पुनश्च एकदा बिटकॉइन

Submitted by कूटस्थ on 25 November, 2017 - 13:44

मध्यंतरी इथे बिटकॉइन बद्दल माहिती देणारे आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारे धागे निघाले होते. त्यामध्ये बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलन हे गुंतवणुकीसाठी योग्य कि अयोग्य यावर बरीच चर्चा देखील झाली. अनेकांचे मत सावध पवित्र्यामुळे म्हणा, अपुऱ्या कायदेशीर प्रणाली अथवा मान्यतेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या जोखीम मुळे म्हणा, हे बिटकॉइन किंवा बाकी डिजिटल चलन गुंतवणुकीसाठी प्रतिकूलच होते. इथे काय, अगदी जगभरात मोठ्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची मते बिटकॉइन च्या भविष्याविषयी परस्पर विरोधी होती. काहींनी आपली प्रामाणिक मते दिली (जसे कि बिल गेट्स), तर काहींनी त्याच्या भविष्याच्या किमतीबाबत थोडी अतिरंजित मतेही दिली ( २०२० मध्ये १ बिटकॉइन ची किंमत ही १ मिलियन डॉलर तर काहींनी ५मिलियन डॉलर होईल असे सांगितले). काही प्रतिष्ठित व्यक्तींनी चक्क याला scam ठरवले (त्यातले बरेच जण banker होते आणि त्यांचे मत हे व्यावसायिक हितसंबंधामुळे biased होते). एकीकडे चीन सारख्या देशांनी बिटकॉइन ची देवाणघेवाण बंद करून बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर एकीकडे जपान आणि इतर काही देशांनी याला चलन म्हणून मान्यताही दिली.
कोणतीही नवीन गोष्ट आल्यावर त्याला विरोध होणं साहजिकच आहे. अगदी पहिली रेल्वे धावली तेंव्हा अनेकांनी तो चेटूक असल्याचा संशय व्यक्त केला. इतके लांब कशाला, काही वर्षांपूर्वी कॉम्पुटर, इंटरनेट याच्या sustainability बद्दलदेखील अनेक प्रश्न उठवले गेले होते. तसेच बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनाचे आहे. खरं तर जालावर बिटकॉइन, ब्लॉकचेन याबद्दलची प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल थोडेसे जाणून घेतल्यावर कळेल कि या तंत्रज्ञानात प्रचंड क्षमता आहे (निदान माझे तरी असे मत झाले आहे).
उगाचच कायदेशीर मान्यता आणि चलनाच्या तांत्रिक बाबी , उपयुक्ततेबद्दलच्या शंका कुशंका यांना फाट्यावर मारून ज्यांनी केवळ गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले आणि यामध्ये योग्य वेळी गुंतवणूक केली त्यांचे अभिनंदन ! यामध्ये जोखीम आहे हे नक्की परंतु शेवटी जोखीम कशात नसते? अगदी रस्त्यावरून चालण्यात देखील जोखीम आहेच म्हणून काही आपण बाहेर जाणं सोडत नाही. शेवटी महत्वाचे आहे ते जोखीम आपल्या क्षमतेप्रमाणे व्यवस्थितपणे हाताळणे.
काहीही असो, हा लेख लिहिताना १ बिटकॉइन ची किंमत $८७०० इतकी पोहोचली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने म्हणाल तर वर्षभरात किंमत साधारण ८ पट झालीये. अनेक विरोधांना सहजपणे पचवून बिटकॉइन चा वारू चौफेर दौडतो आहे आणि त्याला थांबवणं आता सहज शक्य राहिलेलं नाही.
बिटकॉइन किमतीबद्दल थोडक्यात सांगायचे झाल्यास हाथी चले बाजार और कुत्ते भोंकें हजार !

नोट: वरील लेखाचा हेतू हा बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलनात कोणालाही सल्ला देण्याचा किंवा गुंतवणूक करण्यास उद्दीपित करण्याचा नाही. प्रत्येकाने योग्य अभ्यास करून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा ही विनंती.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

सट्टेबाजीला ऊत आलेला आहे, बिटकॉइनला अतिउत्साहात अ‍ॅसेटचा दर्जा मिळत असल्याने (जो फंडामेंटली चुकिचा आहे). तुमच्याकडे डिस्पोजेबल फंड्स असतील आणि शॉर्टटर्म मध्ये खुप पैसे कमावण्याची/गमावण्याची तयारी असेल तर बिंधास्त उतरा. गुड लक!

The way its going up in short time makes me stay away from it.
May be I am way too cautious. May be I will regret in my 60s..
But my mind keeps saying loud "NO" most of the times.

रिस्की इन्वेस्टमेन्टचा चा एकच सिम्पल फंडा आहे- Invest that you can afford to lose. भविष्यात फायदा झालाच तर आपण जिंकतोच परंतु तोटा होऊन इन्वेस्टमेन्टची किंमत अगदी शून्य झाली तरी आपण हरणार नाही कारण इन्व्हेस्ट करताना आपण ती शक्यता गृहीत धरलेली असतेच.

माझ्या माहीती नूसार अजून तरी बिटकॉइन च्या नफयावर कर नाही. सध्यातरी तो कर प्रणालीच्या बाहेरच आहे

तसेच बिटकॉइन संकल्पनेचा निर्माता ( सातोशी? ) आपली खरी ओळख लपवून आहे. तो जो कोणी आहै तो स्वता मात्र ह्यातून गबर झाला आहे है खरे

कूटस्थ एक शंका

सध्या बिटकॉइन मध्ये असलेला पैसा ज्याला अजून तरी मान्यता नाही आणि सामान्य अर्थ व्यवस्थेतील पैसा ह्या दोन समांतर अर्थव्यवस्था होतील का? म्हणजेच सामान्य अर्थव्यवस्थेतील पैसा हा बिटकॉइन मध्ये परिवर्तित होऊ शकतो ना? उदा भारताच्या दृष्टीने विचार केल्यास भारतात सुमारे संमजा 100000 बिटकॉइन आहेत आणि त्याची किम्मत समजा प्रत्येकी रुपये 100000 आहे तर 10000 गुणीले 100000 पैसे सामान्य अर्थव्यवस्थेतून बाहेर जाणार नाहीत का,? आणि त्यामुळे सामान्य अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही का ( येथे मूळ उद्देश्य बिटकॉइन holding gain साठी साठवणे हाच असणार ना ना की वस्तू विकत घेणे)

भविष्यात बिटकॉइन ज्याला मान्यता नाही हा समांतर अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे राष्ट्राच्या सामान्य व्यवसथेला बाधा आणणे है त्या त्या देशाच्या दृष्टीने ( कदाचित देशद्रोहाचा गुन्हा ठरू शकतो) तसे झाल्यास बिटकॉइन कधीही पडू शकतो)

केदार१२३,
तुमच्या वरच्या प्रश्नाद बिटकॉईन बदलुन, कोणतीही ईंपोर्ट केलेली वस्तु घाला जसे की गाड्या, संगणक, कपडे, दागिने ई. आणि तो प्रश्न स्वतःलाच विचारा. काय उत्तर येते?

,
तुमच्या वरच्या प्रश्नाद बिटकॉईन बदलुन, कोणतीही ईंपोर्ट केलेली वस्तु घाला जसे की गाड्या, संगणक, कपडे, दागिने ई. आणि तो प्रश्न स्वतःलाच विचारा. काय उत्तर येते?>>>
ह्या सगळ्या स्थावर मालमत्ता आहेत जे पैसे मूळ ह्या ना त्या स्वरूपात आर्तव्यवस्थेत राहतात

बिटकॉईन मध्ये जे पैसे आहेत ते सामान्य अर्थव्यवस्थेत कसे राहतात ते कृपया समजवा

तसेच बिटकॉईन मध्ये पैसे गुंतवणूक ही जास्त करून holding gains साठीच आहे ना

ह्या सगळ्या स्थावर मालमत्ता आहेत जे पैसे मूळ ह्या ना त्या स्वरूपात आर्तव्यवस्थेत राहतात
>>
दुस-या देशात विकत घेतलेल्या वस्तुचे मुळ पैसे आपल्या देशात कसे राहतात? (त्यावअरचा टॅक्स हे काही "मुळ पैसे" नव्हे)

ह्या व्यवहारात रुपया आणि डॉलर ची देवाणघेवाण कशी होते? FEMA चे उल्लंघन होत नाही का?
Uhoh

लेख आणि चर्चा दोन्ही इंटरेस्टिंग !
आजच्या लोकसत्ता मधल्या एका सामान्य माणसांना कळेल अश्या भाषेतल्या लेखाची लिंक इकडे देऊन ठेवतोयः-
https://www.loksatta.com/arthbhan-news/indias-central-bank-warns-beware-...

केदारजी इथे समांतर अर्थव्यवस्था तयार होत नाही. बिटकॉइन हे शेयर, ऑइल, सोने किंवा इतर करन्सी सारखेच exchange वर ट्रेड केले जातात. ह्या ट्रेडिंग साठी लागणारी जी महत्वाची सुविधा म्हणजेच ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ते देशानुरूप वेगळे आहे. त्यामुळे समजा मला भारतात राहून बिटकॉइन विकत घ्यायचे आहे तेंव्हा मी जेथून ते विकत घेईन तो विकणाराही भारतीय नागरिक असण्याची जास्त शक्यता आहे. विकतानाही हाच नियम लागू असेल. विकताना किंवा विकत घेताना मला भारतीय चलनाचा वापर करणे सध्या तरी अनिवार्य आहे. तसेच बिटकॉइन चा एक चलन म्हणून अजून वापर सुरु झाला नसल्याने तो रुपया मध्ये बदलून (किंवा रुपया बिटकॉइन मध्ये बदलून) घ्यावा लागतो त्यामुळे अर्थव्यवस्थेतेतील पैसा हा वापरला जातोच.
गुंतवणूक ही जास्त करून holding gains साठीच असली तरी प्रत्येक जण कायमस्वरूपी बिटकॉइन घेऊन ठेवणार नाही. सध्या बिटकॉइन विकत घेणारे जास्त आहेत त्यामुळे किंमत वाढत आहे परंतु त्याचबरोबर विकणारे देखील आहेतच त्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैसा अर्थव्यवस्थेत राहतो.

<रिस्की इन्वेस्टमेन्टचा चा एकच सिम्पल फंडा आहे- Invest that you can afford to lose. भविष्यात फायदा झालाच तर आपण जिंकतोच परंतु तोटा होऊन इन्वेस्टमेन्टची किंमत अगदी शून्य झाली तरी आपण हरणार नाही कारण इन्व्हेस्ट करताना आपण ती शक्यता गृहीत धरलेली असतेच.>
मी याला इन्व्हेस्टमेंटपेक्षा सट्टा किंवा स्पेक्युलेशन म्हणेन.

हा धागा वाचल्यावर गुंतवणुकीसंबंधीचे याआधीचे तुमचे दोन धागे पाहून नवल वाटलं.

हे अवांतर आणि वैयक्तिक आहे, त्याबद्दल क्षमस्व.

भरतजी मी एक गोष्ट नमूद करायला विसरलो की कोणतीही गुंतवणूक ही प्रथम आपल्या परीने सांगोपांग अभ्यास करूनच करावी कि नाही हे ठरवावे. माझा वर सांगण्याचा उद्देश - गुंतवणुकीत रिस्क असली तरीही जर potential दिसत असल्यास तेवढीच करावी जिच्या बुडण्यामुळेही आपल्यावर कमीत कमी परिणाम होईल हा होता.

या विषयावर हा एकच धागा चर्चेकरता वापरू या!
बिट कॉइन ( किंवा इतर कोणतीही गुंतवणूक, लॉटरी, सट्टा) या मधून आलेला फायदा टॅक्स मध्ये दाखववाच लागेल व कर भरावाच लागेल.

मी याला इन्व्हेस्टमेंटपेक्षा सट्टा किंवा स्पेक्युलेशन म्हणेन.
>> अगदी अगदी. तेच म्हणतोय. मटका लावण्यापेक्षा वेगळं काहीच नाही. धागालेखक इन्वेस्टमेंट व जुगार यातला फरक करु शकत नसल्याने गोंधळले आहेत.

नानाजी, इन्वेस्टमेंट व जुगार यातला फरक मला माहित आहे. मी केलेली बिटकॉइन ची इन्व्हेस्टमेंट ही त्यामागची टेकनॉलॉजी, त्याचा भविष्यात असलेला उपयोग हे सर्व जाणून केलेली होती. कदाचित मी IT मधला असल्याने म्हणा, अथवा बाकी काही, परंतु ब्लॉकचेन टेकनॉलॉजी आणि त्यावर आधारित applications हे पुढे बऱ्याच काळासाठी राहणार आहेत असे मला वाटते. त्यामुळे बिटकॉइन मधील माझी गुंतवणूक ही मी गुंतवणूक समजतो ना कि जुगार. प्रत्येक गुंतवणुकीत रिस्क असतेच तशी यामध्ये देखील आहे. परंतु केवळ रिस्क असल्याने गुंतवणूक जुगार ठरत नाही. कारण १००% रिस्क फ्री गुंतवणुकीचे पर्याय अत्यंत कमी आहेत. आणि पर्यायाने त्यावरील रिटर्न्स देखील.

असो. हे माझे मत झाले. ज्यांना बिटकॉइन बद्दल अथवा त्याच्या टेकनॉलॉजी बद्दल व उपयुक्ततेबद्दल फारशी माहिती अथवा विश्वास नाही त्यांना यामधील गुंतवणूक ही जुगार अवश्य वाटेल. माझे एवढेच म्हणणे आहे की बिटकॉइन अथवा इतर तत्सम डिजिटल करन्सी, त्याची टेकनॉलॉजी, त्यामध्ये चाललेली development, मोठमोठ्या कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट (उदा Microsoft, Deutsche Bank, Axis Bank etc) आणि त्याच्या फ्युचर पोटेन्शिअलचा एकदा जरूर कानोसा घ्यावा आणि मग जुगार मटका की गुंतवणूक हे स्वतः ठरवावे

>>परंतु ब्लॉकचेन टेकनॉलॉजी आणि त्यावर आधारित applications हे पुढे बऱ्याच काळासाठी राहणार आहेत असे मला वाटते. त्यामुळे बिटकॉइन मधील माझी गुंतवणूक ही मी गुंतवणूक समजतो ना कि जुगार. <<

ब्लॉकचेन मुळे बिटकॉइन उजेडात आली हे बरोबर परंतु यापुढे ब्लॉकचेन किलर टेक्नॉलजी असल्याने ती बिटकॉइनला तारुन नेईल असा तुमचा समज असेल तर तो चूकिचा आहे. ब्लॉकचेन हि निव्वळ लेजर किपिंग सिस्टम आहे आणि तिच्या डिस्ट्रिब्युटेड केपबिलिटिज मुळेच ती पॉप्युलर होत आहे. तुम्हाला या टेक्नॉलजीत गुंतवणुक करायची असेल तर काहि कंपन्या (आय्बीएम, डिलॉय्ट) प्रायवेट ब्लॉकचेन (डिएलटि) निर्मितीत (ब्लॉकचेन अ‍ॅज ए सर्विस) आहेत; त्याचाहि विचार करा...

ब्लॉकचेन मुळे बिटकॉइन उजेडात आली हे बरोबर परंतु यापुढे ब्लॉकचेन किलर टेक्नॉलजी असल्याने ती बिटकॉइनला तारुन नेईल असा तुमचा समज असेल तर तो चूकिचा आहे --> राजजी यावर अधिक खुलासा वाचायला आवडेल.
ब्लॉकचेन चा खुबीने उपयोग करून बिटकॉइन ने पेमेंट सिस्टिम आणली आहे. ब्लॉकचेन मध्ये होणारे सर्व उपयुक्त बदल पर्यायाने बिटकॉइन मध्ये येतीलच. फक्त ब्लॉकचेन चा उपयोग करून आलेल्या इतर करन्सी शी त्याची स्पर्धा आहे आणि वर एका कॉमेंट मध्ये म्हणल्याप्रमाणे सध्या तरी बिटकॉइन ला अर्ली बर्ड चा advantage आहे.

>>ब्लॉकचेन मध्ये होणारे सर्व उपयुक्त बदल पर्यायाने बिटकॉइन मध्ये येतीलच.<<

नॉट नेसेसरी. मी वर म्हटल्याप्रमाणे प्रायवेट ब्लॉकचेन डेवलप्मेंट स्टेजला आहेत. लिनक्स प्रमाणेच ब्लॉकचेनहि ओपन सोर्स अस्ल्याने पुढे लिनक्सचं काय झालं हे इथे लिहित नाहि; ब्लॉकचेनचं हि तेच होईल. बिटकॉइनचे कर्ते-धर्ते त्यांचा संपुर्ण ओरिजिनल ब्लॉकचेन प्लॅट्फॉर्म माय्ग्रेट करण्याचा विचारहि करणार नाहित.

क्रिप्टोकरंसी हि जस्ट एक युज केस आहे जी ब्लॉकचेन टेक्नॉलजीत वापरली जातेय. अशा अनेक युज केसेस विचारात घेतल्या जात आहेत ज्यांची फंक्शनॅलिटी युनिक आहे/असु शकते...

नुस्तं राज म्हणा, राजजी नको... Happy

लिनक्स प्रमाणेच ब्लॉकचेनहि ओपन सोर्स अस्ल्याने पुढे लिनक्सचं काय झालं हे इथे लिहित नाहि
>>
लिनक्सच काय झाल? ओपन सोर्स असल्याने म्हणजे काय? ओपन सोर्स असणे गुन्हाय का?

सगळ चांगलच चाललय की. Diversity is strength. आता तर तुमच्या बिल भाऊंनी पण लिनक्स फाईंडेशन जॉईन केली, लिनक्स बनवायला घेतली हे लिनक्सचेच यश आहे. आता त्यांच्या वयक्तीक संगणकावर युबुंटु असल्याचा स्क्रिनोशॉट व्हायरल झाल की झाले! अजुन काय पाहिजे? बॉलमर साहेब म्हणाले होते की लिनक्स कॅन्सर आहे म्हणुन?

Former Microsoft chief Steve Ballmer once considered Linux users a bunch of communist thieves and saw open source itself as a cancer on Microsoft's intellectual property. But no more.

Ballmer: I may have called Linux a cancer but now I love it

http://www.zdnet.com/article/ballmer-i-may-have-called-linux-a-cancer-bu...
Rofl Rofl

तुम्ही कधी ईन्स्टॉल करताय? की एक्स्पी वरच आहात अजुन?

>>ओपन सोर्स असणे गुन्हाय का?<<

अभि_नव - काम डाउन, दीर्घ श्वास घेत १-१० मनांत मोजा. (हल्ली विनाकारण थयथयाट करायची फॅशन आली आहे काय?) Angry

अरे विषय काय आणि तुमचे प्रश्न काय? वर मी केलेला लिनक्सचा उल्लेख कोणत्या संदर्भात आहे ते परत एकदा वाचुन त्याचा अर्थ समजतोय का बघा? आणि ज्या लिनक्सचं नांव काढ्ल्याने एव्हढे हायपर होताय ती मूळात युनिक्सची क्लोन आहे. तेंव्हा या अनुषंगाने युनिक्सची काय/कशी वाटचाल झाली त्याचाहि अभ्यास करा. मग मी काय म्हणतोय ते कळेल...

BTC and ETH आता घेण्याच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. LitCoin पण आज 400 च्या वर गेला.

Ripple बद्दल मत काय आहे? Ripple कडे सेबी सारखे खरे कस्टमर्स आहेत.

Pages