मनोविकार उपचारांचे (psychiatric treatment) माझे अनुभव

Submitted by अक्कलशून्य on 29 November, 2017 - 07:30

साधारणतः २००६ साली मी कॉलेजमधून पास आऊट झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो.इंटरव्ह्युसाठी लांब ठीकाणी जायचे ,तिथे जाण्यासाठी तयारी करायची ,इंटरव्युला सामोरे जायचे असा प्रकार सुरु होता.इंटरव्युला जाताना सुर्वातीला मजा वाटायची नंतर त्याचे दडपण यायला सुरवात झाली. कुठे इंटरव्यु असेल तर तिथे आपले काय होइल ,नोकरी मिळाली तर आपल्याला झेपेल की नाही याचं प्रचंड मानसिक दडपण येऊ लागले.
अशातच मला एके ठीकाणी नोकरी मिळाली ,पहील्या आठवड्यतच माझ्यावर बरीच जबाबदारी सोपवण्यात आली ,ती पुर्ण करताना प्रचंड घाबरलो होतो.आपल्याला नक्की काय होतेय हे कळत नव्हते.कसाबसा दोन महीने टिकुन राहीलो पण मनावर सतत दडपण असायचे,श्वास लागायचा पॅनिक ॲटेक वगैरे यायला लागले म्हणून नोकरी सोडून सातार्यात परत आलो.स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे अशी घरी थाप मारु घरीच बसून राहीलो.मधे अधे आमच्या शेतावर जायचो.या प्रकारात तीन चार वर्ष घालवली.या काळात प्रचंड निराश असायचो,पण मित्र असायचे त्यामुळे वेळ जायचा.यथावकाश मित्र त्यांच्या नोकरीधंद्यात स्थिर स्थावर झाले, मी मात्र जागेवरच बसून राहीलो ,थिजल्यासारखा,पण विचारचक्र चालू असायचे ,mind clarity चांगली होती.घरचे शेत असल्याने लक्ष घालत होतो.
मित्रांची लग्न कार्ये ,चुलत मावस भावडांची आर्थिक झेप याच्याशी तुलना करत आपल्या आयुष्यात काहीच हॅपनींग नाही,आपण काहीच कामाचे नाही आहोत हा विचार बळावत गेला.something is terribly wrong with me ह्या निर्णयाप्रत आलो(ही चूक होती)
आता काय करायचे?
मग एक दिवस तुळईला गळफास घेण्याचा बालिश प्रयत्न केला.धाडकन खाली कोसळलो ,काही कळतच नव्हते काय होतेय ते!
घरचे धावत आले,बापाने दोन ठेऊन दिल्या ,आईने समजूत काढली की तुला मानसोपचाराची गरज आहे आपण तिकडे जाऊ,घरच्यांनी मग मला सायकीॲट्रीस्टकडे नेले .त्यांनी मला सांगितले की मेंदूमध्ये रासायनिक बदल घडल्याने असे होते.आपण औषधे चालू करुयात मग तू एकदम ठणठणीत बरा होशील,हे साल होते २०१२.ट्रीटमेंट सुरु झाली.तीन प्रकारची औषधे सुरु झाली antidepressants, antipsychotics,benzodiazepines,.पहील्या सहा आठ महीन्यांमध्ये प्रचंड झोप लागण्याशिवाय काही बदल दिसला नाही.मध्यंतरीच्या काळात दोन तीन वर्ष ट्रीटमेंट चालू ठेवली.दिवसभर गुंगीशिवाय काही फरक पडत् नव्हता.वजन ६० किलोवरुन ७५ किलो झाले ,नुसती खाखा सुटलेली असायची.डॉक्टरांना सांगितले तर फरक पडेल, ही औषधे लाँग टर्म घ्यावी लागतात असे उत्तर मिळाले.लाँग टर्म म्हणजे कीती काळ याचं उत्तर मिळत नव्हते.डॉक्टरची फी,अत्यंत महगडी औषधे घरच्यांखातर घेत राहून zombie अवस्थेला पोचलो.सगळ्या इमोशंस ब्लंट झाल्या होत्या,अगदी पोटंट असलेला सेक्श्युल इंटरेस्टही .ट्रीटमेंट आधी ज्या गोष्टीत रस वाटायचा तोही बंद झाला.मग ठरवले इंटरनेटच्या आधारे नक्की आपल्या मेंदूशी काय खेळ चालू आहे ते शोधुन काढुयात.
गुगलला जाऊन psychiatry असा सर्च देऊन पुर्ण व्हायच्या आतच गुगलने psychiatry is a hoax असे सजेशन दिले.त्यावर क्लीक केल्यावर ढीगभर वेबसाईटी ओपन झाल्या .त्यातल्या रिलायबल वाटणार्या बुकमार्क केल्या व अभ्यास सुरु केला.Joanna moncrieff ह्या ब्रिटीश सायकीट्रीस्टचे लेख इंटरेस्टींग वाटले.ते वाचायला घेतले.यावरुन मनोविकारशास्त्र हे drug centred असुन ते disease centred असल्याचे खोटे सांगत कसे रेटून नेले आहे ते समजले.इतर आधुनिक वैद्यकशाखा या disease centred ॲप्रोच वापरतात,म्हणून यशस्वी आहेत. ,सायकीॲटीस्ट्र आणि फार्मासिट्युकल जायंट्सने drug centred असलेल्या या मनोविकारशास्त्राला disease centred असल्याचे भासवून प्रचंड नफा कमावून कीती आयुष्य उध्वस्त केली असतील याची कल्पना न केलेली बरी

https://joannamoncrieff.com/2013/11/21/models-of-drug-action/

.मनोविकारशास्त्राला disease centred असल्याचे सिद्ध करण्यासाठी अगदी पेड रिसर्चही प्रसिद्ध केले जातात.
सायकीॲट्रीचे काही शेंडा बुडखा नसलेले ग्रह आहेत .त्यातला एक आहे नैराश्याच्या बाबतीत .

Serotonin hypothesis of depression -- सायकीॲट्रीनुसार नैराश्य वा डिप्रेशन हे मेंदूमधील सेरोटोनीन नावाच्या neurotransmitter वा संदेशवहनाचे काम करणार्या रसायनाच्या कमतरतेने येते.याला कोणताही आधार नाही .ही चक्क ढगात मारलेली गोळी आहे.मेंदूत कीती सेरोटोनिन आहे हे मुळात मोजताच येत नाही.अशी कोणतीही आधुनिक पद्धत नाही कि ज्याने मेंदूतील सेरोटोनिनची पातळी मोजता येईल.रक्तात कीती सेरोटोनीन आहे हे मोजता येते पण मेंदूत कीती आहे हे मोजता येत नाही.त्यामुळे सेरोटोनीन हाय्पोथिसिस हे एक मिथक आहे.
सेरिटोनिनची मेंदूतील पातळी वाढवण्यासाठी selective serotonin reuptake inhibitorअर्थात SSRI नावाची औषधं दिली जातात.यानुसार मेंदूत पुन्हा शोषले जाणारे सेरोटोनीन थांबवता येते व मेंदूतील सेरोटोनीन ची पातळी वाढते व नैराश्य कमी होते.याला कुठलाही ठोस आधार मिळालेला नाही.सेरोटोनीन ची पातळी वाढत असेलही पण त्याने नैराश्य कमी होते हे सिद्ध झालेले नाही.काही double blind clinical trials मध्ये SSRI व placebo यांचा परिणाम जवळपास सारखाच होता.
Peroxetine नावाचे एक अत्यंत सिडेटिव्ह औषध मला चालू होते ते याच antidepressants प्रकारात येते.माझे वजन वाढायला हे औषध कारणीभूत आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4471964/

Antipsychotics-- मनोभ्रम(Psychosis) ,bipolar disorderआणि छिन्नमनोवस्था(schizophrenia) या रोगांवर antipsychotics दिले जातात.सेरोटोनीन व डोपामाईन या मेंदूतील रसायनांचा ताळमेळ सुधारणे हे या औषधाचे काम मानले जाते.पण याच्या उपयुक्ततेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.रुग्णाला मदत होण्याऐवजी यातून नुकसानच अधिक होते हे लक्षात आले आहे.हे औषध घेतल्याने मेंदूतील उती(tissues)नष्ट होतात व मेंदूचे आकारमान लहान होते.खास करुन विचार करणारा मेंदूचा भाग (prefrontal cortex)ह्रास पावत जातो ,याला brain atrophy म्हणतात.खास करुन मेंदूतील ग्रे मॅटर वॉल्युम कमी होत असल्याचे आढळुण आले आहे.स्कीझोफ्रेनिक जे antipsychotics घेतात त्यांची तुलना औषध न घेणार्या स्कीझोफ्रेनिक पेशंटशी केली असता ,औषध न घेणारा वर्गाचा आजार आटोक्यात असल्याचे दिसून आलेले आहे.त्यामुळे antipsychotics घेणे खुपच धोक्याचे आहे.या औषधामुळे टाईप टू प्रकारचा डायबेटीस होण्याचा धोका अधिक वाढतो.

https://www.theguardian.com/commentisfree/2008/mar/02/mythoftheantipsych...

Benzodiazepines--- ही मायनर ट्रॅंक्युलायझर्स म्हणजे गुंगी आणणारी औषधे आहेत .दोन आठवड्यांनंतर प्रचंड डिपेंडंस येतो.रुग्णाला सतत गुंगीत ठेवणारी औषधे आहेत.यापैकी मला clonazepam नावाचे औषध चालू होते .ज्याची खरे तर काहीच गरज नव्हती.पण gross scientific misconduct चे जे लाखो बळी आहेत त्यापैकी मी एक आहे.

माझ्या अल्पमतीनुसार मी psychiatry नावाच्या आधुनिक वैद्यकशास्त्रातील मिथकाचा बळी ठरलो होतो.एप्रिल २०१७ नंतर मी ट्रीटमेंट थांबवली.पण जो डॅमेज झाला आहे तो न भरुन येणारा आहे.जवळपास लाख दिडलाखाची औषधे खाउन हाती काहीच लागले नाही ,फसवले गेल्याची भावना मनात आहे.जे लोक मनोविकारत्ज्ञाकडे जाण्याचा विचार करत आहेत त्यांना माझ्या अनुभवाचा उपयोग व्हावा ही भावना ठेऊन हे लिहले आहे.
जो पर्यंत मनोविकारासाठी disease centred ट्रीटमेंट विकसीत होत नाहीत तो पर्यंत मनोरुग्णांची परवड होत राहील.इतर आधुनिक वैद्यकीय शाखांची भ्रष्ट नक्कल करण्याच्या नादात psychiatry ही शाखा बदनाम होत चालली आहे.सध्या पुन्हा ट्रीटमेंट आधीचं व्यक्तीमत्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ,जे फार चांगलं होतं असं नाहि पण आजच्या इतकं वाईट नक्कीच नव्हते. या दोन शब्दांचा कुणाला फायदा झाल्यास आनंदी वाटेल.
योग्य ठीकाणी लिंक्स दिल्या आहेत,त्या जरुर वाचाव्यात.विशेषतः Joanna moncrieff यांचे लेखन जरुर वाचावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अल्पमतीनुसार मी psychiatry नावाच्या आधुनिक वैद्यकशास्त्रातील मिथकाचा बळी ठरलो होतो.>>>>> प्लीजच असं नका बोलू.बरेच जण सुधारलेले माहित आहेत. होमियोपॅथी चालू करा.अर्थात आधीची अ‍ॅलोपथी औषधे डॉच्या सल्ल्याशिवाय बंद करु नयेत.

प्लीजच असं नका बोलू.बरेच जण सुधारलेले माहित आहेत. होमियोपॅथी चालू करा.अर्थात आधीची अॅलोपथी औषधे डॉच्या सल्ल्याशिवाय बंद करु नयेत.
Submitted by देवकी on 29 November, 2017 - 15:37
>>
withdrawal symptoms येऊ नयेत म्हणुन डॉ.च्या सल्ल्याने डोस रीडक्शन करुन औषधे बंद केली आहेत.
काही लोक सुधारले असतीलही पण माझ्या अल्पमतीनुसार psychiatry हे होमिओपथी इतकेच बेसलेस आहे.
कुणाला तरी फायदा व्हावा म्हणून लिहिले इतकेच.

पटते आहे. तुम्हाला शुभेच्छा. कुणाशी तुलना करुन स्वतःचे मनस्वास्थ्य गमावु नका. आर्थिक, सामाजिक पातळीवर वर पोचलेल्या लोकांनीही काही ना काही गमावलेलेच असते. Everybody is fighting his/her own battle. All the best!

मी डॉक्टर नाही की स्वत: पेशंट नाही, पण पेशंट्सची काळजी घेण्यातून मी पाहिलेले थोडेफार:

मानसोपचारातील बऱ्याच औषधांचा शोध योगायोगाने लागला आहे. मानसोपचार खूप क्लिष्टही असतात. औषधांचे साईड इफेक्ट्स प्रचंड असतात. ओसीडी, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसॉर्डर्स यांत थिन बाउंडरीज आहेत त्यामुळे पेशंट कधी यातिल कधी त्यातिल सिम्प्टॉम्स मधुन शिफ्ट होउ शकतो. औषधे सूट होण्याचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे सुरवात करुन परिणाम बघुन औषध बदलणे होते. तसेच मल्टिपल ड्रग्ज ट्रिटमेंटपण देतात.

OCD ला SSRI चा उपयोग बऱ्यापैकी होतो.
डिप्रेशनसाठी प्रमाण कमी आहे.

Atypical antipsychotics स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसॉर्डर मधील psychosis फेज मध्ये बऱ्यापैकी काम करतात. या औषधांच्या वापरामुळे टाईप - २ डायबेटिस होण्याची संभावना बरीच आहे, दीर्घ वापराने होण्याचे प्रमाण खूप आहे. तसेच यातिल काही औषधांमुळे मासीक पाळी बंद होणे आणि सेक्स्युअल डिसफंक्शन वगैरे साईड इफेक्ट्सही होतात जे बहुत करुन ते औषध बंद झाल्यास / डोस कमी होउन मेन्टेनन्स डोस पर्यंत खाली आल्यास रिव्हर्स होतात. ( उदा. Amisulpride) अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याने ॲक्युट फेज नंतर औषधे बदलता येतात.

बऱ्याच schizotypal / delusion disorder पेशंट्सना अँटिसायकोटिक ड्रग्जचा विशेष फायदा होत नाही. (त्यातिल सायकोसिस फेज वगळता)

एकंदरीत साईड इफेक्ट्समुळे पेशंट्स बरेच बेजार असतात. पण बऱ्यापैकी फायदा होउन पेशंट्स आपले दैनंदिन जिवन विस्कळीत न होता जगु शकतात, नोकरी धंदा करु शकतात. इफिशियन्सी बरीच कमी होते. ही औषधे सुरु ठेवून सोबत काही ठरावीक आयुर्वेदिक औषधे जोडीने घेतल्यास त्याची मदत होउ शकते.

एक सूचना: हा लेख वाचून कुणी आपले स्वत:चे / आपल्या पाल्याची औषधे स्वत:हून बंद करु नका.
करायची असल्यास लेखकाने केल्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखी खालीच करावीत. ही औषधे फक्त बंद करायचीच असा अट्टाहास असला तरी ती safely बंद करण्यास सहा महिने ते एक वर्ष लागू शकते अन्यथा रिलॅप्स खूप नुकसान करु शकतो.

मानव पृथ्वीकर प्रतिसाद आवडला.पण अनेक स्टडीजमधे प्लासिबो अगैन्स्ट ही औषधे फक्त थोडीशीच सरस आढळली आहेत.परत tolerance डेव्हलप होणे हे कॉमन आहे.मला ट्रीटमेंट च्या सुरवातीला छान झोप लागायची नंतर झोप लागणे कमी झाल्यावर peroxetine 12.5 mg वरुन 25 mg केले गेले ,पण फरक पडला नाही.
गुंतागुंतीचा मामला आहे सगळा,असो.

लेख माहितीपूर्ण आहे. प्रतीसादही.
यावर तुम्ही माहिती मिळवत आहातच, कदाचित तज्ञ बदलून जास्त पॉझिटिव्ह फरक पडू शकेल असे वाटते.

(अवांतरः नोकरी न मिळण्यामुळे नैराश्यः प्लिज असा विचार नका करु.पुणे मुंबई कोअर मध्ये न राहणे, इन्टर्व्यु साठी लांबच्या गावी जावे लागणे हा स्ट्रगल बरेच जण करतात. भारतातल्या इंडस्ट्रिज ४-५ मोजक्या शहरांमध्ये एकवटल्या असण्याच्या रचनेचा हा दोष आहे.(मला आणि मैत्रिणीला एका इन्टर्व्यु मधून तो घेण्यापूर्वीच 'तुम्ही लांबून येता, पावसाळ्यात उशीर कराल' म्हणून बाहेर काढल्याचं आठवतं.)
जॉब थ्रेट थोडं सिनियर झाल्यावर प्रत्येक फिल्ड मध्ये येतोच.आम्हाला अधून मधून 'कोबॉट्स तुमचे जॉब घेतील' वाली लेक्चर मिळत असतात.

प्रेशर न घेता परफॉर्म केले तर जास्त चांगले काम होऊ शकते असे वाटते.बहुधा पुरुषांना हे नोकरी मिळवण्या टिकवण्याचे प्रेशर आपल्या सामाजिक घडणीमुळे जास्त येत असावे.पण हल्ली लोक नोकरी मिळत नाही/करायची नाही म्हणून नवे पर्याय शोधताना बरेच दिसतात.अगदी माणूस पूर्णवेळ घरी असला तरी फार कोणी बॉदर करत नाही.वर्क फ्रॉम होम, फ्रीलान्सर असेल वगैरे वगैरे म्हणून.)

तुम्ही एकदम सायकाय्ट्रिस्ट कडे जाण्याचे काही कारण होते का? एरव्ही समुपदेशकाकडे अधी जाणे होते. जो कोणतेही औशध देऊ शकत नाही. बर्याच टेस्ट्स केल्यावर व समुपदेशननेही जर फरक पडला नाही तर सायकाय्ट्रिस्टचा रस्ता धरला जातो. जर चांगला असेल तर तोही लगेच पोतेभर औशधे देत नाही. असो. तुम्ही बुट्स्ट्रॅप धरून यातून बाहेर येऊ शकलात तर उत्तमच पण एखाद्या उत्तम समुपदेशनाचा मदतीचा हात मिळाला तर जरूर पहा. मिनिमल औशधे व स्वकष्ट + समुपदेशन ह्याने जिद्दीने नैराश्याशी झुंजत मिनिंगफूल आयुश्य उभ करणारी मंडळी पाहीली आहेत. अगदी आत्महत्येचा प्रय्त्न करून सावरलेली सुद्धा. तेन्व्हा ऑल द बेस्ट

मानव प्रतिसाद आवडला.
अक्कलशून्य तुम्ही औषधे घेतलीत ते मान्य पण बरोबरीने समुपदेशनही गरजेचे आहे.
मी सुद्धा मानसोपचार घेतले आहेत, अगदी लॉन्ग टर्म औषधे सुद्धा, पण जोडीने समुपदेशनही त्यामुळे मला तोटा कधी झाला नाही, उलट फायदाच झाला.
तुमचा डॉक्टर (जो औषध देतो तो) आणि समुपदेशक (जो डॉक्टर नसला तरिही चालतो पण वेल ट्रेन्ड हवा त्यावर सर्व अवलंबून असते. फक्त औषधे कधी कधी मदत करत नाहीत. पण कमी क्लिष्ट अडचणींमध्ये फक्त समुपदेशनाची मदत होऊ शकते.
वर मानव नी लिहिल्या प्रमाणे मानसोपचार ही एक अत्यंत क्लिष्ट उपचार पद्धती आहे. आपण सहजगत्या बोलून जातो की व्यक्ती तितक्या प्रकृती मग न दिसणार्‍या मेंदूत काय चालले आहे किंवा तो कसा विचार करतोय्/करू शकतो यावर अभ्यास करून औषधोपचार निर्माण करणे हे जिकिरिचे काम आहे.
समुपदेशन आणि मानसोपचार घेण्यासाठी पेशंटचा ही मोठा सहयोग्/सहकार्य लागते.

पेशवा ,समुपदेशन होईल अशी मान्सिकता असावी लागते,दुर्दैवाने मी खुप अडेल स्वभावाचा आहे म्हणून सरळ ड्रग ट्रीटमेंट चालू केली.
दक्षीणा,धन्यवाद.

सायकियाट्रिस्ट मधे दोन पंथ आहे एकाचा भर औषधांवर असतो. दुसरा सायकोथेरपी वर अधिक भर देतो. ते एकमेकांवर टीका करत नाहीत.

तुमचा अनुभव इथे दिलात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला मनापासून शुभेच्छा.

यावरुन मनोविकारशास्त्र हे drug centred असुन ते disease centred असल्याचे खोटे सांगत कसे रेटून नेले आहे ते समजले. <<<
जो पर्यंत मनोविकारासाठी disease centred ट्रीटमेंट विकसीत होत नाहीत तो पर्यंत मनोरुग्णांची परवड होत राहील. <<<

या दोन वाक्यांनी माझा गोंधळ झाला आहे. कृपया स्पष्ट कराल का?

इथे मी लिहू का नको अश्या द्विधा मनस्थीतीत होतो

गेली तीन वर्षे माझ्यावर मानसोपचार तदन्याचा उपचार चालू आहे. सुरुवातीला मी एका सुप्रसिद्ध मानसोपचार तदन्या कड़े उपचारा साठी गेलो. काहीएक फायदा झाला नाही फक्त पैसे बुडाले. मग सासऱ्यांच्या सांगण्या वरुन दुसऱ्या कमी प्रसिद्ध वैद्या कड़े गेलो. थोड़ा फायदा झाला. सलग तीन वर्षे गोळ्या घेतो आहे. गोळी एक दिवस घेतली नाही तर कहर होतो. जबरदस्त भीती वाटते. घरा बाहेर जायलाही घाबरतो. रात्र भर झोप लागत नाही आणि लागलीच तर भयानक स्वपने पडतात त्यापेक्षा झोपुच नये असे वाटते. जबरदस्त नैराश्य येते. गोळ्या कधी बंदच होणार नाही असे वाटते. आणि गोळ्या शिवाय जगणे अशक्य आहे. वर कुणीस सांगीतल्या प्रमाणे efficiency खुप कमी झाली आहे. जैसे तैसे करूंन जेमतेम अर्धा दिवस काम करु शकतो

मायबोली आहे म्हणून है सगळे शेयर करू शकतोय