्ये.. गरजच नही पड्या कभी..
सगळ काही अपना हाथ जगन्नाथ चालत..

Submitted by टीना on 28 December, 2017 - 09:57>>>>>>>> हो टीना परंतु एकाचवेळी भरपूर एकसारख्या बॉर्डर coils बनवायच्या असतील तर बॉर्डर टूल ला पर्याय नाही.

छान.

हो टीना परंतु एकाचवेळी भरपूर एकसारख्या बॉर्डर coils बनवायच्या असतील तर बॉर्डर टूल ला पर्याय नाही.>> बरोबर..म्हणुन तर म्हटल ना गरज नाही पडली कधी.. माझ्या आपल्या टिवल्या बावल्या चालत असतात.. जे काही करते त्यात त्याचा वापर केला नाही..म्हणुन म्हणतेय Happy

छान.

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 December, 2017 - 14:43>>>> थँक्स

बरोबर..म्हणुन तर म्हटल ना गरज नाही पडली कधी.. माझ्या आपल्या टिवल्या बावल्या चालत असतात.. जे काही करते त्यात त्याचा वापर केला नाही..म्हणुन म्हणतेय Happy

Submitted by टीना on 28 December, 2017 - 17:33>>>>>>> पण टीना तुम्ही झुमके खूप छान बनवता..

हा काय प्रांत आपला नाय.
पण माहिती मस्तच. छायाचित्रं पण सुंदर.

Submitted by दक्षिणा on 29 December, 2017 - 17:41>>>>> धन्यवाद Happy