पैसे कुठे इन्व्हेस्ट करू?

Submitted by Ashwini_९९९ on 15 December, 2017 - 05:29

मी मायबोलीची नियमित वाचक आहे आणि हे सदर तर आवर्जून वाचते.
मला गुंतवणुकीबाबत सल्ला हवा आहे.

माझ्या बहिणीला ५०००० रुपये लॉन्ग टर्मसाठी invest करायचे आहेत . FD करायची तिची तयारी नाही. मी सोन्यात पैसे गुंतव असं सांगितलं तिला. पण त्यालाही ती तयार नाही.

अजून काही option आहेत का ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुक करू शकता; बॅलन्सड; टॅक्स सेव्हर अशा पर्यायांमध्ये थोडे थोडे गुंतवा; एकदम सगळे एकात नको.

Nps

अय्यो भरत मी तेच लिहीणार होते. नैतर एमारेफ एक शेअर घ्या. पैसे कुठे जात नाही.
बिट्कॉ इन,
एक शेअर एमारेफचा
एन पी एस
एच डी एफ सी रिटायरमेंट फंड
चांगले आर्ट पीसेस
ज्वेलरी,
पोस्टल सेव्हिन्ग. मंथली इनकम किंवा इंदिरा विकास पत्र, किसान विकास पत्र.
बाँड्स.
एल आय सी सिंगल प्रि मीअम पॉलिसी.

फक्त कोणत्याही पिरॅमिड स्किम मध्ये गुंतवू नका.

चांगले option दिले आहेत सगळ्यांनी..धन्यवाद... सांगते तिला.... बघू तिला काय पटत ते.

NPS म्हणजे national pension scheme ना ? त्या साठी ५०k बास होतील?
ही माझी शंका आहे बरं का .
मी ऐकलंय कि किमान १ लाख तरी गुंतवावे लागतात.