टेक्सासविषयी थोडंसं....

Submitted by सीमा on 12 August, 2010 - 13:13

Howdy. y'all. Happy
टेक्सास बाफ वर आपण सगळे टाईमपास गप्पा मारतच असतो.
तर इथे आपण टेक्सासविषयीच्या च्या गप्पा मारुया. इथे तुमच्या गावातली रेस्टाँरंट्स (इंडियन , अमेरिकन , मेक्सिकन ,थाई ... कुठलीही) , प्रेक्षणिय स्थळ इत्यादी विषयी लिहुया. टेक्सास का आवडत , आवडत नाही , इथल कोणत फुड तुम्हाला जास्त आवडत या विषयी सुद्धा लिहिता येईल.
थोडक्यात जे काही टेक्सास च्या रिलेटेड असेल ते सर्व. Happy
हा धागा सार्वजनिक केला आहे , जेणेकरुन सर्वानाच या माहितीचा फायदा होइल. धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही परवा ३ दिवस ऑस्टीन ला गेलो होतो तव्हा १ दिवस फ्रेड्रिक्स्बर्ग आणि एंच्यांटेड रॉक अशी ट्रीप केली. धमाल आली.
एंच्यांटेड रॉक म्हणजे एक टेकडी आहे, चढायला १५-२० मिनिटे लागली.
आणि मग फ्रेड्रिक्स्बर्ग ला जावून नुस्तं त्याबियर गार्डन मध्ये बियर घेवून रस्त्याने हिंडणे आणि निरनिराळे सालसे/जेली/स्प्रेड यांची चव घेणे इतकच केलं. ऑस्टीन जवळ वायनरीज पण चिकार आहेत.
१ तारखेला कर्बी लेन कॅफे मध्ये सही ब्रेकफास्ट केला. सगळेच पदार्थ छान होते आणि मुख्य म्हणजे मीट न खाणार्‍यांसाठी पण बरेच ऑप्शन्स होते.

वॉव शूम्पी. आम्ही पण फ्रेड्रिक्स्बर्ग मधे नुसते भटकलो होतो. लेदर वॉलेट्स आणि पर्सेसचं एक मस्त
शॉप होतं. आणि भरपूर वाईन शॉप्स.मजा आली होती.

गौरी.

पॅराडाईज छानच आहे सीमा. भारी चिकन बिर्याणी मिळते. व्हेजच्या (बिर्याणी) फार वाटेला जाऊ नये. सामोसे, व्हेज मंचुरीयन, चिकन ६५ वगैरे पण छान मिळतं. हा अटलांटाचा रिपोर्ट आहे.

परवा गटग , पॅराडाईसमध्ये मध्ये होत. छान वाटल जेवण. डेझर्टनी मात्र माझी निराशा झाली. रसमलाई इतर ठिकाणि मिळते तशी "फेक रसमलाई" च होती.
पण जेवण चांगल होत.

टेक्समेक्स रेसीपीजसाठी हा ब्लॉग पहा. http://homesicktexan.blogspot.com/

ब्ल्यु बॉनेट्स बघायला जायला यावरर्षी जमल नाही. पण ह्या ब्लॉगवर आहे फोटो. खरच स्प्रिंगमध्ये टेक्सास फार सुंदर असतं. (ऑफकोर्स अ‍ॅलर्जीज सोडून.)

मी एग बिर्याणी घेतेली होती आणि चिवा/दिवीजाने व्हेज. पण दोन्हीची चव सेमच होती. मला खर सांगायचं तर नाही आवडली बिर्याणी. त्यात वालपापडी घातली होती Uhoh
कोणत्याही रेस्टॉरंट्ला २दा संधी द्यायची असा माझा रूल आहे त्यामुळे अजुन एकदा जाइन मी. मग ठरवेन ये की ने ते.

अगदी. घरी पण तेच सांगत होते कि भाज्या कशा नाहीत व्हेज बिर्याणी मध्ये म्हणुन?
पण मला मुळातच बिर्याणी कमी आवडते. त्यामुळ जास्त लक्ष दिलं नाही. पंजाबी भाज्या होत्या बर्‍या खरं.
एकुणच माझ्या US मधल्या रेस्टॉरंट विषयी अपेक्षाच कमी झाल्या आहेत. कुठेही जा , स्टाईल तीच.:( त्यातल्या त्यात बरं म्हणुन खायचं एवढचं.

Irwing भागात कुणी घरगुती पोळ्या/ डबा देणारे माहिती आहेत का? विपू मध्ये किंवा संपर्कातून माहिती ईमेल केली तरी चालेल.

इथे वाचून ह्युस्टन आणि सॅन अन्टोनिओ भटकुन आले. अगो आणि सशल च्या पोस्ट्स चा बराच फायदा झाला.
झेक बेकरी सहिये. केक वगैरे तर मस्तच. पण एक अफलातुन चविचे फरसाण सारखे मस्त झणझणित स्नॅक्स मिळाले. आणि चिझ बिस्किट्स (गार्लिक यालापिनो) एकदम मस्त चव होती.

ह्या वर्षी पण आम्ही नविन वर्षारंभ सेलिब्रेट करायला ऑस्टीन ला गेलो होतो.
ह्या वेळचं फाइंड म्हणजे स्ट्रीट फूड Happy
साउथ कॉग्रेस रोड वर बरेच निरनिराळे फुड ट्रेलर्स आहेत. त्यात एक डोसा ट्रेलर पण आहे. १ तारखेला नेमके त्यातले बरेच बंद होते पण तरिही जे चालू होते तिथे खायला मस्तच मिळालं.
http://www.nomaddosa.com/

अरे डॅफो, तू जाऊन आलीस त्या बेकरीत ? मस्त Happy आमचे नंतर जाणे झाले नाही ऑस्टिन साईडला आणि मग तिथून हललोच. नॅचरल ब्रिज कॅव्हर्न्स पाहिल्या का ?

येस्स .. तुझं इथे लिहिलेलं वाचुन त्या कॅव्हर्न्स बघितल्याच Happy मस्त अनुभव होता. दोन्ही टूर्स घेतल्या. पण फक्त त्या रांच ला नाही गेलो. फॉसिल रिम जास्त चांगलंय म्हणून Wink

ह्युस्टन पण फिरलो. डाउनटाउन अ‍ॅक्वेरियम बकवास आहे अगदी Uhoh

ह्युस्टन मधे इंडियन सिझलर्स ला गेलो होतो.
सिझलर म्हणून पावभाजी सर्व्ह केली फक्त Lol
पण दुसर्‍या पनीर ची चव मस्त होती एकदम. Happy

मागे एकदा कामानिमित्त ऑस्टीन ला चक्कर झाली. बरोबर गुजराथी कलीग होती तिने एक रेस्टॉ सजेस्ट केलं.तिथे एक मस्त गुजराथी थाळी मिळाली. तिथल्या गुजराथी काकूंनी फार अगत्याने विचारपुस केली, सर्व मेनु फार रुचकर होता.
त्या रेस्टॉ चे नाव विसरले पण त्या काँप्लेक्स मधे एक ईं ग्रो होतं अस पुसटस आठवतय.
आता परत ऑस्टीन ला चक्कर होईल कदाचीत, म्हणून त्या रेस्टॉ चे नाव जर कोणाला गेस करता आलं असेल तर प्लीज सांगा Happy

गौरीने सजेस्ट केलेल्या ह्युस्टन मधील खाण्याच्या जागा.
आ लिंग्ज ( इंडियन चायनीज)
महाराजा भोग ( राजस्थानी थाळी)
थाय कॉटेज
Las cucos(Mexican)
Bj's( American)
Kiran (Indian Exclusive)
Madras cafe - Mid town and sugarland
Annam( South Indian) I 10
Las Farlos( Mexican)Northwest
El Ranchos (Mexican)Katy
Bombay pizza

अजून एरिया स्पेसिफिक आठवले की सांगते. ही आम्हाला आवडलेली रेस्टॉरंट्स. फूड क्वालिटी कन्सिंटंट आहे.
मिसळ , कोल्हापूरी नॉनव्हेज खायचे असेल तर माझ्या घरी मोस्ट वेलकम स्मित

मंदार ने लिहिलेली माहिती:

वरच्या गौरीच्या लिस्टमधे भरः

नीताज आणी लंडन सिझलर्स - ही दोन्ही शेजारीच आहेत, दोन्हीकडे जेवण मस्त.
बाँम्बे टू बिजींग - देसी चायनीज
ब्लू नाईल - इथिओपियन रेस्टॉरंट. बाहेरुन फार किरकोळ वाटेल पण तसं नाहीये, मस्त आहे एकदम. माझ्या एका इथिओपियन मित्रानीच रेकमेंड केलं होतं.
Straits - सिंगापूरीयन रेस्टॉरंट. तिथेच Ruggles Green पण चांगलं आहे. संध्याकाळी जायला मस्त - माहौल चांगला असतो.
dgn factory - याचं नाव आधी डोसा फॅक्टरी होतं, बर्‍याच प्रकारचे डोसे मिळतात.
पाँडीचेरी कॅफे - जरा वेगळ्या प्रकारचं रेस्टॉरंट.

Hello All
We are considering moving to Austin from California. I have 2 boys of 7 yrs and 2 yrs. I would like to know about good school district and affordable housing.

It would be great if I can talk to "Maaybolikar" who is in Austin.

Thank you in advance.

डिसेंबर च्या सुट्टीमधे ३-४ दिवस ऑस्टिनला जायचा प्लॅन करतो आहेत. ऑस्टिनला काय आहे बघण्यासारखे? आणि तिथल्या कोणत्या एरियामधे हॉटेल घ्यायचे हे कोणी सांगू शकेल का प्लीज?
थॅन्क्स!

Pages