न बघता फारवर्ड

Submitted by Kiranjundre on 18 December, 2017 - 05:46

काय आहे हा चार पाच ओळींचा लेख लिहण्यामागचा उद्देश फक्त एवढाच की आपण काहीही फोरवर्ड करतो न वाचता अगोदर खरे खोटे काय आहे याची शहानिशा करा आणि मग फोरवर्ड करा योग्य माहिती. पटल तर शेयर करा

Group content visibility: 
Use group defaults

आपण काहीही फोरवर्ड करतो न वाचता..>>>>>
sorry बरं का,
माझ्या whtsapp वरून बाहेर जाणारा प्रत्येक मेसेज fact चेक करूनच जातो.
साधारण मोबाईल च्या स्क्रीन वर दिसणारा प्रत्येक मेसेज १००% खोटा आहे , unless proved otherwise या तत्वावर माझा व्यवहार चालतो.
-

  1. " forwarded as received" फुट नोट असलेले मेसेज मी कधीच पुढे पाठवत नाही
  2. - sm होअक्स स्लेयर वगैरे काही वेब साईट यासाठी बर्या पडतात, त्यांना FB वर मेसेज केला तरी ते दाखल घेतात असा अनुभव आहे
  3. - आलेल्या मेसेज मधले साधारण पहिले ४ शब्द गुगल मध्ये type करून " ट्रुथ ऑफ" " reality ऑफ" वगैरे कि वर्डस दिले कि त्या बाबत बरीच माहिती मिळते
  4. - स्पेशली आयुर्वेदाच्या नावावर आलेले मेसेज तसेच अजिबात पुढे पाठवू नयेत, पोट दुखत असेल तर XXX अन्तीबायोतिक घ्या" असे मेसेज आपण fwd करू का?मग जर आयुर्वेद हे औषधशास्त्र आहे तर त्यात एकाच औषध सगळ्या दुखण्यांवर कसे लागू पडेल?
  5. - ऐतिहासिक महापुरुषांचे उद्गार- गुगल कृपेने ते खरेच असे बोलले का ते लगेच कळू शकते

या सगळ्यात भरपूर वेळ जातो, जेव्हा वेळ खर्च करणे परवड नसेल तेव्हा मेसेज fwdन करता गप्प राहतो .

आलेला प्रत्येक मेसेज fact चेक करायची सवय माझ्यात बाणवल्या बद्दल एका पक्षाच्या IT cell चे आभार Happy

वरच्या लिस्ट मध्ये राहिलेल्या काही गोष्टी

  1. आलेला tweet चा स्क्रीन शॉट त्या व्यक्तीने खरच केलेले tweet आहे का ? हे त्याच्या TL वर जाऊन पाहणे.
  2. सेम with FB पोस्ट. ( स्क्रीन शॉट मोर्फ करून tweet करण्याची घटना माबो च्या एका सभासदाबाबतच घडली आहे )
  3. सरकारी धोरणाबाबत आलेले मेसेज शक्य असल्यास सरकारी ऑर्डर बरोबर पडताळून पाहणे ( शक्य नसल्यास किमान २ वर्तमानपत्रांच्या त्या बाबतच्या बातम्या वाचणे )
  4. अमुक अमुक योजना XXX तारखे पासून पहिल्यांदाच सुरु टाईप मेसेज नक्की खोटे असतात. (उदा. ब्लड बँक, लसीकरणा बद्दल एक remindr सर्विस होती ) योजनेचे नाव गुगल मध्य इतकले कि ती कधी पासून अस्तित्वात आहे हे कळते.
  5. गुगल वर reverse इमेज सर्च करणे (मध्यंतरी काश्नीर मध्ये तीरांग्यावर गाय मारले जाण्याचे फोटो वायरल झाले होते, अधिक शोध घेता ते पाकिस्तानातील होते असे कळले ).

असो आठवेल तसे अजून लिहीन

नुकतीच आशीर्वाद आटा प्लाटिक चा वाल्या फॉरवर्ड चे न्युज चॅनल ने व्हेरिफिकेशन केले.
आटा शेवटी तन्य कारण त्यातले ग्लुटेन, प्लास्टिक नव्हे.
मागे अमूल दूधाबद्दल फिरत असलेल्या फेसबुक फॉरवर्ड बद्दल अमूल कंपनीने असाच खुलासा केला होता.

एसएमेस होक्स स्ल्येयर, आल्ट न्युज, होक्स स्ल्येयर , मिथ बस्टर्स अश्या अनेक वेब साइट आहेत चेक करायला. reverse इमेज सर्च हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जर सवय लावुन घेतली तर काहि दिवसातच एखादा मेसेज आला की तो खरा आहे कि खोटा हे लगेच कळु शकते , साधारण अंदाज येतो.

मी फक्त ठराविक जोक्स आणि फोटोज पुढे ढकलते , बाकी लाम्ब लाब पोस्टी , ऑडिओ , फोटोज , व्हिडिओज बर्याच्दा न बघता डीलीट .

मी काहीच पुढे ढकलत नाही

बाकी लाम्ब लाब पोस्टी , ऑडिओ , फोटोज , व्हिडिओज बर्याच्दा न बघता डीलीट .>>> + १२३४५

मी काहीच पुढे ढकलत नाही >> मी पण.

बाकी लाम्ब लाब पोस्टी , ऑडिओ , फोटोज , व्हिडिओज बर्याच्दा न बघता डीलीट .>>> मी पण.

फॉरवर्ड्सच्या फोफावणार्‍या वृक्षाची एक फांदी तरी माझ्यापर्यंत येऊन थांबते.

वाचतही नाही, पुढे ढकलतही नाही. गुड मॉर्निंगचे मुलं, फुलंवाले मेसेजेसही बघवत नाहीत.
फक्त जोक्स आवडीने वाचते आणि जे आवडतात ते शेअर करते.

मी तर जे हाताला लागेत ते फॉर्वर्ड करतो. बरेचदा तर अर्धी अधिक ओळ वाचूनच काय कश्याबद्दल मेसेज आहे हे लक्षात येताच पुढे ढकलतो. वाचणारे वाचतील, त्यातले जे वेचायचेय ते वेचतील. आपण कश्याला ठरवायचे की समोरच्याला काय आवडेल आणि काय नाही हे. प्रत्येकाची आवड वेगळी असते. जे आपल्याला आवडते तेच लोकांना वाचायला ढकलणे हे मला चुकीचे वाटते, एखादा जोक मला पकाव वाटला म्हणून सर्वांनाच पकाव वाटेल असे गरजेचे नाही. हसायचे ते हसतील, नाही तर डिलीट करतील. जर फॉर्वर्ड काही करायचेच नसेल तर मोबाईलमध्ये व्हॉटसप ठेऊच नये.. या ठाम मताचा मी आहे ! Happy

मला आवडलेले जोक्स फॉरवर्ड करतो. अजिबात न आवडलेले लेखही मुद्दाम असे लेख खवचटपणे वाचायला आवडणार्‍यांच्या ग्रूप्स वर फॉरवर्ड करतो Wink (मात्र कधी कधी चुकीच्या ग्रूप वर पाठवले, आणि "कित्ती सुंदर विचार" असे उत्तर आले, असा पोपटही होतो Happy )

कोणाची बदनामी करणारी पोस्ट, कसलेतरी अफाट दावे करणारी पोस्ट असे काही असेल तर सिंबा यांनी लिहील्याप्रमाणे स्वतंत्रपणे खातरजमा करतो. आणि नंतरसुद्धा फॉरवर्ड वगैरे सहसा करत नाहीच. उलट त्या शोधण्यामधून मला सापडलेली माहिती शेअर करतो.

सिम्बा, फा, सायो +१
जोक्स वाचतो आणि कधीमधी पाठवतो पुढे. मुर्ख मेसेज खवचट ग्रुप्सना पाठवतो.
बाकी सिम्बा म्हणतोय तसच, WA आलय म्हणजे ते नक्की खोटंच असणार या ग्रुहितकावर चालतो.

बाकी लाम्ब लाब पोस्टी , ऑडिओ , फोटोज , व्हिडिओज बर्याच्दा न बघता डीलीट .>>> मी पण. >>>> +११११

वॉट्सॅप हे सध्या तरी मला लागलेले एक व्यसन आहे, म्हणजे असे फॉर्वर्ड वगैरे जास्त करत नाही,
जोक्स वगैरे वाचते पण चॅटींगचा वाईट नाद लागलाय. बरेचदा अगदी ठरविले सुद्धा की नाही वापरायचे पण नाही जमत.

माझ्या ओळखीच्या एका मावशींनी मला एका ग्रुप वर अ‍ॅड केले, तीथे त्यांनी काहिही टाकले तर कमेंट करणे मस्ट आहे, नाहीतर त्या मम्मी समोरचं विचारतात की आम्हा जुन्या लोकांचे काही म्हणजे काहीच आवडत नाही न तुम्हा आजकालच्या मुलींना Uhoh

सो, तेव्हापासुन मी त्यांचे काहिही मेसे़ज आले तर एखादी स्मायली टाकयची, एकदा त्यांनी कुठलीतरी लांबलचक स्टोरी टाकली अन मी सवईने न वाचता दोन तीन हसणार्या स्माईलीज टाकल्या तर रीप्लाय आला की कोणीतरी दुरावलेय अन तुला हसु येतेय, अशी कशी तु Angry

बरं तो ग्रुप एक्झीट करायचा म्हटलं तरी त्यांचा स्वभाव चांगलाच माहित आहे मला, अजुन किमान १०-१५ जणांना सांगणार की ही मुलगी किती असंस्कारी आहे वगैरे, तसा त्यांच्या बोलण्याचा मला काही फरक पडत नाही पण मम्मीला नाही आवडणार सो करतेय सहन.

पण सॅड बातमीला अंगठे टाकले तर पंचाईत.
२ ओळी वाचून मगच रिअ‍ॅक्ट करावे.
मी ब्लर फोटो डाउनलोड न करता 'अरे वा, सुंदर आहे तुझ्या घरचं दिवाळी डेकोरेशन, मला पण करायचंय' वाला प्रतीसाद दिला आणि तो स्कॉच बीअर वगैरे सर्व तीव्र लिकरांचा डेकोरेशन चा फॉरवर्डेड फोटो होता. Happy

पण सॅड बातमीला अंगठे टाकले तर पंचाईत.
>>>>
नमस्कार टाकायचा.

अवांतर - अंगठा टाकला, नमस्कार टाकला हे काय मराठी शब्द फेकले जात आहेत ईथे..
अंगठा दाखवला, नमस्कार मारला.. असे हवे ना ते

सिम्बा, फारेण्ड +२

मी कधी कधी काडी टाकायला फॉर्वर्ड करतो. Wink

तसेच फारच संसर्गजन्य फॉर्वर्ड्स / जोक्स आले तर कधी कधी त्यांचा समाचार घेतो, मूड असेल तर.
उद्देश त्या फॉर्वर्ड / जोकचा समाचार घेणे असतो, पाठवणाऱ्याचा नाही, पण बरेचदा पाठवणाऱ्याला ते लागते, तेव्हा ताशेरे ओढल्या जातात / कोणी हिरमुसतात. तेव्हा जरा सावधगिरीने करावे लागते.

मी देखील काहीही forward करत नाही, उलट WhatsApp वर आला आहे म्हणजे 100% खोटाच असणार या तत्त्वावर चालतो.
कालचेच उदाहरण,
एका मित्राने एक image forward केली ज्यात फेब्रुवारी 2018 हा एक अत्यंत (!) विशेष महिना असून ज्यात रविवार ते शनिवार हे सर्वच वार 4 वेळा येत आहेत आणि असा योग म्हणे 823 वर्षातून एकदाच येणार आहे!!! त्यामुळे या महिन्यात खूप लक्ष्मीप्राप्ती होणार आहे!!!!
आता वास्तविक पाहता फेब्रुवारी महिन्यात लीप वर्ष सोडून इतर सर्वच वर्षी 28 दिवस असतात, जे 7 वारांमध्ये एकसमान (4-4) विभागले जातात, त्यामुळे लीप वर्ष सोडून दर वर्षीच फेब्रुवारी मध्ये सर्व वार 4-4 वेळाच येणार!!!

विशेष म्हणजे त्या image मध्ये फेब्रुवारी शब्दानंतरचे वर्ष खोडून बदलले आहे तरीही त्याला काहीही संशय आला नाही. कोणताही विचार न करता forward केले.

ऋन्मेऽऽष नमस्कार "मारला"
हे कुठले मराठी बाबा ??????????
>>>>

हे पीटीच्या शिक्षकांचे मराठी..
ते माझ्या दंडाची बेडकुळी हातात धरून बोलायचे, ऋनम्या लेका हृत्विक रोशनसारखा दिसतोस पण जरा तब्येत बघ तुझी. रोज सकाळी उठल्यावर शंभर जोरबैठका आणि पन्नास नमस्कार मारत जा ...

मी कविता, चारोळ्या, व जोक्स फॉरवर्ड करते. काहीजण संस्कारी विचार टाकतात तेव्हा चीड येते. काही जन रोज सकाळी उठल्या उठल्या आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग टाकून मगच पुढील कामे करतात.