लाईट(वीज) शिवाय ५ ते ६ दिवस

Submitted by आरू on 30 November, 2017 - 04:11

सूचना- या घटनेत कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.

रविवार, दि. १९ नोव्हेंबर, २०१७. रात्री झोपताना जुना मोबाईल
स्वीच ऑफ करून चार्जिंगला ठेवला, ही तशी नेहमीची सवय. आमच्या इथल्या लाईटवर माझा विश्वास नाही म्हणून. तेव्हा नवीन मोबाईलची बॅटरी ९०% चार्ज होती, म्हणून तो तसाच ठेवला.

सोमवार, दि. २० नोव्हेंबर २०१७. सकाळी जाग आली तेव्हा समजलं की पहाटे कधीतरी लाईट गेली होती. म्हटलं असेल काही छोटा-मोठा प्रॉब्लेम. तसंही भारनियमनाची वेळ नाही थोड्यावेळाने येईल लाईट. नुसती अपेक्षा दुसरं काय.
दुसर्या दिवशी जुना मोबाईल स्वीच ऑफच होता. तशी त्याची गरजही नव्हती. त्या दिवशी नवीन मोबाईलवरती दृश्यम् ( अजय देवगणचा) बघितला. फॅन वगैरे नाही पण आधी अर्धा चित्रपट बघितला होता बरा वाटला म्हणून राहिलेला पण बघितला. झालं यात बॅटरी गेली नं ५०% च्या खाली. लाईट येण्याची अपेक्षा अजुनही होतीच. त्यात काॅल्स, व्हाटस्अप, माबो करण्यात बॅटरी अजूनच खालावत गेली. पूर्ण दिवस गेला लाईट मात्र आली नाही. त्या रात्री नवीन मोबाईल पण बंदच ठेवला मग.

मंगळवार, दि. २१ नोव्हेंबर २०१७. सकाळी मोबाईल ऑन केला, तोपर्यंत बॅटरी १५% वर आली होती. म्हणूनच मला अॅण्ड्राॅइड फोन अजिबात आवडत नाहीत. किती लवकर बॅटरी जाते त्याची आणि वरून उगाच हे अपडेट करा न् ते अपडेट करा. असो, आता घेतला तर घेतला काय करणार.
त्या दिवशी समजलं, सोमवारी पहाटे डी.पी.( ट्रान्सफार्मर) जळला म्हणून लाईट गेलीय. छान!!! अजून बघ दृश्यम् असं म्हणून स्वतःचाच राग आला. ट्रान्सफार्मरमध्येच बिघाड असल्याने इतक्यात लाईट येईल याची शाश्वती राहिली नाही. म्हणून त्याच दिवशी मोबाईल बाबांकडे दिला त्यांच्या ऑफिसात चार्ज करायला. बाबा संध्याकाळी घरी आले तेव्हा फोन ७८% चार्ज झाला होता. एक-दोन काॅल करण्यात 4% गेली. रात्री जुन्या फोनवरुन व्हाटस्अप वरती अर्धा तास घालवला, तिथे गेलंच पाहिजे असा काही नियम नाही पण सवय मग काय करणार? तशी त्याची बॅटरी लेवल बर्यापैकी होती म्हणून. यासाठी नवीन मोबाईल चालू ठेवला इंटरनेटसाठी, एवढ्यातच बॅटरी ७१% वरती आली होती. त्या रात्री झोपताना दोन्ही फोन बंदच केले.

बुधवार, दि. २२ नोव्हेंबर, २०१७. लाईट तर आलीच नाही पण त्यासाठी कुणी काही प्रयत्नही केला नाही. त्या दिवशी दोन्ही फोन जपूनच वापरले. नवीन फोनचा फक्त हॉटस्पॉट आणि कॉल्ससाठीच वापर केला.

गुरुवार दि. २३ नोव्हेंबर, २०१७. परिस्थिती आजूनही तीच. नाही म्हटलं तरी जुन्या फोनची बॅटरी ४०% तरी होती, तरीही त्या दिवशी बाबांकडे तो फोन दिला. जास्त काम असल्याने त्यांनी थोडा वेळच फोन चार्जवरती ठेवला, ८४% झाली होती बॅटरी. त्या रात्रीही व्हाटस्अप आणि माबोवरती जाणं झालंच, अर्थातच नवीन मोबाईलच्या नेटचा वापर होत होता. त्यामुळे त्याची प्रत्येक वेळी २%-३% नी बॅटरी कमी होत होती.

शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर, २०१७. जुन्या मोबाईलच्या बॅटरीची स्थिती चांगली असली तरी नवीनची बॅटरी बरीच घटली होती, म्हणून त्या दिवशी दिवसभरात दोन्ही फोन बंद करून ठेवले. कॉल करायचा असेल तेव्हा चालू करून कॉल झाला की लगेच बंद असा कार्यक्रम सुरू झाला होता. या फोन चालू- बंद करण्यात सुद्धा २% बॅटरी कमी होत होती, पण पर्याय नव्हता.
माबोकर अंबज्ञ यांनी यू ट्यूबवरील लिंक दिली, लाईट नसताना मोबाईल चार्ज कसा करायचा? त्याची चित्रफित होती ती. तो व्हिडिओ बघण्यात २% बॅटरी गेलीच. म्हटलं चला बसल्या-बसल्या प्रयोग करून बघायला हरकत नाही. व्हिडिओ बघताना नवीन चार्जर घ्यायचा का असा विचार मनात आला तोच धस्स् झालं, लगेचच नवीन चार्जरला प्रयोगांतून वगळण्यात आलं. मग जुना चार्जर, ब्लेड्स, काडीपेटीतील काड्या आणि घरात व्हिनेगर नाही म्हणून मीठाचं पाणी.( अशक्य आहे मी पण.) प्रयोग केला पण यशस्वी झाला नाही, काय माहित चार्जर खराब होता की मीठाचं पाणी नडलं. पण ठरवलंय कधीतरी नवीन चार्जर आणि व्हिनेगर आणून प्रयोग करून बघायचा, खात्री केली पाहिजे ते मूर्ख बनवतात की खरंच फोन चार्ज होतो ते.

शनिवार, दि. २५ नोव्हेंबर, २०१७. सकाळ पासून दोन्ही फोन बंद. नाही म्हणायला दोन-तीनदा चालू केले होते. तिकडे ट्रान्सफार्मरचं काम करत आहेत असं समजलं, पण लाईट येईल तेव्हा खरं असंच वाटलं. नवीन मोबाईल १३% आणि जुना ६२% इतका चार्ज असतात एकदाची लाईट आली आणि काय आनंद झाला म्हणून सांगू. नशीब चार्जिंगशिवाय मोबाईलवरती डब्बा है डब्बा असं म्हणायची वेळ आली नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विक्षिप्त मुलगा छान माहिती.

तो प्रयोग दाखवताना आमच्या बाईंनी सोडीअम जास्त टाकला, त्यामुळे जास्त 'हायड्रोजन' वायू तयार होऊन वक्रनलीकेच्या तोंडाशी पेटती काडी नेताच मोठ्ठा स्फोट झाला होता!
>>>
बाईंची तब्येत कशी आहे आता?

अंतरंगी, मला बेसिक मोड मिळाला. धन्यवाद. Happy

मानव पृथ्वीकर, :D. नातवंडांना गोष्टी सांगण्यापर्यंत मी काही राहणार नाही. मग डायरीच लिहून ठेवते, आवडीने आजीच्या गोष्टी वाचल्या तर वाचल्या. Lol

हो अदिति, जरा जास्तच दिवस झालं.

विक्षिप्त मुलगा, योग्य माहिती. माझी एक बहिण इलेक्ट्रिकची आहे. ती diode समजू शकते. आणि इतके दिवस लाईट गेली तर कोणताही इन्व्हर्टरची बॅटरी इतके दिवस टिकणार नाही त्यामुळे सौरऊर्जाचा जास्त पाॅवरचा प्लांट परवडेल.

च्रप्स Lol

ऋन्मेष, बाई चांगल्याच असणार म्हणून तर विक्षिप्त मुलगा रिस्क घ्यायला सांगत आहेत. अर्थात विशेष काळजी घेऊन.

मला वाटले लाईटशिवाय दैनंदीन व्यवहाराचे हाल झाले असणार. पण सध्याचा ज्वलंत विषय आहे तर मोबाईलची बॅटरी Lol
छान
पूर्वी अशी खुप दिवस लाईट जायची नशिब तेव्हा मोबाईल नव्हते.

@मेधा, कोणी काय लिहायचं ते लेखक ठरवेल ना! ज्याच्या त्याच्या वयानुसार कशाला प्राधान्य द्यायचं ते जो तो ठरवत असतो. आपण कशाला काही सुचवायला जायच आणी फुकट्ची चिड्चिड करून घ्यायची!
त्यावरही काही महत्वाचे बिझनेस डील्स, पेशंटचे फोन असलं काहि नाही. नुसतं व्हॉट्स अ‍ॅप वर टाइम पास .
सगळेच थोडे डॉक्टर असतात ....आणी फक्त first world चे problems problems असतात असं काही आहे का?
@साहिल शहा तुमचा प्रतिसाद relevant आहे.

मेघा, पंडित दादा थँक्स. Happy
जागू Lol
anjut धन्यवाद Happy
माझी एक बहिण इलेक्ट्रिकची आहे. ती diode समजू शकते. >>> बहीण इलेक्ट्रिक ची म्हणजे काय?>>> maitreyee, हा प्रतिसाद बर्याचजणांनी वाचला असेल. कदाचित त्यांना समजलं असेल मला काय म्हणायचं होतं ते... तुम्हाला खरंच समजलं नाही की समजूनही विचारताय माहित नाही. तर ते typing prediction मुळे तसं झालय. माझी बहिण electrical engineering ची विद्यार्थिनी आहे, तिचा डिप्लोमा झाला आहे आणि सध्या डिग्रीचं पहिलं वर्ष आहे तिचं. अपेक्षा आहे आता तुम्हाला समजेल.

छान लिहिले आहे.

पण मलासुद्धा शीर्षक वाचुन ५-६ दिवस वीज नसताना काय काय हाल झाले असतील वगैरेचे वर्णन असेल असे वाटले
पण सध्याचा ज्वलंत विषय आहे तर मोबाईलची बॅटरी >> Lol

.आणी फक्त first world चे problems problems असतात असं काही आहे का? >> सेल फोनची बॅटरी चार्ज न होणे हाच मुळात फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम नाहीये का

सेल फोनची बॅटरी चार्ज न होणे हाच मुळात फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम नाहीये का
>>>
नक्कीच नाही. आज आमच्या शेतावर काम करणार्‍याचा मोबाइल बंद झाला चार्जींग नसल्यामुळे तर अधिक गैरसोय होते. बहुसंख्य छोट्या उद्योजकांचा (माळी, प्लंबर, सुतार, शेतमजूर/बांधकाम मजूर) धंदा, रोजी-रोटी मोबाईलच्या दळणवळणावर अवलंबून आहे. धंद्याच्या ठिकाणी जेनसेट लावून काम होते, अनेक धंद्यांना वीज लागत नाही. पण मोबाईल पाहिजे नाहीतर निरोप, जुळणी होत नाही.
अगदी विद्यार्थ्यांनासुद्धा स्पर्धा-परिक्षा तयारी, अभ्यास याला मोबाईल गरजेचा आहे. एकवेळ अभ्यास दिवसभरात उरकता येईल. मात्र मोबाईल नसेल ऑनलाइन अप्डेट्स, महत्त्वाची माहिती, डिस्टंट कोर्सेसचे अपडेट्स मिळत नाहीत. भारतात "लॅपटॉप-पीसी + इंटरनेट" हे पेनट्रेट किती झाले व मोबाईल फोन व त्यावरच्या इंटरनेटचा उपयोग आता किती होतो याची आकडेवारी असेल तर नक्कीच मोबाईल फोन 'गरज' आहे हे लक्षात येईल.

पवनपरींना मोबाईलची गरज उद्योगधंद्यासाठी होती का नाही ते माहिती नाही व त्यावर ही टिप्पणी पण नाहिये. मात्र हा फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम नक्की नाही.

टवणेसरांशी सहमत.
प्रथमदर्शनी मलाही प्रथमजगतसमस्या वाटलेली, (खरे तर लेख फारच कॅज्युअली लिहिल्यासारखा आहे म्हणून तसे वाटत असेल,) पण मोबाइल नसेल किंवा साधं इन्टरनेट कनेक्टीवीटी नसेल तर माझी काय अवस्था होते हे आठवून गप्प बसलो.

पण मोबाइल नसेल किंवा साधं इन्टरनेट कनेक्टीवीटी नसेल तर माझी काय अवस्था होते हे आठवून गप्प बसलो.
>>>>
+७८६

माझ्या "माझं बाळ"
https://www.maayboli.com/node/64672
या लेखामागची प्रेरणा हाच लेख होता
हा लेख वाचूनच मलाही माझ्या बाळाबद्दल लिहावेसे वाटले Happy

मोबाईल ईंटर्नेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले अहेत हे कबूल करण्यात काही लोकं उगाच कमीपणा बाळगतात. मोबाईलचे गुलाम, ईंटरनेटचे व्यसन वगैरे .. उगाच आपले शब्द बनवून ठेवले आहेत आणि मग लाजतात.

Pages